व्हिडिओ

Trending:


Rahul Gandhi | राहुल गांधी विठुरायाच्या दर्शनासाठी येणार

Rahul Gandhi To Visit Pandharpur For Vitthal Rukmini Darshan


Bhole Baba Hathras : रांगोळीसाठी महिला गोळा करतात भोलेबाबाच्या पायाखालची माती

Bhole Baba Hathras : रांगोळीसाठी महिला गोळा करतात भोलेबाबाच्या पायाखालची माती उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये (Hathras) सत्संग दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 116 जणांनी जीव गमावला आहे. ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी भोले बाबाच्या सत्संगसाठी मोठी गर्दी झाली होती. पण हे भोले बाबा नेमके आहेत तरी कोण? एवढी मोठी दुर्घटना घडली तरी कशी? विश्व हरी भोले बाबा यांना त्यांचे अनुयायी भोले बाबा म्हणून ओळखतात. भोले बाबा आणि वाद हे फार जुनं समीकरण आहे. भोले बाबांबाबत सांगताना स्थानिकांनी सांगितलं की, कासगंज जिल्ह्यातील पटियाली येथील बहादूर नगर येथील रहिवासी असलेले विश्व हरी भोले बाबा यांनी साधारणतः 17 वर्षांपूर्वी पोलीस खात्यातील नोकरी सोडून सत्संग सुरू केलं. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त राजस्थान आणि मध्य प्रदेशात भोले बाबांचे अनुयायी मोठ्या संख्येनं आहेत. तसं पाहायला गेलं तर, त्यांचे अनुयायी मीडियापासून अंतर ठेवूनच असतात. भोले बाबांच्या एका भक्तानं सांगितलं की, त्यांच्या आयुष्यात कोणीच गुरू नाही. व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांची अचानक देवाशी भेट झाली आणि तेव्हापासून त्यांचा अध्यात्माकडे कल वाढला. भगवंताच्या प्रेरणेनं हे शरीर त्याच भगवंताचा अंश आहे, हे त्यांना कळलं. त्यांचं खरं नाव सूरज पाल असून ते कासगंजचा रहिवासी आहेत. भोले बाबांच्या अनुयायानं पुढे बोलताना सांगितलं की, ते दर मंगळवारी सत्संगला जातात. नुकताच मैनपुरी येथे सत्संग झाला. त्यानंतर हाथरसमध्ये सुरू करण्यात आला. कोरोनाच्या काळातही भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम वादात सापडला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्या सत्संगाला फक्त 50 लोकांचीच परवानगी मागितली होती, पण नंतर 50 हजारांहून अधिक लोक त्यांच्या सत्संगाला आले. प्रचंड गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणा कोलमडली होती.


Sawantwadi News | सावंतवाडी ZP शाळेचा एक भाग कोसळला

Sawantwadi news zp school bad condition


Jharkhand Politics : झारखंडमध्ये मोठी उलथापालथ! चंपई सोरेन यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM

Champai Soren resigns : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी झारखंड हायकोर्टाने हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केल्याने त्यांची तब्बल पाच महिन्यांनंतर २८ जून रोजी तुरुंगातून सुटका झाली होती. आता ते पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्रीपद सांभाळणार आहे.


Vishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम

Vishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता यांना दिलेल्या आहारात चक्क मृत सापाचे किरडू आढळल्याची घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील पळूस तालुक्यात हा प्रकार उघडकीस आलाय. पलूस परिसरातील लाभार्थी पालक व अंगणवाडी सेविकात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना पोषण आहार गेली अनेक वर्षे पुरवला जातो. यामध्ये या अगोदर हरभरा तांदूळ,तूरडाळ,गहू, तिखट,मीठ विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या. नुकताच एप्रिल व मे महिन्याचा पोषण आहार पलूस येथील केंद्रावर पोहोच करण्यात आला. तो तत्परतेने संबधित लाभार्थ्यांना संपर्क करून आहार घेऊन जाण्यास सांगितले.


अकरावी प्रवेश प्रक्रिया : पहिली प्रवेश यादी जाहीर

मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावीची केंद्रीय प्रवेशाची पहिली प्रवेश यादी आज (२७ जून) सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आली.


Uddhav Thackeray and Aaditya Thackeray : "Mahalaxmi Race Course ची जागा बिल्डरांच्या घशात घालू नका"

Uddhav Thackeray and Aaditya Thackeray : "Mahalaxmi Race Course ची जागा बिल्डरांच्या घशात घालू नका" Mahalaxmi Racecourse 120 Acres Land Handover To BMC: मुंबई : महालक्ष्मी रेस कोर्सची (Mahalaxmi Race Course) 120 एक्कर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या (BMC) ताब्यात देण्यास राज्य सरकारनं (Maharashtra Government) मंजुरी दिली आहे. महालक्ष्मी (Mumbai News) रेसकोर्सची 120 एकर जागेत सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी जागा वापरली जाणार आहे. 1914 साली रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 99 वर्षांच्या लीजवर ही जागा देण्यात आली होती. त्यानंतर हा करार 2013 मध्ये संपुष्टात आला होता. त्यानंतर या जमिनीवर थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. या प्रकल्पात थीम पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनर असा समावेश होता. या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. थीम पार्क उभारण्यासाठी ही जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करणे गरजेचे होते. ही 211 एकर जागा आहे. त्यामध्ये 91 एकर जागा टर्फ क्लबला ठेवण्यात येणार आहे, तर उर्वरित 120 एकर जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित केली जाईल. आतापर्यंत ही जागा लीजवर देण्यात आली होती.


Sudha Murthy Rajya Sabha Speech: ‘सर, कसं बोलायचं कळत नाही...’ राज्यसभेत पहिलंच भाषण, सुधा मूर्तींनी जीवाभावाचे विषय मांडत जिंकलं मन

Sudha Murthy's Rajya Sabha Debut: इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी मंगळवारी राज्यसभेत खासदार म्हणून पहिल्यादांच संबोधन केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत सुधा यांनी भाग घेतला. राज्यसभेच्या खासदार म्हणून सुधा मूर्ती यांनी पहिल्यांदाच राज्यसभेत भाषण केले आणि पहिल्याच भाषणात सुधा मूर्ती यांनी सरकारकडे केली मोठी मागणी. सुधा मूर्ती राज्यसभेतील पहिल्या भाषणात काय म्हणाल्या पाहूया...


Password Safety: 17 टक्के भारतीय नागरिक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत बेफिकीर; सर्वेक्षणातून आले समोर

Password Safety negligence : 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षितपणे पासवर्ड जतन करतात, सर्वेक्षणात धक्कादायक सत्य उघड झाले: भारतीय लोक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत निष्काळजी वृत्ती बाळगतात. लोकांना त्यांच्या फोनमध्ये पासवर्ड सेव्ह करण्याची किंवा नोटपॅडवर लिहून ठेवण्याची सवय असते. अशा निष्काळजीपणामुळे डेटा चोरीचा धोका वाढतो. एका सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षित पद्धतीने पासवर्ड सेव्ह करतात.


TOP 50 : संध्याकाळच्या टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 03 July 2024 : ABP Majha

परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी याच अधिवेशनात कायदा, याच अधिवेशनात नव्या कायद्याचं विधेयक मांडणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. महायुती सरकारकडून १ लाख ८ हजार पदांवर भरती प्रक्रिया सुरू, ७० हजार जणांना नियुक्त पत्र प्रदान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मोठी वाढ, २०१४-२०२४ या काळात राज्याची अधिक प्रगती, अभिभाषणावरील चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर. ९७ टक्के पॉलिश्ड डायमंडची निर्यात मुंबईतून, उद्योग गुजरातला चालले हे कथानक खोटं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर, तर मलबार गोल्डची मुंबईत १७०० कोटींची गुंतवणूक, फडणवसांची माहिती. अंबादास दानवे यांनी लेखी दिलगिरी व्यक्त केल्यानं निलंबनाचा कालावधी कमी केला जाण्याची शक्यता. कालावधीबाबतचा निर्णय उद्या बैठकीत घेतला जाणार. सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी, जनतेचे प्रश्न मला मांडू द्या, निलंबनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी, जनतेचे प्रश्न मला मांडू द्या, निलंबनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. लोकसभेत राहुल गांधींनी हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद. राहुल गांधींवर हल्ला होण्याची शक्यता. गुप्तचर विभागाकडे इनपुट. गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर राहुल गांधी आणि त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली.


Nawab Malik : मलिक बैठकीत, घेणार महायुतीत? फडणवीस काय भूमिका घेणार? Special Report

माजी मंत्री नवाब मलिक यांनी अजित दादांनी बोलवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला हजेरी लावली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागच्या अधिवेशनातील पत्राची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली. त्याचसोबत, ज्यांना विरोध केला त्या नवाब मलिकांना महायुतीत घेणार का? असा सवालही आता विचारला जाऊ लागलाय... पाहूयात याबाबतचा एक रिपोर्ट अजित पवार यांनी बोलवलेल्या बैठकीत नवाब मलिक उपस्थित असल्याची ही दृश्य... ही दृश्य जेव्हा बाहेर आली तेव्हा अनेकांच्या भुवया वर गेल्या आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या... अजित पवार राष्ट्रवादीत सर्वात मोठं आणि ऐतिहासिक बंड करत सत्तेच्या मांडवाखाली आले... त्याचवेळी नवाब मलिकांवरून जोरदार खटके उडाले होते... खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना सोबत घेण्याबाबत नाराजीची भूमिका मांडत अजित पवारांना पत्र लिहिलं


Maharashtra weather Update : राज्यात आज 'या' ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD नं दिला हा महत्वाचा इशारा

Maharashtra weather Update : मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे. आज राज्यात काही जिल्ह्यात अतिमुळसाधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवमान विभागाने ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे.


Mumbai Airport Jobs 2024: मुंबई विमानतळावर नोकरीची संधी, एअर इंडियाची १०४९ पदांवर भरती जाहीर

Mumbai Airport Bharti 2024: ए आय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड येथे जवळपास १०४९ रिक्त पदांसाठी भरती होणार असून, भारतीय महिला आणि पुरुष या दोघांसाठी ही भरतीकरता अर्ज करता येणार आहे. कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी हि भरती प्रक्रिया पार पडणार असून, या नोकरीच्या कालावधी हा तीन वर्षाचा असेल.


Nanded | एसटी बस वाहक आणि प्रवाशात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

ST Driver and Passanger Rada in Nanded


NEET Paper leak 2024 Update: विद्यार्थी-पालकांशी संभाषण, बँक व्यवहार, ॲडमिट कार्ड; फक्त NEET नव्हे, अनेक परीक्षेत घोळ, धक्कादायक माहिती समोर

NEET Paper leak 2024 Update: लातूर: लातूर नीट पेपरफुटीप्रकरणी अटक (NEET Paper leak case) असलेल्या दोन आरोपींना सहा तारखेपर्यंत सीबीआय (CBI) कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर सीबीआय पथकाने तपासाचा वेग वाढवला आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून आजपर्यंत झालेल्या तपासाची सर्व कागदपत्रे आणि तपशील गोळा करण्यात आला आहे. सीबीआय पथकाने तपासाची गती आणि दिशा ठरवून कामाला सुरुवात केली आहे. नीट पेपर प्रकरणात सीबीआयकडे तपास वर्ग झाल्यानंतर अनेक वेगवान हालचाली घडल्या...


Vidhan Parishad Election 2024: मिलिंद नार्वेकरांमुळे काँग्रेसचा उमेदवार धोक्यात, पुन्हा घात होणार? शिंदे गटाच्या आमदाराचं सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

मुंबई: उद्धव ठाकरे यांनी अगदी शेवटच्या क्षणी विधानपरिषद निवडणुकीसाठी मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी घोषित केली होती. त्यामुळे विधानपरिषदेच्या जागा 11 आणि उमेदवार 12 असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे कोणत्या तरी एका उमेदवाराचा पत्ता कट होणार, हे निश्चित आहे. सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार विधानपरिषदेच्या (VidhanParishad Election 2024) 8 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होऊ शकतात, तर एका जागेवरुन काँग्रेसच्या प्रज्ञा सातव (Pradnya Satav) आणि...


Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठक

मुंबई: हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली आहे. या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील राजकीय समीकरणं बदलणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे संतोष बांगर यांची भेट झाल्यानंतर हिंगोलीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. अधिवेशनाच्या कालावधीत ही भेट झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्या दरम्यान संतोष बांगर आणि त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्या गेल्या. पण आता हे दोन्ही नेते अब्दुल सत्तारांच्या घरी भेटले आणि ही भेट गुप्त होती. त्यामुळेच ही भेट हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणं बदलवणारी ठरण्याची शक्यता आहे.


Bharat Ratna to Shahu Maharaj: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न; राज्य सरकारमधील मंत्र्यांचे मोठे वक्तव्य

Shahu Maharaj: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने हसन मुश्रीफ यांनी महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी सरकारकडे विनंती करणार असल्याचे सांगितले.


IndiGo flight News: मुंबईला येणाऱ्या विमानातील प्रवाशानं हद्दच केली, टॉयलेटमध्ये गेला अन्…

Delhi-Mumbai IndiGo flight: दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानाच्या स्वच्छतागृहात धुम्रपान केल्याप्रकरणी एका ३८ वर्षीय प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


मागील पानावरून पुढे

Om Birla : विरोधकांनीही मतविभागणी न मागता संख्याबळाची झाकली मूठ कायम ठेवली. उमेदवार निश्चित करताना विश्वासात न घेतल्याबाबत तृणमूल काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्याने ‘इंडिया’ आघाडीतील कुरबुरीही समोर आल्या.


असांज आता काय करणार?

Julian Assange :'हॅकिंग विश्वाचा रॉबिनहूड' अशी ओळख असणारे ज्युलियन असांज यांची नुकतीच सुटका झाली. या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा हा आढावा...


MLA Fund : निधीवाटपावरुन जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप, भाजपकडून सभागृहात गदारोळ

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या निधीवाटपावरुन महायुती सरकारवर गंभीर आरोप, मला आमदार निधी मिळला नाही अशी खंत आव्हाडांनी सभागृहात बोलून दाखवली.