MUMBAI AIRPORT JOBS 2024: मुंबई विमानतळावर नोकरीची संधी, एअर इंडियाची १०४९ पदांवर भरती जाहीर

Mumbai Airport Recruitment 2024: ए आय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड येथे जवळपास १०४९ रिक्त पदांसाठी भरती होणार असून त्यात कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ७०६ जागा, तर सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ३४३ जागा उपलब्ध आहेत. भारतीय महिला आणि पुरुष या दोघांसाठी ही भरती होणार असून या नोकरीच्या कालावधी हा तीन वर्षाचा असेल.

ए आय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड येथे जवळपास १०४९ रिक्त पदांसाठी भरती होणार असून त्यात कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ७०६ जागा, तर सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ३४३ जागा उपलब्ध आहेत. या रिक्त पदांच्या भरतीसाठी भारताच्या नागरिक असलेल्या महिला आणि पुरुष या दोघांनाही संधी दिली जाईल. ही नोकरी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर तीन वर्षांसाठी असेल. त्या महिलेचा किंवा पुरुषाचा कामातील परफॉर्मन्स ध्यानात घेऊन वर्षानंतर आहे ते पुढे काम करणार की नाही हे ठरवले जाईल.

विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उत्तम उत्तम सेवा पुरवून त्यांचा प्रवास सुखाचा करणे, केवळ भारतातच नाही तर जगभरात आपल्या कंपनीचे नाव मोठे करणे असे उद्देश समोर ठेवून एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड कार्यरत आहे. ए आय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये मधल्या नोकरीच्या संधीबद्दल अधिक जाणून घेऊया.

सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठीचे पात्रतेचे निकष, वयोमार्यादा आणि पगाराबद्दल जाणून घेऊ.

पात्रतेचे निकष-Mumbai Airport Vacancy 2024:

  1. कोणत्याही शाखेतील पदवीधर असावेत
  2. संबंधित कामातील किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक
  3. संगणक वापरासंबंधीचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
  4. लेखनात आणि बोलण्यात हिंदी आणि इंग्रजीवर प्रभुत्व आवश्यक

वयोमार्यादा-Air India Jobs in Mumbai:

  • कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे
  • ओबीसी श्रेणीतील अर्जदारांना तीन वर्षाची अधिक सूट
  • एससी आणि एसटी श्रेणीतील अर्जदारांना पाच वर्षांची अधिक सूट

सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी २८,६०५/- इतका पगार दर महिना दिला जाईल.

कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठीचे पात्रतेचे निकष, वयोमार्यादा आणि पगाराबद्दल जाणून घेऊ.

पात्रतेचे निकष-AI AIRPORT SERVICES LIMITED:

  1. कोणत्याही शाखेतील पदवीधर असावेत
  2. वैमानिक अभ्यासक्रमांमधला डिप्लोमा केलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल
  3. संगणक वापरासंबंधीचे फुलशेज ज्ञान असणे आवश्यक
  4. लेखनात आणि बोलण्यात हिंदी आणि इंग्रजीवर प्रभुत्व आवश्यक

वयोमार्यादा-Latest Jobs in Mumbai:

  • कमाल वयोमर्यादा २८ वर्षे
  • ओबीसी श्रेणीतील अर्जदारांना तीन वर्षाची अधिक सूट
  • एससी आणि एसटी श्रेणीतील अर्जदारांना पाच वर्षांची अधिक सूट

कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी २८,६०५/- इतका पगार दर महिना दिला जाईल.

खाली दिलेला अर्ज भरून सदर नोकरीसाठी अर्ज करता येईल.

अर्जाची लिंक -https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScA4WF8Ej8bKu7VwMMOzRhSoYuQSVjD9CFWYZynC_1llrUZVQ/viewform

ए आय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मधील नोकरीच्या इतर संधी बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.aiasl.in या संकेतस्थळाला भेट द्या.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-03T05:55:56Z dg43tfdfdgfd