Trending:


ABP Majha Headlines : 11:00AM : 3 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 11:00AM : 3 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स १२१ जणांचा बळी घेणाऱ्या चेंगराचेंगरीला सत्संग सेवेकरी जबाबदार असल्याचा ठपका, एफआयआरमध्ये भोलेबाबचं नाव वगळलं भोलेबाबाच्या पायाखालच्या पवित्र माती गोळा करण्याच्या नादात १२१ बळी, बाबाची चरणधूळ चमत्कारी असल्याचा भक्तांची श्रद्धा अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिकांची उपस्थिती... बैठकीला आमंत्रण आल्यामुळे मलिक उपस्थित राहिले, फडणवीस, एकनाथ शिंदेंना रूचणार का याची चर्चा विधानपरिषदेच्या नऊच्या नऊ जागा निवडून आणा, मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना सूचना, विधानसभेच्या तयारीला लागण्यचेही आदेश लाडकी बहीण योजनेत दोन बदल... वयाच्या मर्यादेत ६५ वर्षांपर्यंत वाढ, तर पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार, तर अर्ज भरण्यासाठी ⁠३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ एससी एसटी मतांसाठी भाजप पुन्हा आक्रमक, एससी एसटी मोर्चासह फडणवीसांनी घेतला आढावा, विधानसभा निवडणुकीत बेसावध न राहण्याच्या सूचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी लढण्याची शक्यता, पटोलेंची माझगांव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड दीक्षाभूमीवर झालेल्या हिंसक आंदोलनाबाबत गुन्हा दाखल, वंचितचा शहर अध्यक्ष रवी शेंडेही आरोपी, इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल


Pune| पुणे शहराची आज बत्तीगुल

Preview for Pune Without Power Supply For Today


जागतिक राजकारण आणि भारत

G 7 Summit Italy: 'जी ७' परिषद, युक्रेन युद्धाबाबतची शांतता परिषद, अमेरिकेने रशियाचे पैसे वापरण्याविषयी केलेले वक्तव्य या साऱ्या पार्श्वभूमीवर 'ग्लोबल साउथ', 'ब्रिक्स' आणि भारत यांचा विचार करायला हवा. आताची बदललेली बाजू आपणही समजून घ्यायला हवी.


IndiGo flight News: मुंबईला येणाऱ्या विमानातील प्रवाशानं हद्दच केली, टॉयलेटमध्ये गेला अन्…

Delhi-Mumbai IndiGo flight: दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानाच्या स्वच्छतागृहात धुम्रपान केल्याप्रकरणी एका ३८ वर्षीय प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


MLA Fund : निधीवाटपावरुन जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप, भाजपकडून सभागृहात गदारोळ

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या निधीवाटपावरुन महायुती सरकारवर गंभीर आरोप, मला आमदार निधी मिळला नाही अशी खंत आव्हाडांनी सभागृहात बोलून दाखवली.


Pandharpur Wari Toll Free: पंढरीची वारी टोलमुक्त ! 21 जुलैपर्यंत पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफी जाहीर

Ashadhi wari toll free for warkari vehicles: आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल माफी करण्याचं राज्य सरकारने जाहीर केलं आहे.


Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठक

मुंबई: हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली आहे. या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील राजकीय समीकरणं बदलणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे संतोष बांगर यांची भेट झाल्यानंतर हिंगोलीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. अधिवेशनाच्या कालावधीत ही भेट झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्या दरम्यान संतोष बांगर आणि त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्या गेल्या. पण आता हे दोन्ही नेते अब्दुल सत्तारांच्या घरी भेटले आणि ही भेट गुप्त होती. त्यामुळेच ही भेट हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणं बदलवणारी ठरण्याची शक्यता आहे.


Bombay High Court on Hijab : हिजाब बंदीविरोधात विद्यार्थीनीने दिलेलं आव्हान कोर्टाने फेटाळलं

Bombay High Court on Hijab : हिजाब बंदीविरोधात विद्यार्थीनीने दिलेलं आव्हान कोर्टाने फेटाळलं महाविद्यालयातील 'हिजाब बंदी' योग्यच चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजनं ड्रेसकोडच्या माध्यमातून लागू केलीय हिजाबवर बंदी हिजाब बंदीला नऊ विद्यार्थिनींनी दिलंय मुंबई उच्च न्यायालयात दिलेलं आव्हान फेटाळलं हिजाब बंदी धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचा याचिकेतून दावा मात्र याचिकेतील आरोपांच कॉलेजकडून हायकोर्टात जोरदार खंडन कुठल्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही - कॉलेज Mumbai Hijab Ban In College : काही महिन्यांपूर्वी कर्नाटकमध्ये झालेल्या बुरखा बंदीच्या वादानंतर आता मुंबईतही (Mumbai News) असाच वाद निर्माण होतोय का, असे चित्र निर्माण झाले आहे. मुंबईतील चेंबूर (Chembur) भागात आचार्य महाविद्यालयात गणवेश सक्ती आणि बुरखा बंदी ( Hijab Ban) करण्यात आली आहे. त्यानंतर महाविद्यालयात बुरखा परिधान करुन येणाऱ्या विद्यार्थीनींना प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. कॉलेज प्रशासन बुरखा घालून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परवानगी देणार नाही यावर ठाम असल्याची माहिती आहे. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर आता कोर्टाने एका विद्यार्थीनीची याचिका फेटाळली आहे.


Password Safety: 17 टक्के भारतीय नागरिक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत बेफिकीर; सर्वेक्षणातून आले समोर

Password Safety negligence : 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षितपणे पासवर्ड जतन करतात, सर्वेक्षणात धक्कादायक सत्य उघड झाले: भारतीय लोक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत निष्काळजी वृत्ती बाळगतात. लोकांना त्यांच्या फोनमध्ये पासवर्ड सेव्ह करण्याची किंवा नोटपॅडवर लिहून ठेवण्याची सवय असते. अशा निष्काळजीपणामुळे डेटा चोरीचा धोका वाढतो. एका सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षित पद्धतीने पासवर्ड सेव्ह करतात.


Ajit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार

Ajit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार हेही वाचा : कारखान्यासाठी कर्ज डावल्याने अशोक पवारांनी (Ashok Pawar) अजित पवारांना (Ajit Pawar) चॅलेंज केले आहे. 'एनएसडीसी'कडे (NSDC) सादर केलेल्या कर्जाच्या फाईल मध्ये त्रुटी असतील तर संबंधितांनी दाखवाव्यात. माझी कर्जाची फाईल 100% बरोबर आहे. मी समोरासमोर बसून चर्चा करेन असे आव्हान अशोक पवारांनी दिले. मी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत राहिलो म्हणून माझ्यावर अन्याय करणार असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशा शब्दात अशोक पवारांनी अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली. केवळ विरोधी पक्षात आहे म्हणून निधी दिला जात नाही हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. दोन दिवसांपूर्वी राज्यातील १३ कारखान्यांना एनएसडीसीकडून कारखान्यांना 1800 कोटींहून अधिक मर्जीचे कर्ज देण्यात आले होते. यामध्ये विरोधी पक्षात असणाऱ्या कारखान्यांना कर्ज डावलले गेल्याचा आरोप होत असून पुण्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


Manoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणार

Manoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणार मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार आहे ,हे आम्हाला दिसतेय म्हणून आता आम्ही ताकतीने उठाव करणार... मनोज जरांगे सरकारकडून मराठा मोर्चा शंभर टक्के अन्याय होणार आहे हे आम्हाला दिसत असून आता आम्ही ताकतीने उठाव करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय, मात्र शंभूराज देसाई यांच्या शब्दाखातर 13 जुलैपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत असे देखील मनोज जरांगे म्हणालेत दरम्यान छत्रपती संभाजीनगर मध्ये वंचित बहुजन आघाडीने सगे सोयरेचा अध्यादेश रद्द करावा तथा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या स्वरूपाचे बॅनर लावलेत ,यावर बोलताना मनोज जरांगे यांनी वंचित बहुजन आघाडीने अशी का भूमिका घेतली हे आपल्याला माहिती नाही मात्र प्रकाश आंबेडकर यांचा आपल्याला स्पष्टपणा आवडतो त्यामुळे आपण अगोदर ही सन्मान करत होतो आणि उद्याही करत राहू अशा प्रकारचं उत्तर त्यांनी दिलय.


Sanjay Raut PC : गांधींनी मोदींना लोकसभेत घाम फोडला मला बोलू दिलं नाही, माईक बंद केला- राऊत

Sanjay Raut PC : गांधींनी मोदींना लोकसभेत घाम फोडला मला बोलू दिलं नाही, माईक बंद केला- राऊत महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे वक्तव्य योग्य असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं. राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार आहे. आम्हाला 175-180 जागा मिळतील असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. केंद्रात राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर इंडिया आघाडीच्या आणखी 25-30 जागा वाढल्या असत्या असे संजय राऊत म्हणाले. कोणतंही सरकार किंवा संस्था बिनचेहऱ्याची असू नये. आपण कोणासाठी मतदान करतो हे लोकांना कळायला हवं. लोकांनी इंदिरा गांधींना, राजीव गांधींना मतदान केलं. मोदींना मतदान केलं. त्यामुळं महाविकास आघाडीला मुख्यमंत्रीदाचा चेहरा हवा हे आमचं मत असल्याचे राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीसांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊत यांनी टीका केली. फडणवीसांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. त्यांच्या पक्षाला राज्यातील जनतेनं झिडकारुन लावलं आहे. ते स्वत:ला नाना फडणवीसांचे मोठे भाऊ समजत होते, पण तसं काही नाही. नाना फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते. त्या साडेतीन शहाण्यांमध्ये यांना स्थान नाही, असे म्हणत राऊतांनी फडणवीसांना टोला लागवाला.


Maharashtra weather Update : राज्यात आज 'या' ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD नं दिला हा महत्वाचा इशारा

Maharashtra weather Update : मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे. आज राज्यात काही जिल्ह्यात अतिमुळसाधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवमान विभागाने ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे.


Uddhav Thackeray and Aaditya Thackeray : "Mahalaxmi Race Course ची जागा बिल्डरांच्या घशात घालू नका"

Uddhav Thackeray and Aaditya Thackeray : "Mahalaxmi Race Course ची जागा बिल्डरांच्या घशात घालू नका" Mahalaxmi Racecourse 120 Acres Land Handover To BMC: मुंबई : महालक्ष्मी रेस कोर्सची (Mahalaxmi Race Course) 120 एक्कर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या (BMC) ताब्यात देण्यास राज्य सरकारनं (Maharashtra Government) मंजुरी दिली आहे. महालक्ष्मी (Mumbai News) रेसकोर्सची 120 एकर जागेत सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी जागा वापरली जाणार आहे. 1914 साली रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 99 वर्षांच्या लीजवर ही जागा देण्यात आली होती. त्यानंतर हा करार 2013 मध्ये संपुष्टात आला होता. त्यानंतर या जमिनीवर थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. या प्रकल्पात थीम पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनर असा समावेश होता. या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. थीम पार्क उभारण्यासाठी ही जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करणे गरजेचे होते. ही 211 एकर जागा आहे. त्यामध्ये 91 एकर जागा टर्फ क्लबला ठेवण्यात येणार आहे, तर उर्वरित 120 एकर जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित केली जाईल. आतापर्यंत ही जागा लीजवर देण्यात आली होती.


Bharat Ratna to Shahu Maharaj: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न; राज्य सरकारमधील मंत्र्यांचे मोठे वक्तव्य

Shahu Maharaj: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने हसन मुश्रीफ यांनी महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी सरकारकडे विनंती करणार असल्याचे सांगितले.


Ladki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधाव

Ladki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधाव आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने राज्य सरकारसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या (CM Ladki Bahin Yojna) अंमलबजावणीसंदर्भात मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी एक मागणी केली आहे. राज्य सरकारने दोन बायका किंवा दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषत: मुस्लीम महिलांना (Muslim Women) या योजनेचा फायदा देऊ नये, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे. प्रकाश महाजन यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल. राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' एका उदात्त हेतूने सुरु केली आहे. त्यामुळे राज्यातील महिला सक्षम होतील. मात्र, राज्य सरकारने या योजनेसाठी डोमिसाईल प्रमाणपत्राची घातलेली अट गरजेची आहे. डोमिसाईल प्रमाणपत्राची अट रद्द केल्यास राज्याबाहेरील लोक याचा फायदा घेतील, असे मतही प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले.


NEET Paper leak 2024 Update: विद्यार्थी-पालकांशी संभाषण, बँक व्यवहार, ॲडमिट कार्ड; फक्त NEET नव्हे, अनेक परीक्षेत घोळ, धक्कादायक माहिती समोर

NEET Paper leak 2024 Update: लातूर: लातूर नीट पेपरफुटीप्रकरणी अटक (NEET Paper leak case) असलेल्या दोन आरोपींना सहा तारखेपर्यंत सीबीआय (CBI) कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर सीबीआय पथकाने तपासाचा वेग वाढवला आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून आजपर्यंत झालेल्या तपासाची सर्व कागदपत्रे आणि तपशील गोळा करण्यात आला आहे. सीबीआय पथकाने तपासाची गती आणि दिशा ठरवून कामाला सुरुवात केली आहे. नीट पेपर प्रकरणात सीबीआयकडे तपास वर्ग झाल्यानंतर अनेक वेगवान हालचाली घडल्या...


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 7:30 AM: 03 JULY 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 7:30 AM: 03 JULY 2024 देवगिरी निवासस्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची रात्री बैठक संपन्न... नवाब मलिकही बैठकीला उपस्थित..मलिकांना महायुतीत घेण्यास याआधी फडणवीसांनी केला होता विरोध उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक अटळ,शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात अंबादास दानवेंच्या शिवीगाळीबाबत उद्धव ठाकरेंनी मागितली माफी...तर अंबादास दानवेंचं निलंबन एक षडयंत्र, ठाकरेंचा हल्लाबोल तुम्ही नकली वाघांसोबत आहात इथे असली वाघांमध्ये या...वाघनखं कधी आणणार या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जयंत पाटलांना टोला... लाडकी बहीण योजनेत दोन बदल... वयाच्या मर्यादेत ६५ वर्षांपर्यंत वाढ, तर पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार.. तर अर्ज भरण्यासाठी ⁠३१ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ.. उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये भोलेबाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, ११६ भाविकांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त


Nanded | एसटी बस वाहक आणि प्रवाशात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

ST Driver and Passanger Rada in Nanded


Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?

विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय... सर्वच पक्षांकडून मतांची बेगमी करण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. त्यातच, पुरेशी संख्याबळ नसताना उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरवलंय... त्यामुळे मोठी चुरस निर्माण झालीय... पाहूयात... मिलिंद नार्वेकरांचा प्रवास मिलिंद नार्वेकर उद्धवठाकरे यांचे अत्यंतजवळचे १९९२ साली गटप्रमुखअसताना नार्वेकरपहिल्यांदा मातोश्रीवर नार्वेकरांची कामाचीपद्धत पाहून ठाकरेंनीत्यांना जवळ केलं उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठी,दौऱ्यांचं नियोजननार्वेकरांकडे अनेक नेत्यांचेशिवसेना सोडतानामिलिंद नार्वेकरांवर आरोप शिंदेंच्या बंडावेळी आमदारपरत आणण्याची जबाबदारीनार्वेकरांवर मिलिंद नार्वेकर यांचेभाजप, शिंदेसेनेसहसर्वच पक्षात चांगले संबंध शिवसेनेच्या फुटीनंतर मिलिंद नार्वेकर हे शिंदेंसोबत जाण्याबाबतच्या चर्चा रंगल्या होत्या... त्या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकर यांची विधानपरिषदेची उमेदवारी चर्चेचा विषय ठरलीय. त्यामुळे आता मिलिंद नार्वेकरांच्या विजयासाठी गणितं नेमकी कशी जुळवली जातात, हे बघावं लागेल.


जायकवाडीवर ड्रोनद्वारे टेहळणी

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पावर मंगळवारी रात्री दहानंतर चार ते पाच ड्रोन भिरभिरताना आढळून आले. या प्रकाराने खळबळ उडाली.


Bhole Baba Hathras : रांगोळीसाठी महिला गोळा करतात भोलेबाबाच्या पायाखालची माती

Bhole Baba Hathras : रांगोळीसाठी महिला गोळा करतात भोलेबाबाच्या पायाखालची माती उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये (Hathras) सत्संग दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 116 जणांनी जीव गमावला आहे. ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी भोले बाबाच्या सत्संगसाठी मोठी गर्दी झाली होती. पण हे भोले बाबा नेमके आहेत तरी कोण? एवढी मोठी दुर्घटना घडली तरी कशी? विश्व हरी भोले बाबा यांना त्यांचे अनुयायी भोले बाबा म्हणून ओळखतात. भोले बाबा आणि वाद हे फार जुनं समीकरण आहे. भोले बाबांबाबत सांगताना स्थानिकांनी सांगितलं की, कासगंज जिल्ह्यातील पटियाली येथील बहादूर नगर येथील रहिवासी असलेले विश्व हरी भोले बाबा यांनी साधारणतः 17 वर्षांपूर्वी पोलीस खात्यातील नोकरी सोडून सत्संग सुरू केलं. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त राजस्थान आणि मध्य प्रदेशात भोले बाबांचे अनुयायी मोठ्या संख्येनं आहेत. तसं पाहायला गेलं तर, त्यांचे अनुयायी मीडियापासून अंतर ठेवूनच असतात. भोले बाबांच्या एका भक्तानं सांगितलं की, त्यांच्या आयुष्यात कोणीच गुरू नाही. व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांची अचानक देवाशी भेट झाली आणि तेव्हापासून त्यांचा अध्यात्माकडे कल वाढला. भगवंताच्या प्रेरणेनं हे शरीर त्याच भगवंताचा अंश आहे, हे त्यांना कळलं. त्यांचं खरं नाव सूरज पाल असून ते कासगंजचा रहिवासी आहेत. भोले बाबांच्या अनुयायानं पुढे बोलताना सांगितलं की, ते दर मंगळवारी सत्संगला जातात. नुकताच मैनपुरी येथे सत्संग झाला. त्यानंतर हाथरसमध्ये सुरू करण्यात आला. कोरोनाच्या काळातही भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम वादात सापडला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्या सत्संगाला फक्त 50 लोकांचीच परवानगी मागितली होती, पण नंतर 50 हजारांहून अधिक लोक त्यांच्या सत्संगाला आले. प्रचंड गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणा कोलमडली होती.


Vidhan Parishad Election 2024: मिलिंद नार्वेकरांमुळे काँग्रेसचा उमेदवार धोक्यात, पुन्हा घात होणार? शिंदे गटाच्या आमदाराचं सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

मुंबई: उद्धव ठाकरे यांनी अगदी शेवटच्या क्षणी विधानपरिषद निवडणुकीसाठी मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी घोषित केली होती. त्यामुळे विधानपरिषदेच्या जागा 11 आणि उमेदवार 12 असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे कोणत्या तरी एका उमेदवाराचा पत्ता कट होणार, हे निश्चित आहे. सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार विधानपरिषदेच्या (VidhanParishad Election 2024) 8 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होऊ शकतात, तर एका जागेवरुन काँग्रेसच्या प्रज्ञा सातव (Pradnya Satav) आणि...


Rahul Gandhi in Wari : मविआला बळकटी देण्यासाठी राहुल गांधी सामील होणार 'पंढरीच्या वारीत'

Rahul Gandhi join Pandharpur Wari : MVA च्या यशामुळे आणि लोकसभा जिंकल्यामुळे राहुल गांधी पंढरपूर यात्रेत सामील होण्याची योजना आखत आहेत.