MLA FUND : निधीवाटपावरुन जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप, भाजपकडून सभागृहात गदारोळ

मुंबई : विधानसभेच्या अर्थसंकल्पावर भाष्य करण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी आज सभागृहात निवेदन दिले. यावेळी त्यांनी अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर पैसाचे वाटप अशी टीका केली. लोकसभेच्या निकालाचे विश्लेषण करत जितेंद्र आव्हाडांनी भाषणाची सुरुवात केली आणि लोकसभा निकालात महायुतीला कसे नागरिकांनी फटकारले यावर आव्हाडांनी भाष्य केले. यानंतर आव्हाडांनी निधी वाटपावरुन थेट महायुतीसरकार वर हल्लाबोल केला. महायुती सरकारने आपल्याला निधी दिला नाही असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी लगावाल्याने सभागृहात साऱ्याचा भुवया उंचावल्या.

मी निवडूण आलेलो आमदार आहे.फक्त राजकीय द्वेषातून माझ्या मतदार संघाला निधी न देण्याचा हिणकस प्रकार हे सरकार करत आहे.माझ्या मतदार संघाला निधी न देता तेथील "आपल्या लोकांना" निधी देण्याचा प्रकार हे सरकार करत आहे.

या राज्याने अनेक सरकारे पाहीली,पण एक आमदार शरण येत नाही हे पाहून… pic.twitter.com/RcglpEwWjl

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 3, 2024 ]]>

निधी वाटपाचा नेमका घोळ काय?

एक दमडी सुद्धा सरकारने मला निधी म्हणून दिली नाही, सगळ्यांना पत्र लिहली कार्यलायात पन्नास फोन केली पण आमदार कटोरा घेवून दारात असताना माझ्या मतदारसंघात वेगळ्या पद्धतीने ५० कोटी आले असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी भर सभागृहात केला.मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडुन आलेलो आहे पण मला पैसे मिळत नाही जनहितासाठी पण माझ्याच मतदारसंघात ५० कोटी येतात एका ठाराविक व्यक्तीद्वारे मला पाडण्यासाठी षडयंत्र रचले जातात, आचारसंहिता जाहीर होताच ७५ हजार कोटींचे टेंडर काढले, लोकसभेसाठी मतदारसंघात ७० ते ७५ कोटींचे पैसे वाटप केले तर विधानसभेत तर पाऊस पाडतील असा सुद्धा दावा जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात केला. जितेंद्र आव्हाडांच्या याच आरोपांवर भाजप आमदार अतुल भातखळकर, मनिषा चौधरी, संजय कुंटे यांनी आक्षेप घेतला आणि सभागृहात आव्हाडांच्या विधानाचा निषेध केला.

अतुल भातखळकर काय म्हणाले

"सर्वसाधारण अर्थसकंल्पावरील चर्चा चालू आहे पण आव्हाडांनी खोटे आरोप करणे आणि सरकारला जातीयवादी बोलणे असे सभागृहात बोलण्यासाठी परवानगी नाही, ज्यांच्यावर अपहरणाची केस आहे त्यांने तर बोलूच नये" कामकाजातून जातीयवादी आणि पैशांचे गंभीर आरोप हे उद्गार काढून टाकावे अशी मागणी अतुल भातखळकरांनी केली.

संजय कुंटे काय म्हणाले

हवेमध्ये काहीही आरोप करायचे आणि अशाप्रकारे विधानसभेत बोलणे चुकीचे आहे. सरकारबद्दल चुकीचे बोलणे योग्य नाही आरोप आहे तर आताच्या आता पुरावे सादर करा सभागृहात, नाहीतर पैसेवाटप आणि जातीयवादी सरकार असे बिनबुडाचे आरोप विधानसभेच्या पटलावरुन काढून टाका अशी मागणी संजय कुंटे यांनी केली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-03T17:08:15Z dg43tfdfdgfd