FIVE DROWN IN BHUSHI DAM: भुशी धरणावर पर्यटनासाठी गेलेले 5 जण गेले वाहून, दोघांचे मृतदेह सापडले; तिघांचा शोध सुरू

Five People Drown In Bhushi Dam: मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेला लोणावळा येथील भुशी डॅममध्ये पाच जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. धरण परिसरातील धबधब्यावर पर्यटनासाठी गेले असताना तोल जाऊन ते धबधब्यात पडले आणि वाहून गेले अशी माहिती समोर येत आहे. हे सर्व जण एकाच कुटुंबातील असून यात 1 महिला आणि 4 मुलांचा समावेश आहे असे सांगितले जात आहे. शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यातील दोन मुलांचे मृतदेह सापडले असून तिघांचा शोध सुरू आहे. लोणावळा पोलिसांनी ही माहिती दिली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन

लोणावळा परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. भुशी डॅम सह या परिसरातील अनेक धबधबे वाहू लागले आहे. भुशी डॅम ओव्हर फ्लो झाल्याने पर्यटकांमध्ये आनंद होता, परंतु या घटनेमुळे आता पर्यटकांनी येथे येताना आणि वावरताना काळजी घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी येथे जात असतांना काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दोघांचे मृतदेह मिळाले, तिघांचे शोध सरू

भुशी धरण ओव्हरफ्लो झाले असून या ठिकाणी पर्यटक गर्दी करत आहे. धारणांच्या पायऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करत आहेत. अशातच पुण्यातील काही तरुण येथे पर्यटनासाठी आले होते. धरण परिसरात धबधब्याच्या प्रवाहात हे तरुण उतरले तेव्हा पाण्याचा प्रवाह जास्त होता. त्यामुळे ते धारण्याच्या बॅक वॉटरच्या पाण्यात बुडाले. दरम्यान तेथील पर्यटकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस आणि स्थानिक बचाव पथकांकडून शोध मोहीम राबवण्यात आली. यापैकी दोघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत, तर तिघांचा शोध अद्याप सुरू आहे.

2024-06-30T11:58:17Z dg43tfdfdgfd