बातम्या

Trending:


‘हुमणी’चा उपद्रव

शेती व्यवसाय करताना मशागत, लागवड, पाणी-खतांसोबतच विविध किडी, रोगांबाबतही सातत्याने काळजी घ्यावी लागते.


मुख्य सचिवपदावरील पुरुषी मक्तेदारी मोडीत

भारतीय प्रशासन सेवेच्या १९८७ च्या तुकडीतील राज्यातील सर्वांत जेष्ठ अधिकारी असलेल्या सौनिक यांनी आपल्या ३७ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत राज्यात विविध ठिकाणी काम केले आहे.


Legislative Council Election: शिंदेंनी शब्द पाळला, गवळी आणि तुमाने यांचे राजकीय पुनर्वसन; विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर

Legislative Council Election: लोकसभेच्या वेळी दिलेला शब्द एकनाथ शिंदे यांनी पाळला आहे. विधानपरिषदेसाठी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी देण्यात आली आहे.


पुणे कार अपघाता प्रकरणी मोठी अपडेट

pune police to meve supreme court against juvenile case of porsche car accident


Dengue outbreak: अनेक देशांमध्ये डेंग्युचा हाहाकार, भारतातही सतर्कतेचा इशारा

Dengue outbreak:डेंग्यु या प्राणघातक आजाराने अनेक देशांमध्ये विक्रमी पातळी गाठली असून, भारतातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या तज्ज्ञांनी सांगितले की डेंग्यूमुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.


Shivneri Bus : पुणेकरांसाठी खुशखबर! अटल सेतूवरुन स्वारगेट ते मंत्रालय 'शिवनेरी' सुसाट...

Swargate to mumbai Shivneri Bus : मुंबई पुणे प्रवास आणखी जलद होण्यासाठी एसटी परिवहन मंडळाने अटल सेतू महामार्गावरुन शिवनेरी बस सुरु केली आहे, अल्पवधीतच बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. अवघ्या साडे तीन तासांत मुंबई पुणे प्रवास शक्य होतोय.


LPG Price : खुशखबर! 1 जुलैपासून LPG Cylinder झाले स्वस्त, चेक करा दर

मुंबई : दर महिन्याच्या सुरुवातील गॅस सिलिंडरच्या दरात बदल होत असतात. 1 जुलै रोजी वाढत्या महागाईत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर जुलै महिन्यात तरी स्वस्त झाले असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे दिलासा मिळणार आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 30 रुपयांनी कपात केली आहे. 19 किलोग्रॅमच्या कर्मशियल गॅस सिलिंडर ३०-३१ रुपयांनी स्वस्त झाला आहे.1 जुलैपासून हा बदल करण्यात आला आहे. याचा फायदा...


Vidhansabha Diary : आतापर्यंतच्या विधानसभा अधिवेशनातील घडामोडी : 1 जुलै 2024 : ABP Majha

Vidhansabha Diary : आतापर्यंतच्या विधानसभा अधिवेशनातील घडामोडी : 1 जुलै 2024 : ABP Majha हेही वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या परिसरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या परिसरात आंबेडकरी जनतेकडून आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे या भागात अंडरग्राऊंड पार्किंग उभारण्याचे काम केले जात आहे. याच पार्किंगच्या कामाला आंबेडकरी जनतेने विरोध केला आहे. आंदोलक या मागणीला घेऊन आक्रमक झाले आहेत. बांधकामाच्या ठिकाणी आंदोलक मोठ्या संख्येने जमले आहेत. याच प्रकरणावर आंबेडकर चळवळीत काम करणारे तथा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या पार्किंगमुळे दीक्षाभूमी (Dikshabhumi) वास्तूला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबवले पाहिजे, अशी भूमिका आनंदराज आंबेडकर यांनी घेतली. आनंदराज आंबेडकर नेमकं काय म्हणाले? "दीक्षाभूमी परिसरात शुभोभिकरण चालू आहे, त्यात काहीही दुमत नाही. पण या परिसरात अंडरग्राऊंड पार्किंग असू नये. कारण दीक्षाभूमी परिसरात वर्षातून दोन ते तीन दिवस येथे येतो. या पार्किंगमुळे दीक्षाभूमीच्या वास्तूला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हे काम थांबवावं असं लोकांचं मत आहे. त्याऐवजी या भागात यात्रीनिवास बांधावे. वर्षातून दोन ते तीन दिवस या भागात आंबेडकरी समाज येथे येतो, तेव्हा त्यांना या यात्रानिवासात राहण्याची सोय होईल. नागपूर अधिवेशन चालू असते तेव्हादेखील या यात्रीनिवासाचा उपयोग होईल, असे आनंदराज आंबेडकर म्हणाले.


Angarki Sankashti Chaturthi: मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरातील वाहतुकीत बदल; 'हे' रस्ते बंद!

Mumbai Traffic Police Advisory: अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त आज सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.


भाषण विरोधी पक्ष नेत्याचं, कॅमेराचा फोकस अध्यक्षांवर, राहुल गांधींनी विषयच मिटवला

राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला संबोधित करत भाषण केलं. विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींचं हे पहिलंच भाषण होतं. राहुल गांधींनी गुजरातला येऊन तुम्हाला यावेळी हरवणार असं म्हणत अमित शाहांना समोरासमोरच चॅलेंज दिलं आहे, अग्निवीरला जवानाला नरेंद्र मोदी शहीद मानत नाहीत राहुल गांधी म्हणाले. भाषण विरोधी पक्ष नेत्याचं चालू असूनही कॅमेराचा फोकस अध्यक्षांवर का केला असं म्हणत राहुल गांधींनी जागेवरच सुनावलं . भाजप, नरेंद्र मोदी म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही, मोदींच्या समोरासमोर राहुल गांधींचं अख्ख्या कॅबिनेटला घाम फोडणारं संपूर्ण भाषण पहा ..


Top 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 1 जुलै 2024

Top 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 1 जुलै 2024 हेही वाचा : पावसाळी सहलीसाठी (Monsoon Trip) लोणावळ्यातील (Lonavala) भुशी धरण (Bhushi Dam) परिसरात गेलेल्या कुटुंबासोबत मोठी दुर्घटना घडली आहे. भुशी डॅम परिसरातील धबधब्यमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या मागील धबधब्यात पाच जणांचं अख्खं कुटुंब वाहून गेलं असून यामध्ये लहान मुले आणि महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलं असून शोधकार्य सुरु आहे. दरम्यान, हे अख्खं कुटुंब वाहून जातानाचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. धबधब्यातून भुशी धरणात वाहून गेलेलं अख्खं कुटुंब भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले आहेत. यामध्ये लहान मुलं-महिलांचा समावेश आहे. पाच जणांमधील दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत, इतर तिघांचं शोधकार्य सुरु आहेत. सहलीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉलमधून अन्सारी कुटुंब वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले भुशी धरणाच्या मागील धबधबा, रेल्वे वॉटर फॉल म्हणून ओळखला जातो. या धबधब्याचं पाणी पाणी भुशी धरणात येते. या धबधब्यात पाण्याचा अंदाज न आल्याने अख्खं कुटुंब वाहुन गेलं आहे.


‘सहमती’वर सहमती

मणिपूर हिंसाचारापासून सध्या गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटीपर्यंत अनेक प्रकरणांत पंतप्रधान मौन बाळगून असल्याकडे खर्गे यांनी बोट दाखविले आहे. मात्र, पंतप्रधानांप्रमाणे त्यांनीही ‘सर्वसहमती’चा मुद्दा उचलून धरला आहे.


Parliament Session 2024 LIVE Updates : अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, कोण होणार विरोधी पक्षनेता?

First Session Of 18th Lok Sabha LIVE Updates: १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व खासदारांना खासदारकीची शपथ देण्यात आली. तर आज विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे.


Devendra Fadnavis : पंकजा मुंडेंना विधानपरिषदेत उमेदवारी मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Devendra Fadnavis Pankaja Munde : पंकजा मुंडेंना विधानपरिषदेत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या उमेदवारीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


Kelavali Waterfall: केळवली धबधब्यात पोहताना युवक बुडाला

Kelavali Waterfall: मित्रांसोबत धबधब्यात पोहण्यासाठी गेलेला एक 22 वर्षीय तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. रविवारी साताऱ्यात ही दुर्दैवी घटना घडली ऋषिकेश रमेश कांबळे (रा. सैदापूर, ता. कराड) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. धबधब्याच्या मुख्य प्रवाहात आल्याने तरुण वाहून गेले आहे. या घटनेप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.


UPSC Prelims Result 2024 Out: यूपीएससी सीएसई परीक्षेचा निकाल जाहीर; upsc.gov.in लिंकवरून तपासा आणि डाउनलोड करा तुमचा रिझल्ट

UPSC Prelims Result 2024: केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC ने अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर प्रिलिम्स निकाल (UPSC प्रिलिम्स निकाल 2024) जाहीर केला आहे, येथे उमेदवार वेबसाइटची थेट लिंक आणि खालील पायऱ्यांच्या मदतीने आपले निकाल पाहू आणि डाउनलोड करू शकतात.


Prakash Ambedkar Nagpur : दीक्षाभूमी परिसरातील पार्किंगचा प्रश्न, प्रकाश आंबेडकर म्हणतात..

Prakash Ambedkar Nagpur : दीक्षाभूमी परिसरातील पार्किंगचा प्रश्न, प्रकाश आंबेडकर म्हणतात.. Nagpur News नागपूर : जगभरातील बौद्ध अनुयायांसह तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमी (Dikshabhumi) येथील अंडरग्राऊंड पार्किंगला वादाचे वळण लागले आहे. दीक्षाभूमी परिसरात नागरिकांनी अंडरग्राऊंड पार्किंगला (Underground Parking) कडाडून विरोध दर्शवत परिसरात जाळपोळ केली आहे. दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या संतप्त जमावाने होत असलेल्या विकासकामाच्या साहित्याची तोडफोड केली आहे. तर इतर विकासकामाला आमचा विरोधनसून केवळ चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगला आमचा कडाडून विरोध असल्याचे मत या आंदोलकांनी बोलतांना व्यक्त केली आहे. तर दीक्षाभूमी स्मारक समितीने मनमानी करत लोकांना विश्वासात न घेता हे विकासकार्य केल्याचा आरोपही बौद्ध अनुयायी आंदोलकांनी केला आहे. आंदोलनकर्त्याचा रोष लक्षात घेता पोलीस फाटा घटनास्थळी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. दीक्षाभूमी परिसरात बौद्ध अनुयायांचे तीव्र आंदोलन नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारकाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 200 कोटीची वेगवेगळी विकास कामे सुरु आहे . मात्र यातील अंडरग्राऊण्ड पार्किंग प्रकल्पाला घेऊन आंबेडकरी अनुयायांनी विरोध केला आहे. अंडरग्राऊण्ड पार्किंग हि विजयादशमी दिवशी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने हे काम तात्काळ थांबवावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. इतर विकास कामामध्ये सुरक्षा भिंत, तोरण द्वार, दगडी परिक्रमा पथ, मुख्य स्तूपाची डागडुजी आणि सौंदरीकरणाला आंदोलकांचा विरोध नसल्याचे देखील आंदोलकांनी सांगितले. यावेळी दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि शेकडो बौद्ध अनुयायी जमले आहे. परिणामी संतप्त जमावाने काही ठिकाणी साहित्याची नासधूस करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर घटनास्थळी आता मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला असून पोलीस आंदोलकांशी संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय.


July Festival Calendar 2024 : आषाढी एकादशी, योगिनी एकादशी, गुरूपौर्णमा ते चातुर्मास्यारंभ; जाणून घ्या जुलै महिन्यातील सण-उत्सव आणि व्रत

July Festival Calendar 2024 : जुलै महिन्याला सुरूवात झाली असून या महिन्यात अनेक सण आणि व्रत असणार आहे. धार्मिकदृष्ट्या जुलै महिना अतिशय खास असणार आहे. चला या महिन्यातील सण आणि व्रत जाणून घेऊयात.


Nagpur School Opening : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना संघ मुख्यालयाची सफर

Nagpur School Opening : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना संघ मुख्यालयाची सफर विदर्भातील हजारो शाळा आजपासून सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांच्या शाळेच्या आजचा पहिला दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी स्मरणीय ठरला आहे. काही शाळांनी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे फुलं देऊन स्वागत केले. तर काही शाळांनी पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगळे कार्यक्रम ठेवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मात्र, नागपूरच्या (Nagpur News) नूतन भारत शाळेनं पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना संघाच्या रेशीमबाग कार्यालयात (Rashtriya Swayamsevak Sangh Headquarters) नेले. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतिस्थळाला वंदन करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्राची सुरुवात केली. वर्तमान काळात हिंदुत्व काय? त्यासाठी कोणी कोणता त्याग केला आहे, हे भविष्यातील पिढीला कळावं, या उद्दिष्टाने आम्ही आमच्या सर्व 500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्राच्या पहिल्याच दिवशी संघस्थानी आणल्याचे मत शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केले आहे.


Ordnance Factory Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी उत्तम संधी; महिन्याला २०-२५ हजारांपर्यंत पगार

Ordnance Factory Bhandara Recruitment 2024: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भंडारा आयुध निर्माणी (महाराष्ट्र) ने १५८ डॅनियल बिल्डिंग वर्कर (DBW) पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे.


Rahul Gandhi vs Amit Shah : अग्निवीर योजनेवरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक ABP Majha

Rahul Gandhi vs Amit Shah : अग्निवीर योजनेवरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक ABP Majha ही बातमी पण वाचा नवी दिल्ली : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत (Lok Sabha) या चर्चेत बोलताना केलेल्या वक्तव्यानंतर जोरदार गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना म्हटलं की, नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात एका दिवशी म्हटलं की हिंदुस्ताननं कधी कुणावर आक्रमण केलं नाही. याचं कारण आहे हिंदुस्तान अहिंसेचा देश आहे. आपल्या महापुरुषांनी डरो मत, डराओ मत असं म्हटलं. भगवान शंकर म्हणतात डरो मत, डराओ मत आणि त्रिशुल जमीन रोवतात. दुसरीकडे जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात ते 24 तास हिंसा-हिंसा-हिंसा, नफरत-नफरत-नफरत, तुम्ही हिंदू असूच शकत नाही, हिंदू धर्मानं स्पष्टपणे म्हटलंय सत्याची साथ द्या. यानंतर भाजप नेते भाजप आक्रमक झाले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी आक्षेप घेतला. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले आणि या प्रकरणाला गंभीर प्रकरण असल्याचं म्हटलं. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणनं गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही, असं म्हटलं. यानंतर अमित शाह बोलायला उभे राहिले, त्यांनी म्हटलं की विरोधी पक्ष नेत्यांनी यावर माफी मागितली पाहिजे. कोट्यवधी लोक स्वत:ला अभिमानानं हिंदू म्हणतात, असं अमित शाह म्हणाले. राहुल गांधी यांनी अभय मुद्रा या विषयावर अभय मुद्रा मुद्यावर इस्लमाच्या विद्वानांचं मत घ्यावं, असं अमित शाह म्हणाले.