CGHS CARD : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा काढावं लागणार सीजीएचएस कार्ड! कसा करायचा अर्ज? जाणून घ्या

Central Govt Employees CGHS Card: आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सीजीएचएस कार्ड जारी करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेसाठी (सीजीएचएस) अंशदानाच्या देयक पद्धतीत बदल केल्यामुळे सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

union budget 2024 : १० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना करातून दिलासा मिळणार, बजेटमध्ये मोठ्या घोषणेची शक्यता

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वैद्यकीय सेवा पुरवते. संपूर्ण भारतातील ८० शहरांमध्ये सुमारे ४२ लाख लाभार्थी सीजीएचएस अंतर्गत समाविष्ट आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, "सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरता संदर्भ क्रमांक तयार करण्यासाठी ऑनलाइन (www.cghs.nic.in) नवीन सीजीएचएस कार्डसाठी अर्ज करणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून त्यावर सही केलेली हार्ड कॉपी विभागाकडे प्रक्रियेसाठी सादर करावीत आणि कार्ड मिळवण्यासाठी संबंधित सीजीएचएसचे अतिरिक्त संचालक कार्यालयात सादर करावीत.

bank holiday in July : मोहरम वगळता कोणताही मोठा सण नसताना जुलै महिन्यात १२ दिवस बंद राहणार बँका; का, कधी आणि कुठे?

कागदपत्रे पडताळणी

सीजीएचएस अर्जदाराने दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे अर्जाची पडताळणी करेल, ज्यात वेतनश्रेणी आणि सीजीएचएस वजावट दर्शविणारी वेतन स्लिप, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर वैध ओळख दस्तऐवजाचा समावेश आहे.

या योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

केंद्र कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य, विद्यमान आणि माजी खासदार, माजी राज्यपाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर, केंद्र सरकारचे निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे वर्तमान आणि माजी न्यायाधीश, केंद्र सरकारचे मान्यताप्राप्त पत्रकार, दिल्ली पोलीस कर्मचारी, रेल्वे बोर्डाचे कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडून पेन्शन घेणारे केंद्रीय कर्मचारी आणि पोस्ट ऑफीस कर्मचाऱ्यांना सीजीएचएस कार्डचा लाभ मिळतो.

LPG Price news : गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट! तब्बल ३० रुपयांनी स्वस्त; देशात कुठे, किती दर? वाचा

'या' योजनेंतर्गत कोणकोणत्या सुविधा मिळतात?

- ओपीडीमध्ये उपचार आणि औषधांचा खर्च

- सरकारी रुग्णालयांमध्ये तज्ज्ञांचा सल्ला

- सरकारी दवाखान्यात मोफत उपचार

- खाजगी आणि मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये आपत्कालीन उपचारांचा खर्च

- कृत्रिम अवयवांसाठीच्या खर्चाची परतफेड

- कुटुंब कल्याण आणि एमसीएच सेवा.

(सीजीएचएस कार्डसंबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.)

2024-07-01T12:00:59Z dg43tfdfdgfd