MAHARASHTRA WEATHER UPDATE : राज्यात आज 'या' ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD नं दिला हा महत्वाचा इशारा

Maharashtra weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज नाशिक व पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदुरबार पालघर, ठाणे तर उद्या नाशिक व ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट विभागात ६ जुलैपर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता असल्याने पुढील काही दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोबी मंचुरियन, कबाबनंतर आता पाणीपुरीवरही येणार बंदी! कॅन्सरच्या धोक्यामुळे 'या' राज्याचे सरकार घेणार निर्णय

मॉन्सूनने देश व्यापला

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज नैऋत्य मोसमी पाऊस उर्वरित राजस्थान हरियाणा व पंजाबचा भाग व्यापून संपूर्ण भारत देशामध्ये आज सरासरी तारखेच्या म्हणजेच ८ जुलैच्या सहा दिवस आधीच दाखल झाला आहे. आज समुद्रसपाटीवर महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा स्थिर आहे. अंदाज आज व उद्या कोकण विभागात बहुतांश महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Pune Water supply : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी शहरातील 'या' भागात पाणी पुरवठा राहणार बंद

नाशिक व पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नंदुरबार, पालघर, ठाणे तर उद्या नाशिक व ठाणे जिल्ह्यात तर रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट विभागात ६ जुलैपर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Pune Porsche crash : पुणे पोर्शे प्रकरणी आरोपी मुलाच्या आजोबा व बिल्डर बापाला जामीन मंजूर; तरी राहावे लागणार तुरुंगात

विदर्भात पावसाचा जोर वाढणार

२ जुलैपासून ५ जुलैपर्यंत विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तर सहा लाख सर्व जिल्ह्यात तुरळ ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व तारीख ३० ते ४० किमी वेगाच्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने तेथे येलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यात घाट विभागात जोरदार पावसाची शक्यता

पुणे व आजूबाजूच्या परिसरात आजपासून पुढील तीन ते चार दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊसक काही सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट विभागात साठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

2024-07-03T02:04:30Z dg43tfdfdgfd