CROCODILE IN CHIPLUN: चिपळूणच्या चिंचनाका रस्त्यावर आली भलमोठी मगर; वाहनचालकांचा घाबरुन युटर्न

Crocodile Viral Video: रत्नागिरीतील चिपळूण येथील चिंचनाका परिसरात रविवारी एक भलीमोठी मगर दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. चिपळूणमधील मगरीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. मानवी वस्ती असलेल्या भागात मगरींचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. रस्त्यावर दिसलेली नंतर कुठे गेली? हे समजू शकलेले नाही. परंतु, ही मगर पुन्हा नदीत गेल्याचे सांगितले जात आहे. रत्नागिरीत झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळच असलेल्या शिव नदीतून ८ फूट लांबीची ही मगर रस्त्यावर आली, असे सांगितले जाते. 

Trending News : सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने म्हटले ७० लाख कमवतो, मुलीच्या वडिलांचे आले असे उत्तर की, व्हायरल झाले चॅट

@mayuganapatye या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आली. हा व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, चिपळूणमध्ये शिव नदी पात्रात मगरींची संख्या वाढली आहे. चिपळूण नगरपरिषद आणि वनविभागाकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही यावर कोणतीच उपाययोजना करण्यात नाही. प्रत्येक पावसाळ्यात नदीपात्र ओव्हरफ्लो झाल्यानंतर या मगरी रस्त्यावर आणि मानवी वस्तीत शिरतात. शहरातील नागरिकांना याचा फार मोठा धोका आहे, अशीच एक भलीमोठी मगर रविवारी शहरातील शिवनदी पुलाच्यावर मुक्तपणे संचार करताना बघून वाहनचालकांची तारांबळ उडाली. मगरींचे संवर्धन करता करता नागरिकांच्या सुरक्षेचा काय? असा संतप्त सवाल चिपळूणकर उपस्थित करत आहे.

Viral Video : घराच्या छतावर रील बनवत होती तरुणी, त्याचवेळी आकाशातून पडली वीज, पुढं जे घडलं ते पाहा व्हिडिओमध्ये

नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

याआधी शहरातील गोवळकोट परिसरात एक मगर दिसली होती आणि आता आणखी एक मगर चिंचनाका येथे आढळून आली. चिंचनाका येथील मगर मुख्य रस्त्यावर पोहोचली. त्यानंतर रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झढाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Mumbai Electricity Bill News: एका महिन्याचा वीजबिल ६७ हजार रुपये, मुंबईतील ग्राहकाचा स्क्रीनशॉर्ट पाहून अनेकांना धक्का!

प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आवाहन

चिपळूण शहरात शिव नदीपात्रातून मगरी वारंवार बाहेर येतात. याआधी शहरी भागात मगरी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात मानवी वस्तीत मगर दिसणे, हे या भागात सामान्य मानले जाते. मगरी नदी सोडून शहरात येऊ नयेत, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

2024-07-01T08:45:19Z dg43tfdfdgfd