Trending:


Nagpur School Opening : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना संघ मुख्यालयाची सफर

Nagpur School Opening : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना संघ मुख्यालयाची सफर विदर्भातील हजारो शाळा आजपासून सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांच्या शाळेच्या आजचा पहिला दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी स्मरणीय ठरला आहे. काही शाळांनी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे फुलं देऊन स्वागत केले. तर काही शाळांनी पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगळे कार्यक्रम ठेवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मात्र, नागपूरच्या (Nagpur News) नूतन भारत शाळेनं पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना संघाच्या रेशीमबाग कार्यालयात (Rashtriya Swayamsevak Sangh Headquarters) नेले. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतिस्थळाला वंदन करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्राची सुरुवात केली. वर्तमान काळात हिंदुत्व काय? त्यासाठी कोणी कोणता त्याग केला आहे, हे भविष्यातील पिढीला कळावं, या उद्दिष्टाने आम्ही आमच्या सर्व 500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्राच्या पहिल्याच दिवशी संघस्थानी आणल्याचे मत शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केले आहे.


Rahul Gandhi vs Amit Shah : अग्निवीर योजनेवरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक ABP Majha

Rahul Gandhi vs Amit Shah : अग्निवीर योजनेवरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक ABP Majha ही बातमी पण वाचा नवी दिल्ली : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत (Lok Sabha) या चर्चेत बोलताना केलेल्या वक्तव्यानंतर जोरदार गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना म्हटलं की, नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात एका दिवशी म्हटलं की हिंदुस्ताननं कधी कुणावर आक्रमण केलं नाही. याचं कारण आहे हिंदुस्तान अहिंसेचा देश आहे. आपल्या महापुरुषांनी डरो मत, डराओ मत असं म्हटलं. भगवान शंकर म्हणतात डरो मत, डराओ मत आणि त्रिशुल जमीन रोवतात. दुसरीकडे जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात ते 24 तास हिंसा-हिंसा-हिंसा, नफरत-नफरत-नफरत, तुम्ही हिंदू असूच शकत नाही, हिंदू धर्मानं स्पष्टपणे म्हटलंय सत्याची साथ द्या. यानंतर भाजप नेते भाजप आक्रमक झाले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी आक्षेप घेतला. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले आणि या प्रकरणाला गंभीर प्रकरण असल्याचं म्हटलं. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणनं गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही, असं म्हटलं. यानंतर अमित शाह बोलायला उभे राहिले, त्यांनी म्हटलं की विरोधी पक्ष नेत्यांनी यावर माफी मागितली पाहिजे. कोट्यवधी लोक स्वत:ला अभिमानानं हिंदू म्हणतात, असं अमित शाह म्हणाले. राहुल गांधी यांनी अभय मुद्रा या विषयावर अभय मुद्रा मुद्यावर इस्लमाच्या विद्वानांचं मत घ्यावं, असं अमित शाह म्हणाले.


TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 01 JULY 2024 : ABP Majha

TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 01 JULY 2024 : ABP Majha पावसाळी सहलीसाठी (Monsoon Trip) लोणावळ्यातील (Lonavala) भुशी धरण (Bhushi Dam) परिसरात गेलेल्या कुटुंबासोबत मोठी दुर्घटना घडली आहे. भुशी डॅम परिसरातील धबधब्यमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या मागील धबधब्यात पाच जणांचं अख्खं कुटुंब वाहून गेलं असून यामध्ये लहान मुले आणि महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलं असून शोधकार्य सुरु आहे. दरम्यान, हे अख्खं कुटुंब वाहून जातानाचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. धबधब्यातून भुशी धरणात वाहून गेलेलं अख्खं कुटुंब भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले आहेत. यामध्ये लहान मुलं-महिलांचा समावेश आहे. पाच जणांमधील दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत, इतर तिघांचं शोधकार्य सुरु आहेत. सहलीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉलमधून अन्सारी कुटुंब वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले भुशी धरणाच्या मागील धबधबा, रेल्वे वॉटर फॉल म्हणून ओळखला जातो. या धबधब्याचं पाणी पाणी भुशी धरणात येते. या धबधब्यात पाण्याचा अंदाज न आल्याने अख्खं कुटुंब वाहुन गेलं आहे.


झोपडपट्टी निष्कासन कारवाईदरम्यान पोलिसांला धक्काबुक्की; आरोपीला अटक

झोपडपट्टी निष्कासन कारवाईदरम्यान पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी ५३ वर्षीय व्यक्तीला अटक केली.


tamhini ghat news : पाण्याशी मस्ती जिवावर बेतली! ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीच्या धबधब्यात उडी मारणाऱ्या तरुणाचा मृत्यू

Youth falls off in Tamhini Ghat waterfall : पुण्यातील ताम्हिणी घाटातील धबधब्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. दोन दिवसांनंतर त्याचा मृतदेह हाती लागला आहे.


Vidhan Parishad Election Result : मुंबई पदवीधरमध्ये ठाकरेंचीच गर्जना! अनिल परब यांचा 26 हजार मतांनी विजय

Vidhan Parishad Nivadnuk Nikal : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी मतदान पार पडलं होतं. त्यानंतर आज निकाल जाहीर होत आहे.मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटाने आपले वर्चवस्व सिद्ध केले आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाचे अनिल परब हे विजयी झाले आहेत, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाचेच ज. मो. अभ्यंकर यांनी विजय मिळवला आहे.


‘हुमणी’चा उपद्रव

शेती व्यवसाय करताना मशागत, लागवड, पाणी-खतांसोबतच विविध किडी, रोगांबाबतही सातत्याने काळजी घ्यावी लागते.


50th Anniversary of Emergency in India : 1975 मधील 'ती' काळी रात्र! इंदिरा गांधींसह 'हे' होते आणीबाणीचे मास्टरमाइंड, 'त्या' 4 तासात काय घडलेलं?

1975 मधील 'ती' काळी रात्र! इंदिरा गांधींसह 'हे' होते आणीबाणीचे मास्टरमाइंड, 'त्या' 4 तासात काय घडलेलं?


Bansuri Swaraj Taking Oath | संस्कृतमधून शपथ, सुषमा स्वराज यांच्या मुलीनं नाव काढलं

आज २४ जून संसदेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला.भाजपच्या नवनिर्वाचित खासदार बांसुरी स्वराज यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली.बांसुरी स्वराज या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.


millennium express news : रेल्वे प्रवासात मधला बर्थ कोसळून खालील प्रवाशाचा मृत्यू! रेल्वे प्रशासनानं झटकले हात

millennium express accident news : रेल्वे प्रवासात मधल्या बर्थची साखळी निसटून तो खाली कोसळल्याने खालच्या सीटवर असलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


Dengue outbreak: अनेक देशांमध्ये डेंग्युचा हाहाकार, भारतातही सतर्कतेचा इशारा

Dengue outbreak:डेंग्यु या प्राणघातक आजाराने अनेक देशांमध्ये विक्रमी पातळी गाठली असून, भारतातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या तज्ज्ञांनी सांगितले की डेंग्यूमुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.


Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवारांच्या आमदारांची घरवापसी होणार? शरद पवारांनी दिले संकेत

Ajit Pawar vs Sharad Pawar : 2024 च्या लोकसभेत अजित पवार गटाला अपयश आलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत याचा परिमाण होऊ शकतो अशी भीती अजित पवार गटातील आमदारांच्या मनात असल्याचे बोलले जात आहे. अशातच शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या आमदारांना पुन्हा पक्षात घेण्याचे संकेत दिले आहेत.


Tulsi Niyam: या दिवशी तुळशीला पाणी घालाल तर... येईल आर्थिक संकट

सनातन धर्मात झाडे आणि वनस्पतींनाही ईश्वराचा दर्जा आहे. आपल्या देशात जवळपास प्रत्येक अंगणात एक वनस्पती आढळते, ज्याची लोक रोज पाणी अर्पण करून पूजा करतात. तुळशी ही एक अशी वनस्पती आहे ज्यामध्ये लक्ष्मी वास करते असे मानले जाते. प्रत्येक घरात तुळशीचे रोप ठेवणे शुभ मानले जाते. दररोज सूर्योदयाच्या वेळी या वनस्पतीला पाणी दिल्यास जीवनात सकारात्मकता येते आणि जीवन आनंदी होते, अशी श्रद्धा आहे. तथापि, अशीही एक मान्यता आहे की काही दिवस असे असतात जेव्हा तुळशीला...


Bhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर 'माझा'वर : ABP Majha

Bhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर 'माझा'वर : ABP Majha परिसरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेलं आहे. वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून अद्याप एकजण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्याला (Lonavala News) गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर दोघांचा शोध सुरू आहे. दरम्यान 10 जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले होते. त्यापैकी 5 जणांना पाण्याच्या प्रवाहातुन बाहेर पडण्यात यश आलं आहे. दरम्यान, बुडालेल्या 5 जणांपैकी 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर एक अद्याप बेपत्ता आहेत. उर्वरित शोधकार्य आज करण्यात येणार आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातल्या धबधब्यातून हे पाच जण वाहून गेले आहेत. हे सर्वजण अन्सारी कुटुंबातले आहेत. यात लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सुहास दिवसे घटनास्थळी पोहोचले आहेत. भुशी डॅमजवळ वाहून गेलेल्यांना वाचवण्यासाठी ज्यांनी बचावकार्य केलं, त्या शिवदुर्ग टीममधील गावडे यांनी सांगितलं की, "पाऊस जास्त झाल्यानंतर लोणावळ्याकडे पर्यटक येत असतात. असंच हे कुटुंब होतं. हे कुटुंब एका लग्नसमारंभासाठी आलं होतं. समारंभ पार पडल्यापासून ते भुशी डॅमजवळ असलेल्या धबधब्यावर आले. इथे साधारणतः दुपारी साडेबाराच्या सुमारास ते गेले होते. या ठिकाणी अचानक पाऊस वाढला. या ठिकाणी 15 मिनिटांसाठी जरी पाऊस पडला तरीदेखील धबधब्याचं पाणी मोठ्या प्रमाणावर वाढतं. या पाण्याचा या कुटुंबाला अंदाज आला नाही त्यामुळेच दुर्घटना घडली. हा धबधबा पुढे जाऊन भुशी डॅमला मिळतो. आम्हाला आतापर्यंत सापडलेले मृतदेह सर्व भुशी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये सापडले आहेत. आणि इतर दोघांचा शोध सुरू आहे."


Video : Asaduddin Owaisi यांचा शपथविधी वादाच्या भोवऱ्यात, शपथ घेताना म्हणाले 'जय फिलिस्तीन'

Asaduddin Owaisi Oath Controversy : असदुद्दीन ओवेसी यांनी शपथेच्या सुरुवातीला बिस्मिल्ला पठण करून अखेरीस जय भीम, जय मीम, जय तेलंगणा, जय फिलिस्तीन म्हणत शेवट केला. ओवेसी यांच्या शपथेनंतर तेलंगणातील भाजप खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी आणि भाजपच्याच डी के अरूणा यांनी शपथ घेतली. त्यानंतर ओवेसी यांच्या शपथेमधील जय फिलिस्तीन शब्दाला लक्ष्य करणे भाजप खासदारांनी सुरू केले.


Surrogacy Leave : सरकारी कर्मचाऱ्यांना गुडन्यूज! आता सरोगसीने आई बनल्यानंतरही मिळणार ६ महिन्याची मातृत्व रजा

Surrogacy Leave: केंद्र सरकारने आपल्या ५० वर्षापूर्वीच्या नियमात बदल करत आता सरोगरीच्या माध्यमातून आई बनलेल्या महिलेलाही ६ महिन्यांची मातृत्व रजा देण्याची तरतूद केली आहे.


UPSC Prelims Result 2024 Out: यूपीएससी सीएसई परीक्षेचा निकाल जाहीर; upsc.gov.in लिंकवरून तपासा आणि डाउनलोड करा तुमचा रिझल्ट

UPSC Prelims Result 2024: केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC ने अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर प्रिलिम्स निकाल (UPSC प्रिलिम्स निकाल 2024) जाहीर केला आहे, येथे उमेदवार वेबसाइटची थेट लिंक आणि खालील पायऱ्यांच्या मदतीने आपले निकाल पाहू आणि डाउनलोड करू शकतात.


आयुष्मान (कसे) भव?

​​‘आयुष्मान सार्वजनिक आरोग्य केंद्रां’चे नामांतर ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ असे केंद्राने केल्यानंतर त्यास काही राज्यांनी आक्षेप घेतलेला आहे.


Beed Crime: परळीत गोळीबार, धनंजय मुंडे समर्थक युवा सरपंचाचा जागीच मृत्यू

Firing in Parali: बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत आहे. परळीत झालेल्या गोळीबारात एका युवा सरपंचाचा मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात...


Maharashtra Breaking News LIVE: दुधाच्या दरासंदर्भातील मोठी अपडेट

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील आणि देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा लाइव्ह अपडेट्समधून


भाषण विरोधी पक्ष नेत्याचं, कॅमेराचा फोकस अध्यक्षांवर, राहुल गांधींनी विषयच मिटवला

राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला संबोधित करत भाषण केलं. विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींचं हे पहिलंच भाषण होतं. राहुल गांधींनी गुजरातला येऊन तुम्हाला यावेळी हरवणार असं म्हणत अमित शाहांना समोरासमोरच चॅलेंज दिलं आहे, अग्निवीरला जवानाला नरेंद्र मोदी शहीद मानत नाहीत राहुल गांधी म्हणाले. भाषण विरोधी पक्ष नेत्याचं चालू असूनही कॅमेराचा फोकस अध्यक्षांवर का केला असं म्हणत राहुल गांधींनी जागेवरच सुनावलं . भाजप, नरेंद्र मोदी म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही, मोदींच्या समोरासमोर राहुल गांधींचं अख्ख्या कॅबिनेटला घाम फोडणारं संपूर्ण भाषण पहा ..