बातम्या

Trending:


tamhini ghat news : पाण्याशी मस्ती जिवावर बेतली! ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीच्या धबधब्यात उडी मारणाऱ्या तरुणाचा मृत्यू

Youth falls off in Tamhini Ghat waterfall : पुण्यातील ताम्हिणी घाटातील धबधब्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. दोन दिवसांनंतर त्याचा मृतदेह हाती लागला आहे.


Special Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्या

Beed Parli Firing : बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून रोज घडणाऱ्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेच्या पूर्णतः बोजवारा उडाला आहे का असा प्रश्न पडावा एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात एक ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हे प्रकरण पैशाच्या व्यवहारातून झाले असल्याचे पोलिस सांगत असले तरी याला राजकीय रंग असल्याची चर्चा आहे. वेळ रात्रीची सव्वा आठ वाजता, ठिकाण परळी शहरातील बँक कॉलनीमधील परिसर. फारशी रहदारी नसलेल्या या भागात लोक घरामध्ये असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज झाला आणि याच गोळीबारामध्ये एक जण जागीच कोसळला. त्यांचं नाव होतं बापू आंधळे (Bapu Andhale Beed) . परळी शहरापासून जवळ असलेल्या मरळवाडी या गावचे सरपंच. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काही दिवसापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बापू आंधळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.


Bhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर 'माझा'वर : ABP Majha

Bhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर 'माझा'वर : ABP Majha परिसरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेलं आहे. वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून अद्याप एकजण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्याला (Lonavala News) गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर दोघांचा शोध सुरू आहे. दरम्यान 10 जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले होते. त्यापैकी 5 जणांना पाण्याच्या प्रवाहातुन बाहेर पडण्यात यश आलं आहे. दरम्यान, बुडालेल्या 5 जणांपैकी 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर एक अद्याप बेपत्ता आहेत. उर्वरित शोधकार्य आज करण्यात येणार आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातल्या धबधब्यातून हे पाच जण वाहून गेले आहेत. हे सर्वजण अन्सारी कुटुंबातले आहेत. यात लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सुहास दिवसे घटनास्थळी पोहोचले आहेत. भुशी डॅमजवळ वाहून गेलेल्यांना वाचवण्यासाठी ज्यांनी बचावकार्य केलं, त्या शिवदुर्ग टीममधील गावडे यांनी सांगितलं की, "पाऊस जास्त झाल्यानंतर लोणावळ्याकडे पर्यटक येत असतात. असंच हे कुटुंब होतं. हे कुटुंब एका लग्नसमारंभासाठी आलं होतं. समारंभ पार पडल्यापासून ते भुशी डॅमजवळ असलेल्या धबधब्यावर आले. इथे साधारणतः दुपारी साडेबाराच्या सुमारास ते गेले होते. या ठिकाणी अचानक पाऊस वाढला. या ठिकाणी 15 मिनिटांसाठी जरी पाऊस पडला तरीदेखील धबधब्याचं पाणी मोठ्या प्रमाणावर वाढतं. या पाण्याचा या कुटुंबाला अंदाज आला नाही त्यामुळेच दुर्घटना घडली. हा धबधबा पुढे जाऊन भुशी डॅमला मिळतो. आम्हाला आतापर्यंत सापडलेले मृतदेह सर्व भुशी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये सापडले आहेत. आणि इतर दोघांचा शोध सुरू आहे."


चिपळूणमध्ये मगरीचा रस्त्यावर मुक्तसंचार

Chiplun crocodile moving freely on road


Bansuri Swaraj Taking Oath | संस्कृतमधून शपथ, सुषमा स्वराज यांच्या मुलीनं नाव काढलं

आज २४ जून संसदेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला.भाजपच्या नवनिर्वाचित खासदार बांसुरी स्वराज यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली.बांसुरी स्वराज या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.


ABP Majha 06 PM Headlines ABP Majha 01 July 2024 Marathi News ABP Majha

ABP Majha 06 PM Headlines ABP Majha 01 July 2024 Marathi News ABP Majha राहुल गांधींनी संसदेत हिंदुत्वावरून केलेल्या टीकेचे विधान परिषदेत पडसाद, भाजपच्या प्रसाद लाड यांनी हात दाखवल्याचा तर ठाकरेंच्या अंबादास दानवेंनी शिवी हासडल्याचा आरोप देवतांचा डरो मतचा संशय मात्र स्वतःला हिंदू म्हणवणारे हिंसा पसरवतात, विरोधी पक्षनेते पदावरून राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल, तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधिमंडळात पाठच्या दारानं एन्ट्री, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेककरांनाही उमेदवारी मुंबईत पदवीधरमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे जवळपास निश्चित, कार्यकर्त्यांचा जल्लोष नाशिक शिक्षक मतदारसंघात पहिल्या पसंतीमध्ये दराडे, गुळवे आणि कोल्हेंमध्ये काटे की टक्कर, समर्थकांची जोरदार घोषणाबाजी नागपुरातील दीक्षाभूमीच्या विकास आराखड्याला स्थगिती... फडणवीसांची सभागृहात घोषणा ... अनुयायांच्या आक्रमक पवित्र्यानंतर निर्णय पेपरफुटीविरोधातला कायदा याच अधिवेशनात आणणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा, गट क च्या नियुक्त्याही एमपीएससीद्वारे करणार,


अपूर्वा नेमळेकरची लगीन सराई!

अपूर्वा नेमळेकरची लगीन सराई!


आयुष्मान (कसे) भव?

​​‘आयुष्मान सार्वजनिक आरोग्य केंद्रां’चे नामांतर ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ असे केंद्राने केल्यानंतर त्यास काही राज्यांनी आक्षेप घेतलेला आहे.


Pandharpur | शिल्पांनी सजली पंढरी, वारकऱ्यांची शिल्प स्वागतासाठी सज्ज

Pandharpur Ground Report Statues Installed At Various Places Ahead Of Ashadi Ekadashi


पुणे कार अपघाता प्रकरणी मोठी अपडेट

pune police to meve supreme court against juvenile case of porsche car accident


Dengue outbreak: अनेक देशांमध्ये डेंग्युचा हाहाकार, भारतातही सतर्कतेचा इशारा

Dengue outbreak:डेंग्यु या प्राणघातक आजाराने अनेक देशांमध्ये विक्रमी पातळी गाठली असून, भारतातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या तज्ज्ञांनी सांगितले की डेंग्यूमुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.


Shivneri Bus : पुणेकरांसाठी खुशखबर! अटल सेतूवरुन स्वारगेट ते मंत्रालय 'शिवनेरी' सुसाट...

Swargate to mumbai Shivneri Bus : मुंबई पुणे प्रवास आणखी जलद होण्यासाठी एसटी परिवहन मंडळाने अटल सेतू महामार्गावरुन शिवनेरी बस सुरु केली आहे, अल्पवधीतच बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. अवघ्या साडे तीन तासांत मुंबई पुणे प्रवास शक्य होतोय.


Kelavali Waterfall: केळवली धबधब्यात पोहताना युवक बुडाला

Kelavali Waterfall: मित्रांसोबत धबधब्यात पोहण्यासाठी गेलेला एक 22 वर्षीय तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. रविवारी साताऱ्यात ही दुर्दैवी घटना घडली ऋषिकेश रमेश कांबळे (रा. सैदापूर, ता. कराड) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. धबधब्याच्या मुख्य प्रवाहात आल्याने तरुण वाहून गेले आहे. या घटनेप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.


‘सहमती’वर सहमती

मणिपूर हिंसाचारापासून सध्या गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटीपर्यंत अनेक प्रकरणांत पंतप्रधान मौन बाळगून असल्याकडे खर्गे यांनी बोट दाखविले आहे. मात्र, पंतप्रधानांप्रमाणे त्यांनीही ‘सर्वसहमती’चा मुद्दा उचलून धरला आहे.


Ordnance Factory Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी उत्तम संधी; महिन्याला २०-२५ हजारांपर्यंत पगार

Ordnance Factory Bhandara Recruitment 2024: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भंडारा आयुध निर्माणी (महाराष्ट्र) ने १५८ डॅनियल बिल्डिंग वर्कर (DBW) पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे.


Vidhan Parishad Election Result : मुंबई पदवीधरमध्ये ठाकरेंचीच गर्जना! अनिल परब यांचा 26 हजार मतांनी विजय

Vidhan Parishad Nivadnuk Nikal : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी मतदान पार पडलं होतं. त्यानंतर आज निकाल जाहीर होत आहे.मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटाने आपले वर्चवस्व सिद्ध केले आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाचे अनिल परब हे विजयी झाले आहेत, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाचेच ज. मो. अभ्यंकर यांनी विजय मिळवला आहे.


भाषण विरोधी पक्ष नेत्याचं, कॅमेराचा फोकस अध्यक्षांवर, राहुल गांधींनी विषयच मिटवला

राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला संबोधित करत भाषण केलं. विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींचं हे पहिलंच भाषण होतं. राहुल गांधींनी गुजरातला येऊन तुम्हाला यावेळी हरवणार असं म्हणत अमित शाहांना समोरासमोरच चॅलेंज दिलं आहे, अग्निवीरला जवानाला नरेंद्र मोदी शहीद मानत नाहीत राहुल गांधी म्हणाले. भाषण विरोधी पक्ष नेत्याचं चालू असूनही कॅमेराचा फोकस अध्यक्षांवर का केला असं म्हणत राहुल गांधींनी जागेवरच सुनावलं . भाजप, नरेंद्र मोदी म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही, मोदींच्या समोरासमोर राहुल गांधींचं अख्ख्या कॅबिनेटला घाम फोडणारं संपूर्ण भाषण पहा ..


LPG Price : खुशखबर! 1 जुलैपासून LPG Cylinder झाले स्वस्त, चेक करा दर

मुंबई : दर महिन्याच्या सुरुवातील गॅस सिलिंडरच्या दरात बदल होत असतात. 1 जुलै रोजी वाढत्या महागाईत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर जुलै महिन्यात तरी स्वस्त झाले असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे दिलासा मिळणार आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 30 रुपयांनी कपात केली आहे. 19 किलोग्रॅमच्या कर्मशियल गॅस सिलिंडर ३०-३१ रुपयांनी स्वस्त झाला आहे.1 जुलैपासून हा बदल करण्यात आला आहे. याचा फायदा...


Angarki Sankashti Chaturthi: मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरातील वाहतुकीत बदल; 'हे' रस्ते बंद!

Mumbai Traffic Police Advisory: अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त आज सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.


‘१५ मिनिटवाली’ शहरे

15-Minute Cities: घराजवळ नोकरी किंवा नोकरीच्या ठिकाणाजवळ भाड्याने घर हा दृष्टिकोन रुजत आहे. त्यामुळे उद्या ‘पंधरा मिनिटांची शहरे’ निश्चितच उभी राहतील.


Devendra Fadnavis : पंकजा मुंडेंना विधानपरिषदेत उमेदवारी मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Devendra Fadnavis Pankaja Munde : पंकजा मुंडेंना विधानपरिषदेत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या उमेदवारीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.