Trending:


भाषण विरोधी पक्ष नेत्याचं, कॅमेराचा फोकस अध्यक्षांवर, राहुल गांधींनी विषयच मिटवला

राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला संबोधित करत भाषण केलं. विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींचं हे पहिलंच भाषण होतं. राहुल गांधींनी गुजरातला येऊन तुम्हाला यावेळी हरवणार असं म्हणत अमित शाहांना समोरासमोरच चॅलेंज दिलं आहे, अग्निवीरला जवानाला नरेंद्र मोदी शहीद मानत नाहीत राहुल गांधी म्हणाले. भाषण विरोधी पक्ष नेत्याचं चालू असूनही कॅमेराचा फोकस अध्यक्षांवर का केला असं म्हणत राहुल गांधींनी जागेवरच सुनावलं . भाजप, नरेंद्र मोदी म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही, मोदींच्या समोरासमोर राहुल गांधींचं अख्ख्या कॅबिनेटला घाम फोडणारं संपूर्ण भाषण पहा ..


Bansuri Swaraj Taking Oath | संस्कृतमधून शपथ, सुषमा स्वराज यांच्या मुलीनं नाव काढलं

आज २४ जून संसदेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला.भाजपच्या नवनिर्वाचित खासदार बांसुरी स्वराज यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली.बांसुरी स्वराज या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.


Bhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर 'माझा'वर : ABP Majha

Bhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर 'माझा'वर : ABP Majha परिसरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेलं आहे. वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून अद्याप एकजण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्याला (Lonavala News) गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर दोघांचा शोध सुरू आहे. दरम्यान 10 जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले होते. त्यापैकी 5 जणांना पाण्याच्या प्रवाहातुन बाहेर पडण्यात यश आलं आहे. दरम्यान, बुडालेल्या 5 जणांपैकी 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर एक अद्याप बेपत्ता आहेत. उर्वरित शोधकार्य आज करण्यात येणार आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातल्या धबधब्यातून हे पाच जण वाहून गेले आहेत. हे सर्वजण अन्सारी कुटुंबातले आहेत. यात लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सुहास दिवसे घटनास्थळी पोहोचले आहेत. भुशी डॅमजवळ वाहून गेलेल्यांना वाचवण्यासाठी ज्यांनी बचावकार्य केलं, त्या शिवदुर्ग टीममधील गावडे यांनी सांगितलं की, "पाऊस जास्त झाल्यानंतर लोणावळ्याकडे पर्यटक येत असतात. असंच हे कुटुंब होतं. हे कुटुंब एका लग्नसमारंभासाठी आलं होतं. समारंभ पार पडल्यापासून ते भुशी डॅमजवळ असलेल्या धबधब्यावर आले. इथे साधारणतः दुपारी साडेबाराच्या सुमारास ते गेले होते. या ठिकाणी अचानक पाऊस वाढला. या ठिकाणी 15 मिनिटांसाठी जरी पाऊस पडला तरीदेखील धबधब्याचं पाणी मोठ्या प्रमाणावर वाढतं. या पाण्याचा या कुटुंबाला अंदाज आला नाही त्यामुळेच दुर्घटना घडली. हा धबधबा पुढे जाऊन भुशी डॅमला मिळतो. आम्हाला आतापर्यंत सापडलेले मृतदेह सर्व भुशी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये सापडले आहेत. आणि इतर दोघांचा शोध सुरू आहे."


आयुष्मान (कसे) भव?

​​‘आयुष्मान सार्वजनिक आरोग्य केंद्रां’चे नामांतर ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ असे केंद्राने केल्यानंतर त्यास काही राज्यांनी आक्षेप घेतलेला आहे.


Special Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्या

Beed Parli Firing : बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून रोज घडणाऱ्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेच्या पूर्णतः बोजवारा उडाला आहे का असा प्रश्न पडावा एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात एक ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हे प्रकरण पैशाच्या व्यवहारातून झाले असल्याचे पोलिस सांगत असले तरी याला राजकीय रंग असल्याची चर्चा आहे. वेळ रात्रीची सव्वा आठ वाजता, ठिकाण परळी शहरातील बँक कॉलनीमधील परिसर. फारशी रहदारी नसलेल्या या भागात लोक घरामध्ये असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज झाला आणि याच गोळीबारामध्ये एक जण जागीच कोसळला. त्यांचं नाव होतं बापू आंधळे (Bapu Andhale Beed) . परळी शहरापासून जवळ असलेल्या मरळवाडी या गावचे सरपंच. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काही दिवसापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बापू आंधळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.


Pandharpur | शिल्पांनी सजली पंढरी, वारकऱ्यांची शिल्प स्वागतासाठी सज्ज

Pandharpur Ground Report Statues Installed At Various Places Ahead Of Ashadi Ekadashi


Amarnath Yatra Jammu Kashmir : अमरनाथ यात्रेला सुरूवात; 28 हजारहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन

Amarnath Yatra Jammu Kashmir : अमरनाथ यात्रेला सुरूवात; 28 हजारहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन हिंदू धर्मात चार धाम यात्रेला अत्यंत महत्त्व आहे. असं म्हणतात की ही यात्रा केल्याने पुण्य लाभते. 29 जूनपासून पवित्र अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) सुरुवात होत आहे. हिमालयाच्या सुंदर पर्वत रांगांमध्ये वसलेले अमरनाथ हे हिंदूंचे सर्वात आदरणीय पवित्र तीर्थक्षेत्र आहे. अमरनाथ यात्रा दरवर्षी जून-जुलै महिन्यात सुरू होते जी शिवभक्तांसाठी खूप महत्त्वाची आहे. इथल्या गुहेतील बर्फापासून शिवलिंगाची निर्मिती हे अमरनाथचे वैशिष्ट्य आहे, नैसर्गिक बर्फापासून तयार होत असल्याने याला 'हिमानी शिवलिंग' किंवा 'बर्फानी बाबा' असेही म्हणतात. अमरनाथ यात्रा 2024 साठी ऑफलाइन नोंदणी करण्यासाठी, तुम्ही या सोप्या टिप्सची मदत घेऊ शकता जम्मू आणि काश्मीर बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा येस बँकेच्या कोणत्याही शाखेला भेट द्या. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करा भरलेला अर्ज तयार ठेवा आरोग्य प्रमाणपत्र अनिवार्य अर्जदाराचे स्कॅन केलेले छायाचित्र प्रति प्रवासी 500 रुपये नोंदणी शुल्क (पंजाब नॅशनल बँकेत जमा करायचे) सहलीला जाणाऱ्या सर्व लोकांचे फोटो प्रवास नोंदणी शुल्क (प्रति प्रवासी रु. 250) ग्रुप लीडरचे नाव मोबाईल क्रमांक ईमेलसह पत्ता अमरनाथ यात्रेसाठी वैद्यकीय फॉर्म कोणत्याही जवळच्या बँकेच्या शाखेतून मिळू शकतो. फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरल्यानंतर स्वाक्षरी करावी लागेल. त्यानंतर तुम्ही प्रवासासाठी योग्य आहात याची पडताळणी करण्यात येईल.


IAS Sujata Saunik : पुरुषी मक्तेदारी मोडित, राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक

Sujata Saunik : राज्याच्या मुख्य सचिवपदी रविवारी सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. यानिमित्ताने या पदावरील पुरुषी मक्तेदारी मोडित काढण्याचा मान सुजाता सौनिक यांना मिळाला आहे.


LPG Price : खुशखबर! 1 जुलैपासून LPG Cylinder झाले स्वस्त, चेक करा दर

मुंबई : दर महिन्याच्या सुरुवातील गॅस सिलिंडरच्या दरात बदल होत असतात. 1 जुलै रोजी वाढत्या महागाईत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर जुलै महिन्यात तरी स्वस्त झाले असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे दिलासा मिळणार आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 30 रुपयांनी कपात केली आहे. 19 किलोग्रॅमच्या कर्मशियल गॅस सिलिंडर ३०-३१ रुपयांनी स्वस्त झाला आहे.1 जुलैपासून हा बदल करण्यात आला आहे. याचा फायदा...


Pune Traffic Changes:अंगारकी चतुर्थीमुळे पुण्यातील वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग जाणून घ्या

Pune Traffic Changes: अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणपतीच्या मंदिराच्या आसपासच्या भागात प्रचंड गर्दी होते. तसेच रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक सुरळीत करणं, हे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान असतं. तसेच अनेक तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्याने भाविकांचा त्रास वाढतो. त्यामुळे पुणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत काही बदल केले आहेत.


Zatpat News| राज्यभरातील महत्वाच्या बातम्या

Zatpat Batmya Maharashtra Important News


Angarki Sankashti Chaturthi: मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरातील वाहतुकीत बदल; 'हे' रस्ते बंद!

Mumbai Traffic Police Advisory: अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त आज सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.


CGHS Card : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा काढावं लागणार सीजीएचएस कार्ड! कसा करायचा अर्ज? जाणून घ्या

How to Apply CGHS Card: केंद्र सरकारची आरोग्य योजनेअंतर्गत केंद्र सरकार सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वैद्यकीय सेवा पुरवते.


Kelavali Waterfall: केळवली धबधब्यात पोहताना युवक बुडाला

Kelavali Waterfall: मित्रांसोबत धबधब्यात पोहण्यासाठी गेलेला एक 22 वर्षीय तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. रविवारी साताऱ्यात ही दुर्दैवी घटना घडली ऋषिकेश रमेश कांबळे (रा. सैदापूर, ता. कराड) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. धबधब्याच्या मुख्य प्रवाहात आल्याने तरुण वाहून गेले आहे. या घटनेप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.


Parliament Session 2024 LIVE Updates : १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात, २८१ खासदार पहिल्यांदाच संसदेत

First Session Of 18th Lok Sabha LIVE Updates : १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली असून दोन्ही सभागृहात घडणाऱ्या गोष्टींचा आढावा या ब्लॉगद्वारे घेणार आहोत.


‘सहमती’वर सहमती

मणिपूर हिंसाचारापासून सध्या गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटीपर्यंत अनेक प्रकरणांत पंतप्रधान मौन बाळगून असल्याकडे खर्गे यांनी बोट दाखविले आहे. मात्र, पंतप्रधानांप्रमाणे त्यांनीही ‘सर्वसहमती’चा मुद्दा उचलून धरला आहे.


Husband Killed Wife: व्हिडिओ कॉल जीवावर बेतला, चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवलं

Nagpur Crime: आरोपी विकी विर्क आणि मयत मन्नत कौर यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांचा संसार सुरळीत सुरु होता आणि दोघांना 2 वर्षाचा मुलगा देखील आहे. मात्र विकीला जुगाराचे सवय जडली. त्यात तो मन्नतच्या चारित्र्यावर देखील संशय घेत होता. यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत मन्नत ही विकीपासून दूर तिच्या माहेरी राहत होती.


Prakash Ambedkar Nagpur : दीक्षाभूमी परिसरातील पार्किंगचा प्रश्न, प्रकाश आंबेडकर म्हणतात..

Prakash Ambedkar Nagpur : दीक्षाभूमी परिसरातील पार्किंगचा प्रश्न, प्रकाश आंबेडकर म्हणतात.. Nagpur News नागपूर : जगभरातील बौद्ध अनुयायांसह तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमी (Dikshabhumi) येथील अंडरग्राऊंड पार्किंगला वादाचे वळण लागले आहे. दीक्षाभूमी परिसरात नागरिकांनी अंडरग्राऊंड पार्किंगला (Underground Parking) कडाडून विरोध दर्शवत परिसरात जाळपोळ केली आहे. दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या संतप्त जमावाने होत असलेल्या विकासकामाच्या साहित्याची तोडफोड केली आहे. तर इतर विकासकामाला आमचा विरोधनसून केवळ चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगला आमचा कडाडून विरोध असल्याचे मत या आंदोलकांनी बोलतांना व्यक्त केली आहे. तर दीक्षाभूमी स्मारक समितीने मनमानी करत लोकांना विश्वासात न घेता हे विकासकार्य केल्याचा आरोपही बौद्ध अनुयायी आंदोलकांनी केला आहे. आंदोलनकर्त्याचा रोष लक्षात घेता पोलीस फाटा घटनास्थळी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. दीक्षाभूमी परिसरात बौद्ध अनुयायांचे तीव्र आंदोलन नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारकाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 200 कोटीची वेगवेगळी विकास कामे सुरु आहे . मात्र यातील अंडरग्राऊण्ड पार्किंग प्रकल्पाला घेऊन आंबेडकरी अनुयायांनी विरोध केला आहे. अंडरग्राऊण्ड पार्किंग हि विजयादशमी दिवशी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने हे काम तात्काळ थांबवावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. इतर विकास कामामध्ये सुरक्षा भिंत, तोरण द्वार, दगडी परिक्रमा पथ, मुख्य स्तूपाची डागडुजी आणि सौंदरीकरणाला आंदोलकांचा विरोध नसल्याचे देखील आंदोलकांनी सांगितले. यावेळी दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि शेकडो बौद्ध अनुयायी जमले आहे. परिणामी संतप्त जमावाने काही ठिकाणी साहित्याची नासधूस करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर घटनास्थळी आता मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला असून पोलीस आंदोलकांशी संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय.


Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवारांच्या आमदारांची घरवापसी होणार? शरद पवारांनी दिले संकेत

Ajit Pawar vs Sharad Pawar : 2024 च्या लोकसभेत अजित पवार गटाला अपयश आलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत याचा परिमाण होऊ शकतो अशी भीती अजित पवार गटातील आमदारांच्या मनात असल्याचे बोलले जात आहे. अशातच शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या आमदारांना पुन्हा पक्षात घेण्याचे संकेत दिले आहेत.


NEET चौकशीसाठी CBI चं पथक लातूरमध्ये दाखल

NEET CBI


Ordnance Factory Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी उत्तम संधी; महिन्याला २०-२५ हजारांपर्यंत पगार

Ordnance Factory Bhandara Recruitment 2024: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भंडारा आयुध निर्माणी (महाराष्ट्र) ने १५८ डॅनियल बिल्डिंग वर्कर (DBW) पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे.


‘१५ मिनिटवाली’ शहरे

15-Minute Cities: घराजवळ नोकरी किंवा नोकरीच्या ठिकाणाजवळ भाड्याने घर हा दृष्टिकोन रुजत आहे. त्यामुळे उद्या ‘पंधरा मिनिटांची शहरे’ निश्चितच उभी राहतील.


Shivneri Bus : पुणेकरांसाठी खुशखबर! अटल सेतूवरुन स्वारगेट ते मंत्रालय 'शिवनेरी' सुसाट...

Swargate to mumbai Shivneri Bus : मुंबई पुणे प्रवास आणखी जलद होण्यासाठी एसटी परिवहन मंडळाने अटल सेतू महामार्गावरुन शिवनेरी बस सुरु केली आहे, अल्पवधीतच बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. अवघ्या साडे तीन तासांत मुंबई पुणे प्रवास शक्य होतोय.


TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :01 JULY 2024 : ABP Majha

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :01 JULY 2024 : ABP Majha नाशिक शिक्षक मतदार संघाचा निकाल आज जाहीर होणार आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक महायुतीकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी मतदारसंघात बैठका घेऊन मोर्चे बांधणी केली होती. महायुतीने दोन उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयाचा मार्ग सोपा असेल या अशी परिस्थिती असताना महायुतीने किशोर दराडे हेच एकमेव महायुतीचे उमेदवार असल्याची घोषणा केली. विरोधकांकडून निवडणुकीत किशोर दराडे यांच्यावर पैसे वाटण्याच्या आरोप देखील करण्यात आले होते. त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राज्यभर चर्चेत आली होती. निकालाच्या दिवशी महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी घरात देवदर्शन केले आणि कुटुंबियांकडून किशोर दराडे यांचे औक्षण करण्यात आले. किशोर दराडे यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.


Legislative Council Elections: विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, २ जागांवर महायुतीला धक्का, १ जागेवर भाजपची बाजी

Legislative Council Elections Result: विधान परिषद निवडणुकीच्या तीन जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यात दोन जागांवर मविआने विजय मिळवला आहे. तर एका जागेवर भाजपला विजय मिळाला आहे.


Jitendra Awhad Thane :ठाण्याजवळ येऊरमध्ये रेव्ह पार्टीचं आयोजन - जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Thane :ठाण्याजवळ येऊरमध्ये रेव्ह पार्टीचं आयोजन - जितेंद्र आव्हाड हेही वाचा : यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये पंजाबमधील एका कुटुंबाचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी पहाटे यवतमाळ -नागपूर महामार्गावरील (Yavatmal Nagpur Highway) चापरडा गावाजवळ हा अपघात (Road Accident) झाला. या दुर्घटनेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यवतमाळ-नागपूर महामार्गावर एका इनोव्हा गाडीतून हे शीख कुटुंब प्रवास करत होते. हे सर्वजण पंजाबवरुन आले होते. ते नांदेड येथील गुरुद्वारामध्ये चालले होते. त्यांची इनोव्हा कार चारपडा गावाजवळ असताना गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार समोर असलेल्या ट्रकवर जोरात जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, इनोव्हा कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. इनोव्हा कारच्या बोनेटचा भाग जोरात धडक झाल्यामुळे ट्रकच्या मागच्या भागात शिरला. त्यामुळे बोनेटचा पत्रा उखडला गेला अन् पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला. या गाडीत एअरबॅग्ज नव्हत्या. त्यामुळे चालकासह मागच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांनाही गंभीर दुखापत झाली. या जोरदार धडकेत इनोव्हा कारमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे.


पुणे कार अपघाता प्रकरणी मोठी अपडेट

pune police to meve supreme court against juvenile case of porsche car accident