PARLIAMENT SESSION 2024 LIVE UPDATES : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर आज चर्चा, संसदेत काय घडतंय?

Lok Sabha Session LIVE Updates : देशात नवं सरकार स्थापन होऊन १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू झालं आहे. आज संसदीय अधिवेशनाचा पाचवा दिवस असून भाजपा नेते आणि माजी मंत्री अनुराग ठाकूर लोकसभेतील चर्चेला सुरुवात करतील. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावार आज चर्चा केली जाईल. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी २ जुलै रोजी उत्तर देतील. तर भाजपा नेते आणि खासदार सुधांशू त्रिवेदी हे राज्यसभेतील आभार प्रस्तावावर चर्चेस सुरुवात करतील. संसदेच्या या वरिष्ठ सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ जुलै रोजी उत्तर देणार आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहात काय घडतंय यावर आपलं लक्ष असेल. येथे घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

2024-06-28T05:36:16Z dg43tfdfdgfd