NEPAL LANDSLIDES: नेपाळमध्ये मान्सूनचा कहर! मुसळधार पाऊस, भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू

Nepal Landslides: नेपाळमध्ये गेल्या 24 तासात मान्सूनने कहर केला आहे. नेपाळच्या विविध भागात मुसळधार पावसासह (heavy rain in nepal) भूस्खलन, पूर आणि वीज पडून 14 जणांचा मृत्यू (14 people died due to heavy rains and landslides) झाला आहे. नेपाळच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDRMA) म्हणण्यानुसार, भूस्खलनामुळे 8, वीज पडून 5 आणि पुरामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.

NDRMA नुसार, 26 जून 2024 रोजी एकूण 44 घटनांची नोंद झाली. यात 14 लोकांनी आपला जीव गमावला आहे. यात भूस्खलनामुळे 8 जणांचा मृत्यू, 5 जणांचा वीज पडून आणि 1 मृत्यू पुरामुळे झाला. दोन जण अद्याप बेपत्ता आहेत, तर 10 जण जखमी आहेत.

दरम्यान, गेल्या 24 तासात लामजुंगमध्ये भूस्खलनात पाच, कास्कीमध्ये दोन आणि ओखलढुंगा येथे एकाचा मृत्यू झाला, तर पुराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला. गृह मंत्रालयाच्या नोंदीनुसार, नेपाळमध्ये मान्सून सक्रिय झाल्यापासून 33 जिल्हे मान्सूनमुळे प्रभावित झाले असून 17 दिवसांच्या कालावधीत एकूण 147 घटनांची नोंद झाली आहे. यात गेल्या 17 दिवसांत एकूण 28 जणांनी आपला जीव गमावला आहे. यात, एकट्या भूस्खलनात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर वीज पडून 13 जणांना आपला जीव गमवावा लागला. नेपाळमध्ये दरवर्षी भूस्खलन आणि पुरामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त असते.

नेपाळमध्ये 3 महिने राहणार मान्सून

नेपाळमध्ये दरवर्षी मान्सूनचे (monsoon in nepal) आगमन साधारणपणे 13 जूनला होतो आणि 23 सप्टेंबर रोजी मान्सून संपतो. गेल्या वर्षी 14 जून रोजी सुरू झाला होता. यंदा 13 जूनपासून नेपाळमध्ये मान्सून (monsoon) दाखल झाला. या ठिकाणी सुमारे तीन महिने मान्सून सक्रिय राहील. या दरम्यान, पावसाशी संबंधित घटनांमुळे 1.8 दशलक्ष लोक प्रभावित होऊ शकतात, असा अंदाज नेपाळ सरकारने वर्तवाला आहे.

2024-06-27T01:27:01Z dg43tfdfdgfd