CBSE BOARD EXAM 2025: सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा पॅटर्न बदलणार; आता वर्षभरात दोनदा परीक्षा घेण्यावर भर

CBSE Board Exam 2025 Update: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिफारशी लक्षात घेऊन, शिक्षण मंत्रालयाचा शालेय शिक्षण विभाग आता बोर्ड परीक्षा सुधारणांसह अनेक मोहिमांवर काम करत आहे, ज्यातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात जोडले जात आहे. शिक्षण मंत्रालयाने CBSE शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF), ऑटोमेटेड परमनंट ॲकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री (APAAR ID), वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा आणि इतर मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे.

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे, सचिव संजय कुमार यांनी, “CBSE शाळांच्या सुमारे १० हजार मुख्याध्यापकांसोबत ऑफलाइन आणि व्हर्च्युअल बैठका झाल्या आहेत. वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याच्या मुद्द्यावरही त्यांच्याशी चर्चा झाली. शाळेच्या मुख्याध्यापकांना त्यांच्या सूचना आणि मते लिखित स्वरूपात देण्यास सांगण्यात आले आहे जेणेकरून त्यांच्या अर्थपूर्ण सूचनांचाही अभ्यास करता येईल. बोर्डाच्या परीक्षेशी संबंधित निर्णयांमध्येही त्यांच्या मताला महत्त्व दिले जाणार आहे. सीबीएसईही आपल्या स्तरावर काम करत आहे.” असे सांगितले.

CBSE Board च्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींनुसार आणि शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) देखील तपशीलवार योजनेवर काम करत आहे. यात शाळा विभागाचे सचिव संजय कुमार यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांसह सीबीएसई अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक घेतली होती.

बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा केव्हा घेता येतील? यावर शाळेचे मुख्याध्यापकही आपले मत मांडतील. अलीकडेच यूजीसीने वर्षातून दोनदा प्रवेश घेण्याच्या नियमाला मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पर्याय देण्यास प्राधान्य दिले जात आहे.

एका शाळेच्या मुख्यध्यापकांनी, या बैठकीत शैक्षणिक धोरण आणि एनसीएफशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. शालेय शिक्षण सचिवांनी शाळांनी विद्यार्थ्यांसाठी APAAR आयडी बनवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून त्यांना भविष्यात त्याचा लाभ मिळू शकेल. याद्वारे सरकारी आणि खाजगी शाळा एकमेकांकडून सर्वोत्तम पद्धती शिकू शकतात. शाळांनी एनसीईआरटीच्या पुस्तकांवर भर द्यावा. वर्षातून दोनदा बोर्डाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल आणि ते दोन्ही परीक्षांमधून सर्वोत्तम गुण निवडू शकतील, अशी माहिती दिली.

शिक्षण मंत्रालय आणि सीबीएसई वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षांवर काम करत आहेत. त्याचबरोबर त्यांच्यापुढे खरे आव्हान हे आहे की या दोन्ही परीक्षांसाठी खिडकी काय असेल? सध्या बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होतात आणि मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत सुरू असतात आणि त्यानंतर मे-जूनमध्ये निकाल लागतात. अभियांत्रिकी परीक्षा देखील दोनदा घेतली जाते, सध्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा एकदाच घेतली जाते. अशा परिस्थितीत पहिली आणि दुसरी बोर्डाची परीक्षा कधी होणार, त्याची वेळ खूप महत्त्वाची ठरणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेमिस्टर पद्धतीची शक्यता नाही. बोर्डाच्या दोन्ही परीक्षांना विद्यार्थ्यांना बसणे बंधनकारक असणार नाही. ते एक परीक्षा देतात की दोन्ही परीक्षा देतात हे सर्वस्वी विद्यार्थ्यांनावर अवलंबून असेल. परीक्षा सुधारणांमध्ये बोर्ड परीक्षेच्या पॅटर्नमध्ये अनेक प्रश्नांची संख्या वाढवणे आणि परीक्षा प्रक्रिया सुलभ करणे यांचाही समावेश आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-29T02:54:31Z dg43tfdfdgfd