पुणे : गणेशोत्सवासाठी जाताना पती ठार

खंडाळा : पुढारी वृत्तसेवा

गणेशोत्सवासाठी गावी जाणार्‍या तरुण दाम्पत्यावर काळाने घाला घातल्याने अर्ध्या रस्त्यातच अपघातात पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाली. कोल्हापूरच्या दिशेने जाताना पुणे-बंगळूर महामार्गावर पारगाव-खंडाळा बसस्थानकानजीक असणार्‍या उड्डाण पुलावर ही भीषण दुर्घटना घडली. यामध्ये दुचाकी महामार्गावरच पती - पत्नी 70 फूट खाली सेवा रस्त्यावर पडले. उपेंद्र नागेश चाटे (वय 40, रा. दिंडेनगर, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे मृत पतीचे नाव आहे तर त्यांची पत्नी उन्नती चाटे या जखमी झाल्या आहेत. उपेंद्र चाटे व पत्नी उन्नती चाटे हे दोघेही पिंपरी- चिंचवड, आकुर्डी येथे नोकरीला आहेत. गणेशोत्सवामुळे ते शनिवारी दुचाकीवरून गावी निघाले होते. शनिवारी सकाळी

Kolhapur Flood : पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी गेलेल्या सरपंच पतीचा बुडून मृत्यू

साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते पारगाव खंडाळा बसस्थानकशेजारी असणार्‍या महामार्गावरील उड्डाण पुलानजिक आले. त्यांची दुचाकी पुलाच्या बाजूच्या कठड्यास घासत गेली. त्यामुळे उपेंद्र यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यात ते तोल जाऊन पुलावरून खाली कोसळले. दुचाकी महामार्गावरच मात्र ते दोघेही सेवा रस्त्यावर सुमारे 70 फूट उंचीवरून पडल्याने दोघांनाही गंभीर दुखापत झाली. ही घटना पाहून नागरिक गोंधळून गेले. जखमी चाटे दाम्पत्याला नागरिकांनी तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र पती नागेश चाटे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.

उन्नती या गंभीर जखमी असल्याने त्यांची परिस्थिती चिंताजनक होती. त्यांना तातडीने सातारा येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. गणेशोत्सव काळातच गणपती बसवण्यासाठी जाणार्‍या दांपत्यावर ही वेळ आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस स्टेशन येथे झाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

नाशिक : मारहाणीत पतीचा मृत्यू ; पत्नीसह तिघांना कोठडी

हुलकावणी दिल्याने अपघात

पुणे-बंगळूर महामार्गावर वाहनांची तोबा गर्दी दिसत आहे . चाटे दाम्पत्य हे रस्त्याच्या डाव्या बाजूने आपल्या दुचाकी वरून निघाले होते. रस्त्याच्या कडेने जात असताना महामार्गावरील इतर वाहनाने त्यांना हुलकावणी दिल्याने त्यांची गाडी बाजूच्या कठड्यास घासली. त्यामुळे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

2024-09-08T01:42:07Z dg43tfdfdgfd