MAHARASHTRA NEET COUNSELLING 2024: सुरू होत आहे महाराष्ट्र नीट काऊन्सिलिंग, ही कागदपत्रे तयार ठेवा

NEET Counselling 2024 Schedule: महाराष्ट्रातल्या NEET काऊन्सिलिंग २०२४ मधून राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा भरण्याचा उद्देश असेल. ज्यातील १०,१४५ जागा या MBBS पदवीसाठी तर ३,५४६ जागा BDS म्हणजेच दंतचिकित्सेच्या पदवीसाठी अशा एकूण १३,६९१ जागांसाठी काऊन्सिलिंग होईल.

महाराष्ट्र NEET काऊन्सिलिंग २०२४ हे ३ फेऱ्यांमध्ये होईल. मेरिट लिस्टच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. तरीही जागा शिल्लक असल्यास अखेर स्ट्रे वेकन्सी फेरी होईल.

तीन राउंड-NEET Counselling Maharashtra:राउंड 1: महाराष्ट्र NEET काऊन्सिलिंग २०२४- फेरी १: रजिस्टर करणे, कोर्ससाठीचे शुल्क भरणे, त्यासाठी लागणारी सगळी कागदपत्रे जमा करणे या सगळ्या पायऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांना पूर्ण करायच्या आहेत. या सगळ्या प्रक्रिया जुलै २०२४ मध्ये पूर्ण होतील आणि राज्यातली तात्पुरती मेरिट लिस्ट ऑगस्ट २०२४ मध्ये जाहीर केली जाईल.

राउंड 2: महाराष्ट्र NEET काऊन्सिलिंग २०२४- फेरी २: दुसऱ्या फेरीतील ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑगस्ट २०२४ मध्ये होईल. विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यानुसार यादी भरण्याची प्रक्रिया सुद्धा ऑगस्ट महिन्यातच पूर्ण होईल. पुढे तात्पुरती मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर त्यात लागलेल्या महाविद्यालयात भेट देण्यासाठी सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत दिली जाईल. इथे काऊन्सिलिंग ची दुसरी फेरी संपेल.

राउंड 3: महाराष्ट्र NEET काऊन्सिलिंग २०२४- फेरी ३: या फेरीतील ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू होईल. त्या पुढच्या प्रक्रियांमध्ये रजिस्ट्रेशन फी भरणे, मेरिट लिस्ट जाहीर होणे, प्राधान्यानुसार यादी भरणे, निवडीसंदर्भातील यादी जाहीर होणे या सगळ्या प्रक्रिया सप्टेंबर २०२४ या महिन्यात पूर्ण होतील. याच महिन्याच्या अखेरपर्यंत लिस्ट्स मध्ये लागलेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जावे लागेल.

स्ट्रे वेकन्सी काऊन्सिलिंग फेरी साधारणपणे सप्टेंबर २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या दरम्यान चालेल.

आवश्यक कागदपत्रे-Documents for NEET Maharashtra Counselling:

महाराष्ट्र NEET काऊन्सिलिंग २०२४ च्या व्हेरिफिकेशनसाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे-

  • NEET स्कोअरकार्ड २०२४
  • NEET ॲडमिट कार्ड २०२४
  • १०वी, १२वी चे पासिंग सर्टिफिकेट
  • इंटरमिजीएट मार्कशीट
  • डोमीसाईल सर्टिफिकेट
  • कॅरॅक्टर सर्टिफिकेट
  • ॲकनॉलेजमेंट स्लिप

महाराष्ट्र NEET काऊन्सिलिंग २०२४ बद्दल अधिक सविस्तर माहिती तुम्हाला www.mahacet.org या संकेतस्थळावर वाचता येईल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-03T08:56:26Z dg43tfdfdgfd