STELLAR EXPLOSION: दोन तारे एकमेकांच्या खूप जवळ आल्यामुळे कधीही होऊ शकतो स्फोट, उघड्या डोळ्यांनी येणार पाहता

अंतराळातील एका ताऱ्याचा कधीही स्फोट होऊ शकतो आणि स्फोटाची वेळ जवळ येत आहे. काही महिन्यांपूर्वी मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की T Coronae Borealis नावाचा एक ‘ब्लेज स्टार' मोठ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. हा स्फोट असा असेल जो पृथ्वीवरून देखील पाहता येईल. परंतु याची वेळ ठरलेली नाही. शास्त्रज्ञांच्या मते सप्टेंबर 2024 पर्यंत हा स्फोट होऊ शकतो. कारण आता जून संपला आहे आणि जुलै सुरु झाला आहे त्यामुळे पुढील काही महिन्यात स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ज्या जागी स्फोट होईल ती जागा पृथ्‍वीपासून 3 हजार प्रकाश वर्ष दूर आहे. अमेरिकन अवकाश संस्था Nasa नुसार या ताऱ्यात दर 79-80 वर्षांनी स्फोट होतो. या धमक्यांमुळे हौशी अंतराळ अभ्यासकांना अंतराळातील एक खास दृश्य कॅप्चर करण्याची संधी मिळेल. या संभाव्य स्फोटाबाबत नासाचे मीटरॉयड इन्वारमेन्ट ऑफ‍िस (MEO) चे प्रमुख बिल कुक यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं होतं की याच्या टाइमिंगबाबत आम्हाला देखील जास्त माहिती नाही आहे. परंतु जेव्हा होईल तेव्हा ते दृश्य अविस्मरणीय असेल.

ज्या ताऱ्यात स्फोट होणार आहे, तो एका बायनरी सिस्‍टममध्ये अडकलेले आहे. अश्या सिस्‍टममध्ये एक मोठा तारा असतो आणि एक सफेद छोटा तारा असतो. टी कोरोना बोरियालिसच्या बाबत मोठा तारा आपला मटीरियल सफेद छोट्या ताऱ्याच्या तळाशी टाकत आहे कारण दोन्ही एकमेकांच्या खूप जवळ आहेत. मटीरियल डंप झाल्यामुळे छोट्या ताऱ्याच्या तापमानात वाढ होत आहे. रिपोर्टनुसार, असं झाल्यास त्यात थर्मोन्यूक्लियर स्फोट सुरु होईल त्यानंतर छोटा तारा सर्व मटीरियल अवकाशात उडवून टाकेल आणि आधीपेक्षा शेकडो पट जास्त जास्त चमकू लागेल.

1217 मध्ये समजलं होतं पहिल्या स्फोटाबाबत

माणसांना सर्वप्रथम 1217 मध्ये टी कोरोना बोरियालिसमध्ये स्फोट होतो याची माहिती मिळाली होती. तेव्हापासून यात आणखी दोन स्फोट दिलसे आहेत. 1946 मध्ये यात शेवटचा स्फोट दिसला होता. शात्रज्ञांच्या मते, दर 79 किंवा 80 वर्षांनी एक स्फोट होतो. गेल्यावर्षी मार्चमध्ये ताऱ्यात हालचाल दिसली होती, ज्यावरून अंदाज लावला गेला होता की लवकरच पुन्हा एकदा स्फोट होणार आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-03T02:58:46Z dg43tfdfdgfd