Trending:


Suspicious Death In Dhule : एकाच कुटूंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू

प्रवीण गिरासे (५२), पत्नी दीपांजली गिरासे (४७), मुलगे सोहम गिरासे (१८) आणि गितेश गिरासे (१४) अशी मृतांची नावे आहेत.


Tirupati Balaji : तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर झाला, चंद्राबाबू नायडूंचा धक्कादायक आरोप

Chandrababu Naidu On Tirupati Balaji Prasad Laddoos : जगन रेड्डी सरकारच्या काळात तिरुपती बालाजी मंदिरात दिल्या जाणाऱ्या प्रसादाच्या लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर होत होता, असा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.


Nitesh Rane vs NCP Special Report : Ajit Pawar यांच्या तंबीला चॅलेंजने उत्तर,राणे - पवार प्रकरण काय?

मुंबई : वाचाळवीरांनी थोडीशी मर्यादा पाळावी, कुठेही वेडंवाकडं विधानं करून मुख्यमंत्री वा घटकपक्षांना अडचणीत आणू नये असं सांगत अजित पवारांनी वाचाळविरांना दम दिल्यानंतर आता महायुतीतून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. अजितदादांनी भाजपमधील वाचाळविरांची तक्रार दिल्लीतील वरिष्ठांकडे केल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली. तर अजितदादांना कुठे तक्रार करायची ते करू द्या अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली. मुस्लिमांविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंसारख्या भाजपच्या नेत्यांविरोधात अजितदादांच्या राष्ट्रवादीनं अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे. महायुतीत असूनही धर्मनिरपेक्ष राजकारण करणाऱ्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत याबद्दल तीव्र नाराजी असल्याचं समजतंय. पण नितेश राणेंनी मात्र यावरून अजितदादांनाच चॅलेंज दिलंय. अजितदादांना कुठे तक्रार करायची ते करू द्या, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असं आमदार नितेश राणे म्हणाले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र नितेश राणेंची पाठराखण केल्याचं दिसतंय.


Crime News : एकतर्फी प्रेमातून विवाहितेला संपवले

एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. गौरी लणेश आरे (वय 25, रा. कळस माळवाडी, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. गौरी यांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी (दि. 18) सकाळी साडेसात वाजता उपचारांदरम्यान गौरी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी विश्रांतवाडी प...


Amit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चा

Amit Thackeray: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) या निवडणुकीत 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी 7 उमेदवारांची घोषणा केली आहे. आता राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी हे कामाला लागलेले आहेत.यामध्येच सोमवारी मनसे नेते आणि सरचिटणीस यांची मुंबईतील राजगड कार्यालय येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मनसे नेत्यांनी अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पूत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आपल्याला लोकांसाठी जर काही करायचं असेल तर स्वतः संसदीय राजकारणात यायला हवं असं मनसे नेते आणि सरचिटणीस यांना सांगत मी देखील विधानसभेसाठी तयार आहे अशी तयारी दर्शवली. त्यामुळे आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात येणार या चर्चांना आणि त्यांनी यावं यासाठी कार्यकर्त्यांकडून मागणी होऊ लागलीये.


Mumbai Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पहिली झलक, ताशी 350 किमी वेगाने स्वप्ननगरीकडे धावणार

Mumbai Ahmedabad Bullet Train: भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या ड्रीम रूटवर धावणार आहे. या मार्गावर वेगाने काम सुरू आहे. ही ट्रेन बुलेट ट्रेन ताशी 320 किमी वेगाने धावणार आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकूण लांबी 508 किलोमीटर असून प्रकल्पाची एकूण किंमत 1.08 लाख कोटी रुपये आहे.


Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 19 Sept 2024

राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करणाऱ्या संजय गायकवाड यांचे अजित पवारांनी टोचले कान, बुलढाण्यातील लाडकी बहीण योजनेच्या सोहळ्यात गायकवाड यांचं नाव न घेता मर्यादा पाळण्याचा सल्ला मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजितदादांची तीव्र नाराजी, भाजप हायकमांडकडे तक्रार करणार विधानसभेच्या १६० जागांसाठी भाजप आग्रही, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती, २ ऑक्टोबरनंतर पहिल्या ५० उमेदवारांच्या यादीचं टार्गेट मंत्रिपदासाठी सूट शिवून तयार असणाऱ्या भरत गोगावलेंची महामंडळावर बोळवण, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची चर्चा, आदित्य ठाकरेंकडून खिल्ली मनसेच्या वरळी व्हिजनचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण देणार, मनसेच्या संदीप देशपांडेंची माहिती, काका-पुतण्यामधल्या राजकारणाची मुंबईभर चर्चा राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, मुंबईत राहुल नार्वेकरांच्या घराबाहेर वर्षा गायकवाड यांची निदर्शनं झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांनी वर्षा गायकवाडांचे पोस्टर्स फाडले, काँग्रेसचा आरोप...तर अनेक काँग्रेस नेते झिशान सिद्दीकींवर बसरले काँग्रेसच्या भूमिकेमुळे पाकिस्तान खूश, नरेंद्र मोदींचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... काँग्रेस आणि पाकिस्तानचा अजेंडा एकच, अमित शाह यांचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी सह-आरोपी चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला, गुन्ह्याचा तांत्रिक तपास करायचा आहे हा पोलिसांचा युक्तिवाद कोर्टानं स्वीकारला बदलापूरमधील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणी ५०० हून अधिक पत्रांचं आरोपपत्र दाखल, सुनावणी कधी सुरू होते त्याकडे लक्ष गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरूपदावरून हटवण्याच्या निर्णयाविरोधात डॉ. अजित रानडेंची हायकोेर्टात याचिका, २३ सप्टेंबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी करू नका, हायकोर्टाचे अंतरिम आदेश भंडाऱ्यातील एसटी ट्रान्सपोर्ट बँकेच्या सभेत राडा.. सदावर्तेंनी बँकेतील पैसे घरी नेल्याचा विरोधकांचा आरोप तर विरोधकांच्या हातून बँक गेल्याने आरोप सुरु असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा.


Fish market | मच्छी मार्केटमध्ये खवय्यांची तुफान गर्दी !

मच्छी मार्केटमध्ये खवय्यांची तुफान गर्दी !


Zero Hour Jammu Kashmir : जम्मू - काश्मीरमध्ये 370 वरुन घमासान, मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल!

Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी दोन ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. बारामुल्लामध्ये तीन दहशतवादी ठार झाले आहेत. काल किश्तवाडमध्ये दोन जवान शहीद झाले होते. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. दोन्ही ठिकाणी लष्कर आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेरी येथील चक टापर भागात शुक्रवारी (13 सप्टेंबर) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही चकमक सुरू झाली. रात्री उशिरा ही कारवाई थांबवण्यात आली. आज सकाळी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. किश्तवाडच्या चत्रू पट्ट्यातील नैदघम गावात शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास चकमक सुरू झाली. जैश-ए-मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांच्या उपस्थितीची गुप्त माहिती लष्कराला मिळाली होती. शोध मोहिमेदरम्यान चकमक सुरू झाली. नायब सुभेदार विपिन कुमार आणि कॉन्स्टेबल अरविंद सिंग अशी शहीद जवानांची नावे आहेत. कठुआमध्ये दोन दहशतवादी ठार, शस्त्रे जप्त याआधी कठुआच्या खंडारामध्येही लष्कराचे ऑपरेशन झाले होते. येथे रायझिंग स्टार कॉर्प्सच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराने एक्सवरील पोस्टद्वारे ही माहिती दिली. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.11 सप्टेंबर रोजी उधमपूरमध्ये सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. लष्कराने सांगितले की, लष्कराच्या फर्स्ट पॅरा सैनिकांना उधमपूरच्या खांद्रा टॉपच्या जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. सुमारे चार तास चाललेल्या चकमकीत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.


One Nation One Election: 'मोदी दर्शनाला गेले आणि गणपती पावला केजरीवालांना..', उल्हास बापट असं का म्हणाले?

Ulhas Bapat on PM Modi: 'वन नेशन वन इलेक्शन' या विषयावर बोलताना घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपती दर्शनासाठी दिलेल्या भेटीचा दाखला देत मार्मिक टिप्पणी केली आहे.


केजरीवाल यांची खेळी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या रविवारी आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करून राजकीय वादळ निर्माण केले होते. मुख्यमंत्रिपद दोन दिवसांत सोडण्याचा निर्धारही व्यक्त करताना त्यानुसार ते पदावरून पायउतारही झाले. दिल्ली विधानसभेची मुदत फेब—ुवारी 2025 मध्ये संपत असली, ...


Aaj Che Havaman (आजचे हवामान): राज्यात आज 'या' जिल्ह्यांत मुसळधार! IMD कडून यलो अलर्ट

Maharashtra Weather Update: राज्याच्या दृष्टीने पुढचे दोन-तीन दिवस पावसाचे असणार आहे. त्यानुसार, आज कोकणात व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढच्या तीन दिवसाचा अंदाज घेत भारतीय हवामान विभागातर्फे काही भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


Maharashtra Breaking News LIVE: पंतप्रधान मोदींच्या विदर्भ दौऱ्यानंतर अमित शाहांचा मराठवाडा दौरा

विधानसभा निवडणुकींच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणुकी दरम्यान तिघांचा आकस्मित मृत्यू झालाय. पुण्यात विसर्जनाच्या दिवशी मेट्रोने प्रवास करण्याची संख्या अधिक होती ..तब्बल साडेतीन लाख प्रवाशांनी प्रवास केला.राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.


EPF One Lac : ईपीएफमधून काढता येणार 1 लाख रुपये, मर्यादा वाढवली

EPF One Lac : ईपीएफमधून काढता येणार 1 लाख रुपये, मर्यादा वाढवली कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांना कर्मचारी भविष्य निधीतून (ईपीएफ) मधून वैयक्तिक आर्थिक गरज भागविण्यासाठी एकावेळी पैसे काढण्याची मर्यादा ५० हजार रुपयांवरून १ लाख करण्याचा निर्णय केंद्रीय श्रम मंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, ईपीएफओच्या परिचालनासाठी अनेक नियमांत बदल करण्यात आले आहेत. ईपीएफओचे डिजिटल आर्किटेक्चर नूतनीकृत करण्यात आले आहे. सदस्यांना गैरसोय सोसावी लागू नये, यासाठी नियम अधिक लवचिक व प्रतिसादक्षम करण्यात आले आहे. विद्यमान नोकरीत ६ महिने पूर्ण न करणाऱ्या नवीन सदस्यांनाही आता ईपीएफमधून पैसे काढता येतील. आधी त्यांना ही परवानगी नव्हती.


भारत-बांगला आमनेसामने

​भारत-बांगला आमनेसामने​


मूठभर कन्नडिगांची कोल्हेकुई

बेळगाव : गणेशोत्सवात शहरात मराठी भाषेतून शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. ते तत्काळ हटवून फलक लावणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच महापालिकेच्या गणेश मंडपावरील मराठी फलक हटवावा, अशी कोल्हेकुई करत मूठभर कन्नडिगांनी गुरुवारी (दि. 19) महापालिका प्रशासनाला वेठीस धरले. त्यांनी मंडपावरील फलक फाडून कंडू शमवून घेतला. गणेशोत्सव काळात शहरात मराठी भाषेतून फ...


MVA Chief Minister Special Report : मुख्यमंत्रि‍पदाचा वादा, कोण होणार मविआचा दादा?

MVA Chief Minister Special Report : मुख्यमंत्रि‍पदाचा वादा, कोण होणार मविआचा दादा? 100 टक्के काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, बाळासाहेब थोरातांकडून कार्यकर्त्यांसमोर विश्वास व्यक्त, तर ठाकरे मुख्यमंत्री बनणं ही तेव्हाची गरज होती, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य... मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी थोडी माघार घेतल्याचं चित्र असतानाच, आता १०० टक्के काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार, असा विश्वास व्यक्त केलाय... आणि त्यामुळेच महाविकास आघाडीत आता वादाची चिन्ह निर्माण झालीयत... पण तरीही हा वाद शरद पवार यांची संख्याबळाची भूमिका मिटवेल का? हा खरा प्रश्नय... पाहूयात... संगमनेर : आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) 125 जागांवर सहमती झाली असून राहिलेले जागावाटप देखील लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केलाय. गणेशोत्सवानंतर (Ganeshotsav 2024) चर्चा करून सर्वांच्या सहमतीने जागावाटप पूर्ण होईल. एमआयएमबाबत (MIM) प्रस्ताव आल्याची मला माहिती नाही. मात्र, जे काही निर्णय होतील ते उच्च पातळीवर होतील असं थोरात यांनी स्पष्ट केलंय. तर विधानसभा निवडणुकीत 180 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर नवल वाटू देऊ नका, असेही वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, आमच्या दोन-तीन बैठका आत्तापर्यंत झाल्या आहेत. या बैठकीमध्ये 125 जागांवर सहमती असल्यास दिसून आलंय. इतर जागांवर लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाईल. एमआयएमबाबत कोणता प्रस्ताव दिलाय याची मला माहिती नाही. मात्र असं काही असेल तर त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल. आमचे जागा वाटप लवकरच पूर्ण होईल आणि राज्यात महाविकास आघाडी 180 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर नवल वाटू देऊ नका, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.


Jai Malokar Akola Case : जय मालोकर याच्या मृत्यूआधीचं CCTV फुटेज माझाच्या हाती! EXCLUSIVE

अकोला: अकोला जिल्ह्यात मनसे कार्यकर्ता जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं झाल्याचं या अहवालात उघड झालं आहे. 30 जुलैला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृह येथे मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. यानंतर गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तर मृत्यूच्या आधी जय नेमका कोणासोबत होता, त्याला कुठे-कुठे नेण्यात आले सर्वांचे कॉल डिटेल्स चेक करा आणि न्याय त्याला द्या, असंही त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, मी आताच ही बातमी ऐकली की अकोल्या जिल्ह्यात एका मनसेच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. आधी असे दाखविण्यात आले होते की, हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पण, आता शवविच्छेदन अहवालामध्ये वेगळं समोर आलं आहे. त्यांच्या कुटुंबाकडून आता सुरक्षेची मागणी केली आहे, त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात यावी. मनसे कार्यकर्ता जय मालोकारच्या कुटुंबाच्या समोर सत्य आले पाहिजे.या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी त्यांच्या कुटुंबांना सुरक्षा द्यावी असंही अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटलं आहे.


Sharad Pawar | शरद पवार सोमवारी चिपळुणात येणार

चिपळूण शहर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे येत्या सोमवारी (दि. २३) चिपळूण दौऱ्यावर येणार असून, यावेळी बहादूरशेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकानजीकच्या न.प.च्या स्वा. सावरकर मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. पाच वर्षांनंतर शरद पवार प्रथमच चिपळूण दौऱ्यावर येत असून, यावेळी ते समाजातील सर्व घटकांशी संवाद साधणा...


ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

100 टक्के काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, बाळासाहेब थोरातांकडून कार्यकर्त्यांसमोर विश्वास व्यक्त, तर ठाकरे मुख्यमंत्री बनणं ही तेव्हाची गरज होती, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य... राज्यातील १५ ते २० जागांवरुन उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षात पेच..जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी मातोश्रीवर बैठक... भाजपा १६०जागांसाठी आग्रही राहणार, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून १२६ ते १२८ जागांसाठी तयारी, अजितदादांची ७० जागांसाठी डिमान्ड मनसेच्या व्हिजन वरळीचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण देणार, मनसेच्या संदीप देशपांडेंची माहिती, काका-पुतण्यामधल्या राजकारणाची मुंबईभर चर्चा दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडकोच्या घरांची लॉटरी निघणार... . वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर, नेरूळ रेल्वे स्थानकाशेजारी ४० हजार घरांसाठी लॉटरी ज्येष्ठ नागरिकांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा,ज्येष्ठांना मालडब्यातून प्रवासाची मुभा, लोकलमध्ये स्वतंत्र डबा देण्याचे आदेश अश्विन-जडेजाच्या झुंजार भागीदारीने चेन्नई कसोटीत भारताला सावरलं, बांगलादेशविरुद्ध सहा बाद १४४ वरुन सहा बाद ३३९ पर्यंत मजल, अश्विनचं नाबाद शतक, जडेजाचीही शतकाकडे कूच


Aadhaar Card : आधार कार्ड क्रमांक 12 अंकी का असतो? तुम्हाला माहिती आहे का या मागील कारण, जाणून घ्या

Aadhaar Card : आधार कार्ड हा ओळखीचा पुरावा म्हणून वापरला जातो. आधार कार्डशी अनेक गोष्टी संलग्न करण्यात आल्यानं त्याचं महत्त्व वाढलेलं आहे.


Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 08 PM 19 Sep 2024

राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करणाऱ्या संजय गायकवाड यांचे अजित पवारांनी टोचले कान, बुलढाण्यातील लाडकी बहीण योजनेच्या सोहळ्यात गायकवाड यांचं नाव न घेता मर्यादा पाळण्याचा सल्ला मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजितदादांची तीव्र नाराजी, भाजप हायकमांडकडे तक्रार करणार विधानसभेच्या १६० जागांसाठी भाजप आग्रही, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती, २ ऑक्टोबरनंतर पहिल्या ५० उमेदवारांच्या यादीचं टार्गेट मंत्रिपदासाठी सूट शिवून तयार असणाऱ्या भरत गोगावलेंची महामंडळावर बोळवण, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची चर्चा, आदित्य ठाकरेंकडून खिल्ली मनसेच्या वरळी व्हिजनचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण देणार, मनसेच्या संदीप देशपांडेंची माहिती, काका-पुतण्यामधल्या राजकारणाची मुंबईभर चर्चा राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, मुंबईत राहुल नार्वेकरांच्या घराबाहेर वर्षा गायकवाड यांची निदर्शनं झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांनी वर्षा गायकवाडांचे पोस्टर्स फाडले, काँग्रेसचा आरोप...तर अनेक काँग्रेस नेते झिशान सिद्दीकींवर बसरले काँग्रेसच्या भूमिकेमुळे पाकिस्तान खूश, नरेंद्र मोदींचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... काँग्रेस आणि पाकिस्तानचा अजेंडा एकच, अमित शाह यांचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी सह-आरोपी चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला, गुन्ह्याचा तांत्रिक तपास करायचा आहे हा पोलिसांचा युक्तिवाद कोर्टानं स्वीकारला बदलापूरमधील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणी ५०० हून अधिक पत्रांचं आरोपपत्र दाखल, सुनावणी कधी सुरू होते त्याकडे लक्ष गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरूपदावरून हटवण्याच्या निर्णयाविरोधात डॉ. अजित रानडेंची हायकोेर्टात याचिका, २३ सप्टेंबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी करू नका, हायकोर्टाचे अंतरिम आदेश भंडाऱ्यातील एसटी ट्रान्सपोर्ट बँकेच्या सभेत राडा.. सदावर्तेंनी बँकेतील पैसे घरी नेल्याचा विरोधकांचा आरोप तर विरोधकांच्या हातून बँक गेल्याने आरोप सुरु असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा.


Lebanon Walkie Talkies Blasts : लेबनानमधील स्फोटानंतर वॉकीटॉकी बनवणाऱ्या जपानी कंपनीकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “आम्ही २०१४ नंतर…”

लेबनानमध्ये गेल्या दोन दिवसांत दोन मोठे स्फोट घडले आहेत. मंगळवारी (१७ सप्टेंबर) पेजरचा स्फोट झाला. त्यानंतर बुधवारी वॉकीटॉकीचा स्फोट झाल्याची घटना घडली.


Bachchu Kadu Joins Raju Shetti : एकनाथ शिंदेंना धक्का! Bachchu Kadu तिसऱ्या आघाडीत सहभागी

Bachchu Kadu Joins Raju Shetti : एकनाथ शिंदेंना धक्का! Bachchu Kadu तिसऱ्या आघाडीत सहभागी Bachchu Kadu on Mahayuti : राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने एक पाऊल पुढे टाकलं आहे. आज पुण्यामध्ये तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असलेल्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, प्रहारचे बच्चू कडू आदी नेते उपस्थित होते. यावेळी बच्चू कडू यांनी महायुतीमधून अप्रत्यक्षपणे बाहेर पडल्याचे सांगितले. तिसऱ्या आघाडीने परिवर्तन महाशक्ती असं नाव दिलं आहे. 26 सप्टेंबरला परिवर्तन महाशक्तीचा मेळावा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मेळावा होणार आहे. स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? तिसऱ्या आघाडी संदर्भात पुण्यात बैठक पार पडल्यानंतर संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मी महायुती बाहेर पडलो हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली, असे म्हणत महायुतीला सोडचिट्टी दिल्याचे जाहीर केले. लोकसभा निवडणुकीतही बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये उमेदवार देत बंडाळी केली होती.


Weather Update : बाप्पाच्या विसर्जनानंतर पाऊस सक्रिय, 'या' जिल्ह्यांना IMD चा इशारा

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपानंतर महाराष्ट्रत पुन्हा एकदा पावसाचं आगमन होणार आहे. हवमान खात्याने काही जिल्ह्यांना अलर्ट जाहीर केला आहे.


ST Bus-Car Accident | एनसीसी विद्यार्थी एसटी बस-कारचा भीषण अपघात, 45 विद्यार्थी थोडक्यात बचावले

सुधागड : संतोष उतेकर पाली खोपोली राज्य महामार्गावर पालीनजिक असलेल्या दापोडे गावाजवळ मंगळवारी (17 सप्टेंबर) एनसीसीचे विद्यार्थी घेऊन जाणारी परिवहन महामंडळाची बस व कारचा भीषण अपघात झाला. यावेळी बस बाजूच्या शेतात कलंडली मात्र यामध्ये 45 विद्यार्थी थोडक्यात बचावले असून सुखरूप आहेत. तर कारचे नुकसान झाले आहे. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारचालक ज...


CBSE Pattern In Maharashtra: राज्यातील शाळांतही आता CBSE पॅटर्न; या 'कॉपी'ने पास होऊ?

CBSE Pattern In Maharashtra: ‘सीबीएसई’ आणि ‘एसएससी’ शाळांमधील विद्यार्थ्यांमधील हा सामाजिक फरक दुर्लक्षून चालणार नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य मंडळांच्या अभ्यासक्रमांकडे पाहणे आवश्यक ठरते.


Raigad Bribe News | ४० हजारांची लाच घेताना जि.प. शिक्षण विभाग समन्वयक अटकेत

अलिबाग : शिक्षकांचे थकित वेतन देण्यासाठी चाळीस हजारांची लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे समन्वयक अमित राजेश पंड्या याना बुधवारी रंगेहाथ पकडले. यातील तक्रारदार हे शिक्षक आहेत. त्यांच्यासह अन्य तीन शिक्षकांचे जून, जुलै या दोन महिन्यांचे थकित वेतन निघण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाक...


भिवंडी येथील राड्यानंतर आयपीएस अधिकाऱ्याची बदली

परोपकारी यांची काही महिन्यांपूर्वीच विशेष शाखेतून भिवंडीच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली होती. परंतु भिवंडीतील दोन गटामध्ये झालेला वाद परोपकारी यांना भोवला आहे.


Kokan News | स्वायत्त कोकणासाठी आजपासून आंदोलन

रत्नागिरी : स्वायत्त कोकणासाठी गुरुवारपासून आंदोलन छेडले जाणार आहे. हे आंदोलन ऐतिहासिक ठरणार असल्याची माहिती समृद्ध कोकण संघटनेचे अध्यक्ष प्रशांत यादवराव यांनी दिली. ते शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, कोकणातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी ९ वा. हातखंबा...


माशांचा श्वास गुदमरतोय!

सुचित्रा दिवाकर सागरी जीवन वैविध्यतेने व्यापलेले असताना तितकेच गूढही आहे. समुद्रातील लाखो प्रजाती पर्यावरण संतुलन साधण्याचे काम करत असून, त्यांचे संरक्षण करणे आणि सुरक्षित ठेवणे मानवाची जबाबदारी आहे; पण अलीकडच्या काळात स्वार्थापोटी मानवाकडून सागरी संपत्तीचा विनाश केला जात असताना त्याचे परिणाम माशांना भोगावे लागत आहेत. पृथ्वीवरचा नैसर्गिक समतोल ढासळ...


MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna

अहमदनगर : उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, मी इथून संभाजीनगर ला जाणार असल्याचे सांगत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिर्डी येथील जुनी पेन्शन मेळाव्यात भाषणाला सुरुवात केली. राज्यातील जुनी पेन्शन संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मंत्री दीपक केसरकर यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना जुनी पेन्शन योजना (Old Pension Yojana) आणि नवी पेन्शन योजनेबाबत भाष्य केले. तसेच, आतापर्यंत तुमच्या अडचणी दूर करण्याचं काम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीच केलं आहे. शालेय शिक्षण सेवकांना आपण लाभ दिला असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, दीपक केसरकर यांचे भाषण सुरू असताना काही उपस्थितांनी मध्येच उभे राहून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच, जुनी पेन्शनची मागणी करत कार्यक्रमातून काढता पाय घेतला. येथील कार्यक्रमात पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, कमी अनुदान असणाऱ्या शिक्षकांना देखील मदत करण्यासाठी समिती नेमली आहे. त्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होईल.पगाराच्या रकमेपेक्षा खर्च जास्त असल्याने यातून मार्ग काढू. केंद्र सरकार ने जाहीर केलेली पेन्शन योजना सर्वांना माहीत आहे. मात्र,याबाबत सम्रभ पसरविला जातोय. काही लोक इथे भाषण करून गेले असतील, ते सत्तेत असताना काही देऊ शकले नाहीत. मात्र, एकनाथ शिंदे यांना जबाबदारी समजते. एक सामान्य रिक्षावाला या पदावर बसला आहे, असे म्हणत नाव न घेता शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर केसरकरांनी हल्लाबोल केला.


Nandurbar News : नंदुरबारमध्ये दोन गटांत दगडफेक, पोलिसांच्या गाड्याही फोडल्या

Nandurbar : नंदुरबार शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रॅलीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. नंदुरबार मधील इलाही चौक माळीवाडा आणि मच्छीबाजार परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आहे.


Nashik | जिल्हा रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याने चोरलं मृतदेहावरील मंगळसूत्र

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याने महिलेच्या मृतदेहावरील मंगळसूत्र चोरल्याची संतापजनक घटना बुधवारी (दि. १८) सकाळी उघडकीस आली. वेळीच ही बाब लक्षात आल्याने पोलिसांनी आणि मृताच्या नातलगांनी कर्मचाऱ्याची अंगझडती घेतल्याने चोरलेले दागिने मिळून आले. दरम्यान, याबाबत नातलगांनी अद्याप तक्रार न दिल्याने संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नसल्...


Minor Girls Gangrape In Pune : बारामतीतील अल्पवयीन मुलींवर पुण्यात सामूहिक अत्याचार, तिघे अटकेत

आरोपींची मुलींशी ओळख होती. याप्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला.


अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत 7 प्रश्न आणि त्यांची उत्तरे

देशात सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी होत नाही. त्याऐवजी दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना 50 राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी लढावे लागते.