Trending:


City 60 Superfast : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा : 22 June 2024 : ABP Majha

City 60 Superfast : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा : 22 June 2024 : ABP Majha ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मागण्यांसदर्भात अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठक, पत्राद्वारे सरकारचं हाके आणि वाघमारेंना आश्वासन. महायुती सरकार ओबीसी आरक्षणाबद्दल संवेदनशील, २९ जूनला ओबीसी आरक्षणच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक होणार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपेंची माहिती. मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, डॉक्टरांकडून तपासणी, जरांगे पुन्हा सलाईनवर, काल बीड दौऱ्यावर गेल्यापासून अस्वस्थ वाटत असल्याची जरांगेंची माहिती. ओबीसी समाजाचं आरक्षण न जाता मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सरकारची भूमिका, हाकेंचं आंदोलन स्थगित झालंय, निश्चित सामंजस्यातून मार्ग निघेल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास. सरकार मराठ्यांना फसवतंय, सग्यासोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून मराठ्यांना न्याय मिळाला नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा. २९ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाने काढलेल्या आदेशानुसार पाणीपट्टीत वाढ, ही वाढ महाविकास आघाडीच्या काळातलीच, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य.


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 7 AM: 23June 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6:30 AM: 23June 2024 मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज रेल्वेचा मेगाब्लॉक असणार. छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी, जातीय विरोध केला नाही तरी पंकजा मुंडेंना बीडमधून पाडलं, तर फडणवीसांचाही जातनिहाय जनगणनेला पाठिंबा, भुजबळांची माहिती १० दिवसांपासून सुरु असलेलं लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणेंचं उपोषण मागे, उपोषण स्थगित, लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही सरकारचं आश्वासन सत्ताधारीच ओबीसींना आंदोलन करायला लावतात, जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप.. भुजबळ समाजात तेढ निर्माण करत असल्याचीही टीका विधानसभेच्या जागावाटपाबाबत मविआ नेत्यांची उद्या बैठक, सत्ता परिवर्तनसाठी विधानसभा एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर चांगलंच, अमोल मिटकरींचं वक्तव्य...तर वक्तव्याचा विपर्यास केल्याची नंतर सारवासारव... शेतीच्या पाणीपट्टीत २० टक्क्यांनी वाढ, विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवण्याचा पटोलेंचा इशारा...तर पाणीपट्टीची ही वाढ महाविकास आघाडीच्या काळातली, फडणवीसांचं स्पष्टीकरण... अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर चांगलंच, अमोल मिटकरींचं वक्तव्य...तर वक्तव्याचा विपर्यास केल्याची नंतर सारवासारव...


लोकसभेच्या निकालाने भाजप विधानसभेसाठी सतर्क

नवी दिल्ली : सात टप्प्यांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनला जाहीर झाले आणि पुन्हा एकदा ‘एनडीए’ सरकार सत्तेत आले. असे असले तरी भाजपसह एनडीएला अपेक्षित लक्ष्य गाठता आले नाही. २०१४ आणि २०१९ मध्ये स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. तो आकडाही यावेळेस भाजपला मिळवता आला नाही, ‘४०० पार’चे स्वप्न तर दूरच… परंतु या …


Mumbai Sion Flyover: मुंबईकरांसाठी कामाची बातमी: शीव उड्डाणपूल बंद, कारण...

Mumbai Sion Flyover: आयआयटी आणि मध्य रेल्वेच्या संरचनात्मक तपासणी अहवालात शीव रेल्वे उड्डाणपूल धोकादायक ठरला आहे. अहवालातील शिफारशीनुसार पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक बंद करण्यात येईल.


Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कसा घडला अपघात? मृताचे नातेवाईक म्हणाले...

Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कसा घडला अपघात? मृताचे नातेवाईक म्हणाले... पुणे पोर्शे अपघातानंतर (Pune Porshe Accident) आणखी एका भीषण अपघातानं (Pune Nashik Highway Accident) पुणे (Pune News) हादरलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका आमदाराच्या पुतण्यानं आपल्या गाडीनं दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवल्याचा प्रकार घडला. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आमदाराचा पुतण्या अपघातानंतर तिथून निघून गेला, त्यानं अपघातग्रस्तांना कोणतीही मदत केलेली नाही. तसेच, अपघातावेळी त्यानं मद्यप्राशन केलं होतं, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) कळंबमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचालकानं दोघांना चिरडलं असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या (Dilip Mohite Patil) पुतण्याकडून हा अपघात झाला आहे. या प्रकरणी मोहिते पाटलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार दिलीप मोहिते पाटलांचा पुतण्या कार चालवताना दारुच्या नशेत होतो, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.


Yashomati Thakur Amravati : टेबल टाकून बाहेर बसू, भिणार नाही..कितीही गुन्हे टाका, ठाकूर गरजल्या

Yashomati Thakur Amravati : टेबल टाकून बाहेर बसू, भिणार नाही..कितीही गुन्हे टाका, ठाकूर गरजल्या अमरावती (Amravti News) खासदार कार्यालय नेमकं कुणाचं? हा प्रश्न आता चांगलाच तापल्याचं दिसत आहे. अमरावतीचं खासदार कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सील केलं आहे. आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे आणि लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) या दोघांनीही खासदार कार्यालयावर दावा केला आहे. पण या संपूर्ण प्रकरणात नवनीत राणांचं पत्र चर्चेचा विषय ठरतोय. नवनीत राणांनी अमरावती खासदार कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं आणि त्यावेळी लिहिलेल्या पत्रात हे कार्यालय काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंना देण्याची विनंती केली आहे. नवनीत राणांच्या पत्रामुळे अमरावतीतील खासदार कार्यालयाच्या वादात नवा ट्वीस्ट आला आहे. कार्यालय बळवंत वानखेडेंना देण्याची नवनीत राणांची पत्रातून विनंती खासदार कार्यालय परत करत असल्याचं नवनीत राणा यांनी पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं होतं. तसेच, कार्यालय काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडेंना देण्याती मागणी केली होती. नवनीत राणा जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणालेल्या की, "मी सर्वप्रथम अमरावती जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बळवंतरावजी वानखडे यांचे विजयाबद्दल अभिनंदन करते आणि पुढील जिल्हयाच्या यशस्वी विकास कामासाठी शुभेच्छा देते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले खासदार जनसंपर्क कार्यालय हे जिल्हयातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य जनतेच्या कामाकरीता होते. त्यामुळे भविष्यातही नवनिर्वाचित खासदाराच्या जनसंपर्क कार्यालयातून सर्व सामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांची कामं व्हावी या अपेक्षेसह खासदार जनसंपर्क कार्यालयाची चावी मी या पत्रासोबत आपल्याकडे सुपूर्त करत आहे. कृपया आपल्या माध्यमातून खासदार बळवंत वानखडे यांना ही चावी सुपूर्त करावी, ही विनंती करते. आपल्या सहकार्याची अपेक्षा."


Millionaires Leave India: यंदाच्या वर्षात ४३०० भारतीय कोट्यधीश देश सोडणार; कोणत्या देशांमध्ये बस्तान बसवणार?

Shocking News: देशातील तब्बल ४,३०० कोट्यधीश हे देश सोडून जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एका अहवालानुसार, यंदा वर्षभरात भारतातील ४,३०० कोट्यधीश हे देश सोडून दुसऱ्या देशात स्थलांतर करतील.


पांढर्‍या शिधापत्रिकाधारकांना 5 लाखांचे आरोग्य कवच

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील 43 हजार 605 शुभ्र (पांढरे) शिधापत्रिका असणार्‍या कुटुंबीयांना दरवर्षी 5 लाख रुपयांचे आरोग्य कवच मिळणार आहे. राज्य सरकारने नव्याने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ त्यांना मिळेल. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन …


Sushma Andhare on Drugs Case : "Excise Department ची अब्रू वेशीवर, शंभूराज देसाईंनी राजीनामा द्यावा"

Sushma Andhare on Drugs Case : "Excise Department ची अब्रू वेशीवर, शंभूराज देसाईंनी राजीनामा द्यावा" Pune Drugs News : पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आलेय. एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यानंतर पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये मुलं नशा करत असल्याचं दिसतेय. पुणे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जायाचं, त्याची आता ओळख बदलली जातेय का? असा सवाल उपस्थित केला जातोय. अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचेही समोर आलेय. कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर पुण्यातील आणखी एक प्रकार समोर आलाय. यामुळे सरकारवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले आहे. पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, ते ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडीओ समोर आलेय. मॅफेनड्रग्स असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलेय. पुण्यातील ललीत पाटील प्रकरणात आलेले ड्रग्जप्रकरण अजून शांत नसल्याचं दिसतेय


आंतरराष्‍ट्रीय : आखातातील असुरक्षित भारतीय

भारतीय मजुरांना मोठमोठी स्वप्ने दाखवून आखाती देशांत नेण्यात येते; पण त्यांना दिलेल्या हमीनुसार वेतन आणि सुविधा दिली जात नाही. आपल्या तुलनेत आखाती देशांत जादा वेतन मिळत असल्याने, तसेच बेरोजगारीमुळे ते घर सोडून चांगले आयुष्य जगण्यासाठी आखाती देशांना प्राधान्य देतात. परंतु, बहुतांशवेळा फसगतच होते. आखाती देशांत कुवेतसह बहारिन, इराक, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब …


संजीव सिंह हा सराईत पेपरफोड्या

पाटणा/रांची; वृत्तसंस्था : नीट परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी झारखंड पोलिसांनी शनिवारी देवघर येथून 6 जणांना ताब्यात घेतले. ताब्यातील सर्व जण बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील आहेत. बिहारमधील पाटणा येथे या सगळ्यांना नेण्यात येईल. झारखंडमधूनच नीटचा पेपर फुटल्याचा पुरावा उपलब्ध झाला आहे, असे बिहार आणि झारखंड दोन्ही राज्यांच्या पोलिसांकडून सांगण्यात आले. प्रकरणाचा मास्टरमाईंड तसेच बिहारमधील नालंदा महाविद्यालयातील कर्मचारी संजीव सिंह …


Devendra Fadnavis Full PC : काळाराम मंदिरात दलितांविरोधात धमकीचं पत्रकं, फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis Full PC : काळाराम मंदिरात दलितांविरोधात धमकीचं पत्रकं, फडणवीस काय म्हणाले? पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे... काळाराम मंदिराच्या अवतीभवती राहणाऱ्या लोकांना धमकीचा पत्र प्रकाशित करण्यात आलं होतं.. ज्याने तो प्रकाशित केलं होतं, त्याला अटक झाली आहे.. त्याने दुसऱ्या एका व्यक्तीशी जुनं वैमनस्य काढण्यासाठी दलित समाजाला धमकी देणारा, निळे झेंडे लावू नका असं मजकूर असलेला पत्रक प्रकाशित केला होता.. ज्याने हे पत्र प्रकाशित केलंय, तोही दलित समाजाचा आहे... काहीतरी वेगळ्याच हेतूने त्याने हे पत्रक काढलं आहे... पोलीस या मागची कारण काय आहेत ते शोधून काढत आहे... ज्याला अटक केली त्याच्याकडून चार मोबाईल आणि दोन लॅपटॉप मिळाले आहे... त्यामुळे अन्य कोणी त्याच्या पाठीशी आहेत का?? दंगल घडवण्यासाठी हे पत्रक काढण्यात आले होते का?? याचा शोध पोलीस घेत आहे... सध्या तरी प्राथमिक दृष्ट्या एका व्यक्तीशी जुन्या वैमानस्यातून हे पत्रक काढण्याचे दिसत आहे... मात्र अटक झालेल्या व्यक्तीकडे ज्या वस्तू सापडल्या आहे, त्यामुळे त्याचा हेतू वेगळा होता का याचाही शोध घेतला जात आहे... यापुढे देखील असे प्रयत्न होऊ शकतात... पत्र काढायचं आणि समाज माध्यमावर तो पोस्ट करायचे आणि समाजात गैरसमजुत निर्माण करून दंगल सदृश्य स्थिती निर्माण करायची असं यापुढेही होऊ शकतं.. म्हणून गृह विभाग यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे... पोलीस महासंचालक आणि एसआयडी ला वस्तुस्थिती सांगितली आहे... काही राजकीय नेत्यांनी काल तो पत्र ट्विट केलंय.. माझी त्यांना विनंती आहे, शहानिशा न करता, वस्तूस्थिती न तपासता समाज माध्यमावर पोस्ट केली तर समाजात तेढ निर्माण होईल... कालच्या प्रकरणात सर्व सत्य बाहेर आलाय...


शांतिदूत

Karamat Ali: भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या शांततेसाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे पाकिस्तानमधील शांततावादी कार्यकर्ते करामत अली यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या भारतीय सहृदाने जागवलेल्या आठवणी...


Laxman Hake OBC Reservation Protest : हाके, वाघमारे यांचं उपोषण स्थगित

जालना : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले ओबीसी आरक्षण बचाव उपोषण अखेर लक्ष्मण हाके यांनी अखेर संपवलं आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, तसेच ओबीसी आरक्षणासंबंधी लक्ष्मण हाके यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं आहे. छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी या शिष्टमंडळाने आरक्षणावर राज्य सरकारची काय भूमिका आहे याची माहिती हाके यांना दिली. त्याचवेळी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण मागे घ्यावं अशी विनंती या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. काय म्हणाले लक्ष्मण हाके? बोगस सर्टिफिकेट देणाऱ्यांवर आणि घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने आश्वासन दिलं. त्यावर श्वेतपत्रिका काढावी आणि ते जाहीर करावं. या सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे. पंचायत राजच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षण देऊन घेणार की त्याशिवाय घेणार हे शासनाने स्पष्ट करावं. अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक होणार असून त्यामध्ये चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल. या सरकारने आश्वासन दिलं आहे, पण केवळ त्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे आमच्या मागण्या पूर्णपणे मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. आता ते फक्त तात्पुरतं स्थगित केलं आहे.


Intercity Express And Deccan Express: पुणे-मुंबई रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; इंटरसिटी एक्स्प्रेस व डेक्कन एक्स्प्रेस इतक्या दिवसांसाठी बंद

Pune-Mumbai Railway: पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेस या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या दोन एक्स्प्रेस गाड्या ३ दिवस बंद राहणार आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.


COEP Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

COEP Pune recruitment 2024 : अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे अंतर्गत कोणत्या पदांसाठी नोकरीची भरती करण्यात येणार आहे याची माहिती इच्छुक उमेदवारांनी पाहा.


'शेतमजुर तरुणाशी लग्न करणाऱ्या मुलीला..' राजू शेट्टी यांची सरकारकडे मोठी मागणी

बारामती, (जितेंद्र जाधव, प्रतिनिधी) : ग्रामीण भागात लग्नाळू मुलांना मुली मिळत नसल्याने असंख्य तरुण सध्या निराशेच्या छायेत आहे. त्यातही शेतकरी नवरा नको गं बाई, असं समज झाल्याने प्रत्येक गावाच्या चावडीवर अनेक अविवाहित तरुण आपल्याला पाहायला मिळतील. यावरुन सोलापूरमध्ये मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही काहीच हालचाल झाल्याचे पाहायला मिळाले नाही. आता स्वाभीमानी शेतकरी संघटनेने यासाठी पुढाकार घ्यायचं ठरवलं आहे. नुकताच बारामती येथे राजू...


Google Chrome वापरताय सावधान! सरकारने दिला Alert, सांगितला मोठा धोका

नवी दिल्ली : इंटरनेटवर कोणत्याही स्वरूपाचं काम करायचं असेल तर बहुतांश युजर्स गुगलचा वापर करतात. त्यामुळे इंटरनेट म्हणजे गुगल असं समीकरण तयार झालं आहे. पण सायबर गुन्हेगारीचा वाढता धोका पाहता इंटरनेटवर काम करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अनेक युजर्स रोज गुगल क्रोम ब्राउझरचा वापर करतात. सरकारने आता गुगल क्रोम ब्राउझर युजर्सना एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. काही कारणांमुळे युजर्सचा खासगी डाटा हॅकर्सच्या हाती लागू शकतो. त्यामुळे युजर्सने...


NEET Paper Leak Case : नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय कडून FIR दाखल; पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरपर्यंत

NEET Paper Leak Case Latur : नीट पेपरफुटी प्रकरणात (NEET Paper Leak Case) दिवसागणिक नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच आज होणारी नीट पीजी परीक्षा (NEET PG Exam) पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय आरोग्य मंत्रालयानं (Ministry of Health) घेतला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात बिहार (Bihar) कनेक्शननंतर आता महाराष्ट्र (Maharashtra News) कनेक्शन समोर आलं आहे. नीट (NEET Exam) पेपरफुटी प्रकरणी दोन शिक्षकांना नांदेड एटीएसनं (Nanded ATS) ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात...


गर्दभ आख्यान…

पूर्वी आपण भारतीय आपल्या मागासपणाच्या मासल्यासाठी अमेरिका युरोपसिंगापूरच्या प्रगल्भतेची उदाहरणे द्यायचो. आता उगी विकासाच्या गमजांसाठी पाकिस्तानच्या बुटक्या अर्थव्यवस्थेला तुलनेसाठी धरतो, हे भारतातही गर्दभजमात जोमाने वाढत असल्याचे लक्षण आहे काय?


पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया लांबणार?

कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्णयानुसार या वर्षापासून राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) मिळणारे गुण पीएच.डी. प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत; परंतु ‘नेट’चा पेपरच रद्द झाल्याने विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थांची पीएच.डी.ची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर जाणार असल्याने विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. यूजीसीची काही दिवसांपूर्वी बैठक होऊन ‘नेट’संदर्भात निर्णय झाला. त्यानुसार 27 व 28 …


क्रीडा : पाकिस्तानच्या क्रिकेटला घरघर

निवड समितीतील वशिलेबाजी, खेळाडूंमधील गटबाजी, फिटनेसचा अभाव, मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप, अशा अनेक कारणांमुळे पाकिस्तानचे क्रिकेट रसातळाला चालले आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत तर पाक संघाला बाद फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. या दारुण पराभवाची बीजे तिथल्या भोंगळ व्यवस्थेत लपली आहेत. संपन्न भूतकाळ आणि अस्वस्थ करणारे वर्तमान अशी पाकिस्तानच्या क्रिकेट …


पुणे Porsche अपघात प्रकरणाची मोठी अपडेट, विशाल अग्रवालला जामीन, पण…

चंद्रकांत फुंदे, पुणे: पोर्शे अपघात प्रकरण अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अल्पवयीन मुलान पोर्शे कारने दोन जणांना उडवलं होतं आणि त्यातच दोघांचा मृत्यू झाला. हे प्रकरण खूप चिघळलं. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.विशाल अगरवाल याच्यावर दाखल असलेल्या तीन गुन्ह्यापैकी एका गुन्ह्यात जामीन मिळाला आहे मात्र इतर दोन गुन्ह्यात तो न्यायालयन कोठडीत राहणार आहे. त्यामुळे विशाल अगरवाल याचा मुक्काम येरवडा कारागृहातच राहणार आहे.विशाल अगरवलाच्या अल्पवयीन...


Mumbai Metro: मुंबईकरांना दिलासा! पावसाळ्यात 24 अतिरिक्त मेट्रो धावणार

Mumbai Metro: पावसाळ्यात मुंबईकरांना वाहतुकीसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशात मुंबईकरांसाठी एक दिलासादायक माहिती सोमोर आली आहे. मुंबई मेट्रो संदर्भात ही माहिती आहे. त्यानुसार, महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनने पावसाळ्यात प्रवाशांना मोठा दिलास दिला आहे, प्रवासांना त्याच्या इच्छितस्थळी सहज पोहोचवण्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात मेट्रो स्थानकावर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे.


अल्याड पल्याड

कोकणातील वेगळी परंपरा म्हणून ‘गावपळण’ ओळखली जाते. संपूर्ण गाव वेशीबाहेर जाते. गावातील प्रत्येक मनुष्य, पाळीव प्राण्यांसह तीन दिवस वेशीबाहेर तंबू ठोकून राहतात. तीन दिवसांनी देवाचा कौल घेऊन पुन्हा सर्वांचा गावात प्रवेश होतो. कोणी म्हणते, ‘पूर्वजांचा आत्मा या दिवसांमध्ये गावात येऊन राहतो’, तर कोणी म्हणते, ‘भूता-प्रेतांच्या फिरण्याचा हा काळ असतो.’ ‘गाव...


MHT-CET 2024 सदंर्भात आक्षेपावर CET विभागाकडून मोठा खुलासा

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून घेण्यात आलेल्या MHT-CET 2024 संदर्भात काही आक्षेप पालक,परिक्षार्थी आणि लोकप्रतिनिधी यांनी घेतले आहेत. याबाबत वस्तुस्थितीदर्शक खुलासा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून करण्यात आलाराज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषीशिक्षण याअभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली MHT-CET 2024 ही सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक 22 एप्रिल, 2024 ते 30 एप्रिल, 2024...


Breaking News LIVE Updates: अलिबागमध्ये तलावात बुडून 2 मुलांचा मृत्यू

Today Breaking News LIVE Updates: देशाबरोबरच महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडींसहीत महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी अगदी मोजक्या आणि संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या...