बातम्या

Trending:


SSC Recruitment 2024: सरकारी नोकरीची संधी, कर्मचारी निवड आयोगात ८ हजारांपेक्षा अधिक जागांसाठी भरती

Staff Selection Commission Recruitment: कर्मचारी निवड आयोगात एकूण ८ हजार ३२६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसंदर्भात आवश्यक माहिती जाणून घेऊयात.


Water Level In Dams: धरणक्षेत्रांत थेंबे थेंबेच... पाणीसाठ्यात अवघी दीड टक्का वाढ; कोणत्या धरणात किती पाणी?

Mumbai Dams Water Level: जुलै महिन्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबईत लागू करण्यात आलेली दहा टक्के पाणीकपात महापालिका मागे घेऊ शकते.


Password Safety: 17 टक्के भारतीय नागरिक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत बेफिकीर; सर्वेक्षणातून आले समोर

Password Safety negligence : 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षितपणे पासवर्ड जतन करतात, सर्वेक्षणात धक्कादायक सत्य उघड झाले: भारतीय लोक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत निष्काळजी वृत्ती बाळगतात. लोकांना त्यांच्या फोनमध्ये पासवर्ड सेव्ह करण्याची किंवा नोटपॅडवर लिहून ठेवण्याची सवय असते. अशा निष्काळजीपणामुळे डेटा चोरीचा धोका वाढतो. एका सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षित पद्धतीने पासवर्ड सेव्ह करतात.


IndiGo flight News: मुंबईला येणाऱ्या विमानातील प्रवाशानं हद्दच केली, टॉयलेटमध्ये गेला अन्…

Delhi-Mumbai IndiGo flight: दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानाच्या स्वच्छतागृहात धुम्रपान केल्याप्रकरणी एका ३८ वर्षीय प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


Raj Thackeray: आयुष्यात कुणाला घाबरता? राज ठाकरेंचं उत्तर ऐकून सगळेच भारावले

मुंबई: तडाखेबाज भाषण आणि बेधडक निर्णय शैलीमुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. विरोधकांना किंवा सरकारच्या निर्णयावर घेऊन ठाकरी शैलीत फटकेबाजी करणारे राज ठाकरे आयुष्यात खरंच कुणाला घाबरतात का, असा सवाल थेट एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दिलेलं उत्तर ऐकून सगळेच भारावून गेले आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी...


Breaking News LIVE Updates : अधिवेशनात पूर्णवेळ उपस्थित राहण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या सुचना

Today Breaking News LIVE Updates: देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...


Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठक

मुंबई: हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली आहे. या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील राजकीय समीकरणं बदलणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे संतोष बांगर यांची भेट झाल्यानंतर हिंगोलीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. अधिवेशनाच्या कालावधीत ही भेट झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्या दरम्यान संतोष बांगर आणि त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्या गेल्या. पण आता हे दोन्ही नेते अब्दुल सत्तारांच्या घरी भेटले आणि ही भेट गुप्त होती. त्यामुळेच ही भेट हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणं बदलवणारी ठरण्याची शक्यता आहे.


Arvind Kejriwal Health Updated : कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं?

Arvind Kejriwal Health Updated : कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं? नवी दिल्ली : मद्य विक्री धोरणप्रकरणात अटकेत असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा न्यायालयातील मुक्काम आणखी वाढला आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, दिल्ली हायकोर्टानं (Highcourt) जामिनाच्या निर्णयाला दिलेल्या स्थगिती दिल्याने, त्या विरोधात केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्चात याचिका सादर केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. त्यावेळी, अरविंद केजरीवाल यांनी जामिनाला दिलेल्या स्थगिती प्रकरणी दिल्ली हायकोर्टाच्या अंतिम निर्णयाची वाट पाहावी, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सांगितले. आता, दिल्ली हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांना धक्का दिला आहे. कारण, ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचा जामीन रद्द केला आहे. त्यातच आज अरविंद केजरीवाल हे कोर्टरुममध्ये असताना त्यांची शुगर लेव्हल खालावली.


Weather update : महाराष्ट्रावर धडकणार मोठं संकट; पुढील 2 दिवस महत्त्वाचे

महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD)देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात आज पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सोबतच वादळी वाऱ्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. विदर्भात समाधानकारक पाऊस झाला नव्हता मात्र गेले दोन दिवस पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान पुढील 24 तासांमध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकणाबाबत बोलायचं झाल्यास पुढील 24 तासांमध्ये कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ढगाळ वातावरण राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. मुंबईत पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या काळात मुंबईचं तापमान 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान या काळात नुसता पाऊसच पडणार नसून, वादळाच्या रुपानं मोठं संकट देखील समोर आहे. या काळात ताशी 50 ते 60 किमी वेगानं वारं वाहू शकतं असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून आज पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.


BSF Constables Missing: बीएसएफच्या दोन महिला कॉन्स्टेबल गायब, लास्ट लोकेशन परराज्यात, आईला वेगळाच संशय

Women Mysteriously Missing From BSF Academy: बीएसएफच्या दोन महिला कॉन्स्टेबल अचानक गायब झाल्याने खळबळ माजली आहे. त्या गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता आहेत. तर या प्रकरणी एका महिलेल्या आईने मोठी भीती व्यक्त केली आहे.


Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE : अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक, शिंदे सरकारला कोंडित पकडणार?

Marathi News Live Update : विधीमंडळ अधिवेशनासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.


Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं? Narendra Modi on Congress : “दहशतवादी 2014 च्या पूर्वी वाटेल तेव्हा आणि वाटेल तिथे हल्ला करु शकत होते. 2014 च्या पूर्वी निर्दोष लोक मारले जात होते. भारतातील कानाकोपऱ्याला टार्गेट केले जात होते. तेव्हाचे सरकार गपचूप बसायचे. तोंड सुद्धा उघडत नव्हते. 2014 नंतरचा भारत घरात घुसून मारतो. आताचा भारत सर्जिकल स्ट्राईक करतो, एअर स्ट्राईक करतो. दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचे सामर्थ्यही भारताने दाखवले आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. ते लोकसभेत बोलत होते. नरेंद्र मोदींनी लोकसभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. संविधान डोक्यावर ठेऊन नाचणारे लोक जम्मू काश्मीरमध्ये संविधान लागू करण्याचे धैर्य दाखवत नव्हते पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आता देशातील प्रत्येक नागरिक जाणतो की, आपल्या सुरक्षेसाठी भारत काहीही करु शकतो. आर्टिकल 370 व्होट बँकेचे शस्त्र बनवण्यात आले. कलम 370 मुळे जम्मू काश्मीरमधील लोकांचे अधिकार गेले होते. भारताचे संविधान जम्मू-काश्मीरच्या सीमेमध्ये प्रवेश करु शकत नव्हते. हे संविधान डोक्यावर ठेऊन नाचणारे लोक जम्मू काश्मीरमध्ये संविधान लागू करण्याचे धैर्य दाखवत नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत होते. कलम 370 चा काळ होता,तेव्हा सीमेवर दगड मारण्यात येत होते. हे लोक निराशेत जात म्हणायचे आता जम्मू -काश्मीरचे आता काहीही होऊ शकणार नाही. आता आर्टिकल 370 ची भिंत कोसळली आहे.


Nanded | एसटी बस वाहक आणि प्रवाशात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

ST Driver and Passanger Rada in Nanded


MLA Fund : निधीवाटपावरुन जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप, भाजपकडून सभागृहात गदारोळ

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या निधीवाटपावरुन महायुती सरकारवर गंभीर आरोप, मला आमदार निधी मिळला नाही अशी खंत आव्हाडांनी सभागृहात बोलून दाखवली.


Bombay High Court on Hijab : हिजाब बंदीविरोधात विद्यार्थीनीने दिलेलं आव्हान कोर्टाने फेटाळलं

Bombay High Court on Hijab : हिजाब बंदीविरोधात विद्यार्थीनीने दिलेलं आव्हान कोर्टाने फेटाळलं महाविद्यालयातील 'हिजाब बंदी' योग्यच चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजनं ड्रेसकोडच्या माध्यमातून लागू केलीय हिजाबवर बंदी हिजाब बंदीला नऊ विद्यार्थिनींनी दिलंय मुंबई उच्च न्यायालयात दिलेलं आव्हान फेटाळलं हिजाब बंदी धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचा याचिकेतून दावा मात्र याचिकेतील आरोपांच कॉलेजकडून हायकोर्टात जोरदार खंडन कुठल्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही - कॉलेज Mumbai Hijab Ban In College : काही महिन्यांपूर्वी कर्नाटकमध्ये झालेल्या बुरखा बंदीच्या वादानंतर आता मुंबईतही (Mumbai News) असाच वाद निर्माण होतोय का, असे चित्र निर्माण झाले आहे. मुंबईतील चेंबूर (Chembur) भागात आचार्य महाविद्यालयात गणवेश सक्ती आणि बुरखा बंदी ( Hijab Ban) करण्यात आली आहे. त्यानंतर महाविद्यालयात बुरखा परिधान करुन येणाऱ्या विद्यार्थीनींना प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. कॉलेज प्रशासन बुरखा घालून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परवानगी देणार नाही यावर ठाम असल्याची माहिती आहे. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर आता कोर्टाने एका विद्यार्थीनीची याचिका फेटाळली आहे.


अन्नपूर्णांचा आधार -प्रेमाताई पुरव

Prematai Purav : प्रेमाताई मूळच्या गोव्याच्या. लहानपणीच त्या गोवा मुक्ती संग्रामात उतरल्या. बंदुक चालवणे, बॉम्ब तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवणे, दारूगोळा लपवणे अशा क्रांतिकारी कामांत त्यांचा सहभाग असे.


Job Majha : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथे विविध पदांसाठी भरती : 3 July 2024 : ABP Majha

Job Majha : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथे विविध पदांसाठी भरती : 3 July 2024 : ABP Majha हेही वाचा BOB Jobs 2024 : बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी, 600 हून अधिक पदांवर भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या Bank of Baroda Jobs 2024 : तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात (Job Vacancy) असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत विविध पदांवर भरती करण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावा. इच्छुक आणि पात्र उमेदवार bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. बँक ऑफ बडोदामध्ये 627 पदांवर भरती बँक ऑफ बडोदामध्ये वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यात येत आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 627 पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 12 जून 2024 पासून सुरु झाली आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख 2 जुलै 2024 आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळीच अर्ज दाखल करावा.


Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दर

Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दर हेही वाचा : देवगिरी निवासस्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची रात्री बैठक संपन्न... नवाब मलिकही बैठकीला उपस्थित..मलिकांना महायुतीत घेण्यास याआधी फडणवीसांनी केला होता विरोध उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक अटळ,शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात अंबादास दानवेंच्या शिवीगाळीबाबत उद्धव ठाकरेंनी मागितली माफी...तर अंबादास दानवेंचं निलंबन एक षडयंत्र, ठाकरेंचा हल्लाबोल तुम्ही नकली वाघांसोबत आहात इथे असली वाघांमध्ये या...वाघनखं कधी आणणार या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जयंत पाटलांना टोला... लाडकी बहीण योजनेत दोन बदल... वयाच्या मर्यादेत ६५ वर्षांपर्यंत वाढ, तर पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार.. तर अर्ज भरण्यासाठी ⁠३१ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ.. उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये भोलेबाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, ११६ भाविकांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त


मोदी-शहांचे विश्वासू

सन १९८९मध्ये ते परिषदेचे ‘राष्ट्रीय महामंत्री’ झाले आणि पुढील दोन वर्षांतच भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. याच काळात हिमाचल प्रदेशातील विलासपूर मतदारसंघातून ते विधानसभेत पोहोचले. प्रारंभी विरोधी पक्षनेता आणि पुढील निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळातील मंत्री अशी त्यांची वाटचाल झाली.


Ladki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधाव

Ladki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधाव आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने राज्य सरकारसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या (CM Ladki Bahin Yojna) अंमलबजावणीसंदर्भात मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी एक मागणी केली आहे. राज्य सरकारने दोन बायका किंवा दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषत: मुस्लीम महिलांना (Muslim Women) या योजनेचा फायदा देऊ नये, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे. प्रकाश महाजन यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल. राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' एका उदात्त हेतूने सुरु केली आहे. त्यामुळे राज्यातील महिला सक्षम होतील. मात्र, राज्य सरकारने या योजनेसाठी डोमिसाईल प्रमाणपत्राची घातलेली अट गरजेची आहे. डोमिसाईल प्रमाणपत्राची अट रद्द केल्यास राज्याबाहेरील लोक याचा फायदा घेतील, असे मतही प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले.


Ajit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार

Ajit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार हेही वाचा : कारखान्यासाठी कर्ज डावल्याने अशोक पवारांनी (Ashok Pawar) अजित पवारांना (Ajit Pawar) चॅलेंज केले आहे. 'एनएसडीसी'कडे (NSDC) सादर केलेल्या कर्जाच्या फाईल मध्ये त्रुटी असतील तर संबंधितांनी दाखवाव्यात. माझी कर्जाची फाईल 100% बरोबर आहे. मी समोरासमोर बसून चर्चा करेन असे आव्हान अशोक पवारांनी दिले. मी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत राहिलो म्हणून माझ्यावर अन्याय करणार असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशा शब्दात अशोक पवारांनी अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली. केवळ विरोधी पक्षात आहे म्हणून निधी दिला जात नाही हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. दोन दिवसांपूर्वी राज्यातील १३ कारखान्यांना एनएसडीसीकडून कारखान्यांना 1800 कोटींहून अधिक मर्जीचे कर्ज देण्यात आले होते. यामध्ये विरोधी पक्षात असणाऱ्या कारखान्यांना कर्ज डावलले गेल्याचा आरोप होत असून पुण्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.