Trending:


Legislative Council Election: शिंदेंनी शब्द पाळला, गवळी आणि तुमाने यांचे राजकीय पुनर्वसन; विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर

Legislative Council Election: लोकसभेच्या वेळी दिलेला शब्द एकनाथ शिंदे यांनी पाळला आहे. विधानपरिषदेसाठी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी देण्यात आली आहे.


‘१५ मिनिटवाली’ शहरे

15-Minute Cities: घराजवळ नोकरी किंवा नोकरीच्या ठिकाणाजवळ भाड्याने घर हा दृष्टिकोन रुजत आहे. त्यामुळे उद्या ‘पंधरा मिनिटांची शहरे’ निश्चितच उभी राहतील.


Bhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर 'माझा'वर : ABP Majha

Bhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर 'माझा'वर : ABP Majha परिसरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेलं आहे. वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून अद्याप एकजण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्याला (Lonavala News) गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर दोघांचा शोध सुरू आहे. दरम्यान 10 जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले होते. त्यापैकी 5 जणांना पाण्याच्या प्रवाहातुन बाहेर पडण्यात यश आलं आहे. दरम्यान, बुडालेल्या 5 जणांपैकी 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर एक अद्याप बेपत्ता आहेत. उर्वरित शोधकार्य आज करण्यात येणार आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातल्या धबधब्यातून हे पाच जण वाहून गेले आहेत. हे सर्वजण अन्सारी कुटुंबातले आहेत. यात लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सुहास दिवसे घटनास्थळी पोहोचले आहेत. भुशी डॅमजवळ वाहून गेलेल्यांना वाचवण्यासाठी ज्यांनी बचावकार्य केलं, त्या शिवदुर्ग टीममधील गावडे यांनी सांगितलं की, "पाऊस जास्त झाल्यानंतर लोणावळ्याकडे पर्यटक येत असतात. असंच हे कुटुंब होतं. हे कुटुंब एका लग्नसमारंभासाठी आलं होतं. समारंभ पार पडल्यापासून ते भुशी डॅमजवळ असलेल्या धबधब्यावर आले. इथे साधारणतः दुपारी साडेबाराच्या सुमारास ते गेले होते. या ठिकाणी अचानक पाऊस वाढला. या ठिकाणी 15 मिनिटांसाठी जरी पाऊस पडला तरीदेखील धबधब्याचं पाणी मोठ्या प्रमाणावर वाढतं. या पाण्याचा या कुटुंबाला अंदाज आला नाही त्यामुळेच दुर्घटना घडली. हा धबधबा पुढे जाऊन भुशी डॅमला मिळतो. आम्हाला आतापर्यंत सापडलेले मृतदेह सर्व भुशी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये सापडले आहेत. आणि इतर दोघांचा शोध सुरू आहे."


Parliament Session 2024 LIVE Updates : अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, कोण होणार विरोधी पक्षनेता?

First Session Of 18th Lok Sabha LIVE Updates: १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व खासदारांना खासदारकीची शपथ देण्यात आली. तर आज विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे.


UPSC Success Story : IIT टॉपर पण UPSC परीक्षेत चार वेळा आले अपयश, आता आहे IAS अधिकारी

UPSC Success Story: आशीष कुमार सिंघलचा यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. आशीष लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. शिवाय तो आयआयटी टॉपरदेखील होता.


IAS Sujata Saunik : पुरुषी मक्तेदारी मोडित, राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक

Sujata Saunik : राज्याच्या मुख्य सचिवपदी रविवारी सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. यानिमित्ताने या पदावरील पुरुषी मक्तेदारी मोडित काढण्याचा मान सुजाता सौनिक यांना मिळाला आहे.


‘सहमती’वर सहमती

मणिपूर हिंसाचारापासून सध्या गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटीपर्यंत अनेक प्रकरणांत पंतप्रधान मौन बाळगून असल्याकडे खर्गे यांनी बोट दाखविले आहे. मात्र, पंतप्रधानांप्रमाणे त्यांनीही ‘सर्वसहमती’चा मुद्दा उचलून धरला आहे.


July Festival Calendar 2024 : आषाढी एकादशी, योगिनी एकादशी, गुरूपौर्णमा ते चातुर्मास्यारंभ; जाणून घ्या जुलै महिन्यातील सण-उत्सव आणि व्रत

July Festival Calendar 2024 : जुलै महिन्याला सुरूवात झाली असून या महिन्यात अनेक सण आणि व्रत असणार आहे. धार्मिकदृष्ट्या जुलै महिना अतिशय खास असणार आहे. चला या महिन्यातील सण आणि व्रत जाणून घेऊयात.


Ordnance Factory Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी उत्तम संधी; महिन्याला २०-२५ हजारांपर्यंत पगार

Ordnance Factory Bhandara Recruitment 2024: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भंडारा आयुध निर्माणी (महाराष्ट्र) ने १५८ डॅनियल बिल्डिंग वर्कर (DBW) पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे.


ABP Majha 06 PM Headlines ABP Majha 01 July 2024 Marathi News ABP Majha

ABP Majha 06 PM Headlines ABP Majha 01 July 2024 Marathi News ABP Majha राहुल गांधींनी संसदेत हिंदुत्वावरून केलेल्या टीकेचे विधान परिषदेत पडसाद, भाजपच्या प्रसाद लाड यांनी हात दाखवल्याचा तर ठाकरेंच्या अंबादास दानवेंनी शिवी हासडल्याचा आरोप देवतांचा डरो मतचा संशय मात्र स्वतःला हिंदू म्हणवणारे हिंसा पसरवतात, विरोधी पक्षनेते पदावरून राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल, तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधिमंडळात पाठच्या दारानं एन्ट्री, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेककरांनाही उमेदवारी मुंबईत पदवीधरमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे जवळपास निश्चित, कार्यकर्त्यांचा जल्लोष नाशिक शिक्षक मतदारसंघात पहिल्या पसंतीमध्ये दराडे, गुळवे आणि कोल्हेंमध्ये काटे की टक्कर, समर्थकांची जोरदार घोषणाबाजी नागपुरातील दीक्षाभूमीच्या विकास आराखड्याला स्थगिती... फडणवीसांची सभागृहात घोषणा ... अनुयायांच्या आक्रमक पवित्र्यानंतर निर्णय पेपरफुटीविरोधातला कायदा याच अधिवेशनात आणणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा, गट क च्या नियुक्त्याही एमपीएससीद्वारे करणार,


Kelavali Waterfall: केळवली धबधब्यात पोहताना युवक बुडाला

Kelavali Waterfall: मित्रांसोबत धबधब्यात पोहण्यासाठी गेलेला एक 22 वर्षीय तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. रविवारी साताऱ्यात ही दुर्दैवी घटना घडली ऋषिकेश रमेश कांबळे (रा. सैदापूर, ता. कराड) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. धबधब्याच्या मुख्य प्रवाहात आल्याने तरुण वाहून गेले आहे. या घटनेप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.


Zika Virus Pune: पुण्यात वाढतोय 'झिका'चा संसर्ग; रुग्णसंख्येत वाढ, गर्भवती महिलांनी घ्या विशेष काळजी

Zika Virus In Pune: एरंडवण्यातील २८ वर्षीय गर्भवती महिलेलाही ‘झिका’चा संसर्ग झाल्याने रुग्णसंख्या पाचवर गेली आहे. तपासणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येऊनही या महिलेला कोणतीही लक्षणे नाहीत.


Crocodile In Chiplun: चिपळूणच्या चिंचनाका रस्त्यावर आली भलमोठी मगर; वाहनचालकांचा घाबरुन युटर्न

Crocodile Seen On Chiplun Chinchnaka Road: चिपळूणच्या चिंचनाका रस्त्यावर भलमोठी मगर वावरताना दिसली. अचनाक रस्त्यावर आलेल्या मगरीला पाहून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.


क्रियाशील जाणकार - मुचकुंद दुबे

बुधवारी वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. आंतरराष्ट्रीय संबंधांची सखोल जाण असणारे आणि सामाजिक-शैक्षणिक विकासासाठी सतत क्रियाशील राहिलेले मुचकुंद दुबे यांना आदरांजली.


भाजप, नरेंद्र मोदी म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही, राहुल गांधी स्पष्टच बोलले

काही लोकं स्वतःला हिंदू म्हणवून घेतात आणि हिंसा करतात. राहुल गांधींच्या या विधानानंतर थेट नरेंद्र मोदी उभे राहिले आणि. राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला, यावर राहुल गांधींनी उत्तर दिलं.ते म्हणाले, नरेंद्र मोदी म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही. पाहा संपूर्ण व्हिडिओ.


NEETसह अनेक प्रश्न विरोधकांच्या अजेंड्यावर

Opposition To Raise And Put Pressure On Govt For NEET And Rising Inflation


पोर्श अपघात प्रकरण: अल्पवयीन आरोपीच्या जामिनाविरोधात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाने २५ जून रोजी पूणे पोर्श अपघातप्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन दिला होता.


MU Autonomous Colleges List: मुंबई विद्यापीठाच्या आणखी ६ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा

MU Autonomous Colleges 2024: मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या आणखी ६ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा (Empowered Autonomous College) दर्जा देण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेच्या शिफारशीवरून व्यवस्थापन परिषदेने ६ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्रदान केला आहे.


Kolhapur Ports Water Level : कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावरुन धोकादायक पद्धतीने वाहतूक

Kolhapur Ports Water Level : कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावरुन धोकादायक पद्धतीने वाहतूक हेही वाचा : पावसाळी सहलीसाठी (Monsoon Trip) लोणावळ्यातील (Lonavala) भुशी धरण (Bhushi Dam) परिसरात गेलेल्या कुटुंबासोबत मोठी दुर्घटना घडली आहे. भुशी डॅम परिसरातील धबधब्यमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या मागील धबधब्यात पाच जणांचं अख्खं कुटुंब वाहून गेलं असून यामध्ये लहान मुले आणि महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलं असून शोधकार्य सुरु आहे. दरम्यान, हे अख्खं कुटुंब वाहून जातानाचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. धबधब्यातून भुशी धरणात वाहून गेलेलं अख्खं कुटुंब भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले आहेत. यामध्ये लहान मुलं-महिलांचा समावेश आहे. पाच जणांमधील दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत, इतर तिघांचं शोधकार्य सुरु आहेत. सहलीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉलमधून अन्सारी कुटुंब वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.


आयुष्मान (कसे) भव?

​​‘आयुष्मान सार्वजनिक आरोग्य केंद्रां’चे नामांतर ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ असे केंद्राने केल्यानंतर त्यास काही राज्यांनी आक्षेप घेतलेला आहे.


Nagpur Airport: आठवड्याभरात दुसऱ्यांदा विमानतळ उडवण्याची धमकी, बॉम्ब ठेवल्याच्या मेलने खळबळ

Nagpur News: नागपूर विमानतळ उडवण्याची दुसऱ्यांदा धमकी आली. मेलद्वारे आलेल्या धमकीने खळबळ उडाली होती. यामुळे प्रवाशांची तपासणी करण्यात आली होती.


Top 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 1 जुलै 2024

Top 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 1 जुलै 2024 हेही वाचा : पावसाळी सहलीसाठी (Monsoon Trip) लोणावळ्यातील (Lonavala) भुशी धरण (Bhushi Dam) परिसरात गेलेल्या कुटुंबासोबत मोठी दुर्घटना घडली आहे. भुशी डॅम परिसरातील धबधब्यमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या मागील धबधब्यात पाच जणांचं अख्खं कुटुंब वाहून गेलं असून यामध्ये लहान मुले आणि महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलं असून शोधकार्य सुरु आहे. दरम्यान, हे अख्खं कुटुंब वाहून जातानाचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. धबधब्यातून भुशी धरणात वाहून गेलेलं अख्खं कुटुंब भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले आहेत. यामध्ये लहान मुलं-महिलांचा समावेश आहे. पाच जणांमधील दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत, इतर तिघांचं शोधकार्य सुरु आहेत. सहलीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉलमधून अन्सारी कुटुंब वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले भुशी धरणाच्या मागील धबधबा, रेल्वे वॉटर फॉल म्हणून ओळखला जातो. या धबधब्याचं पाणी पाणी भुशी धरणात येते. या धबधब्यात पाण्याचा अंदाज न आल्याने अख्खं कुटुंब वाहुन गेलं आहे.


Suragaon Katal Khana : फडणवीसांच्या नागपूरात कत्तलखान्याचा विरोधात हजारो लोक रस्त्यावर

Surgaon Katal khana : सुरगाव कत्तलखान्याला विरोध करण्यासाठी हजारो लोकांचा जनसमुदाय उतरला रस्त्यावर, वाहनांची मोठी वाहतूक कोंडी, नागरिकांनी भजन-कीर्तन करत जोरदार आंदोलन केले.


NEET Paper Leak Case : नीट पेपर फुटीप्रकरणातील आरोपींना CBI ताब्यात घेणार, कागदपत्रांची पूर्तता पूर्ण

Latur NEET Exam Paper Leak Case : देशभरात गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणी लातुरमध्ये आलेले सीबीआयचे पथक आरोपींचा ताबा घेणार आहे. सोमवार संध्याकाळपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मंगळवारी आरोपींचा ताबा घेण्यात येणार आहे नीट प्रकरणात CBI च्या पथकाने मुख्य न्यायदंडाधिकारी लातूर यांच्या न्यायालयात आरोपीचा ताबा मिळणेसाठी आज अर्ज केला होता. सदरचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून, आरोपीचा ताबा आणि तपासातील सर्व कागदपत्रे आणि जप्त...


Tulsi Niyam: या दिवशी तुळशीला पाणी घालाल तर... येईल आर्थिक संकट

सनातन धर्मात झाडे आणि वनस्पतींनाही ईश्वराचा दर्जा आहे. आपल्या देशात जवळपास प्रत्येक अंगणात एक वनस्पती आढळते, ज्याची लोक रोज पाणी अर्पण करून पूजा करतात. तुळशी ही एक अशी वनस्पती आहे ज्यामध्ये लक्ष्मी वास करते असे मानले जाते. प्रत्येक घरात तुळशीचे रोप ठेवणे शुभ मानले जाते. दररोज सूर्योदयाच्या वेळी या वनस्पतीला पाणी दिल्यास जीवनात सकारात्मकता येते आणि जीवन आनंदी होते, अशी श्रद्धा आहे. तथापि, अशीही एक मान्यता आहे की काही दिवस असे असतात जेव्हा तुळशीला...


Weather update : महाराष्ट्रावर धडकणार मोठं संकट; पुढील 2 दिवस महत्त्वाचे

महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD)देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात आज पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सोबतच वादळी वाऱ्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. विदर्भात समाधानकारक पाऊस झाला नव्हता मात्र गेले दोन दिवस पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान पुढील 24 तासांमध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकणाबाबत बोलायचं झाल्यास पुढील 24 तासांमध्ये कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ढगाळ वातावरण राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. मुंबईत पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या काळात मुंबईचं तापमान 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान या काळात नुसता पाऊसच पडणार नसून, वादळाच्या रुपानं मोठं संकट देखील समोर आहे. या काळात ताशी 50 ते 60 किमी वेगानं वारं वाहू शकतं असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून आज पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.