AJIT PAWAR VS SHARAD PAWAR : अजित पवारांच्या आमदारांची घरवापसी होणार? शरद पवारांनी दिले संकेत

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं विभाजन झालं. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर शरद पवार यांना पत्रकारांनी अनेकदा तुम्ही अजित पवारांच्या आमदारांना पुन्हा पक्षात घ्याल का? असा प्रश्न विचारला. त्यावर पवार यांनी '' अजित पवारांच्या आमदारांना पुन्हा पक्षात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही'' असं उत्तर दिलं होतं. परंतु आता शरद पवार यांनी आपला विचार बदलला असल्याचं बोललं जात आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत शरद पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांना पुन्हा पक्षात घेण्याचे संकेत दिले आहेत.

2024 च्या लोकसभेत अजित पवार गटाला अपयश आलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत याचा परिमाण होऊ शकतो अशी भीती अजित पवार गटातील आमदारांच्या मनात असल्याचे बोलले जात आहे. अशातच शरद पवार यांनी असं वक्तव्य केल्यामुळे अनेकांच्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या आहेत.

आगामी निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये नवीन उमेदवारांना संधी दिली जाईल,पक्ष याबाबत सकारात्मक असल्याचं शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

बारामतीतून युगेंद्र पवार यांना संधी ?

बारामती लोकसभा निवडणुकीतून चर्चेत आलेले तसेच अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभेचं तिकीट देण्यात यावं अशी मागणी होत आहे. जर युगेंद्र पवार यांना तिकीट मिळालं तर अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. अजित पवार गटाने एकूण चार जागा लढवल्या होत्या. त्यात त्यांना एकाच जागेवर विजय मिळवता आला. तर दुसरीकडे शरद पवार यांनी एकूण 10 जागा लढवल्या त्यातून 8 जागांवर विजय मिळवला आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-24T15:48:06Z dg43tfdfdgfd