बातम्या

Trending:


संजीव सिंह हा सराईत पेपरफोड्या

पाटणा/रांची; वृत्तसंस्था : नीट परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी झारखंड पोलिसांनी शनिवारी देवघर येथून 6 जणांना ताब्यात घेतले. ताब्यातील सर्व जण बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील आहेत. बिहारमधील पाटणा येथे या सगळ्यांना नेण्यात येईल. झारखंडमधूनच नीटचा पेपर फुटल्याचा पुरावा उपलब्ध झाला आहे, असे बिहार आणि झारखंड दोन्ही राज्यांच्या पोलिसांकडून सांगण्यात आले. प्रकरणाचा मास्टरमाईंड तसेच बिहारमधील नालंदा महाविद्यालयातील कर्मचारी संजीव सिंह …


Maharashtra Assembly Monsoon Session : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता

Maharashtra Assembly Monsoon Session : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आजपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन, मुंबईतील विधान भवनात एकूण १३ दिवस चालणार कामकाज,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल होणार सादर. विरोधकाकडून आज पुन्हा विधानसभेत नागपूर अमरावती महामार्गावरील चामुंडी ब्लास्टचा मुद्दा मांडला जाणार. चामुंडी एक्सप्लोझिव्ह प्रायव्हेट मिलिटेड कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार लक्षवेधित मांडणार. सातत्याने या ठिकाणी स्फोट होत असतानाही सरकारने याप्रकरणात कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याचा आरोप. मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना शासनाची आणि कंपनी व्यवस्थापनाकडून ठोस मदत मिळवून देण्याची मागणी. दुसरीकडे विधानपरिषदेत सतेज पाटील आणि काँग्रेस नेत्यांकडून शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा मांडला जाणार. शक्तिपीठ महामार्गाला स्थानिकांचा विरोध असल्याने सरकारने त्या अनुषंगाने कार्यवाही आणि उपाययोजना करावी अशी लक्षवेधित मागणी.


Nandurbar News: जातीचा दाखला अवघ्या ५०० रुपयात, नंदुरबारमधील धक्कादायक प्रकार उघडकीस

Fake Caste Certificates: नंदुरबार जिल्ह्यात ५०० रुपयात जातीचे दाखले देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. नुकत्याच शाळा महाविद्यालये सुरू झालीत. विविध योजनांसह विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता असते. याचाच फायदा सायबर चालक घेत अवघ्या काही वेळातच हुबेहूब दाखला तयार करून देत नागरिकांची फसवणूक करत आहेत.


Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

भारत आणि दक्षिण आफ्रिक संघांत आज अंतिम सामना,भारतीय वेळेनुसार आज रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार. विधीमंडळात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरुन घमासान..निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजनेची घोषणा, विरोधकांचा आरोप तर लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक हक्कभंग आणण्याच्या तयारीत महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा...मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं स्पष्टीकरण... अधिवेशनात नीटच्या मुद्द्यावरून अधिवेशनात विरोधक आक्रमक...नीट पेपर फुटी प्रकरणी राज्यात स्वतंत्र कायदा करण्याची मागणी...तर अर्थसंकल्पातील योजनांवरून सरकारविरोधात घोषणाबाजी राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय. तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी नियमावली ठरवू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. विधानसभेलाही लोकसभेसारखेच निकाल लागतील, शरद पवारांना विश्वास, काँग्रेसमुक्तीची घोषणा देणाऱ्या मोदींनी भाजपच्या जागा किती घटल्या बघावं असा सल्ला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंची पक्षातून हकालपट्टी.. कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी तीन दिवस पोलीस कोठडी वायकरांचा मेहुणेा मंगेश पंडीलकरकडं होतं अपक्ष उमेदवाराच्या पोलिंग एजंटचं आयडी कार्ड, पंडीलकरनं दोन उमेदवारांचं ओळखपत्र वापरल्याचा शाह यांचा आरोप.... नीट पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढली...लातूरसोबत बीडचंही कनेक्शन... आरोपींकडे सापडलेल्या १४ एडमिट कार्ड पैकी ७ कार्ड बीडच्या विद्यार्थ्यांचे असल्याचं समोर नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर पालिकेचा हातोडा.. अतिक्रमण विभागाकडून वसंत गितेंचे संपर्क कार्यालयावर कारवाई..प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना कारवाई करत असल्याचा गीतेंचा आरोप अरविंद केजरीवालांना पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल अटकेत.. गंगानदीची पाणीपातळी वाढल्याने उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये पूरस्थिती.. अनेकांची घरं पाण्यात, तर गाड्याही गेल्या वाहून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान, तर तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पहिला मुक्काम आळंदीत माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी.. वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांचा फुगडीचा फेरा.


कारी बदरी जवानी की छटती नहीं…

वयरोधक अर्थात ‘अॅन्टीएजिंग’ उत्पादनांची जगभरातली उलाढाल २०३० पर्यंत १२० अब्ज डॉलरवर जाण्याची अपेक्षा आहे. याची भारतातील बाजारपेठही १२ टक्के दरानं वाढेल, असा अंदाज आहे.


Alandi Dnyaneshwar Maharaj Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान;देवाची आळंदी नादावली

Alandi Dnyaneshwar Maharaj Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान;देवाची आळंदी नादावली अलंकापुरीत वारकरी दाखल झाला की आधी इंद्रायणी काठ गाठतो. आज तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. त्यामुळं याच इंद्रायणी काठी आज वारकऱ्यांची मांदियाळी पहायला मिळत आहे. वारकऱ्यांनी हे इंद्रायणी काठ कसं फुलून गेलंय आणि याप्रसंगी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने ही कशी खबरदारी घेतली आहे सुरक्षेच्या कारणास्तव NDRFचं पथक आळंदीत दाखल, कोणताही अनुचीत प्रकार घडूनये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी.संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार, आळंदीत वारकऱ्यांची मोठी गर्दी, विठू नामाच्या गजरात वारकऱ्यांचा उत्साह . अलंकापुरीत वारकरी दाखल झाला की आधी इंद्रायणी काठ गाठतो. आज तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. त्यामुळं याच इंद्रायणी काठी आज वारकऱ्यांची मांदियाळी पहायला मिळत आहे. वारकऱ्यांनी हे इंद्रायणी काठ कसं फुलून गेलंय आणि याप्रसंगी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने ही कशी खबरदारी घेतली आहे


Raj Thackeray: आयुष्यात कुणाला घाबरता? राज ठाकरेंचं उत्तर ऐकून सगळेच भारावले

मुंबई: तडाखेबाज भाषण आणि बेधडक निर्णय शैलीमुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. विरोधकांना किंवा सरकारच्या निर्णयावर घेऊन ठाकरी शैलीत फटकेबाजी करणारे राज ठाकरे आयुष्यात खरंच कुणाला घाबरतात का, असा सवाल थेट एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दिलेलं उत्तर ऐकून सगळेच भारावून गेले आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी...


Baramati Crime: ३७ लाखांच्या बैलावरुन राडा, बारामतीत गोळीबार, मध्यरात्री थरार

Pune Crime: पुण्यातील बारामतीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारातून एका जणावर गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला आहे.


Ahmednagar Nilesh Lanke Banner : अहमदनगरमधील निलेश लंकेंच्या कार्यालयासमोर इंग्रजीतून बॅनर

Ahmednagar Nilesh Lanke Banner : अहमदनगरमधील निलेश लंकेंच्या कार्यालयासमोर इंग्रजीतून बॅनर लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघाची (Ahmednagar Lok Sabha Constituency) जोरदार चर्चा झाली. शरद पवार गटाच्या निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी भाजपच्या सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांचा पराभव केला. सुजय विखेंचा पराभव करुन निलेश लंके हे जायंट किलर ठरले. तर अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा प्रचारही राज्यभरात गाजला. सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर इंग्रजी भाषेवरुन (English Language) टीका केली होती. मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर निलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीत शपथ घेऊन सुजय विखे पाटलांना प्रत्युत्तर दिले होते. आता निलेश लंकेंच्या समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून सुजय विखेंना डिवचले आहे. अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला होता. याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंकेंनी इंग्रजी बोलण्याचे आव्हान दिले होते. याचे पडसाद राज्यभर उमटले होते. निलेश लंके यांनी सुजय विखे यांचे आव्हान स्वीकारले होते. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे. ती शिकायची म्हटल्यास त्यामध्ये काय अवघड आहे, असे प्रत्युतर निलेश लंके यांनी दिले होते. त्यांनतर संसदेत इंग्रजी भाषेत खासदारकीची शपथ घेऊन निलेश लंके यांनी विखे-पाटील यांना प्रत्युत्तर दिले होते.


धगधगते अर्धे शतक

सधन, शिक्षित आणि पुरोगामी स्त्रियांचा सहवास त्यांना लाभल्याने त्यांचे आयुष्य वेगळ्या प्रकारे घडल्याचे सांगतात. आयएएस असलेल्या रॉय यांनी १९७५मध्ये नोकरीचा राजीनामा देत सामाजिक चळवळीत उतरण्याचा निर्णय घेतला.


३१ डिसेंबरची पहाट, शर्मिला ठाकरे सोबत, पण समोर पाहून मी पळ काढला; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!

अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे.या अधिवेशनाला मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक प्रकट मुलाखत दिली.यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या लग्नाआधीच भन्नाट किस्सा सांगितला आहे.ते म्हणाले, लग्नाच्या आधी एका ३१ डिसेंबरला मी आणि शर्मिला, आम्ही एका ठिकाणी फिरायला गेलो होतो.तेव्हा शर्मिला आणि माझ्या प्रेम संबंधांबाबत माझ्या सासऱ्यांना म्हणजे मोहन वाघ यांना माहिती नव्हतं.रात्री अडीच तीनच्या सुमारास मी शर्मिला यांना त्यांच्या घरी सोडायला गेलो.तेव्हा फाटकाजवळ कुणीतरी फिरताना दिसलं, तेव्हा तिने मला तिथे बाबा आहेत, असं सांगितले.ती ३१ डिसेंबरची पहाट होती. त्यावर मी तिला सांगितलं की तिथे बाबा नाही तर वॉचमन आहेत.पण ते शर्मिला यांचे बाबा होतो, तेव्हा घाबरून तिथून पळ काढला, हा आयुष्यातला एकमेव प्रसंक होता.राज ठाकरेंनी हा किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.


वित्तीय तूट वाढली, विकासकामांना फटका

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या विविध घोषणांवर सुमारे एक लाख रुपये कोटी खर्च होणार आहेत.


CM Eknath Shinde on Drugs : ड्रग्जमुक्त शहरं होईपर्यंत कारवाई सुरुच राहणार : एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde on Drugs : ड्रग्जमुक्त शहरं होईपर्यंत कारवाई सुरुच राहणार : एकनाथ शिंदे काल अर्थ संकल्पत अनेक योजना केल्या आहेत लाडकी बहीण, जेष्ठ नागरिक शेतकऱ्यांसाठी सुद्धा निर्णय घेतले प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी मांडली की जेष्ठ नागरिक जे तीर्थ क्षेत्राना जाऊ इच्छितात दर्शन घेऊ इच्छितात... ज्यांना तीर्थ यात्रा परवडणारी नाही त्यांना यांचा लाभ घेता येईल यासाठी मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थ दर्शन योजना आम्ही आज सुरु करत आहोत यासाठी धोरण ठरवलं जाईल शासनच्या माध्यमातून ५ हजार १० हजार लोकांना तीर्थ दर्शन यात्रा घडवली जाईल सर्व धर्मीय हिंदू, ईसाई, शीख, बौद्ध जैन ख्रिश्चन यांच्या धार्मिक स्थळाचा यामध्ये समावेश असेल हज यात्रा तर आधीपासून आहे ऑन शरद पवार पवार साहेब जेष्ठ नेते आहेत पब आणि ड्रग्स ला ते कधी पाठींबा देणार नाहीत पुणे नाही तर संपूर्ण राज्यभरात ड्रग विकणाऱ्यावर सरकार कठोर कारवाई करणार..


Congress: अदानीवरून काँग्रेसकडून मोदी लक्ष्य; ऊर्जा प्रकल्पासाठी चीनच्या मदतीचा आरोप

Narendra Modi: अदानी सोलर कंपनीला मदत करण्यासाठी चीनमधील कामगारांना व्हिसा दिल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी अदानी ग्रुपवरून पुन्हा एकदा मोदींना टार्गेट केले.


काचेचे छत तोडले!

१३ कोटी लोकसंख्या असलेल्या मेक्सिकोत बहुसंख्य कॅथलिक आहेत. देशातील ज्यूंची संख्या जेमतेम ५० हजार. तरीही देशाच्या अध्यक्षपदी क्लॉडिया शेनबॉम या ज्यू महिला निवडून आल्या आहेत.


TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 June 2024 : 10 AM: ABP Majha

TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 June 2024 : 10 AM: ABP Majha विधानसभेलाही लोकसभेसारखेच निकाल लागतील, शरद पवारांना विश्वास, काँग्रेसमुक्तीची घोषणा देणाऱ्या मोदींनी भाजपच्या जागा किती घटल्या बघावं असा सल्ला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस. अर्थसंकल्पावर चर्चा होणार, शेतकऱ्यांसह विविध मुद्द्यांवर आजही विरोधका सरकारला घेरण्याच्या तयारीत उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं वृत्त शिवसेनेचे आमदार विप्लव बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी फेटाळलं,वृत्त खोडसाळपणाचं असल्याचा दावा मुंबईत आज भाजप कोअर कमिटीची बैठक, विधानपरिषदेच्या पाच जागा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीला महत्त्व मुंबईत आज भाजप कोअर कमिटीची बैठक, विधानपरिषदेच्या पाच जागा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीला महत्त्व अजित पवारांनी बोलावली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक, विधानपरिषदेचे उमेदवार अंतिम करण्यासाठी आज देवगिरीवर खलबतं पुण्यातील वानवडीत टँकर चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून अपघात, टँकरच्या धडकेत काही मुलं आणि महिला जखमी ग्रेटर नोएडामध्ये बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळून ६ मुले दबली, तिघांचा मृत्यू, ३ जण जखणी, खोडना गावातील घटना


Husband Killed Wife: व्हिडिओ कॉल जीवावर बेतला, चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवलं

Nagpur Crime: आरोपी विकी विर्क आणि मयत मन्नत कौर यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांचा संसार सुरळीत सुरु होता आणि दोघांना 2 वर्षाचा मुलगा देखील आहे. मात्र विकीला जुगाराचे सवय जडली. त्यात तो मन्नतच्या चारित्र्यावर देखील संशय घेत होता. यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत मन्नत ही विकीपासून दूर तिच्या माहेरी राहत होती.


NEET-PG Exam: NEET-PG प्रवेश परीक्षा स्थगित; परिक्षेच्या 11 तासांपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नुकतंच नीटचा पेपर फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचं पहायला मिळालं. अशातच रविवारी होणारी नीट पीजीची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.


GST Council meet: प्लॅटफॉर्म तिकिटासह रेल्वेच्या सेवांवरील करात सूट, GST परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय, पाहा यादी

GST Council meet: तब्बल आठ महिन्यांनंतर जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. शेवटची बैठक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झाली होती. यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पाहा यादी


घोरण्यावर करा हे 9 घरगुती उपाय

घोरणे ही झोपेशी संबंधित समस्या आहे. घोरण्याचा आवाज नाकातून किंवा तोंडातून येऊ शकतो. हा आवाज झोपल्यानंतर कधीही सुरू किंवा थांबू शकतो.


मुंबईत पावसाची संततधार

मुंबई शहर, तसेच उपनगरांत गुरुवारपासून दमदार पावसाने हजेरी लावली असून शुक्रवारीही पाऊस मुंबई मुक्कामी आहे.


Pune| पुण्यात प्रवाशांसाठी व्हॉट्सअॅप क्रमांकाची सुविधा

Pune Regional Transport Department In Action On Raikshaw And Pickup Ignoring Passengers


गर्दभ आख्यान…

पूर्वी आपण भारतीय आपल्या मागासपणाच्या मासल्यासाठी अमेरिका युरोपसिंगापूरच्या प्रगल्भतेची उदाहरणे द्यायचो. आता उगी विकासाच्या गमजांसाठी पाकिस्तानच्या बुटक्या अर्थव्यवस्थेला तुलनेसाठी धरतो, हे भारतातही गर्दभजमात जोमाने वाढत असल्याचे लक्षण आहे काय?


Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा

Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा पुण्यातील कल्याणीनगर भागात गतमहिन्यात झालेल्या भीषण पोर्शे कार अपघात प्रकरण आणि पुणे ड्रग्जप्रकरणावरुन आज सभागृहात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना पुण्याला उडता पंजाब म्हणणं योग्य नाही, असे म्हटले. तसेच, पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईवरही त्यांनी भाष्य केलं. विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवेदन सादर केल्यानंतर विरोधी पक्षांनी 293 च्या प्रस्तावानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना पुणे अपघातप्रकरणी पोलिसांच्या दोन चुका झाल्याचंही मान्य केलं. विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात बोलताना म्हटले की, आज विरोधकांचा 293 चा प्रस्ताव आहे, ⁠या प्रस्तावामध्ये चंदा लो धंदा दो अशा प्रकारचे वाक्य टाकलं होतं. ⁠मात्र, ते वाक्य का वगळण्यात आलं हे आम्हाला माहीत नाही. ⁠सरकार यावर चर्चा करायला का घाबरते, असा सवाल करत ⁠आमच्या हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. या सभागृहात नियम आहेत, जे काही सभागृहात येणे योग्य नाही ते वगळण्यात आलेलं आहे, ⁠त्यामुळे हे वाक्य मी वगळलेलं आहे, असे स्पष्टीकरण विधानसभा अध्यक्षांनी वडेट्टीवारांच्या प्रश्नावर दिले.


Maharashtra| OBC आरक्षणासंदर्भात आज होणारी सर्वपक्षीय बैठक रद्द

All Party Meet Today For OBC Reservation Cancelled


MHADA Lottery: मुंबईत घर खरेदीचं स्वप्न पूर्ण होणार; म्हाडाच्या लॉटरीचा मुहूर्त ठरला, वाचा कधी सोडत निघणार

MHADA Mumbai Lottery advertisement: मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी लॉटरीचा मुहूर्त ठरला आहे. त्यामुळे आता मुंबईत आपल्या हक्काचं आणि स्वप्नातलं घर घेण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे.


Sharad Pawar Full PC : मोदींच्या 18 सभा, 14 जागी पराभव; काय काय म्हणाले शरद पवार ?

Sharad Pawar Full PC : मोदींच्या 18 सभा, 14 जागी पराभव; काय काय म्हणाले शरद पवार ? राज्य सरकारने आपला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) 28 जून रोजी सादर केला. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने अनेक आकर्षक घोषणा केल्या. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महिला, तरुण, शेतकरी यांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पोकळ घोषणा केल्या आहेत, असा दावा विरोधकांनी केलाय. त्यानंतर आता खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनीदेखील या अर्थसंकल्पावर भाष्य केलं आहे. खिशात 70 रुपये असताना 100 रुपये खर्च कसे करणार? असे शरद पवार म्हणाले. खिशात 70 रुपये असताना.... शरद पवार हे कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी अर्थसंकल्पतील गोष्टी बाहेर आल्या होत्या. विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. प्रत्यक्षात येणार नाहीत अशा गोष्टी अर्थसंकल्पात आहेत, असे शरद पवार म्हणाले. विशेष म्हणजे खिशात 70 रुपये असताना 100 रुपये खर्च कसे करणार? असा खोचक सवालही शरद पवार यांनीक केला. विधानसभा निवडणुकीतही लोकसभेप्रमाणेच चित्र असेल पुढ बोलताना शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव यावरही प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणुकीत आम्ही 48 पैकी 31 जागा जिंकल्या. सरकारने आमचा धसका घेतला आहे. मोदींनी राज्यात 18 सभा घेतल्या. पण सभा घेतलेल्या 14 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. मोदीच्या कामावर जनता खुश नाही, असे शरद पवार म्हणाले. आणीबाणीचा विषय काढणे योग्य नव्हते तसेच, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीचेही चित्र असेल. आमच्या आघाडीत सामूहिक नेतृत्व असेल. सध्या चालू असलेल्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेच्या अध्यक्षांनी आणीबाणीचा उल्लेख केला होता. यावरही शरद पवार यांनी भाष्य केले. लोकसभा अध्यक्षांच्या भाषणातील तो भाग त्यांच्या पदाच्या प्रतिष्ठेला शोभणारा नव्हता. आणीबाणीचा विषय काढण्याची गरज नव्हती. त्या विषयाला आता 50 वर्षे झाली आहेत. इंदिरा गांधी यांनी त्याविषयी दिलगीरीही व्यक्त केली होती. तो विषय काढणे योग्य नव्हते, असे शरद पवार म्हणाले.


Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाअंतर्गत नोकरीची संधी! कसा करायचा अर्ज, पाहा

Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाअंतर्गत कोणत्या पदांवर भरती निघाली आहे याची माहिती इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्यावी.