Trending:


Alandi Dnyaneshwar Maharaj Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान;देवाची आळंदी नादावली

Alandi Dnyaneshwar Maharaj Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान;देवाची आळंदी नादावली अलंकापुरीत वारकरी दाखल झाला की आधी इंद्रायणी काठ गाठतो. आज तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. त्यामुळं याच इंद्रायणी काठी आज वारकऱ्यांची मांदियाळी पहायला मिळत आहे. वारकऱ्यांनी हे इंद्रायणी काठ कसं फुलून गेलंय आणि याप्रसंगी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने ही कशी खबरदारी घेतली आहे सुरक्षेच्या कारणास्तव NDRFचं पथक आळंदीत दाखल, कोणताही अनुचीत प्रकार घडूनये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी.संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार, आळंदीत वारकऱ्यांची मोठी गर्दी, विठू नामाच्या गजरात वारकऱ्यांचा उत्साह . अलंकापुरीत वारकरी दाखल झाला की आधी इंद्रायणी काठ गाठतो. आज तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. त्यामुळं याच इंद्रायणी काठी आज वारकऱ्यांची मांदियाळी पहायला मिळत आहे. वारकऱ्यांनी हे इंद्रायणी काठ कसं फुलून गेलंय आणि याप्रसंगी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने ही कशी खबरदारी घेतली आहे


CCTV Installation Tips: घरामध्ये लावायचाय CCTV कॅमेरा; आधी तपासा 'या' 4 गोष्टी, नाहीतर पैसे जातील वाया

CCTV Camera Installation Tips: आजकाल कामाच्या बदलत्या मागण्यांनुसार अनेकांना दिवसातील अनेक तास घराबाहेर तसेच महत्वाच्या कामानिमित्त काही दिवस शहराबाहेरही रहावे लागते. अशावेळी घरातील आबालवृद्धांच्या सुरक्षिततेतेसाठी आजकाल अनेक घरांमध्येही सीसीटीव्ही लावले जातात. तेंव्हा हे सीसीटीव्ही घेतांना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.


Sindhudurg News : महाराष्ट्राची चेरापुंजी पर्यटकांनी बहरली, आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी

Amboli Ghat Tourist : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी केली आहे.


Advocate Aniket Nikam on IPC : आधी राजद्रोह हा गुन्हा होता, आता तो कायदा नसणार

Advocate Aniket Nikam on IPC : आधी राजद्रोह हा गुन्हा होता, आता तो कायदा नसणार भारतीय न्याय व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी कायद्यात बदल करण्यात आला आहे. जून्या कायद्यात पोलिसांना 15 दिवस कोठडी मिळतं होती आता यात बदल करण्यात आला आहे. आता 15 दिवसांच विभाजन करण्यात आलं आहे. या 15 दिवसांचा वापर पोलीस कधीही करू शकतील. जरी तो न्यायालिन कोठडीत असला तरी पोलीस त्याला पोलीस कोठडीत घेऊ शकतात. आरोपीला जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न होउ शकतो. आधी दहशतवाद असा कोणता कलम नव्हता आता मात्र दहशतवादाशी संबंधित एक कलम यामध्ये घेण्यात आला आहे. आधी राजद्रोह हा गुन्हा होता. आता राजद्रोह हा कायदा नसणार आहे. जन माणसांच्या मनात भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्या स्वरूपाचे कलम आता ऍड करण्यात आले आहेत आता ऑर्गनायझ क्राईमची व्याख्या करण्यात आली आहे. नवीन कायदे माहिती व्हावे यासाठी अनेक व्याख्याने पार पडली आहेत. पोलिसांना देखील याची ट्रेनिंग झाली असणार आरोपीला अटक केल्यानंतर 15 दिवसांचा कालावधी पोलिसांना मिळू शकते. या कालावधीत कधीही पोलिसी पोलीस कोठडी घेऊ शकतात. आता आरोपीला जामीन मिळू नये यासाठी पोलिस अशी भूमीका घेऊ शकतात की दोषारोप पत्र दाखल व्हायच्या शेवटच्या दिवशी देखील पोलीस पुन्हा पोलीस कोठडी घेउ शकतात. याचा दुरुपयोग होऊ शकतो. त्यामुळें न्यायाधिशांची जबाबदारी वाढणार आहे. सरकारी अधिकाऱ्यावर गून्हा दाखल करायचा असेल तर त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागत होती. आता ज्यावेळी परवानगी मागितली जाईल आणि 120 दिवसांत जर परवानगी मिळाली नाही तर असं ग्राह्य धरल जाईल की सरकारची परवानगी आहे आणि अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला जाईल मॉब लिंचींग बाबत देखील नव्याने तरतूद करण्यात आली आहे एक स्पेसिफिक कलम यामध्ये आणण्यात आला आहे. पाच व्यक्ती किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या समूहाने जातीच्या धर्माच्या लिंगाच्या जन्म ठिकाणाच्या कारणावरून जर त्याला मारला असेल तर त्यावर मॉब लींचींगचा खटला दाखल करण्यात येणार आहे. देह दंडाची शिक्षा देखील त्याला होऊ शकते. जर आरोपी फरार झाला. त्याला समन्स बजावून देखील तो हजर झाला नाही तर त्याच्या विरोधात त्याच्या उपरोक्ष खटला चालवला जाईल आणि शिक्षा देखील केली जाईल त्या दिवशी त्याला अटक होईल त्या दिवशी त्याला ती शिक्षा भोगावी लागेल.


भाषण विरोधी पक्ष नेत्याचं, कॅमेराचा फोकस अध्यक्षांवर, राहुल गांधींनी विषयच मिटवला

राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला संबोधित करत भाषण केलं. विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींचं हे पहिलंच भाषण होतं. राहुल गांधींनी गुजरातला येऊन तुम्हाला यावेळी हरवणार असं म्हणत अमित शाहांना समोरासमोरच चॅलेंज दिलं आहे, अग्निवीरला जवानाला नरेंद्र मोदी शहीद मानत नाहीत राहुल गांधी म्हणाले. भाषण विरोधी पक्ष नेत्याचं चालू असूनही कॅमेराचा फोकस अध्यक्षांवर का केला असं म्हणत राहुल गांधींनी जागेवरच सुनावलं . भाजप, नरेंद्र मोदी म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही, मोदींच्या समोरासमोर राहुल गांधींचं अख्ख्या कॅबिनेटला घाम फोडणारं संपूर्ण भाषण पहा ..


आयुष्मान (कसे) भव?

​​‘आयुष्मान सार्वजनिक आरोग्य केंद्रां’चे नामांतर ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ असे केंद्राने केल्यानंतर त्यास काही राज्यांनी आक्षेप घेतलेला आहे.


Parliament Session 2024 LIVE Updates : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर आज चर्चा, संसदेत काय घडतंय?

18th Lok Sabha LIVE Updates : १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा आज (२८ जून) पाचवा दिवस आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावार आज चर्चा होत आहे


ABP Majha Headlines : 1:00PM : 1 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 1:00PM : 1 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स हेही वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला (Vote Counting) सुरुवात झाली आहे. या मतमोजणीत दोन वेळेस जास्त मतपत्रिका आढळून आल्या आहेत. एकूण पाच बोगस मतपत्रिका जास्त आढळल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena Thackeray Camp) यावर आक्षेप घेण्यात आला. आता या प्रकरणाची शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दखल घेतली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले होते. या पत्रकार परिषदेत ज्या ज्या भागात शिवसेना ठाकरे गटाचे मतदान जास्त आहे, त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया अतिशय संथ गतीने पार पडत असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यातच आता नाशिक शिक्षक मतदारसंघात जास्त मतपत्रिका आढळल्याची माहिती मिळत उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली आहे.


LPG Price : खुशखबर! 1 जुलैपासून LPG Cylinder झाले स्वस्त, चेक करा दर

मुंबई : दर महिन्याच्या सुरुवातील गॅस सिलिंडरच्या दरात बदल होत असतात. 1 जुलै रोजी वाढत्या महागाईत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर जुलै महिन्यात तरी स्वस्त झाले असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे दिलासा मिळणार आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 30 रुपयांनी कपात केली आहे. 19 किलोग्रॅमच्या कर्मशियल गॅस सिलिंडर ३०-३१ रुपयांनी स्वस्त झाला आहे.1 जुलैपासून हा बदल करण्यात आला आहे. याचा फायदा...


‘सहमती’वर सहमती

मणिपूर हिंसाचारापासून सध्या गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटीपर्यंत अनेक प्रकरणांत पंतप्रधान मौन बाळगून असल्याकडे खर्गे यांनी बोट दाखविले आहे. मात्र, पंतप्रधानांप्रमाणे त्यांनीही ‘सर्वसहमती’चा मुद्दा उचलून धरला आहे.


घटनांची धूळ

मला अखेर एक छानशी नोकरी मिळाली. कंपनीत बहुसंख्य गोरे. थोडे फार काळे आणि मी। सुरुवातीला माझे उच्चार आणि रंग यांमुळे परकेपणा जाणवत असे, पण सवयीनं त्याचे अडसर दूर झाले.


Pune| पुणे शहराची आज बत्तीगुल

Preview for Pune Without Power Supply For Today


Delhi| दिल्लीत मुसळधार पावसाचं थैमान

Preview for delhi rain news


Raj Thackeray: लोकसभा निवडणुकीवर अमेरिकेतून पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे

Raj Thackeray in America : अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाला राज ठाकरेंनी उपस्थिती लावली होती. यावेळी कार्यक्रमात राज ठाकरेंची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्याच शैलीत रोखठोक उत्तरे दिली आहे.


Ordnance Factory Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी उत्तम संधी; महिन्याला २०-२५ हजारांपर्यंत पगार

Ordnance Factory Bhandara Recruitment 2024: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भंडारा आयुध निर्माणी (महाराष्ट्र) ने १५८ डॅनियल बिल्डिंग वर्कर (DBW) पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे.


Sanjay Raut Full PC : गरज सरो, वैद्य मरो; संजय राऊतांची भाजपवर सडकून टीका

Sanjay Raut Full PC : गरज सरो, वैद्य मरो; संजय राऊतांची भाजपवर सडकून टीका महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे वक्तव्य योग्य असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं. राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार आहे. आम्हाला 175-180 जागा मिळतील असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. केंद्रात राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर इंडिया आघाडीच्या आणखी 25-30 जागा वाढल्या असत्या असे संजय राऊत म्हणाले. कोणतंही सरकार किंवा संस्था बिनचेहऱ्याची असू नये. आपण कोणासाठी मतदान करतो हे लोकांना कळायला हवं. लोकांनी इंदिरा गांधींना, राजीव गांधींना मतदान केलं. मोदींना मतदान केलं. त्यामुळं महाविकास आघाडीला मुख्यमंत्रीदाचा चेहरा हवा हे आमचं मत असल्याचे राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीसांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊत यांनी टीका केली. फडणवीसांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. त्यांच्या पक्षाला राज्यातील जनतेनं झिडकारुन लावलं आहे. ते स्वत:ला नाना फडणवीसांचे मोठे भाऊ समजत होते, पण तसं काही नाही. नाना फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते. त्या साडेतीन शहाण्यांमध्ये यांना स्थान नाही, असे म्हणत राऊतांनी फडणवीसांना टोला लागवाला. नाशिक आणि पुणे ही महाराष्ट्रातील ड्रगची महत्वाची केंद्र पुणे हे ड्रग्जचं केंद्र बनलं आहे. पुणे हे एकेकाळी सामाजिक चळवळीचं केंद्र होतं. पोलिसांची मदत असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा व्यवहार होईल असं वाटत नसल्याचेही संजय राऊत म्हणाले. हे सगळं ड्रग्ज गुजरातमधून येत आहे. नाशिक आणि पुणे ही महाराष्ट्रातील ड्रगची महत्वाची केंद्र आहेत. तरुण ड्रग्जच्या आहारी जातायेत. वरदहस्त असल्याशिवाय हे होऊ शकत नाही असेही राऊत म्हणाले.


Manoj Jarange Village Matori Beed : पोलीस बंदोबस्त वाढला, तणावपूर्ण शांतता, मातोरी गावात काय घडलं?

Manoj Jarange Village Matori Beed : पोलीस बंदोबस्त वाढला, तणावपूर्ण शांतता, मातोरी गावात काय घडलं? मराठा आरक्षण आंदोलनाचा सध्याचा प्रमुख चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या बीड जिल्ह्यातील मातोरी (Materi Village) या मूळगावी दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. डीजे वाजवण्याच्या वादातून गावातील दोन गट आमनेसामने आल्याने ही घटना घडल्याचे समजते. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मातेरी गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा काल बीडमध्ये आली होती. रात्री गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा नियोजित दौरा हा भगवानगड येथे जाऊन भगवान बाबाचे दर्शन करण्याचा नियोजित कार्यक्रम होता. मात्र, त्यापूर्वीच सायंकाळी म्हणून जरांगे पाटील यांच्या मूळ गावी मातेरीमध्ये एका डीजेवर दगडफेक झाली आणि त्यानंतर तणाव निर्माण झाला. यावेळी रस्त्यावरील काही गाड्यावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर मातोरी शहरांमध्ये पोलीस दाखल झाले. मात्र, मातेरी शहराच्या दोन्ही बाजूला म्हणजे बीड आणि नगर या दोन्ही दिशेच्या बाजूने रास्तारोको रात्रभर सुरू


मागील पानावरून पुढे

Om Birla : विरोधकांनीही मतविभागणी न मागता संख्याबळाची झाकली मूठ कायम ठेवली. उमेदवार निश्चित करताना विश्वासात न घेतल्याबाबत तृणमूल काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्याने ‘इंडिया’ आघाडीतील कुरबुरीही समोर आल्या.


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024 आज कोल्हापूरात राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती साजरी केली जाणार, शाहू महाराजांच्या जन्मभूमी ठिकाणी शासकीय कार्यक्रम,पालकमंत्री यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार. नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या आज होणाऱ्या निवडणुकीची जिल्हा प्रशानसनाकडून तयारी पूर्ण, धुळे जिल्ह्यात बार केंद्रांवर आज मतदान प्रक्रिया पार पडणार. आज नाशिक शिक्षक मतदार संघासाठी मतदान होणार,महायुतीचे किशोर दराडे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, महाविकास आघाडीचे संदिप गुळवे तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात चौरंगी लढत. नाशिक शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात,शिक्षकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता गुणवत्तेच्या आधारावर मतदान करावे एडवोकेट महेंद्र भावसार यांचे आवाहन. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आजपासून अभिवादन दौऱ्यावर, सिंदखेडराजापासून सुरु होणाऱ्या दौऱ्याची चौंडीमध्ये सांगता होणार, पोहरादेवी, गोपीनाथगड, भगवानगडाचा दौरा करणार. माजी पंतप्रधान व्ही पी सिंगांना ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंकडून जयंतीनिमित्त अभिवादन, दवाखान्यातच व्ही.पी सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.


Nepal landslides: नेपाळमध्ये मान्सूनचा कहर! मुसळधार पाऊस, भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू

Nepal Weather: नेपाळमध्ये गेल्या 24 तासांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे नेपाळच्या भागात भूस्खलन, पूर आणि वीज पडल्याच्या एकूण 44 घटना घडल्या. या घटनांमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर भूस्खलनामुळे 2 जण बेपत्ता झाले आहे. तर शेकडो लोक बेघर झाले आहेत.


Bansuri Swaraj Taking Oath | संस्कृतमधून शपथ, सुषमा स्वराज यांच्या मुलीनं नाव काढलं

आज २४ जून संसदेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला.भाजपच्या नवनिर्वाचित खासदार बांसुरी स्वराज यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली.बांसुरी स्वराज या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.


Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कात

Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कात हे देखील वाचा Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या Beed Parli Firing : बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून रोज घडणाऱ्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेच्या पूर्णतः बोजवारा उडाला आहे का असा प्रश्न पडावा एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात एक ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हे प्रकरण पैशाच्या व्यवहारातून झाले असल्याचे पोलिस सांगत असले तरी याला राजकीय रंग असल्याची चर्चा आहे. वेळ रात्रीची सव्वा आठ वाजता, ठिकाण परळी शहरातील बँक कॉलनीमधील परिसर. फारशी रहदारी नसलेल्या या भागात लोक घरामध्ये असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज झाला आणि याच गोळीबारामध्ये एक जण जागीच कोसळला. त्यांचं नाव होतं बापू आंधळे (Bapu Andhale Beed) . परळी शहरापासून जवळ असलेल्या मरळवाडी या गावचे सरपंच. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काही दिवसापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बापू आंधळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.


नोकरीची संधी : बँकेतील भरतीसुहास पाटील

महाराष्ट्र राज्यात दोन ग्रामीण बँका (RRB) आहेत. (१) महाराष्ट्र ग्रामीण बँक (मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.) (२) विदर्भ कोकण ग्रामीण बँक (मुख्यालय नागपूर येथे आहे.)