बातम्या

Trending:


IndiGo flight News: मुंबईला येणाऱ्या विमानातील प्रवाशानं हद्दच केली, टॉयलेटमध्ये गेला अन्…

Delhi-Mumbai IndiGo flight: दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानाच्या स्वच्छतागृहात धुम्रपान केल्याप्रकरणी एका ३८ वर्षीय प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


मागील पानावरून पुढे

Om Birla : विरोधकांनीही मतविभागणी न मागता संख्याबळाची झाकली मूठ कायम ठेवली. उमेदवार निश्चित करताना विश्वासात न घेतल्याबाबत तृणमूल काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्याने ‘इंडिया’ आघाडीतील कुरबुरीही समोर आल्या.


Nanded | एसटी बस वाहक आणि प्रवाशात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

ST Driver and Passanger Rada in Nanded


MLA Fund : निधीवाटपावरुन जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप, भाजपकडून सभागृहात गदारोळ

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या निधीवाटपावरुन महायुती सरकारवर गंभीर आरोप, मला आमदार निधी मिळला नाही अशी खंत आव्हाडांनी सभागृहात बोलून दाखवली.


millennium express news : रेल्वे प्रवासात मधला बर्थ कोसळून खालील प्रवाशाचा मृत्यू! रेल्वे प्रशासनानं झटकले हात

millennium express accident news : रेल्वे प्रवासात मधल्या बर्थची साखळी निसटून तो खाली कोसळल्याने खालच्या सीटवर असलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


Ulhasnagar Crime News : वाढदिवसालाच मित्रांनी घेतला जीव, उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये वाढदिवसालाच एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणाच्या मित्रांनीच त्याचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. उल्हासनगरमधल्या या घटनेविषयी जाणून घेऊयात.


Maharashtra Vidhan Parishad : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं Mahayuti vs MVA Special Report

सध्या विधानपरिषद निवडणुकीची जोरदार चर्चा रंगलीय... कुणी कुणाला उमेदवारी दिली याची चर्चा तर रंगली आहेच... मात्र त्याचसोबत, कोणत्या उमेदवाराची किती संपत्ती आहे... आणि उमेदवारांनी संपत्तीच्या बाबतीत कशी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतलीयत... पाहूयात... पंकजा मुंडेंची संपत्ती किती? उत्पन्नाचा स्त्रोत- शेती, माजी आमदार निवृत्तीवेतन, भाडे बँक खात्यांत- ९१ लाख २३ हजार ८६१ शेअर्स, म्युच्युअल फंड- १ कोटी २८ लाख, ७५ हजार ६९४ स्वत:च्या नावावर एकही वाहन नाही स्थावर मालमत्ता- ९६ लाख, ७३ हजार, ४९० जंगम मालमत्ता- ६ कोटी ८ लाख, १५ हजार, ७०९ एकूण कर्ज- २ कोटी, ५० लाख, ३२ हजार ४२७ सोने- ४५० ग्रॅम (३२ लाख, ८५ हजार) ------------------- मिलिंद नार्वेकरांची संपत्ती किती? उत्पन्नाचा स्त्रोत- घरांचे भाडे, व्यावसायिक उत्पन्न बँक खात्यांत- ७४ लाख १३ हजार, २४३ बॉण्ड्स, म्युच्युअल फंड- ५० हजार रुपये पोस्ट, पॉलिसीमध्ये- ३ लाख ६८ हजार, ७२९ स्वत:च्या नावावर एकही कोणतेही वाहन नाही सोने- ३५५ ग्रॅम (२४ लाख, ६७ हजार ९८१) जमीन- दापोली येथे ७४ एकर जमीन मालाड, बोरीवली १ हजार चौरस फुटाचं घर एकूण कर्ज- २६ लाख, ३८ हजार, १६० रुपये --------------- भावना गवळी यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा स्त्रोत- घरांचे भाडे, व्यावसायिक उत्पन्न बँक खात्यांत- २१ लाख २५ हजार ०१६ रुपये बॉण्ड्स, म्युच्युअल फंड- २७ हजार ७०० हजार रुपये पोस्ट, पॉलिसीमध्ये- २० लाख वाहन - टोयाटो इनोव्हा- २४ लाख ३७ हजार रुपये सोने- २०० ग्रॅम (१३ लाख ६० हजार ) जमीन- रिसोड येथे ५ एकर ५६ गुंठे जमीन वाशिममध्ये ५ हजार चौरस फुटाचं घर ------------------- सदाभाऊ खोत यांची संपत्ती बँक खात्यांत- २ लाख ०८ हजार ८४० बॉण्ड्स, म्युच्युअल फंड- ५३ हजार रुपये पोस्ट, पॉलिसीमध्ये- ५८ लाख ९ हजार ५०० वाहन - टोयाटो इनोव्हा क्रिस्ट- २९ लाख रुपये एमजी हेक्टर झेड एस इव्ही किंमत २३ लाख सोने- १५ ग्रॅम (१३ लाख ६० हजार ) सांगली ६१२ चौरस फुटांचं घर


Maharashtra NEET Counselling 2024: सुरू होत आहे महाराष्ट्र नीट काऊन्सिलिंग, ही कागदपत्रे तयार ठेवा

NEET Counselling Documents List: महाराष्ट्रातल्या NEET काऊन्सिलिंग २०२४ मधून राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा भरण्याचा उद्देश असेल. ज्यातील १०,१४५ जागा या MBBS पदवीसाठी तर ३,५४६ जागा BDS म्हणजेच दंतचिकित्सेच्या पदवीसाठी काऊन्सिलिंग होईल. महाराष्ट्र NEET काऊन्सिलिंग २०२४ हे ३ फेऱ्यांमध्ये होईल. मेरिट लिस्टच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. तरीही जागा शिल्लक असल्यास अखेर स्ट्रे वेकन्सी फेरी होईल.


Mumbai Central Public Park : न्यूयॉर्क, लंडनसारखं आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ लवकरच मुंबईत

Mumbai Central Public Park On 300 Acres : मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क विकसित होणार आहे. ३०० एकरवर हे उभारण्यात येणार असून यासाठी प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे.


Weather : सावधान! आज राज्यातील 'या' भागात पडणार मुसळधार पाऊस

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठक

मुंबई: हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली आहे. या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील राजकीय समीकरणं बदलणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे संतोष बांगर यांची भेट झाल्यानंतर हिंगोलीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. अधिवेशनाच्या कालावधीत ही भेट झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्या दरम्यान संतोष बांगर आणि त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्या गेल्या. पण आता हे दोन्ही नेते अब्दुल सत्तारांच्या घरी भेटले आणि ही भेट गुप्त होती. त्यामुळेच ही भेट हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणं बदलवणारी ठरण्याची शक्यता आहे.


Nepal landslides: नेपाळमध्ये मान्सूनचा कहर! मुसळधार पाऊस, भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू

Nepal Weather: नेपाळमध्ये गेल्या 24 तासांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे नेपाळच्या भागात भूस्खलन, पूर आणि वीज पडल्याच्या एकूण 44 घटना घडल्या. या घटनांमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर भूस्खलनामुळे 2 जण बेपत्ता झाले आहे. तर शेकडो लोक बेघर झाले आहेत.


जागतिक राजकारण आणि भारत

G 7 Summit Italy: 'जी ७' परिषद, युक्रेन युद्धाबाबतची शांतता परिषद, अमेरिकेने रशियाचे पैसे वापरण्याविषयी केलेले वक्तव्य या साऱ्या पार्श्वभूमीवर 'ग्लोबल साउथ', 'ब्रिक्स' आणि भारत यांचा विचार करायला हवा. आताची बदललेली बाजू आपणही समजून घ्यायला हवी.


SSC Recruitment 2024: सरकारी नोकरीची संधी, कर्मचारी निवड आयोगात ८ हजारांपेक्षा अधिक जागांसाठी भरती

Staff Selection Commission Recruitment: कर्मचारी निवड आयोगात एकूण ८ हजार ३२६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसंदर्भात आवश्यक माहिती जाणून घेऊयात.


Zika Virus Advisory: झिका व्हायरसचा धोका वाढतोय? आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना ॲडव्हायझरी जारी

Union Health Ministry Issues Advisory to States in view of Zika virus: महाराष्ट्रातील झिका विषाणूची प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना अॅडव्हायजरी जारी केली आहे. झिका विषाणूच्या संसर्गासाठी गर्भवती महिलांची तपासणी करून आणि झिका पॉझिटिव्ह आलेल्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवत राज्यांनी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रुग्णालयांचा परिसर एडिस डासमुक्त ठेवण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी...


असांज आता काय करणार?

Julian Assange :'हॅकिंग विश्वाचा रॉबिनहूड' अशी ओळख असणारे ज्युलियन असांज यांची नुकतीच सुटका झाली. या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा हा आढावा...


नीट पेपरफुटी प्रकरणात पालकांकडून पैशांची फसवणूक

NEET Exam Paper Leak Accused And Wife Account Showing Transaction Of 7 Lakhs


Five Drown In Bhushi Dam: भुशी धरणावर पर्यटनासाठी गेलेले 5 जण गेले वाहून, दोघांचे मृतदेह सापडले; तिघांचा शोध सुरू

Five People Of Same Family Were Drown In Bhushi Dam: लोणावळ्यात वर्षा पर्यटनासाठी गेलेले 5 जण भुशी धरणाच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या जंगलातील वॉटर फॉलमध्ये हे पर्यटक वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. यात लहान मुले, महिलांचा समावेश आहे. शोधकार्य सुरू असल्याच माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


ABP Majha Headlines : 5 PM : 3 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी होण्याची शक्यता , दानवेंनी सभापतींना दिलं दिलगिरीचं पत्र, उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक महायुती सरकारकडून १ लाख ८ हजार पदांवर भरती प्रक्रिया सुरू, ७० हजार जणांना नियुक्त पत्र प्रदान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात माहिती परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी याच अधिवेसनात नवा कायदा आणणार, फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना टोलमाफी, आजपासून २१ जुलैपर्यंत सवलत लागू मुंबईच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी बोलावली तातडीची बैठक, संबंधित मंत्र्यांमार्फत पाणीपुरवठ्याची माहिती देण्याचे बीएमसीच्या जलअभियंत्यांना निर्देश मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमधील जीन्स, टीशर्ट बंदीचा मुद्दा विधानसभेत गाजला... कॉलेजने तालिबानी फतवा मागे घ्यावा, प्रताप सरनाईकांची मागणी नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतो का, अजित पवारांचा सवाल, तर फडणवीसांच्या भूमिकेत बदल नाही, सरनाईकांचं मत पुण्यात आठ तालुक्यांतील पर्यटनस्थळ, गडकिल्ले, धबधब्यांवर जमावबंदी, भुशी डॅम परिसर, ताम्हिणी घाटातील दुर्घटनेनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


Ajit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार

Ajit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार हेही वाचा : कारखान्यासाठी कर्ज डावल्याने अशोक पवारांनी (Ashok Pawar) अजित पवारांना (Ajit Pawar) चॅलेंज केले आहे. 'एनएसडीसी'कडे (NSDC) सादर केलेल्या कर्जाच्या फाईल मध्ये त्रुटी असतील तर संबंधितांनी दाखवाव्यात. माझी कर्जाची फाईल 100% बरोबर आहे. मी समोरासमोर बसून चर्चा करेन असे आव्हान अशोक पवारांनी दिले. मी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत राहिलो म्हणून माझ्यावर अन्याय करणार असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशा शब्दात अशोक पवारांनी अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली. केवळ विरोधी पक्षात आहे म्हणून निधी दिला जात नाही हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. दोन दिवसांपूर्वी राज्यातील १३ कारखान्यांना एनएसडीसीकडून कारखान्यांना 1800 कोटींहून अधिक मर्जीचे कर्ज देण्यात आले होते. यामध्ये विरोधी पक्षात असणाऱ्या कारखान्यांना कर्ज डावलले गेल्याचा आरोप होत असून पुण्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


Sudha Murthy Rajya Sabha Speech: ‘सर, कसं बोलायचं कळत नाही...’ राज्यसभेत पहिलंच भाषण, सुधा मूर्तींनी जीवाभावाचे विषय मांडत जिंकलं मन

Sudha Murthy's Rajya Sabha Debut: इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी मंगळवारी राज्यसभेत खासदार म्हणून पहिल्यादांच संबोधन केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत सुधा यांनी भाग घेतला. राज्यसभेच्या खासदार म्हणून सुधा मूर्ती यांनी पहिल्यांदाच राज्यसभेत भाषण केले आणि पहिल्याच भाषणात सुधा मूर्ती यांनी सरकारकडे केली मोठी मागणी. सुधा मूर्ती राज्यसभेतील पहिल्या भाषणात काय म्हणाल्या पाहूया...


Bharat Ratna to Shahu Maharaj: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न; राज्य सरकारमधील मंत्र्यांचे मोठे वक्तव्य

Shahu Maharaj: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने हसन मुश्रीफ यांनी महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी सरकारकडे विनंती करणार असल्याचे सांगितले.


Password Safety: 17 टक्के भारतीय नागरिक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत बेफिकीर; सर्वेक्षणातून आले समोर

Password Safety negligence : 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षितपणे पासवर्ड जतन करतात, सर्वेक्षणात धक्कादायक सत्य उघड झाले: भारतीय लोक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत निष्काळजी वृत्ती बाळगतात. लोकांना त्यांच्या फोनमध्ये पासवर्ड सेव्ह करण्याची किंवा नोटपॅडवर लिहून ठेवण्याची सवय असते. अशा निष्काळजीपणामुळे डेटा चोरीचा धोका वाढतो. एका सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षित पद्धतीने पासवर्ड सेव्ह करतात.


IRCTC Ticket Booking: वेगळे आडनाव असलेल्या नातेवाईकांचे रेल्वे तिकीट बुक करणे अवैध? IRCTC ने दिले स्पष्टीकरण

IRCTC Clarification On Online Ticket Booking: सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या बातम्यांमध्ये असा दावा केला जात होता की, जर प्रवाशांची आडनाव वेगळी असेल तर त्यांना एकत्र तिकीट मिळणार नाही असे सांगितले जात होते. यावरून प्रवाशांमध्ये बराच गोंधळ झाला होता. तिकिट बुकिंग करण्याबाबत प्रवाशांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत होते. परंतु आता यावर आयआरसीटीसीने पुढे येऊन स्पष्टीकरण दिले आहे.


Nawab Malik : मलिक बैठकीत, घेणार महायुतीत? फडणवीस काय भूमिका घेणार? Special Report

माजी मंत्री नवाब मलिक यांनी अजित दादांनी बोलवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला हजेरी लावली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागच्या अधिवेशनातील पत्राची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली. त्याचसोबत, ज्यांना विरोध केला त्या नवाब मलिकांना महायुतीत घेणार का? असा सवालही आता विचारला जाऊ लागलाय... पाहूयात याबाबतचा एक रिपोर्ट अजित पवार यांनी बोलवलेल्या बैठकीत नवाब मलिक उपस्थित असल्याची ही दृश्य... ही दृश्य जेव्हा बाहेर आली तेव्हा अनेकांच्या भुवया वर गेल्या आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या... अजित पवार राष्ट्रवादीत सर्वात मोठं आणि ऐतिहासिक बंड करत सत्तेच्या मांडवाखाली आले... त्याचवेळी नवाब मलिकांवरून जोरदार खटके उडाले होते... खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना सोबत घेण्याबाबत नाराजीची भूमिका मांडत अजित पवारांना पत्र लिहिलं


Pandharpur Wari Toll Free: पंढरीची वारी टोलमुक्त ! 21 जुलैपर्यंत पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफी जाहीर

Ashadhi wari toll free for warkari vehicles: आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल माफी करण्याचं राज्य सरकारने जाहीर केलं आहे.


Pune Tourism: पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जमावबंदीचे आदेश

Prohibition orders at tourist places in Pune district after bhushi dam accident