NASHIK ACCIDENT | ट्रकच्या चाकाखाली आल्याने तरुण ठार

चांदवड : शहरातील भैरवनाथ कॉलनीत बुधवारी (दि. ४) रात्री ट्रकच्या चाकाखाली आल्याने युवक ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

चांदवड पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेत त्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. कोंबडवाडी शिवारातील राशेवाडी येथील ज्ञानेश्वर अभिमन मोरे (३८) हा बुधवार (दि.4) रात्री ९.३० च्या सुमारास भैरवनाथ कॉलनीत असताना त्याला ट्रकने (एम. एच. १५, इ. जी. ७५४४) धडक दिली. त्यानंतर ट्रकचे चाक तरुणाच्या डोक्यावरून व छातीवरून गेल्याने तो जागीच ठार झाला. रक्तबंबाळ ज्ञानेश्वरला उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत तेथील खुणांवरून ट्रकचा शोध घेतला. संशयित ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले.

2024-09-07T05:02:13Z dg43tfdfdgfd