BHARAT RATNA TO SHAHU MAHARAJ: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न; राज्य सरकारमधील मंत्र्यांचे मोठे वक्तव्य

कोल्हापूर (नयन यादवाड): लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त आज सकाळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म स्थळ असलेल्या कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे राजर्षी छत्रपती शाहू महजाराज यांच्या प्रतिमेस पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी शासनाकडे विनंती करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

शाहू महाराज यांचा जन्म स्थळ असलेल्या कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे जिल्हाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, आयुक्त के मंजुलक्ष्मी, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, जयसिंगराव पवार उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150वी जयंती निम्मित शाहू महाराजांनी हे रयतेचे राज्य कशा पद्धतीने उभे केले जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचणार आहोत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री मंडळातील सर्व मंत्र्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावा यासाठी आवाहन करणार असल्याचेही मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

शहरात शोभायात्रेच आयोजन

राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात तालीम शाळा बोर्डिंग व सामाजिक संस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असून, याच पार्श्वभूमीवर दसरा चौकातून संपूर्ण शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत लेझीम, झांज घोडे आणि शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक कार्याचा संदेश देणारे रथ सहभागी झाले होते.

राज्य सरकार विरोधात नाराजी

आज कोल्हापुरात 150 वी जयंती साजरी होत आहे. मात्र या सोहळाल्या जिल्ह्याचे पालकमंत्री वगळता राज्यातील शाहू महाराजांच्या नावाने सरकार चालवणारे आणि प्रचार करणारे एक ही नेता नआल्याने शाहूप प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा हा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव आहे. याची तयारी महाराष्ट्र शासनाने दोन-तीन महिने आधीच सुरू करणे अपेक्षित होते मात्र हे त्यांनी केले नाही यावरूनच शाहू महाराजांबद्दल असलेली उदासीनता राज्य सरकारने अधोरेखित केली असल्याची टीका इंद्रजीत सावंत आणि वसंत मुळीक यांनी केले आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-26T14:09:56Z dg43tfdfdgfd