Trending:


Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठक

मुंबई: हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली आहे. या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील राजकीय समीकरणं बदलणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे संतोष बांगर यांची भेट झाल्यानंतर हिंगोलीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. अधिवेशनाच्या कालावधीत ही भेट झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्या दरम्यान संतोष बांगर आणि त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्या गेल्या. पण आता हे दोन्ही नेते अब्दुल सत्तारांच्या घरी भेटले आणि ही भेट गुप्त होती. त्यामुळेच ही भेट हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणं बदलवणारी ठरण्याची शक्यता आहे.


अन्नपूर्णांचा आधार -प्रेमाताई पुरव

Prematai Purav : प्रेमाताई मूळच्या गोव्याच्या. लहानपणीच त्या गोवा मुक्ती संग्रामात उतरल्या. बंदुक चालवणे, बॉम्ब तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवणे, दारूगोळा लपवणे अशा क्रांतिकारी कामांत त्यांचा सहभाग असे.


Raj Thackeray: आयुष्यात कुणाला घाबरता? राज ठाकरेंचं उत्तर ऐकून सगळेच भारावले

मुंबई: तडाखेबाज भाषण आणि बेधडक निर्णय शैलीमुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. विरोधकांना किंवा सरकारच्या निर्णयावर घेऊन ठाकरी शैलीत फटकेबाजी करणारे राज ठाकरे आयुष्यात खरंच कुणाला घाबरतात का, असा सवाल थेट एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दिलेलं उत्तर ऐकून सगळेच भारावून गेले आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी...


BSF Constables Missing: बीएसएफच्या दोन महिला कॉन्स्टेबल गायब, लास्ट लोकेशन परराज्यात, आईला वेगळाच संशय

Women Mysteriously Missing From BSF Academy: बीएसएफच्या दोन महिला कॉन्स्टेबल अचानक गायब झाल्याने खळबळ माजली आहे. त्या गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता आहेत. तर या प्रकरणी एका महिलेल्या आईने मोठी भीती व्यक्त केली आहे.


असांज आता काय करणार?

Julian Assange :'हॅकिंग विश्वाचा रॉबिनहूड' अशी ओळख असणारे ज्युलियन असांज यांची नुकतीच सुटका झाली. या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा हा आढावा...


Water Level In Dams: धरणक्षेत्रांत थेंबे थेंबेच... पाणीसाठ्यात अवघी दीड टक्का वाढ; कोणत्या धरणात किती पाणी?

Mumbai Dams Water Level: जुलै महिन्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबईत लागू करण्यात आलेली दहा टक्के पाणीकपात महापालिका मागे घेऊ शकते.


Nanded | एसटी बस वाहक आणि प्रवाशात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

ST Driver and Passanger Rada in Nanded


TOP 50 : संध्याकाळच्या टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 03 July 2024 : ABP Majha

परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी याच अधिवेशनात कायदा, याच अधिवेशनात नव्या कायद्याचं विधेयक मांडणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. महायुती सरकारकडून १ लाख ८ हजार पदांवर भरती प्रक्रिया सुरू, ७० हजार जणांना नियुक्त पत्र प्रदान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मोठी वाढ, २०१४-२०२४ या काळात राज्याची अधिक प्रगती, अभिभाषणावरील चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर. ९७ टक्के पॉलिश्ड डायमंडची निर्यात मुंबईतून, उद्योग गुजरातला चालले हे कथानक खोटं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर, तर मलबार गोल्डची मुंबईत १७०० कोटींची गुंतवणूक, फडणवसांची माहिती. अंबादास दानवे यांनी लेखी दिलगिरी व्यक्त केल्यानं निलंबनाचा कालावधी कमी केला जाण्याची शक्यता. कालावधीबाबतचा निर्णय उद्या बैठकीत घेतला जाणार. सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी, जनतेचे प्रश्न मला मांडू द्या, निलंबनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी, जनतेचे प्रश्न मला मांडू द्या, निलंबनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. लोकसभेत राहुल गांधींनी हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद. राहुल गांधींवर हल्ला होण्याची शक्यता. गुप्तचर विभागाकडे इनपुट. गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर राहुल गांधी आणि त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली.


Password Safety: 17 टक्के भारतीय नागरिक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत बेफिकीर; सर्वेक्षणातून आले समोर

Password Safety negligence : 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षितपणे पासवर्ड जतन करतात, सर्वेक्षणात धक्कादायक सत्य उघड झाले: भारतीय लोक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत निष्काळजी वृत्ती बाळगतात. लोकांना त्यांच्या फोनमध्ये पासवर्ड सेव्ह करण्याची किंवा नोटपॅडवर लिहून ठेवण्याची सवय असते. अशा निष्काळजीपणामुळे डेटा चोरीचा धोका वाढतो. एका सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षित पद्धतीने पासवर्ड सेव्ह करतात.


Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE : अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक, शिंदे सरकारला कोंडित पकडणार?

Marathi News Live Update : विधीमंडळ अधिवेशनासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.


Vidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय...या निवडणुकीचं चित्र आज स्पष्ट झालं...महायुती आणि महाविकास आघाडीला अधिकची एक जागा निवडून आणायची आहे...त्यामुळे निवडणुकीत क्रॉस वोटिंग किंवा घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय...पाहुया एक स्पेशल रिपोर्ट... विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आता चुरशीची निवडणूक होणार हे नक्की झालंय... निवडणूक बिनविरोध होईल अशी अटकळ असतानाच बारावा उमेदवार रिंगणात उतरल्यानं निवडणूक निश्चित झालीय... भाजपकडून - १. पंकजा मुंडे २. योगेश टिळेकर ३.डॉ. परिणय फुके ४. सदाभाऊ खोत ५. अमित गोरखे यांना उमेदवारी देण्यात आलीय... शिंदेंच्या शिवसेनेकडून १. भावना गवळी २. कृपाल तुमाणे तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून १. राजेश विटेकर २. शिवाजीराव गर्जे असे महायुतीकडून ९ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत... महाविकास आघाडीत काँग्रेसकडून प्रज्ञा सातवांना तिकीट देण्यात आलंय... राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं शेकापच्या जंयत पाटलांना पाठिंबा दिलाय... तर ठाकरेंच्या शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना रिंगणात उतरवलंय..


MLA Fund : निधीवाटपावरुन जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप, भाजपकडून सभागृहात गदारोळ

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या निधीवाटपावरुन महायुती सरकारवर गंभीर आरोप, मला आमदार निधी मिळला नाही अशी खंत आव्हाडांनी सभागृहात बोलून दाखवली.


Uddhav Thackeray and Aaditya Thackeray : "Mahalaxmi Race Course ची जागा बिल्डरांच्या घशात घालू नका"

Uddhav Thackeray and Aaditya Thackeray : "Mahalaxmi Race Course ची जागा बिल्डरांच्या घशात घालू नका" Mahalaxmi Racecourse 120 Acres Land Handover To BMC: मुंबई : महालक्ष्मी रेस कोर्सची (Mahalaxmi Race Course) 120 एक्कर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या (BMC) ताब्यात देण्यास राज्य सरकारनं (Maharashtra Government) मंजुरी दिली आहे. महालक्ष्मी (Mumbai News) रेसकोर्सची 120 एकर जागेत सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी जागा वापरली जाणार आहे. 1914 साली रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 99 वर्षांच्या लीजवर ही जागा देण्यात आली होती. त्यानंतर हा करार 2013 मध्ये संपुष्टात आला होता. त्यानंतर या जमिनीवर थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. या प्रकल्पात थीम पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनर असा समावेश होता. या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. थीम पार्क उभारण्यासाठी ही जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करणे गरजेचे होते. ही 211 एकर जागा आहे. त्यामध्ये 91 एकर जागा टर्फ क्लबला ठेवण्यात येणार आहे, तर उर्वरित 120 एकर जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित केली जाईल. आतापर्यंत ही जागा लीजवर देण्यात आली होती.


Pandharpur Wari Toll Free: पंढरीची वारी टोलमुक्त ! 21 जुलैपर्यंत पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफी जाहीर

Ashadhi wari toll free for warkari vehicles: आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल माफी करण्याचं राज्य सरकारने जाहीर केलं आहे.


‘दीक्षाभूमी’चा प्रक्षोभ

Deekshabhoomi Nagpur : दीक्षाभूमी स्मारक समितीने संवादी भूमिका टाळल्याने आणि एकूणच पारदर्शकता न दाखविल्याने हा तिढा चिघळल्याचा अनेकांचा आरोप आहे.


Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दर

Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दर हेही वाचा : देवगिरी निवासस्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची रात्री बैठक संपन्न... नवाब मलिकही बैठकीला उपस्थित..मलिकांना महायुतीत घेण्यास याआधी फडणवीसांनी केला होता विरोध उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक अटळ,शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात अंबादास दानवेंच्या शिवीगाळीबाबत उद्धव ठाकरेंनी मागितली माफी...तर अंबादास दानवेंचं निलंबन एक षडयंत्र, ठाकरेंचा हल्लाबोल तुम्ही नकली वाघांसोबत आहात इथे असली वाघांमध्ये या...वाघनखं कधी आणणार या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जयंत पाटलांना टोला... लाडकी बहीण योजनेत दोन बदल... वयाच्या मर्यादेत ६५ वर्षांपर्यंत वाढ, तर पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार.. तर अर्ज भरण्यासाठी ⁠३१ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ.. उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये भोलेबाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, ११६ भाविकांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त


Bharat Ratna to Shahu Maharaj: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न; राज्य सरकारमधील मंत्र्यांचे मोठे वक्तव्य

Shahu Maharaj: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने हसन मुश्रीफ यांनी महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी सरकारकडे विनंती करणार असल्याचे सांगितले.


Arvind Kejriwal | मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवालांच्या अडचणीत वाढ

CBI Arrest Delhi CM Arvind Kejriwal


Zero Hour Rahul Gandhi vs Narendra Modi:राहुल गांधी यांचं वक्तव्य ते नरेंद्र मोदी यांची सडेतोड उत्तर

ब्रेकनंतर झीरो अवरमध्ये पुन्हा एकदा स्वागत.. ज्यांच्या समर्थनासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंनी काल सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं.. त्या राहुल गांधींसंदर्भातली बातमी.. काल भाजपवर आरोप करत असताना राहुल गांधींनी जी जोरदार बॅटिंग केली.. त्यातीलच वक्तव्य हाताशी धरत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोक सभेत राहुल गांधींना क्लीन बोल्ड करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावासाठी लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं.. आणि मोदींनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरींचा उल्लेख केला.. सोबतच राहुल गांधींच्या कालच्या भाषणाला उत्तरं दिलं..राहुल गांधींच्या वक्तव्याचा कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध व्यक्त केला होता.. आज सकाळपासूनचं भाजपनं देशभरात निदर्शनं केली.. टीका केली.. फक्त भाजपच नाही तर आज मित्रपक्षांकडूनही राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध बघायला मिळाला. भाजपाच्या मित्रपक्षांनी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजप मित्रपक्षांमध्ये कशी एकवाक्यता दिसली.. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही राहुल गांधींवर पलटवार केलाय.. तो आधी पाहुयात.. आज म्हणायला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान बोलणार असे जरी असले, तरी उत्सुकता होती... ती राहुल गांधींना मोदी काय उत्तर देणार ह्याची... त्यांच्या भाषणाचा एक मोठा भाग राहुल गांधींवर असणार.. ही अपेक्षा होती. आणि मोदींनी अपेक्षाभंग केला नाही.. १० वर्षानंतर देशाला विरोधी पक्ष नेता मिळाला आणि काल ते पद भूषवणाऱ्या राहुल गांधींचे पहिलेच भाषण होते... त्यात त्यांचा रोख निवडणुकीसारखाच मोदी सरकार विरोधी होता... त्यालाच आज त्याच आवेशात पंतप्रधानांनी उत्तर दिले... मोदी भाषणाला उभे राहिले तेव्हापासूनच विरोधी बाकांवरून गोंधळ ऐकू येऊ लागला... मात्र मोदींनी हि न थांबता आपले भाषण सुरु ठेवले.. आणि राहुल गांधींनी काल केलेल्या प्रत्येक मुद्द्याला खोडून काढलं.. आणि राहुल गांधी यांच्या हिंदू या शब्दावरुन केलेल्या टीकेला विशेष उत्तर दिलं.. पाहुयात.. नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं.. पण, जसं भाजपच्या मित्रपक्षांनी देशभरात राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला.. अनेक ठिकाणी राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी केली.. बॅनरबाजी केली.. तिथं काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही राहुल गांधीचं समर्थन सुरु केलंय.. आणि त्याची सुरुवात झाली महाराष्ट्रातून.. उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं वक्तव्य केलं.. तर राहुल गांधींनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा उतरवल्याची टीका, संजय राऊतांनी केली.. पाहुयात..


Mumbai Central Public Park : न्यूयॉर्क, लंडनसारखं आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ लवकरच मुंबईत

Mumbai Central Public Park On 300 Acres : मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क विकसित होणार आहे. ३०० एकरवर हे उभारण्यात येणार असून यासाठी प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे.