VIDHAN PARISHAD ELECTION RESULT : मुंबई पदवीधरमध्ये ठाकरेंचीच गर्जना! अनिल परब यांचा 26 हजार मतांनी विजय

Vidhan Parishad Election Result : विधानपरिषदेच्या चारही जागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटाने आपले वर्चवस्व सिद्ध केले आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाचे अनिल परब हे विजयी झाले आहेत, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाचेच ज. मो. अभ्यंकर यांनी विजय मिळवला आहे. दोन्ही उमेदवारांच्या विजयानंतर ठाकरे गटाकडून जल्लोष केला जात आहे.

याशिवाय कोकण पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपचे निरंजन डावखरे हे विजयी झाले आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही, या जागेवर किशोर दराडे आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी मतदान पार पडलं होतं. त्यानंतर आज निकाल जाहीर होत आहे.

अनिल परब यांचा 26 हजार मतांनी विजय

मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांनी 26 हजार 26 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे किरण शेलार यांचा पराभव केला आहे. अनिल परब यांच्या विजयामुळे शिवसेना ठाकरे गटाने आपला मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम राखला आहे. या निकालानंतर वरून सरदेसाई यांनी मतदारांनी भाजपला नाकारलं असून उद्धव ठाकरेंवर पुन्हा विश्वास व्यक्त केला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई फक्त शिवसेनेचीच - अनिल परब

या विजयानंतर मुंबई फक्त ठाकरेंच्या शिवसेनेचीच असल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे. अनिल परब म्हणाले की, हा विजय मी बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करतो. बाळासाहेबांचा आशीर्वाद असाच कायम राहू दे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी आभारी आहे. माझ्या विजयासाठी लढलेल्या महाविकास आघाडीच्या घटकपक्षांचे मी आभर माणतो. मुंबईमध्ये शिवसेना आणि तीही उद्धव ठाकरेंची शिवसेना असणार. मुंबईचा मतदार हा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या मागे उभार आहे असे अनिल परब म्हणाले.

2024-07-01T15:32:51Z dg43tfdfdgfd