व्हिडिओ

Trending:


Rahul Gandhi | राहुल गांधी विठुरायाच्या दर्शनासाठी येणार

Rahul Gandhi To Visit Pandharpur For Vitthal Rukmini Darshan


मोदी-शहांचे विश्वासू

सन १९८९मध्ये ते परिषदेचे ‘राष्ट्रीय महामंत्री’ झाले आणि पुढील दोन वर्षांतच भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. याच काळात हिमाचल प्रदेशातील विलासपूर मतदारसंघातून ते विधानसभेत पोहोचले. प्रारंभी विरोधी पक्षनेता आणि पुढील निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळातील मंत्री अशी त्यांची वाटचाल झाली.


अन्नपूर्णांचा आधार -प्रेमाताई पुरव

Prematai Purav : प्रेमाताई मूळच्या गोव्याच्या. लहानपणीच त्या गोवा मुक्ती संग्रामात उतरल्या. बंदुक चालवणे, बॉम्ब तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवणे, दारूगोळा लपवणे अशा क्रांतिकारी कामांत त्यांचा सहभाग असे.


भारतीयांची जिनोम कुंडली!

भारतात साडेचार हजार विविध वांशिक लोकसंख्या गट आढळतात. त्यातील अधिकाधिक लोकांना प्रतिनिधित्व देऊन त्यांचा जिनोम अभ्यासण्यात आला आहे. ही एक प्रकारची डीएनए बायोबँकच म्हणता येईल.


Sudha Murthy Rajya Sabha Speech: ‘सर, कसं बोलायचं कळत नाही...’ राज्यसभेत पहिलंच भाषण, सुधा मूर्तींनी जीवाभावाचे विषय मांडत जिंकलं मन

Sudha Murthy's Rajya Sabha Debut: इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी मंगळवारी राज्यसभेत खासदार म्हणून पहिल्यादांच संबोधन केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत सुधा यांनी भाग घेतला. राज्यसभेच्या खासदार म्हणून सुधा मूर्ती यांनी पहिल्यांदाच राज्यसभेत भाषण केले आणि पहिल्याच भाषणात सुधा मूर्ती यांनी सरकारकडे केली मोठी मागणी. सुधा मूर्ती राज्यसभेतील पहिल्या भाषणात काय म्हणाल्या पाहूया...


Zero Hour Vidhan Parishad Election : 11 जागा 12 उमेदवार; कुणाचे आमदार फुटणार? मविआ की महायुती?

नमस्कार मी सरिता कौशिक... झीरो अवरमध्ये आपलं स्वागत.. आमदारांची पळवापळवी ... ते उमेदवारांची फोडाफोडी.. हे महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही.. आणि गेल्या पाच वर्षांतलं महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं.. तर लक्षात येतं की अशा घटनांमध्ये चांगलीच वाढ झालीय.. आताही असाच प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा राहिलाय.. समोर विधान परिषद निवडणूक.. कोण कोणत्या पक्षासोबत राहणार.. कोण कोणत्या पक्षात जाणार.. गेल्या विधानसभेला राज्यात जिथं सेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी असे चार प्रमुख पक्ष होते.. तिथ आज सहा पक्ष झालेत. त्यामुळे राज्यात ग्रामपंचायतीच्याही निवडणुका लागल्या.. तरी त्या प्रतिष्ठेच्या बनतात... आणि हेच आपण गेल्या अडीच वर्षांमध्ये पाहतोय... त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा अपवाद उरल्या नाहीएत. त्यामुळे अवघ्या पाच दिवसांवर आलेली विधान परिषदेची निवडणूकही रंजक बनलीय.. बारा जुलैला होणाऱ्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवाराचा रिंगणात आहेत.. मविआकडे दोन आमदारांपुरतं संख्याबळ असताना त्यांनी तीसरा उमेदवार दिलाय.. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक होणार हे नक्की.. आणि त्यामुळेच दोन्ही आघाड्यांना लहान-मोठ्या राजकीय पक्षांना एकत्र घेत.. मतांची जुळवा जुळव करावी लागणारय.. याच निवडणुकीमुळे अपक्ष आमदारांनाही विशेष महत्व आलंय.. अशी निवडणूक महागडी पण असते असे हि ऑफ द रिकॉर्ड सांगितल्या जाते ... तीन जागा जिंकण्याचं संख्याबळ नसतानाही मविआन तीन उमेदवार रिंगणात उभे केलेत.. आणि दावा केलाय.. की तीनही उमेदवार जिंकणार...? त्यावरच होता आपला पहिला प्रश्न.. तोच पाहण्यासाठी जावूयात पोल सेंटरला..


Zero Hour Guest Center : दानवेंची शिवी ते निलंबन; Neelam Gorhe चं सविस्तर उत्तर

विधान परिषदेतून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं झालं निलंबन... सत्ताधारी - विरोधकांमधले आरोप-प्रत्यारोप... येणारी विधान परिषद निवडणूक.. या सर्व विषयांवर बोलण्यासाठी झीरो अवरमध्ये उपस्थित आहेत. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं सभागृहात काल झालेल्या प्रकरणात निलंबन करण्यात आलं आहे. अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आल्याची घोषणा नीलम गोऱ्हे यांनी केली. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले. नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याच्या परवानगी दिली असता देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आणि त्यांनी आक्षेप घेतला. यानंतर विरोधकांना संधी न देता पुढील कामकाज सुरु करण्यात आलं. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत राडा झाला. अंबादास दानवेंनी आपल्याकडे हात करणाऱ्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. अंबादास दानवेंनी माफी मागावी, आणि त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. तर चंद्रकांत पाचील यांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली. चंद्रकांत पाटील म्हणाले, अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्याकडे पाहत अर्वाच्य भाषा वापरली आहे. त्यांच्या बेशिस्त वर्तनाबाबत पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात यावे.


Zika Virus Advisory: झिका व्हायरसचा धोका वाढतोय? आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना ॲडव्हायझरी जारी

Union Health Ministry Issues Advisory to States in view of Zika virus: महाराष्ट्रातील झिका विषाणूची प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना अॅडव्हायजरी जारी केली आहे. झिका विषाणूच्या संसर्गासाठी गर्भवती महिलांची तपासणी करून आणि झिका पॉझिटिव्ह आलेल्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवत राज्यांनी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रुग्णालयांचा परिसर एडिस डासमुक्त ठेवण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी...


Mumbai Central Public Park : न्यूयॉर्क, लंडनसारखं आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ लवकरच मुंबईत

Mumbai Central Public Park On 300 Acres : मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क विकसित होणार आहे. ३०० एकरवर हे उभारण्यात येणार असून यासाठी प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे.


Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठक

मुंबई: हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली आहे. या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील राजकीय समीकरणं बदलणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे संतोष बांगर यांची भेट झाल्यानंतर हिंगोलीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. अधिवेशनाच्या कालावधीत ही भेट झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्या दरम्यान संतोष बांगर आणि त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्या गेल्या. पण आता हे दोन्ही नेते अब्दुल सत्तारांच्या घरी भेटले आणि ही भेट गुप्त होती. त्यामुळेच ही भेट हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणं बदलवणारी ठरण्याची शक्यता आहे.


Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial Report

नागपुरात झालेल्या आंदोलनाबाबत आता एक नवी माहिती समोर आलीय. या आंदोलनात नागपूरच्या बाहेरच्यांचा काही सहभागी होता का असा संशय उत्पन्न झालाय. स्मारक समितीने सुरू केलेल्या सौदर्यकरण प्रकल्पाला अचानक विरोध कसा काय सुरू झाला, इथपासून कालच्या आंदोलनापर्यंत अनेक प्रश्न निर्माण होतात. या संदर्भात एबीपी माझाने थेट स्मारक समिती विश्वस्तांशी चर्चा केली... त्यातून कोणती माहिती समोर आलीय. पाहूया हा रिपोर्ट देशातलंच नाही तर जगातलं एक महत्त्वाचं श्रद्धास्थान... या ऐतिहासिक भूमीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचारांचा अंकूर पेरला, त्याचा आता जगभरात वटवृक्ष झालाय. मात्र इथल्या सौंदर्यीकरण प्रकल्पातील अंडरग्राऊंड कामाला विरोध करत १ जुलैला आंदोलन पेटलं. अंडरग्राऊंड सुरु असलेल्या विरोधाची कारणं जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने स्मारक समितीच्या विश्वस्तांशी चर्चा केली. त्यांनी दिलेली माहितीही या प्रकरणात जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल.


विधानपरिषदेमध्ये मराठा आरक्षणावरुन खडाजंगी; पाहा घ्या कोण काय म्हणालं

Vikram Kale Kapil Patil and Shambhuraj desai on Maratha reservation


SSC Recruitment 2024: सरकारी नोकरीची संधी, कर्मचारी निवड आयोगात ८ हजारांपेक्षा अधिक जागांसाठी भरती

Staff Selection Commission Recruitment: कर्मचारी निवड आयोगात एकूण ८ हजार ३२६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसंदर्भात आवश्यक माहिती जाणून घेऊयात.


Vishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम

Vishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता यांना दिलेल्या आहारात चक्क मृत सापाचे किरडू आढळल्याची घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील पळूस तालुक्यात हा प्रकार उघडकीस आलाय. पलूस परिसरातील लाभार्थी पालक व अंगणवाडी सेविकात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना पोषण आहार गेली अनेक वर्षे पुरवला जातो. यामध्ये या अगोदर हरभरा तांदूळ,तूरडाळ,गहू, तिखट,मीठ विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या. नुकताच एप्रिल व मे महिन्याचा पोषण आहार पलूस येथील केंद्रावर पोहोच करण्यात आला. तो तत्परतेने संबधित लाभार्थ्यांना संपर्क करून आहार घेऊन जाण्यास सांगितले.


Bharat Ratna to Shahu Maharaj: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न; राज्य सरकारमधील मंत्र्यांचे मोठे वक्तव्य

Shahu Maharaj: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने हसन मुश्रीफ यांनी महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी सरकारकडे विनंती करणार असल्याचे सांगितले.


Stellar explosion: दोन तारे एकमेकांच्या खूप जवळ आल्यामुळे कधीही होऊ शकतो स्फोट, उघड्या डोळ्यांनी येणार पाहता

Stellar explosion: टी कोरोना बोरियालिस नावाच्या एका ब्लेज स्टारमध्ये लवकरच स्फोट होणार आहे. या स्फोटाची अचूक वेळ शास्त्रज्ञांना सांगता येत नाही परंतु हा उघड्या डोळ्यांनी पाहता येईल. दोन तारे जवळजवळ असल्यामुळे हा स्फोट होणार आहे.


Railway Ticket Concession: ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेच्या तिकीट दरात सवलत मिळण्याची शक्यता

Railway Ticket Concession For Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सवलत देण्याच्या विचारात आहे. या सवलतीविषयी जाणून घेऊयात.


Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दर

Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दर हेही वाचा : देवगिरी निवासस्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची रात्री बैठक संपन्न... नवाब मलिकही बैठकीला उपस्थित..मलिकांना महायुतीत घेण्यास याआधी फडणवीसांनी केला होता विरोध उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक अटळ,शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात अंबादास दानवेंच्या शिवीगाळीबाबत उद्धव ठाकरेंनी मागितली माफी...तर अंबादास दानवेंचं निलंबन एक षडयंत्र, ठाकरेंचा हल्लाबोल तुम्ही नकली वाघांसोबत आहात इथे असली वाघांमध्ये या...वाघनखं कधी आणणार या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जयंत पाटलांना टोला... लाडकी बहीण योजनेत दोन बदल... वयाच्या मर्यादेत ६५ वर्षांपर्यंत वाढ, तर पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार.. तर अर्ज भरण्यासाठी ⁠३१ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ.. उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये भोलेबाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, ११६ भाविकांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त


Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE : अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक, शिंदे सरकारला कोंडित पकडणार?

Marathi News Live Update : विधीमंडळ अधिवेशनासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.


Nandurbar News : ९७ हजार विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत, राज्य शासनाच्या 'एक राज्य एक गणवेश' योजनेचा फज्जा

Nandurbar Students Waiting For School Uniform : नंदुरबारमध्ये शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटले असले, तरी अद्याप विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यात आले नाहीत. गणवेश शिवण्यासाठी महिलांना प्रशिक्षणही देण्यात आलं आहे, मात्र कापड नसल्याने अद्याप गणवेश तयार करण्यात आले नाही.


Maharashtra Vidhan Parishad : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं Mahayuti vs MVA Special Report

सध्या विधानपरिषद निवडणुकीची जोरदार चर्चा रंगलीय... कुणी कुणाला उमेदवारी दिली याची चर्चा तर रंगली आहेच... मात्र त्याचसोबत, कोणत्या उमेदवाराची किती संपत्ती आहे... आणि उमेदवारांनी संपत्तीच्या बाबतीत कशी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतलीयत... पाहूयात... पंकजा मुंडेंची संपत्ती किती? उत्पन्नाचा स्त्रोत- शेती, माजी आमदार निवृत्तीवेतन, भाडे बँक खात्यांत- ९१ लाख २३ हजार ८६१ शेअर्स, म्युच्युअल फंड- १ कोटी २८ लाख, ७५ हजार ६९४ स्वत:च्या नावावर एकही वाहन नाही स्थावर मालमत्ता- ९६ लाख, ७३ हजार, ४९० जंगम मालमत्ता- ६ कोटी ८ लाख, १५ हजार, ७०९ एकूण कर्ज- २ कोटी, ५० लाख, ३२ हजार ४२७ सोने- ४५० ग्रॅम (३२ लाख, ८५ हजार) ------------------- मिलिंद नार्वेकरांची संपत्ती किती? उत्पन्नाचा स्त्रोत- घरांचे भाडे, व्यावसायिक उत्पन्न बँक खात्यांत- ७४ लाख १३ हजार, २४३ बॉण्ड्स, म्युच्युअल फंड- ५० हजार रुपये पोस्ट, पॉलिसीमध्ये- ३ लाख ६८ हजार, ७२९ स्वत:च्या नावावर एकही कोणतेही वाहन नाही सोने- ३५५ ग्रॅम (२४ लाख, ६७ हजार ९८१) जमीन- दापोली येथे ७४ एकर जमीन मालाड, बोरीवली १ हजार चौरस फुटाचं घर एकूण कर्ज- २६ लाख, ३८ हजार, १६० रुपये --------------- भावना गवळी यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा स्त्रोत- घरांचे भाडे, व्यावसायिक उत्पन्न बँक खात्यांत- २१ लाख २५ हजार ०१६ रुपये बॉण्ड्स, म्युच्युअल फंड- २७ हजार ७०० हजार रुपये पोस्ट, पॉलिसीमध्ये- २० लाख वाहन - टोयाटो इनोव्हा- २४ लाख ३७ हजार रुपये सोने- २०० ग्रॅम (१३ लाख ६० हजार ) जमीन- रिसोड येथे ५ एकर ५६ गुंठे जमीन वाशिममध्ये ५ हजार चौरस फुटाचं घर ------------------- सदाभाऊ खोत यांची संपत्ती बँक खात्यांत- २ लाख ०८ हजार ८४० बॉण्ड्स, म्युच्युअल फंड- ५३ हजार रुपये पोस्ट, पॉलिसीमध्ये- ५८ लाख ९ हजार ५०० वाहन - टोयाटो इनोव्हा क्रिस्ट- २९ लाख रुपये एमजी हेक्टर झेड एस इव्ही किंमत २३ लाख सोने- १५ ग्रॅम (१३ लाख ६० हजार ) सांगली ६१२ चौरस फुटांचं घर


Pune Tourism: पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जमावबंदीचे आदेश

Prohibition orders at tourist places in Pune district after bhushi dam accident


ABP Majha Headlines : 5 PM : 3 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी होण्याची शक्यता , दानवेंनी सभापतींना दिलं दिलगिरीचं पत्र, उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक महायुती सरकारकडून १ लाख ८ हजार पदांवर भरती प्रक्रिया सुरू, ७० हजार जणांना नियुक्त पत्र प्रदान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात माहिती परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी याच अधिवेसनात नवा कायदा आणणार, फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना टोलमाफी, आजपासून २१ जुलैपर्यंत सवलत लागू मुंबईच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी बोलावली तातडीची बैठक, संबंधित मंत्र्यांमार्फत पाणीपुरवठ्याची माहिती देण्याचे बीएमसीच्या जलअभियंत्यांना निर्देश मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमधील जीन्स, टीशर्ट बंदीचा मुद्दा विधानसभेत गाजला... कॉलेजने तालिबानी फतवा मागे घ्यावा, प्रताप सरनाईकांची मागणी नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतो का, अजित पवारांचा सवाल, तर फडणवीसांच्या भूमिकेत बदल नाही, सरनाईकांचं मत पुण्यात आठ तालुक्यांतील पर्यटनस्थळ, गडकिल्ले, धबधब्यांवर जमावबंदी, भुशी डॅम परिसर, ताम्हिणी घाटातील दुर्घटनेनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


Weather : सावधान! आज राज्यातील 'या' भागात पडणार मुसळधार पाऊस

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.