BREAKING NEWS LIVE UPDATES :मध्य रेल्वेवर रेल्वे रुळाला तडे; कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अनेक लोकल जागेवर थांबल्या, लाखो प्रवासी खोळंबले

Breaking News Live Updates : मराष्ट्राला हादरवुन टाकणारा घोटाळा नुकताच समोर आला असून, महाराष्ट्राची तिजोरी लुटणारा हा सर्वात मोठा घोटाळा आहे. घोटाळेबाज कसे महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारतायत याचा INVESTIGATION रिपोर्ट समोर. 

जळगाव आणि अमळनेर शहर हे या शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी आहे. सानेगुरुजींची जयंती यावर्षी साजरी होतेय. त्यांच्या शिक्षक होण्यालाही याच वर्षी शंभर वर्ष पूर्ण होतायत. साने गुरुजींनी ज्या अमळनेर शहरात आपल्या संवेदनशील स्वभावाने शिक्षणाचा लौकिक वाढवला. त्याच अमळनेर शहरात आणि खुद्द साने गुरुजींच्या शाळेतच मोठा शिक्षण घोटाळा समोर आलाय. साने गुरुजींच्या शाळेत झालेला घोटाळा हा शाळेत होणा-या घोटाळ्याच्या हिमनगाचं एक टोक आहे.

2024-07-03T01:44:26Z dg43tfdfdgfd