MUMBAI-NASHIK HIGHWAY ACCIDENT: मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनरचा ब्रेक फेल; दुचाकीनं जाणाऱ्या दोघांना चिरडलं!

Container Collided Bike : मुंबई- नाशिक महामार्गावर कंटनेर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंटनेरचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अनर्थ घडला. याप्रकरणी पोलिसांनी कंटनेर चालकाला अटक केली आहे. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अमान सय्यद (वय, १९) आणि अर्चना पगारे (वय, २०) अशी मृतांची नावे आहेत. अमान आणि अर्चना हे दोघेही ठाणे आणि डोंबिवलीमध्ये नोकरी करायचे. शनिवारी दोघेही कामावरून घरी परतत असताना खारेगाव टोल जवळ भरधाव कंटनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कंटेनरमधील लोखंडी रॉड त्यांच्या शरीरात घुसले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनरचालक जितेंद्रकुमार यादव (वय, २८) याला अटक केली. तसेच हा अपघात कशामुळे झाला? त्यामागचे खरे कारणही शोधले जात आहे. याशिवाय, कंटेनर चालकाने मद्यपान केले होते का? याचाही तपास सुरू आहे.

Muslim OBC reservation : कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मुस्लिमांना ओबीसी आरक्षण द्या; मनोज जरांगे पाटील यांची मागणी

पुणे: आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले

पुणे- नाशिक महामार्गावर एका आमदाराच्या पुतण्याने दोन जणांना चिडरल्याची घटना उघडकीस आली. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातानंतर आरोपी फरार झाला. याप्रकरणी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Pimpri Chinchwad Crime:शारीरिक संबंधावरून वाद, पतीनं पत्नीला भर रस्त्यात भुलीचं इंजेक्शन देऊन केलं अपहरण, पिंपरीतील घटना

Pune hotel Drugs Party: पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी? व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांचा सरकारवर हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने दोघांना कारखाली चिरडले. नाशिक पुणे जुना महामार्ग रोडवर मयूर मोहिते पाटील याने कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातानंतर मयूर मोहिते पाटील याने मदत न करता तिथून पळून गेला. मयूर मोहितेने मद्य प्राशन केले होते की नाही? याचा तपासही पोलीस करत आहे. पुण्यातील पोर्शे कार प्रकरण ताजे असताना एका आमदाराच्या पुतण्याने दोन जणांचा कारखाली चिरडल्याची घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

2024-06-24T07:16:18Z dg43tfdfdgfd