बातम्या

Trending:


Water Level In Dams: धरणक्षेत्रांत थेंबे थेंबेच... पाणीसाठ्यात अवघी दीड टक्का वाढ; कोणत्या धरणात किती पाणी?

Mumbai Dams Water Level: जुलै महिन्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबईत लागू करण्यात आलेली दहा टक्के पाणीकपात महापालिका मागे घेऊ शकते.


Password Safety: 17 टक्के भारतीय नागरिक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत बेफिकीर; सर्वेक्षणातून आले समोर

Password Safety negligence : 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षितपणे पासवर्ड जतन करतात, सर्वेक्षणात धक्कादायक सत्य उघड झाले: भारतीय लोक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत निष्काळजी वृत्ती बाळगतात. लोकांना त्यांच्या फोनमध्ये पासवर्ड सेव्ह करण्याची किंवा नोटपॅडवर लिहून ठेवण्याची सवय असते. अशा निष्काळजीपणामुळे डेटा चोरीचा धोका वाढतो. एका सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षित पद्धतीने पासवर्ड सेव्ह करतात.


IRCTC Ticket Booking: वेगळे आडनाव असलेल्या नातेवाईकांचे रेल्वे तिकीट बुक करणे अवैध? IRCTC ने दिले स्पष्टीकरण

IRCTC Clarification On Online Ticket Booking: सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या बातम्यांमध्ये असा दावा केला जात होता की, जर प्रवाशांची आडनाव वेगळी असेल तर त्यांना एकत्र तिकीट मिळणार नाही असे सांगितले जात होते. यावरून प्रवाशांमध्ये बराच गोंधळ झाला होता. तिकिट बुकिंग करण्याबाबत प्रवाशांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत होते. परंतु आता यावर आयआरसीटीसीने पुढे येऊन स्पष्टीकरण दिले आहे.


Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial Report

नागपुरात झालेल्या आंदोलनाबाबत आता एक नवी माहिती समोर आलीय. या आंदोलनात नागपूरच्या बाहेरच्यांचा काही सहभागी होता का असा संशय उत्पन्न झालाय. स्मारक समितीने सुरू केलेल्या सौदर्यकरण प्रकल्पाला अचानक विरोध कसा काय सुरू झाला, इथपासून कालच्या आंदोलनापर्यंत अनेक प्रश्न निर्माण होतात. या संदर्भात एबीपी माझाने थेट स्मारक समिती विश्वस्तांशी चर्चा केली... त्यातून कोणती माहिती समोर आलीय. पाहूया हा रिपोर्ट देशातलंच नाही तर जगातलं एक महत्त्वाचं श्रद्धास्थान... या ऐतिहासिक भूमीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचारांचा अंकूर पेरला, त्याचा आता जगभरात वटवृक्ष झालाय. मात्र इथल्या सौंदर्यीकरण प्रकल्पातील अंडरग्राऊंड कामाला विरोध करत १ जुलैला आंदोलन पेटलं. अंडरग्राऊंड सुरु असलेल्या विरोधाची कारणं जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने स्मारक समितीच्या विश्वस्तांशी चर्चा केली. त्यांनी दिलेली माहितीही या प्रकरणात जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल.


अन्नपूर्णांचा आधार -प्रेमाताई पुरव

Prematai Purav : प्रेमाताई मूळच्या गोव्याच्या. लहानपणीच त्या गोवा मुक्ती संग्रामात उतरल्या. बंदुक चालवणे, बॉम्ब तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवणे, दारूगोळा लपवणे अशा क्रांतिकारी कामांत त्यांचा सहभाग असे.


Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray : चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं स्वागत : ABP Majha

Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray : चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं स्वागत : ABP Majha मुंबई: महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन म्हणून पाहिल्या जाणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून मुंबईत सुरुवात झाली. कालच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापल्या पत्रकारपरिषदांमध्ये परस्परांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कटूता पाहायला मिळेल, असा अंदाज होता. मात्र, आज सकाळी...


Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठक

मुंबई: हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली आहे. या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील राजकीय समीकरणं बदलणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे संतोष बांगर यांची भेट झाल्यानंतर हिंगोलीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. अधिवेशनाच्या कालावधीत ही भेट झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्या दरम्यान संतोष बांगर आणि त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्या गेल्या. पण आता हे दोन्ही नेते अब्दुल सत्तारांच्या घरी भेटले आणि ही भेट गुप्त होती. त्यामुळेच ही भेट हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणं बदलवणारी ठरण्याची शक्यता आहे.


Mumbai Central Public Park : न्यूयॉर्क, लंडनसारखं आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ लवकरच मुंबईत

Mumbai Central Public Park On 300 Acres : मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क विकसित होणार आहे. ३०० एकरवर हे उभारण्यात येणार असून यासाठी प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे.


9 Second News : 9 सेकंदात बातमी राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha

9 Second News : 9 सेकंदात बातमी राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha देवगिरी निवासस्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची रात्री बैठक संपन्न... नवाब मलिकही बैठकीला उपस्थित..मलिकांना महायुतीत घेण्यास याआधी फडणवीसांनी केला होता विरोध उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक अटळ,शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात अंबादास दानवेंच्या शिवीगाळीबाबत उद्धव ठाकरेंनी मागितली माफी...तर अंबादास दानवेंचं निलंबन एक षडयंत्र, ठाकरेंचा हल्लाबोल तुम्ही नकली वाघांसोबत आहात इथे असली वाघांमध्ये या...वाघनखं कधी आणणार या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जयंत पाटलांना टोला... लाडकी बहीण योजनेत दोन बदल... वयाच्या मर्यादेत ६५ वर्षांपर्यंत वाढ, तर पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार.. तर अर्ज भरण्यासाठी ⁠३१ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ.. उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये भोलेबाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, ११६ भाविकांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त


Vidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय...या निवडणुकीचं चित्र आज स्पष्ट झालं...महायुती आणि महाविकास आघाडीला अधिकची एक जागा निवडून आणायची आहे...त्यामुळे निवडणुकीत क्रॉस वोटिंग किंवा घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय...पाहुया एक स्पेशल रिपोर्ट... विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आता चुरशीची निवडणूक होणार हे नक्की झालंय... निवडणूक बिनविरोध होईल अशी अटकळ असतानाच बारावा उमेदवार रिंगणात उतरल्यानं निवडणूक निश्चित झालीय... भाजपकडून - १. पंकजा मुंडे २. योगेश टिळेकर ३.डॉ. परिणय फुके ४. सदाभाऊ खोत ५. अमित गोरखे यांना उमेदवारी देण्यात आलीय... शिंदेंच्या शिवसेनेकडून १. भावना गवळी २. कृपाल तुमाणे तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून १. राजेश विटेकर २. शिवाजीराव गर्जे असे महायुतीकडून ९ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत... महाविकास आघाडीत काँग्रेसकडून प्रज्ञा सातवांना तिकीट देण्यात आलंय... राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं शेकापच्या जंयत पाटलांना पाठिंबा दिलाय... तर ठाकरेंच्या शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना रिंगणात उतरवलंय..


Nanded | एसटी बस वाहक आणि प्रवाशात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

ST Driver and Passanger Rada in Nanded


मोदी-शहांचे विश्वासू

सन १९८९मध्ये ते परिषदेचे ‘राष्ट्रीय महामंत्री’ झाले आणि पुढील दोन वर्षांतच भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. याच काळात हिमाचल प्रदेशातील विलासपूर मतदारसंघातून ते विधानसभेत पोहोचले. प्रारंभी विरोधी पक्षनेता आणि पुढील निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळातील मंत्री अशी त्यांची वाटचाल झाली.


Weather update : महाराष्ट्रावर धडकणार मोठं संकट; पुढील 2 दिवस महत्त्वाचे

महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD)देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात आज पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सोबतच वादळी वाऱ्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. विदर्भात समाधानकारक पाऊस झाला नव्हता मात्र गेले दोन दिवस पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान पुढील 24 तासांमध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकणाबाबत बोलायचं झाल्यास पुढील 24 तासांमध्ये कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ढगाळ वातावरण राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. मुंबईत पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या काळात मुंबईचं तापमान 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान या काळात नुसता पाऊसच पडणार नसून, वादळाच्या रुपानं मोठं संकट देखील समोर आहे. या काळात ताशी 50 ते 60 किमी वेगानं वारं वाहू शकतं असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून आज पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.


Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दर

Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दर हेही वाचा : देवगिरी निवासस्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची रात्री बैठक संपन्न... नवाब मलिकही बैठकीला उपस्थित..मलिकांना महायुतीत घेण्यास याआधी फडणवीसांनी केला होता विरोध उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक अटळ,शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात अंबादास दानवेंच्या शिवीगाळीबाबत उद्धव ठाकरेंनी मागितली माफी...तर अंबादास दानवेंचं निलंबन एक षडयंत्र, ठाकरेंचा हल्लाबोल तुम्ही नकली वाघांसोबत आहात इथे असली वाघांमध्ये या...वाघनखं कधी आणणार या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जयंत पाटलांना टोला... लाडकी बहीण योजनेत दोन बदल... वयाच्या मर्यादेत ६५ वर्षांपर्यंत वाढ, तर पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार.. तर अर्ज भरण्यासाठी ⁠३१ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ.. उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये भोलेबाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, ११६ भाविकांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त


SSC Recruitment 2024: सरकारी नोकरीची संधी, कर्मचारी निवड आयोगात ८ हजारांपेक्षा अधिक जागांसाठी भरती

Staff Selection Commission Recruitment: कर्मचारी निवड आयोगात एकूण ८ हजार ३२६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसंदर्भात आवश्यक माहिती जाणून घेऊयात.


BSF Constables Missing: बीएसएफच्या दोन महिला कॉन्स्टेबल गायब, लास्ट लोकेशन परराज्यात, आईला वेगळाच संशय

Women Mysteriously Missing From BSF Academy: बीएसएफच्या दोन महिला कॉन्स्टेबल अचानक गायब झाल्याने खळबळ माजली आहे. त्या गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता आहेत. तर या प्रकरणी एका महिलेल्या आईने मोठी भीती व्यक्त केली आहे.


Maharashtra Superfast : तुमच्या जिल्ह्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 03 July 2024

मराठा आरक्षण सुनावणी, राज्य मागासवर्ग आयोगाला हायकोर्टाची नोटीस, १० जुलैच्या सुनावणीत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, आयोगाला प्रतिवादी करण्यास विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांची माघार. ६ जुलैला मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये महायुतीचा मेळावा, मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता. दूध उत्पादकांना प्रति लिटर ३० रुपये शिवाय पाच रुपये अनुदान असे ३५ रुपये शेतकऱ्यांना मिळणार, तर दूध भुकटी निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना किलोमागे ३० रुपये देणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा. दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार, कोणतेही शुल्क न घेता विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करुन देण्याचे शाळांना आदेश. दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या कामाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, आरपीआयच्या सचिन खरात यांची मागणी. एबीपी माझाच्या बातमीचा दणका. महिलांकडून पैसे उकळणाऱ्या निलंबित तलाठी तुळशीराम कंठाळेविरोधात गुन्हा दाखल. वरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. एबीपी माझानं सर्वात आधी दाखवली होती बातमी. छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण कार्यालयात उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली, महाज्योती फेलोशिप मिळावी या मागणीसाठी गेल्या ३ दिवसांपासून विद्यार्थ्यांचं उपोषण सुरु. बीडच्या केकत सारणी गावात चार तरुणांचं शोले स्टाईल आमरण उपोषण, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची तरुणांची मागणी. अंबादास दानवे यांच्या निलंबनाविरोधात ठाकरे गट आक्रमक. छत्रपती संभाजीनगरात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा केला निषेध. अंबादास दानवे यांच्या समर्थनार्थ लावले बॅनर.


Raj Thackeray: आयुष्यात कुणाला घाबरता? राज ठाकरेंचं उत्तर ऐकून सगळेच भारावले

मुंबई: तडाखेबाज भाषण आणि बेधडक निर्णय शैलीमुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. विरोधकांना किंवा सरकारच्या निर्णयावर घेऊन ठाकरी शैलीत फटकेबाजी करणारे राज ठाकरे आयुष्यात खरंच कुणाला घाबरतात का, असा सवाल थेट एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दिलेलं उत्तर ऐकून सगळेच भारावून गेले आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी...


MLA Fund : निधीवाटपावरुन जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप, भाजपकडून सभागृहात गदारोळ

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या निधीवाटपावरुन महायुती सरकारवर गंभीर आरोप, मला आमदार निधी मिळला नाही अशी खंत आव्हाडांनी सभागृहात बोलून दाखवली.


Mhada 2000 Housing Lottery । म्हाडाच्या 2000 घराची लॉटरी; घरे कुठे आणि किती असणार किंमती?

Mhada 2000 Housing Lottery. Mhada's 2000 House Lottery; Where and how much will the prices be?


Bharat Ratna to Shahu Maharaj: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न; राज्य सरकारमधील मंत्र्यांचे मोठे वक्तव्य

Shahu Maharaj: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने हसन मुश्रीफ यांनी महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी सरकारकडे विनंती करणार असल्याचे सांगितले.


असांज आता काय करणार?

Julian Assange :'हॅकिंग विश्वाचा रॉबिनहूड' अशी ओळख असणारे ज्युलियन असांज यांची नुकतीच सुटका झाली. या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा हा आढावा...


Arvind Kejriwal | मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवालांच्या अडचणीत वाढ

CBI Arrest Delhi CM Arvind Kejriwal