LEBANON WALKIE TALKIES BLASTS : लेबनानमधील स्फोटानंतर वॉकीटॉकी बनवणाऱ्या जपानी कंपनीकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “आम्ही २०१४ नंतर…”

Lebanon Walkie Talkies Blasts : बुधवारी (१८ सप्टेंबर) दक्षिण लेबनॉन आणि उपनगरात हेझबोलाहने वापरलेल्या रेडिओचा आणि काही वॉकीटॉकीचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, ज्या वॉकीटॉकींचा स्फोट झाला आहे, ते वॉकीटॉकी जपानच्या आयकॉम कंपनीचे असल्याचंही पुढे आलं आहे. त्यानंतर आता आयकॉम कंपनीनेही याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कंपनीने लेबनानमधील स्फोटानंतर निवेदन जारी करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ज्या वॉकीटॉकींचा स्फोट झाला आहे, त्या मॉडलची निर्मिती कंपनीने दशकभरापूर्वीच बंद केली होती, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. तसेच यासंदर्भात तपास सुरू असून आम्ही लवकरच एक सविस्तर निवेदन जारी करू, असंही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा – Lebanon Explosion : लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरच्या स्फोटानंतर आता वॉकीटॉकी आणि रेडिओचा स्फोट; ९ जणांचा मृत्यू, ३०० जण जखमी

कंपनीने नेमकं काय म्हटलंय?

लेबनानमध्ये आयकॉम कंपनीच्या वॉकीटॉकींचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. मात्र, ते वॉकीटॉकी आमच्या कंपनीने लेबनानमध्ये शिफ्ट केले होते का? याबाबत अद्याप स्पष्टपणे सांगता येणं कठीण आहे. या घटनेत ज्या मॉडेलचा स्फोट झाला आहे, त्या मॉडेलमध्ये बॅटरीचा वापर केला जातो. या मॉडेलची निर्मिती आम्ही २०१४ मध्ये बंद केली आहे. तरीही आम्ही यासंदर्भात तपास करत आहोत, असं कंपनीने म्हटलं आहे.

हेही वाचा – Israel : मोसाद नव्हे ‘युनिट-८२००’ ने लेबनॉनमध्ये पेजर्स, वॉकी-टॉकीचे स्फोट घडवले; इस्रायलच्या नव्या गुप्तचर यंत्रणेबद्दल जाणून घ्या

लेबनानमध्ये दोन दिवसांत दोन मोठे स्फोट

दरम्यान, लेबनानमध्ये गेल्या दोन दिवसांत दोन मोठे स्फोट घडले आहेत. मंगळवारी (१७ सप्टेंबर) झालेल्या पेजरच्या स्फोटात १० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला, तर तब्बल २,८०० लोक जखमी झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी (१८ सप्टेंबर) रेडिओचा आणि काही वॉकीटॉकीचा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेतही २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास ४५० जण जखमी झाले आहेत.

2024-09-19T06:49:48Z dg43tfdfdgfd