DEVENDRA FADNAVIS : पंकजा मुंडेंना विधानपरिषदेत उमेदवारी मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यांना आता विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची चर्चा होती. आता त्यावर शिक्कामोर्तब झाला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, विधानपरिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाकडून पाच नावं जाहीर झाली आहेत. विशेषत: आमचा सर्वांचा आग्रह होता, की पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली जावी. केंद्रीय भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलं आहे आणि त्यांचं नाव जाहीर केलं आहे.

पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी केंद्राने जाहीर केल्याचा आनंद आहे. पंकजाताईंना विधानपरिषदेत स्थान दिलं जावं, असा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता. तो भाजप केंद्रीय समितीने मान्य केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असं फडणवीस म्हणाले.

विधानपरिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली असून पाच जणांना तिकीटं जाहीर करण्यात आली आहेत. यात पंकजा मुंडे यांचं नाव असून त्यांना भाजपने तिसऱ्यांदा संधी दिली आहे. दरम्यान, लोकसभेत बीड मदतारसंघातून महायुतीकडून पंकजा मुंडे, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रीवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना उमेदवारी होती. मात्र बजरंग सोनवणेंनी पंकजाताईंचा लोकसभेत पराभव केला होता. आता त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी मिळली असून २ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तर १२ जुलै रोजी मतदान होणार असून १२ जुलैलाच मतमोजणी होणार आहे.

...हा हिंदू समाजाचा अपमान आहे - फडणवीस

दरम्यान, राहुल गांधींनी हिंदूंना हिसंक म्हटलं, त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, राहुल गांधींनी अतिशय चुकीचं, अतिशय आक्षेपार्ह, संपूर्ण हिंदू समाजाचं अपमान करणारं विधान राहुल गांधी यांनी केलं आहे. लोकसभेत तमाम हिंदू समाजाला त्यांनी हिंसक म्हणणं हा हिंदू समाजाचा अपमान आहे. आम्ही त्यांच्या विधानाचा निषेध करतो. त्यांनी आपले शब्द मागे घ्यावेत. त्यांनी लोकसभेत सर्व हिंदूंची माफी मागावी अशी आमची मागणी आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-01T15:00:03Z dg43tfdfdgfd