Trending:


Ravindra Waikar Clean Chit : रविंद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीनचीट; काय आहे प्रकरण ?

Ravindra Waikar Clean Chit : रविंद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीनचीट; काय आहे प्रकरण ? रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) क्लीन चीट मिळाल्याची माहिती मिळत आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी (Jogeshwari Plot Scam Case) EOW कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेनं (Mumbai Municipal Corporation) गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, रवींद्र वायकर त्यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकीत हॉटेल बांधण्याचा घाट घालून 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. या गैरव्यवहारातून पालिकेचा महसूल बुडवल्याचा आरोप करत पालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.


वित्तीय तूट वाढली, विकासकामांना फटका

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या विविध घोषणांवर सुमारे एक लाख रुपये कोटी खर्च होणार आहेत.


Beed Parli Firing : परळीतील गोळीबार, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू

Beed Parli Firing : परळीतील गोळीबार, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बातमी अपडेट होत राहील हे देखील वाचा ब्रेकिंग! पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई! मुंबई, नाशिकमध्ये 33 ठिकाणी छापेमारी, पासपोर्ट अधिकारी आणि दलालांवर गुन्हे दाखल मुंबई : सीबीआयकडून (CBI) मुंबई (Mumbai) आणि नाशिक (Nashik) परिसरात एकूण 33 ठिकाणी छापेमारी (CBI Raid) करण्यात आली आहे. सीबीआयने पासपोर्ट अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर एकूण बारा गुन्हे दाखल केले आहेत. पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सीबीआयचा दावा असून या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतील परेल, मालाड परिसरात सीबीआयकडून मोठी छापेमारी करण्यात आली आहे. पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी केल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी करुन त्या बदल्यात काही एजंटच्या माध्यमातून पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे आल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. मुंबईसह नाशिक परिसरात सीबीआयने मोठे सर्च ऑपरेशन राबवत संशयास्पद कागदपत्र हस्तगत केली आहेत.


Smart Electricity Meters : स्मार्ट प्रीपेड मीटरबाबत महत्त्वाची घोषणा, फक्त 'या' ठिकाणी बसविले जाईल मीटर

Smart Electricity Meters: स्मार्ट प्रीपेड मीटरला होत असलेला विरोध लक्षात घेता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की, स्मार्ट प्रीपेड मीटरविषयी गैरसमज निर्माण केला जात आहे. स्मार्ट मीटर सर्वसामान्य ग्राहकांसाठी नाहीत. स्मार्ट मीटर केवळ सरकारी कार्यालये आणि महावितरण आस्थापनांमध्ये बसविण्यात येतील.


Manoj Jarange Maratha Reservation : मुंबईत जाण्याचं ठरलं तर; ती मोठी रॅली असणार - मनोज जरांगे

Manoj Jarange Maratha Reservation : मुंबईत जाण्याचं ठरलं तर; ती मोठी रॅली असणार - मनोज जरांगे भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सरपंचाच्या घरी झालेल्या भेटीत तब्बल दोन तास चर्चा झाली. दरम्यान, चर्चा झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भेटीत काय काय घडलं हे त्यांनी सांगितलं आहे. चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे काय म्हणाले? अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे सरकार ,समाज किंवा माध्यम म्हणून आलेत का? हा विषय महत्त्वाचा नाही. त्यांच्या माध्यमातून चर्चा सुरु राहिलं. बाकी आमच्या मागण्याबाबत पाठपुरावा सुरूच राहणार आहे. सगेसोयरेची आमच्या व्याख्येप्रमाणे अंमलबजावणी, हैदराबाद गॅजेट आणि सरसकट गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं. अशोक चव्हाण काय काय म्हणाले? आमचा सर्वांची इच्छा आहे हा विषय जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढा संपलेला बरा. आमच्या चर्चेत राजकीय चर्चेचा विषयच नव्हता. शासन आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वयाची आवश्यकता आहे. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असून हा विषय लवकर संपवा अशी आमची भावना असल्याने संवाद होण्याच्या कारणाने आपण आल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. शनिवारपासून मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला सुरुवात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची शनिवारपासून शांतता रॅले सुरु होणार आहे. त्यापूर्वीच राज्यसरकार अॅक्शनमोडवर आलं आहे. येत्या सोमवारपासून शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहे. शिंदे समितीचा हा 4 दिवसांचा हैद्राबाद दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये शिंदे समिती मनोज जरांगेंच्या हैदराबाद गॅझेटच्या मागणीबाबत पुरावे गोळा करण्यात येणार आहेत. या कामात मदत करावी अशी विनंती राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी तेलंगणाच्या मुख्य सचिवांना पत्र देऊन केली आहे. 13 जुलैपर्यंत सरकारने सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही तर 288 उमेदवार पाडायचे की उभे करायचे याबाबत विचार करावा लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे.


CBSE Board Exam 2025: सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा पॅटर्न बदलणार; आता वर्षभरात दोनदा परीक्षा घेण्यावर भर

CBSE Latest News in Marathi: CBSE 2025 बोर्ड परीक्षेत मोठा बदल होऊ शकतो. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचे धोरण वर्षातून दोनदा लागू करण्याची तयारी शिक्षण मंत्रालयाने तीव्र केली आहे. सीबीएसई बोर्ड परीक्षेचा पॅटर्न तयार करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील मुख्याध्यापकांकडून सूचना मागवल्या आहेत.


पुणे Porsche कार अपघात प्रकरणातील आरोपीचा निबंध आला समोर, नेमकं काय म्हणाला?

पुणे, प्रतिनिधी : पुण्यात 19 मे रोजी एक भीषण अपघात घडला होता. भरधाव पोर्शे कारनं दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडलं. कल्याणीनगर परिसरात झालेल्या या अपघातामध्ये अपघातग्रस्त अभियंता तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही अलिशान कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच गाजलं, अपघात घडल्यानंतर तिथे असल्येल्या नागरिकांकडून या मुलाला मारहाण देखील करण्यात आली. मुलगा अल्पवयीनं असल्यानं हे प्रकरण बाल न्याय मंडळाकडे...


Sant Tukaram Maharaj Palkhi 2024: पुणेकरांसाठी मोठी बातमी! पालखींच्या आगमनानिमित्त उद्या वाहतुकीत बदल; कोणते रस्ते बंद?

Sant Tukaram Maharaj Palkhi: शहरात पालखी मार्गावरील रस्ते दुपारी दोनपासून आवश्यकतेनुसार बंद केले जाणार आहेत. या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.


Uddhav Thackeray Apologized: 'दानवेंच्या वक्तव्याबद्दल मी माफी मागतो', उद्धव ठाकरेंनी मागितली राज्यातील माता-भगिनींची माफी

Uddhav Thackeray Apologized For Ambadas Danve's Statement: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात सोमवारी सभागृहात जोरदार राडा झाला होता. यावेळी अंबादास दानवे यांनी लाड यांना शिविगाळ केल्याची घटना घडली. त्यानंतर आज दानवेंचे निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दानवेंच्या वक्तव्यासाठी राज्यातील माता भगिनींची माफी मागितली आहे.


'तो १० लोकांचा निर्णय होता, माझे हात बांधलेले होते'

'तो १० लोकांचा निर्णय होता, माझे हात बांधलेले होते'


Ajit Pawar| मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनची घोषणा

DCM Ajit Pawar Announce Ladki Bahin Yojna


Nagpur : उपचारासाठी पैसे नसल्याने दाम्पत्याची आत्महत्या

Nagpur : Nagpur couple sucide for no money tretment


Special Report NCP : अजितदादांचे साथी शरद पवार साहेबांचे सोबती? ABP Majha

Special Report NCP : अजितदादांचे साथी शरद पवार साहेबांचे सोबती? ABP Majha हे देखील वाचा Nilesh Rane : होमग्राऊंड राष्ट्रवादीच्या आमदाराचं, फॅक्टरी उदय सामंतांच्या निकटवर्तीयांची, गावकऱ्यांना दूषित पाणी प्यायला लागताच निलेश राणे भडकले रत्नागिरी : सावर्डे येथील कातभट्टीच्या दूषित पाण्यावरून राजकारण तापल्याचं दिसून आलं. अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम (Shekhar Nikam) यांच्या होमग्राउंडवर जाऊन कातभट्टीच्या दूषित पाण्याची माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रत्यक्ष जाऊन केली पाहणी. इथले ग्रामस्थ हे दडपणाखाली असून त्यांना दूषित पाणी प्याव लागतंय, तो प्रश्न आता सोडवणार असल्याचं सांगत निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय. यावेळी निलेश राणे यांनी पाहणी केलेली काताची भट्टी पालकमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय सचिन पाकळे यांची असल्याची माहिती आहे. नारायण राणे खासदार होताच पुत्र निलेश राणे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. सावर्डे गावच्या नागरिकांना कातभट्टीमुळे दूषित पाणी प्यावं लागतंय असं सांगत त्यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. पाणी चांगलं असेल तर ते तुम्ही पिणार का असा सवाल निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या समोरच निलेश राणे यांनी धारेवर धरले.


Mumbai : मुंबईत आज महायुतीचा मेळावा

Mumbai : Todays Mumbai Mahayuti meeting


भाजपकडून २४ राज्यांमध्ये नवे प्रभारी

महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर पुढील वर्षी जूनमध्ये बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे


विज्ञानक्षेत्रात ‘ती’ कुठे?

जागतिक स्तरावर संशोधनात स्त्रियांचं प्रमाण ४१ टक्के असल्याचं दर्शवणारा एक नवीन अहवाल समोर आलाय. त्यानुसार सक्रिय संशोधकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण वाढण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.


Gondia News : जिल्हा परिषदेच्या शाळेत अजब कारभार; 7 वर्गासाठी फक्त दोनच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या पालकांचा संताप

Gondia News गोंदिया : विदर्भातील जवळ जवळ सर्व शाळांना 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे. शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांनी शाळेची सुरुवात स्मरणीय ठरलीय. काही शाळांनी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे फुलं देऊन स्वागत केले. तर काही शाळांनी पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगळे कार्यक्रम ठेवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मात्र, गोंदिया जिल्ह्याच्या (Gondia News) अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव बंध्या या गावातील...


चंद्रमौळी

डोक्यावर चंद्र धारण करणारा, अशा अर्थाने या दोन्ही ठिकाणी ‘चंद्रमौळी’ असा शब्द वापरला जातो. गरिबी असली, अगदी छतही नीट शाकारलेले नसले, तरी घरामध्ये चंद्र उतरणे ही बाब साहित्यिकांनी शब्दबद्ध केली.


गांधी कुटुंबातला पहिला वारकरी!

संतोष गोरे, प्रतिनिधीलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणार आहेत. राहुल गांधी 14 जुलैला वारीत सहभागी होणार आहेत. शरद पवारांनी दिलेलं निमंत्रण राहुल गांधींनी स्वीकारलं. मात्र आता जोरदार राजकारण सुरू झालं आहे. शरद पवारांना हा अधिकार कुणी दिला? असा सवाल भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसलेंनी उपस्थित केला आहे. तर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी, पालखी सोहळ्यात कॅटवॉक करण्यापेक्षा...


UCO Bank Recruitment: परीक्षा न देता बँकेत नोकरी, युको बँकेने 'या' पदांसाठी मागवले अर्ज

UCO Bank Apprentice Recruitment 2024: युको बँकेत एकूण ५४४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.


बिहारची ‘अफसर बिटिया’

टिनू सिंगने २०२३ च्या मध्यंतरीच्या काळात लागोपाठ कॉम्प्युटर ऑपरेटर, सहाय्यक शाखा अधिकारी, बीपीएससी शिक्षक भरतीमधील तीन वेगवेगळ्या अशा एकूण पाच परीक्षा दिल्या होत्या. या सर्व परीक्षांचा निकाल डिसेंबर २०२३ मध्ये सलग पाच दिवस लागणार होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे टिनूच्या मेहनतीला यश आले आणि तिने ज्या पाच परीक्षा दिल्या होत्या त्या सर्व परीक्षांमध्ये ती अव्वल क्रमांकाने पास झाली. टिनूच्या या यशाने जमुई जिल्हाच नाही तर बिहारमध्ये ती चर्चेचा विषय...


Weather update : महाराष्ट्रावर घोंगावतंय मोठं संकट, IMD ची पावसाबाबत मोठी अपडेट

गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाची महाराष्ट्रात जोरदार बॅटिंग सुरू आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (IMD) राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात देखील हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, विदर्भात विजांच्या कडाकडाटासह पाऊस पडेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. मराठवाड्यात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबईबाबत बोलायचे झाल्यास मुंबई आणि उपनगरांमध्ये वातावरण ढगाळ राहणार असून, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्रात नुसता पाऊसच पडणार नसून, वादळाचा इशारा देखील हवामान विभागानं वर्तवला आहे. या काळात वादळाचा वेग ताशी 50 ते 60 किमी राहण्याचा अंदाज आहे.


Vijay Wadettiwar Full PC : सरकारकडून शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी, विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका

बीडमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीच्या नावे लाटल्या, सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय, वडेट्टीवारांची सरकारवर टीका लाडकी बहिण योजना जरी काढली असेल तरी या सरकारला बहिणी मतदान देणार नाही. शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आमच्या बहिणी यांना भीक घालणार नाहीत, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी लाडकी बहिण योजनेवर (Ladki Bahin Yojana) शिंदे सरकारवर (Shinde Government) केली. पत्रकारांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, मी दिक्षाभूमीला गेलो होतो. गुन्हे दाखल करण्याची गरज नाही. ही दडपशाही आहे. याबाबत पोलीस आयुक्तांशी बोलून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घ्या आणि सोडा अशी विनंती केली होती, मात्र आता गुन्हे दाखल झाले असतील तर ते मागे घ्यावेत.


Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही

Raj Thackeray on Pune Car Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. हे देखील वाचा ब्रेकिंग! पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई! मुंबई, नाशिकमध्ये 33 ठिकाणी छापेमारी, पासपोर्ट अधिकारी आणि दलालांवर गुन्हे दाखल मुंबई : सीबीआयकडून (CBI) मुंबई (Mumbai) आणि नाशिक (Nashik) परिसरात एकूण 33 ठिकाणी छापेमारी (CBI Raid) करण्यात आली आहे. सीबीआयने पासपोर्ट अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर एकूण बारा गुन्हे दाखल केले आहेत. पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सीबीआयचा दावा असून या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतील परेल, मालाड परिसरात सीबीआयकडून मोठी छापेमारी करण्यात आली आहे. पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी केल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी करुन त्या बदल्यात काही एजंटच्या माध्यमातून पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे आल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. मुंबईसह नाशिक परिसरात सीबीआयने मोठे सर्च ऑपरेशन राबवत संशयास्पद कागदपत्र हस्तगत केली आहेत.


ABP Majha Headlines : 8:00AM : 6 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 8:00AM : 6 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट, गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार महायुतीची आज संध्याकाळी बैठक, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि नेते उपस्थित राहणार, विधान परिषद निवडणूक आणि शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचं मार्गदर्शन केलं जाणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट..राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवर चर्चा विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी.. दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग... मुख्यमंत्री शिंदे माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार..एक दिवस वारकऱ्यांसह करणार पायी वारी