ABP Majha Headlines : 5 PM : 3 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी होण्याची शक्यता , दानवेंनी सभापतींना दिलं दिलगिरीचं पत्र, उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक महायुती सरकारकडून १ लाख ८ हजार पदांवर भरती प्रक्रिया सुरू, ७० हजार जणांना नियुक्त पत्र प्रदान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात माहिती परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी याच अधिवेसनात नवा कायदा आणणार, फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना टोलमाफी, आजपासून २१ जुलैपर्यंत सवलत लागू मुंबईच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी बोलावली तातडीची बैठक, संबंधित मंत्र्यांमार्फत पाणीपुरवठ्याची माहिती देण्याचे बीएमसीच्या जलअभियंत्यांना निर्देश मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमधील जीन्स, टीशर्ट बंदीचा मुद्दा विधानसभेत गाजला... कॉलेजने तालिबानी फतवा मागे घ्यावा, प्रताप सरनाईकांची मागणी नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतो का, अजित पवारांचा सवाल, तर फडणवीसांच्या भूमिकेत बदल नाही, सरनाईकांचं मत पुण्यात आठ तालुक्यांतील पर्यटनस्थळ, गडकिल्ले, धबधब्यांवर जमावबंदी, भुशी डॅम परिसर, ताम्हिणी घाटातील दुर्घटनेनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
2024-07-03T12:19:06Z
Milind Narvekar Pankaja Munde : मिलिंद नार्वेकर पंकजा मुंडे यांची संपत्ती नेमकी किती?
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदावार रिंगणात आहेत..त्यातील अनेक उमेदवार कोट्यधीश आहेत.. पाहूया कुणाची किती संपत्ती आहे.. शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना नार्वेकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीचा तपशील आता जाहीर झाला आहे. पाहूया मिलिंद नार्वेकरांची संपत्ती नेमकी किती आहे..व पंकजा मुंडेंची संपत्ती किती? उत्पन्नाचा स्त्रोत- शेती, माजी आमदार निवृत्तीवेतन, भाडे बँक खात्यांत- ९१ लाख २३ हजार ८६१ शेअर्स, म्युच्युअल फंड- १ कोटी २८ लाख, ७५ हजार ६९४ स्वत:च्या नावावर एकही वाहन नाही स्थावर मालमत्ता- ९६ लाख, ७३ हजार, ४९० जंगम मालमत्ता- ६ कोटी ८ लाख, १५ हजार, ७०९ एकूण कर्ज- २ कोटी, ५० लाख, ३२ हजार ४२७ सोने- ४५० ग्रॅम (३२ लाख, ८५ हजार)
2024-07-03T16:04:51Z