बातम्या

Trending:


IMD Monsoon Forecast : मोठी बातमी! अखेर मान्सून विदर्भात धडकला

विदर्भासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अखेर मान्सून नागपुरात धडकला आहे, मान्सून नागपूरसह पूर्व विदर्भात दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. नागपुरात मान्सून सामान्यपणे 16 जूनपर्यंत दाखल होतो, मात्र यंदा पाच दिवसांच्या विलंबानं मान्सून पूर्व विदर्भात दाखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केरळ नंतर कोंकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतेक भागात मान्सून काही दिवसांपू्र्वीची दाखल झाला होता. विदर्भात मात्र मान्सूनची प्रतिक्षा होती, अखेर विदर्भात मान्सून दाखल झाला आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये आज मान्सून दाखल झाला आहे, येत्या काही तासांमध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मान्सून अभावी वातावरणात उकडा जाणवत होता, पेरण्या खोळंबल्या हेत्या, मात्र आता मान्सून दाखल झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांत विदर्भात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने मान्सूनच्या ढगांनी जोर पकडला आहे, विदर्भासह राज्यात पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवस नागपुरात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.


Sanjay Raut on Election Commission : निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहतंय

Sanjay Raut on Election Commission : निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहतंय मुख्यमंत्री येऊन गेले - ते कशासाठी जातात हे माहिती आहे - शेअर बाजाराप्रमाने भाव लावला जात आहे - शिक्षकांना विकत घेऊ नका - परंपरा मोडू नाका सुषमा अंधारे यांनी त्याबाबत व्हिडीओ दिला - लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टर मध्ये 20 कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिले - पदवीधर शिक्षक हा वर्गाला बाजारात ओढू नका - निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहता आहे - लोकशाही ची हत्या होत आहे - या भारताचे निवडणूक धृतराष्ट्र प्रमाणे पाहत आहे - दिंडोरीत भास्कर भगरे यांच्या विरोधात नाम साधर्म्य असणारा भगरे नावाचा उमेदवार उभा केला - भास्कर भगरे यांच्या नावांप्रमाने - भास्कर भगरे ला गुरुजी लावले नाही - 3 री पास उमेदवारच्या नावापुढे सर लावले - त्याला पिपाणी चिन्ह दिले - लोकांना फसवणूक मत घेणे सुरू ही पद्धत बंद व्हायला पाहिजे - लोकांना भ्रमित केलं जात आणि मत घेतली - यातून मार्ग काढावा लागेल - संदीप गुळवे यांना मत द्यायचे तर डुप्लिकेट ला दिलं जातं - आदिवासी आणि शेतकरी वर्ग चुकतो - लोकांनी शिवसेना समजून धनुष्यबाण ला मत गेली - उद्धव ठाकरे यांना मत द्यायचे होते


यूपी पोलिस पेपरफुटीचा आरोपी रवी अत्री याचा नीट पेपरफुटी प्रकरणातही सहभाग

नीट पेपरफुटीच्या तपासात रवी अत्री हे नावही समोर येत आहे. आधीच घडलेल्या उत्तर प्रदेश पोलिस भरती पेपरफुटीतही तो आरोपी आहे. मेरठ जेलमध्ये सध्या तो आहे. इथूनच त्यानेही नीट पेपरफुटीत सक्रिय भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते. रवी अत्री हा नीट पेपरफुटीतील सॉल्व्हर गँगचा (पेपर सोडविणारी टोळी) म्होरक्या आहे. तो नोएडातील नीमका गावचा आहे. पेपर फोडणार्‍यांना सॉल्व्हर टोळीपर्यंत …


Devendra Fadnavis Full PC : काळाराम मंदिरात दलितांविरोधात धमकीचं पत्रकं, फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis Full PC : काळाराम मंदिरात दलितांविरोधात धमकीचं पत्रकं, फडणवीस काय म्हणाले? पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे... काळाराम मंदिराच्या अवतीभवती राहणाऱ्या लोकांना धमकीचा पत्र प्रकाशित करण्यात आलं होतं.. ज्याने तो प्रकाशित केलं होतं, त्याला अटक झाली आहे.. त्याने दुसऱ्या एका व्यक्तीशी जुनं वैमनस्य काढण्यासाठी दलित समाजाला धमकी देणारा, निळे झेंडे लावू नका असं मजकूर असलेला पत्रक प्रकाशित केला होता.. ज्याने हे पत्र प्रकाशित केलंय, तोही दलित समाजाचा आहे... काहीतरी वेगळ्याच हेतूने त्याने हे पत्रक काढलं आहे... पोलीस या मागची कारण काय आहेत ते शोधून काढत आहे... ज्याला अटक केली त्याच्याकडून चार मोबाईल आणि दोन लॅपटॉप मिळाले आहे... त्यामुळे अन्य कोणी त्याच्या पाठीशी आहेत का?? दंगल घडवण्यासाठी हे पत्रक काढण्यात आले होते का?? याचा शोध पोलीस घेत आहे... सध्या तरी प्राथमिक दृष्ट्या एका व्यक्तीशी जुन्या वैमानस्यातून हे पत्रक काढण्याचे दिसत आहे... मात्र अटक झालेल्या व्यक्तीकडे ज्या वस्तू सापडल्या आहे, त्यामुळे त्याचा हेतू वेगळा होता का याचाही शोध घेतला जात आहे... यापुढे देखील असे प्रयत्न होऊ शकतात... पत्र काढायचं आणि समाज माध्यमावर तो पोस्ट करायचे आणि समाजात गैरसमजुत निर्माण करून दंगल सदृश्य स्थिती निर्माण करायची असं यापुढेही होऊ शकतं.. म्हणून गृह विभाग यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे... पोलीस महासंचालक आणि एसआयडी ला वस्तुस्थिती सांगितली आहे... काही राजकीय नेत्यांनी काल तो पत्र ट्विट केलंय.. माझी त्यांना विनंती आहे, शहानिशा न करता, वस्तूस्थिती न तपासता समाज माध्यमावर पोस्ट केली तर समाजात तेढ निर्माण होईल... कालच्या प्रकरणात सर्व सत्य बाहेर आलाय...


संजीव सिंह हा सराईत पेपरफोड्या

पाटणा/रांची; वृत्तसंस्था : नीट परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी झारखंड पोलिसांनी शनिवारी देवघर येथून 6 जणांना ताब्यात घेतले. ताब्यातील सर्व जण बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील आहेत. बिहारमधील पाटणा येथे या सगळ्यांना नेण्यात येईल. झारखंडमधूनच नीटचा पेपर फुटल्याचा पुरावा उपलब्ध झाला आहे, असे बिहार आणि झारखंड दोन्ही राज्यांच्या पोलिसांकडून सांगण्यात आले. प्रकरणाचा मास्टरमाईंड तसेच बिहारमधील नालंदा महाविद्यालयातील कर्मचारी संजीव सिंह …


शांतिदूत

Karamat Ali: भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या शांततेसाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे पाकिस्तानमधील शांततावादी कार्यकर्ते करामत अली यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या भारतीय सहृदाने जागवलेल्या आठवणी...


Konkan Railway Special Report : कोकणवासीयांसाठी खूषखबर ! कोकण रल्वे मार्गाचं दुहेरीकरण होणार

Konkan Railway Special Report : कोकणवासीयांसाठी खूषखबर ! कोकण रल्वे मार्गाचं दुहेरीकरण होणार कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला वेग आला असून त्याचा प्राथमिक अहवालही रेल्वे बोर्डाला दिलाय. तो मंजूर झाला की या कामाला वेग येणार असून त्यामुळं जादा गाड्या सोडता येतील, गाड्यांचा वेग वाढेल..पाहू या स्पेशल रिपोर्ट..


TOP 100 Headlines : 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 23 June 2024 : 6 AM : ABP Majha

TOP 100 Headlines : 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 23 June 2024 : 6 AM : ABP Majha मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज रेल्वेचा मेगाब्लॉक असणार. छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी, जातीय विरोध केला नाही तरी पंकजा मुंडेंना बीडमधून पाडलं, तर फडणवीसांचाही जातनिहाय जनगणनेला पाठिंबा, भुजबळांची माहिती १० दिवसांपासून सुरु असलेलं लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणेंचं उपोषण मागे, उपोषण स्थगित, लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही सरकारचं आश्वासन सत्ताधारीच ओबीसींना आंदोलन करायला लावतात, जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप.. भुजबळ समाजात तेढ निर्माण करत असल्याचीही टीका विधानसभेच्या जागावाटपाबाबत मविआ नेत्यांची उद्या बैठक, सत्ता परिवर्तनसाठी विधानसभा एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर चांगलंच, अमोल मिटकरींचं वक्तव्य...तर वक्तव्याचा विपर्यास केल्याची नंतर सारवासारव... शेतीच्या पाणीपट्टीत २० टक्क्यांनी वाढ, विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवण्याचा पटोलेंचा इशारा...तर पाणीपट्टीची ही वाढ महाविकास आघाडीच्या काळातली, फडणवीसांचं स्पष्टीकरण... अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर चांगलंच, अमोल मिटकरींचं वक्तव्य...तर वक्तव्याचा विपर्यास केल्याची नंतर सारवासारव...


पुण्यात Porsche नंतर आता मर्सिडीजनं एकाला चिरडलं, अपघाताचा धक्कादायक CCTV VIDEO

चंद्रकांत फुंदे, पुणे: पुण्यातील पौर्षे अपघात प्रकरण ताजं असतानाच आणखी अपघातांच्या घटना घडत असल्याचं समोर येतंय. एकामागोमाग पुण्यात बरेच अपघातांच्या घटना घडल्याचं चित्र आहे. आता पुण्यातून आणखी एक अपघात झाल्याची घटना समोर आलीय. मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याची घटना घडली आहे.पुण्यातील येरवड्याच्या गोल्फ क्लब चौकात हा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. एक मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला धडक दिली असून या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओही व्हायरल होत...


Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कसा घडला अपघात? मृताचे नातेवाईक म्हणाले...

Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कसा घडला अपघात? मृताचे नातेवाईक म्हणाले... पुणे पोर्शे अपघातानंतर (Pune Porshe Accident) आणखी एका भीषण अपघातानं (Pune Nashik Highway Accident) पुणे (Pune News) हादरलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका आमदाराच्या पुतण्यानं आपल्या गाडीनं दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवल्याचा प्रकार घडला. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आमदाराचा पुतण्या अपघातानंतर तिथून निघून गेला, त्यानं अपघातग्रस्तांना कोणतीही मदत केलेली नाही. तसेच, अपघातावेळी त्यानं मद्यप्राशन केलं होतं, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) कळंबमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचालकानं दोघांना चिरडलं असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या (Dilip Mohite Patil) पुतण्याकडून हा अपघात झाला आहे. या प्रकरणी मोहिते पाटलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार दिलीप मोहिते पाटलांचा पुतण्या कार चालवताना दारुच्या नशेत होतो, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.


संयुक्त राष्ट्रसंघाचं भवितव्य

ज्या उदात्त हेतूने हा संयुक्त राष्ट्रसंघ जन्माला घातला गेला, तो संघ त्याच्या उद्दिष्टपूर्तीत कितपत यशस्वी झाला? जर झाला नसेल तर त्याची कारणं कोणती; आणि ती कारणं दूर करून या संघाचा गाडा रुळावर आणण्याजोगी जागतिक परिस्थिती निर्माण होऊ शकते का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.


GST Council meet: प्लॅटफॉर्म तिकिटासह रेल्वेच्या सेवांवरील करात सूट, GST परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय, पाहा यादी

GST Council meet: तब्बल आठ महिन्यांनंतर जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. शेवटची बैठक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झाली होती. यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पाहा यादी


सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्त्ती वय ६०; मुख्यमंत्र्यांकडून सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वस्त

केंद्र शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ वरुन ५० टक्के केला आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी तयार केला आहे.


अल्याड पल्याड

कोकणातील वेगळी परंपरा म्हणून ‘गावपळण’ ओळखली जाते. संपूर्ण गाव वेशीबाहेर जाते. गावातील प्रत्येक मनुष्य, पाळीव प्राण्यांसह तीन दिवस वेशीबाहेर तंबू ठोकून राहतात. तीन दिवसांनी देवाचा कौल घेऊन पुन्हा सर्वांचा गावात प्रवेश होतो. कोणी म्हणते, ‘पूर्वजांचा आत्मा या दिवसांमध्ये गावात येऊन राहतो’, तर कोणी म्हणते, ‘भूता-प्रेतांच्या फिरण्याचा हा काळ असतो.’ ‘गाव...


Rahul Gandhi To Leave Wayanad: राहुल गांधी सोडणार वायनाडची जागा, प्रियंका गांधी लढवणार पोटनिवडणूक

Priyanka Gandhi To Contest from Wayanad : लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर करण्यात आले. या निकालात राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून विजय मिळवला. काँग्रेसचे अध्यक्ष प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधी केरळच्या वायनाड या लोकसभा जागा सोडतील अशी घोषणा केली. तसेच प्रियंका गांधी या वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.


तवायफनामा एक गाथा

तब्बल पंधरा वर्षं संशोधन... मौखिक इतिहासाचे आणि दस्तावेजांचे उत्खनन करून सबा दीवान यांनी ‘तवायफनामा’ हा ग्रंथ साकारला


बहार विशेष : ‘जी-७’ परिषदेचे फलित

सद्यस्थितीत जागतिक संघर्षांच्या काळात भारताची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील जी-7 सारख्या गटांना तो गरजेचा वाटतो; तर रशिया, इराण आणि अन्य अमेरिकाविरोधी इस्लामिक देशांनाही भारताशी मैत्रीसंबंध तोडता येत नाहीत. जागतिक ध्रुवीकरणामधील दोन्ही गटांच्या केंद्रस्थानी असणारा भारत समतोल भूमिकेतून आपले आर्थिक हितसंबंध पूर्ण करू इच्छित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीच्या प्रमुख आधारांमध्ये हेच …


Raj Thackeray Maharashtra : महाराष्ट्राचे डोळे उघडण्यासाठी हे मशीन आहे का? राज ठाकरेंचा खोचक टोला

Raj Thackeray Maharashtra : महाराष्ट्राचे डोळे उघडण्यासाठी हे मशीन आहे का? राज ठाकरेंचा खोचक टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुप्रसिद्ध डॉक्टर नितीन देशपांडे यांच्या श्री रामकृष्ण नेत्रालय या रुग्णालयाचे उद्घाटन समारंभासाठी उपस्थित राज ठाकरे बोलत आहेत देशपांडे यांच्या दुसरया हाॅस्पिटलचं माझा हस्ते उद्घाटन होतयं डोळे दाखवायच्या अत्याधुनिकयंत्र पाहून थक्क झालो सध्या महाराष्ट्राची डोळे उघडण्याची गरज आहे त्याच्यासाठी काही...


आंतरराष्‍ट्रीय : आखातातील असुरक्षित भारतीय

भारतीय मजुरांना मोठमोठी स्वप्ने दाखवून आखाती देशांत नेण्यात येते; पण त्यांना दिलेल्या हमीनुसार वेतन आणि सुविधा दिली जात नाही. आपल्या तुलनेत आखाती देशांत जादा वेतन मिळत असल्याने, तसेच बेरोजगारीमुळे ते घर सोडून चांगले आयुष्य जगण्यासाठी आखाती देशांना प्राधान्य देतात. परंतु, बहुतांशवेळा फसगतच होते. आखाती देशांत कुवेतसह बहारिन, इराक, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब …


अरेच्चा! हा तर सर्वात कुरुप, म्हूणच मिळाला मान; जगातील सर्वात विचित्र कुत्रा

मुंबई : कुत्रे पाळणाऱ्यांची जगात कमी नाही. शिवाय कुत्र्यांच्या ही लाखो प्रजाती आढळतात, लोक आपल्या आवडीप्रमाणे कुत्रा पाळतात आणि त्याला लहान मुलांप्रमाणे प्रेम करतात. काही कुत्रे हे दिसायला खुपस सुंदर असतात. ज्यांना पाहून आनंद होतो. शिवाय ते त्यांच्या निरागसतेने सर्वांचे मन जिंकतात.आज आम्ही तुम्हाला अशा कुत्र्याबद्दल सांगणार आहोत ज्याने आपल्या कुरूप रुपामुळे कुरूप कुत्रा होण्याचा मान मिळवला आहे.आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हा कुत्रा कोण आहे...


NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटीचे धागेदोरे पोहोचले राज्यात; लातूर येथून दोन शिक्षकांना नांदेड एटीएसने घेतले ताब्यात

NEET Exam : वैद्यकीय प्रवेश परीक्षेत (NEET) मोठा घोटाळा पुढे आला आहे. परीक्षेआधीच हे पेपर फुटल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, या प्रकारांचे कनेक्शन बिहार प्रमाणे राज्यात देखील पोहोचले आहेत. या प्रकरणी नांदेड एटीएसने लातूर येथून दोन शिक्षकांना अटक केली आहे.


अभिजात मराठी

अभिजात मराठीच्या पुरस्कर्त्यांनी केवळ चळवळीवर लक्ष केंद्रित केले व मराठी भाषा व भाषा याचाच उद्घोष सुरू ठेवला. मात्र मराठी राज्य भाषेचे, स्टेट लँग्वेजचे घटनाकारांना कोणते कार्यक्षेत्र अभिप्रेत आहे, याकडे दुर्लक्ष केले.


Mumbai News: काळाराम मंदिर परिसरातील पोस्टरबाजी व्यक्तीगत वैमनस्यातून, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Devendra Fadnavis News: काळाराम मंदिर परिसरात पोस्टरबाजी करण्यात आली होती. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा नेमकं काय म्हणाले?


Aaditya Thackeray on Pune Drugs Case : हॉटेलमध्ये ड्रग्ज सेवनाचा व्हिडीओ, आदित्य ठाकरे म्हणाले...

Aaditya Thackeray on Pune Drugs Case : हॉटेलमध्ये ड्रग्ज सेवनाचा व्हिडीओ, आदित्य ठाकरे म्हणाले... Pune Drugs News : पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आलेय. एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यानंतर पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये मुलं नशा करत असल्याचं दिसतेय. पुणे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जायाचं, त्याची आता ओळख बदलली जातेय का? असा सवाल उपस्थित केला जातोय. अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचेही समोर आलेय. कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर पुण्यातील आणखी एक प्रकार समोर आलाय. यामुळे सरकारवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले आहे. पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, ते ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडीओ समोर आलेय. मॅफेनड्रग्स असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलेय. पुण्यातील ललीत पाटील प्रकरणात आलेले ड्रग्जप्रकरण अजून शांत नसल्याचं दिसतेय


MHT-CET 2024 सदंर्भात आक्षेपावर CET विभागाकडून मोठा खुलासा

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून घेण्यात आलेल्या MHT-CET 2024 संदर्भात काही आक्षेप पालक,परिक्षार्थी आणि लोकप्रतिनिधी यांनी घेतले आहेत. याबाबत वस्तुस्थितीदर्शक खुलासा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून करण्यात आलाराज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषीशिक्षण याअभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली MHT-CET 2024 ही सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक 22 एप्रिल, 2024 ते 30 एप्रिल, 2024...