बातम्या

Trending:


Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाचा ‘जांगडगुत्ता’!

Maharashtra Sadan Delhi : अयोध्येत, जम्मू-काश्मीरमध्ये सरकारने नवी महाराष्ट्र सदने सदने जरूर बांधावीत. पण आधी राजधानीतल्या दोन्ही सदनांतील प्रशासकीय अनास्थेचा, गडबड-गोंधळाचा ‘जांगडगुत्ता’ सोडवावा. ती इच्छाशक्ती राज्य सरकार कधी दाखवणार?


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6:30 AM : 06 JULY 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6:30 AM : 06 JULY 2024 मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, तर आरोप करणारेच घोडेबाजार करतात, नाना पटोलेंचा पलटवार विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग... टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडदरम्यान उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल मुंबई पोलिसांचं विधानभवनातही कौतुक, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सूर्यकुमार यादवकडून कौतुकाची थाप लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदी आणि शिंदेंचे फोटो कशासाठी? विजय वडेट्टीवार आणि सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर..३ ते १० वर्षांची शिक्षा तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद...मंंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक..


Aditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संताप

Aditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संताप


bihar bridge collapses : पडझडीचे वर्तमान

bihar ten bridges collapsed : बिहारमध्ये १५ दिवसांत एक, दोन नव्हे, तब्बल १० पूल कोसळले आहेत. पूल कोसळण्याच्या या दहा दुर्घटनांत मनुष्यहानी झालेली नाही, हा त्यातल्या त्यात दिलासा; पण, त्यामुळे कदाचित त्याचे गांभीर्यही अद्याप फारसे अधोरेखित झालेले नसेल.


Traffic Police | पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकून जळण्याचा प्रयत्न

Wadettiwar Reaction on Pune attempt to fire on Traffic Police


Mumbai Flyover Slab Collapses: मुंबईतील अंधेरी भागातली धक्कादायक घटना उड्डाणपुलाचा कोसळला स्लॅब

Mumbai Flyover Slab Collapses: अंधेरीत वेस्टर्न हायवे मेट्रो स्थानकाजवळ उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळाली आहे. स्लॅब कारच्या बोनेटवर पडल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र कारचे अतोनात नुकसान झाले आहे. मुंबईतल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.


Vijay Wadettiwar Full PC : सरकारकडून शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी, विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका

बीडमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीच्या नावे लाटल्या, सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय, वडेट्टीवारांची सरकारवर टीका लाडकी बहिण योजना जरी काढली असेल तरी या सरकारला बहिणी मतदान देणार नाही. शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आमच्या बहिणी यांना भीक घालणार नाहीत, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी लाडकी बहिण योजनेवर (Ladki Bahin Yojana) शिंदे सरकारवर (Shinde Government) केली. पत्रकारांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, मी दिक्षाभूमीला गेलो होतो. गुन्हे दाखल करण्याची गरज नाही. ही दडपशाही आहे. याबाबत पोलीस आयुक्तांशी बोलून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घ्या आणि सोडा अशी विनंती केली होती, मात्र आता गुन्हे दाखल झाले असतील तर ते मागे घ्यावेत.


Video : सेल्फीच्या नादात मृत्यू, चालत्या बाईकवरचा धक्कादायक अपघात कॅमेरात कैद

मुंबई : रील बनवणाऱ्यांची जगभरात कमी नाही. भारतीय लोकांमध्येतर रिल्सचं क्रेज आहे. तुम्हाला रस्त्यावर चालताना एक ना एक व्यक्ती रिल्स करताना दिेसेल. रिल्ससाठी लोक आपला जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात रील बनवताना लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, परंतु त्यानंतरही लोक त्यातून धडा घेत नाहीत.आता महाराष्ट्रातून एक व्हिडीओ समोर आला आहे. येथे चालत्या दुचाकीवरून सेल्फी घेणे महागात पडले. या दोघांपैकी एकाचा मृत्यू...


Nagpur Crime: कॅन्सरच्या उपचाराला पैसे नाही! पतीने पत्नीसह मुलीला विष देत संपवलं आयुष्य

Nagpur Crime: कॅन्सरग्रस्त पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्रकार नागपुरात घडला आहे. उपचारासाठी पैसे नसल्याने पतीने स्वतःसह पत्नी आणि मुलीला शीत पेयातून विष पाजत आयु्ष्य संपवलं आहे. या घटनेत पती-पत्नीचा मृत्यू झाला. तर सुदैवाने या घटनेत मुलीचा जीव वाचला आहे. मयत दाम्पत्य हे केरळ येथून नागपूरला उपचार घेण्यासाठी आले होते.


Alandi Dnyaneshwar Maharaj Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान;देवाची आळंदी नादावली

Alandi Dnyaneshwar Maharaj Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान;देवाची आळंदी नादावली अलंकापुरीत वारकरी दाखल झाला की आधी इंद्रायणी काठ गाठतो. आज तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. त्यामुळं याच इंद्रायणी काठी आज वारकऱ्यांची मांदियाळी पहायला मिळत आहे. वारकऱ्यांनी हे इंद्रायणी काठ कसं फुलून गेलंय आणि याप्रसंगी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने ही कशी खबरदारी घेतली आहे सुरक्षेच्या कारणास्तव NDRFचं पथक आळंदीत दाखल, कोणताही अनुचीत प्रकार घडूनये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी.संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार, आळंदीत वारकऱ्यांची मोठी गर्दी, विठू नामाच्या गजरात वारकऱ्यांचा उत्साह . अलंकापुरीत वारकरी दाखल झाला की आधी इंद्रायणी काठ गाठतो. आज तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. त्यामुळं याच इंद्रायणी काठी आज वारकऱ्यांची मांदियाळी पहायला मिळत आहे. वारकऱ्यांनी हे इंद्रायणी काठ कसं फुलून गेलंय आणि याप्रसंगी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने ही कशी खबरदारी घेतली आहे


Ashadhi Ekadashi Special Trains: आषाढी यात्रेसाठी मध्य रेल्वेच्या ६४ विशेष गाड्या; जाणून घ्या कधी, कोणत्या मार्गावरून धावणार

Ashadhi Ekadashi:मध्य रेल्वेकडून आषाढी यात्रेसाठी विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. या गाड्यांचे वेळापत्रक मध्य रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आले असून त्याचे मार्ग आणि थांबे देखील रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहेत.


Jogeshwari | जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी वायकरांना क्लीन चीट

What is jogeshwari land Scam


विज्ञानक्षेत्रात ‘ती’ कुठे?

जागतिक स्तरावर संशोधनात स्त्रियांचं प्रमाण ४१ टक्के असल्याचं दर्शवणारा एक नवीन अहवाल समोर आलाय. त्यानुसार सक्रिय संशोधकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण वाढण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.


Sandeep Thapar attack | शिवसेना नेत्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, रस्त्यावर तलवारीने सपासप वार

पंजाबमधील शिवसेना नेते संदिप थापर यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. सुरक्षा कवच काढून घेतल्यानंतर काही दिवसातच रस्त्यात अडवून हा हल्ला झाला. निहंगा वेशातील दोन अज्ञातांनी स्कुटीवरुन जात असलेल्या थापर यांना अडवलं. आधी मागे बसलेल्या सुरक्षा रक्षकाला हाकलून दिलं आणि नंतर सपासप वार केले. रस्त्यावर जमलेल्या गर्दीपैकी कुणीही पुढे येऊन हल्ला रोखण्याची तसदी घेतली नाही. थापर यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंजाबच्या लुधियानामधील सरकारी रुग्णालयासमोरच हा प्रकार घडला.


बिहारची ‘अफसर बिटिया’

टिनू सिंगने २०२३ च्या मध्यंतरीच्या काळात लागोपाठ कॉम्प्युटर ऑपरेटर, सहाय्यक शाखा अधिकारी, बीपीएससी शिक्षक भरतीमधील तीन वेगवेगळ्या अशा एकूण पाच परीक्षा दिल्या होत्या. या सर्व परीक्षांचा निकाल डिसेंबर २०२३ मध्ये सलग पाच दिवस लागणार होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे टिनूच्या मेहनतीला यश आले आणि तिने ज्या पाच परीक्षा दिल्या होत्या त्या सर्व परीक्षांमध्ये ती अव्वल क्रमांकाने पास झाली. टिनूच्या या यशाने जमुई जिल्हाच नाही तर बिहारमध्ये ती चर्चेचा विषय...


महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल : महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या मागे पडलाय का?

महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचा अहवाल अर्थमंत्री अजित पवार यांनी 27 जूनला विधानभवनात मांडला.


Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीतील घरांची किंमत 1,00,00,000; एरिया किती मिळतोय पाहिलं?

Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या सोडतीमध्ये सहभागी होऊ पाहणाऱ्यांसाठीची महत्त्वाची घोषणा काही दिवसांमध्येच होणार असून, आता यामध्ये कोणाच्या नशीबी हक्काच्या घराच्या चाव्या येतता हे पाहणं महत्त्वाचं असेल...


Sharad Pawar on PM Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं

Sharad Pawar on PM Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) संपल्यानंतर आता समस्त महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकचे वेध लागले आहे. राजकीय पक्षांनीदेखील या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली तयारी चालू केली आहे. दुसरीकडे नेतेमंडळींना आपल्या मतदारसंघात लोकांशी गाठीभेटी वाढवल्या आहेत. तर काही नेते तिकीट मिळवण्यासाठी वरिष्ठांची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात आहेत. काही नेते आपली राजकीय सोय बघून पक्षबदल करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा या परिस्थितीत कोल्हापुरातील (Kolhapur) राजकीय घडामोडींनीही वेग आला आहे. कोल्हापुरातील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. येथील अजित पावर यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील (A Y Patil) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रादीत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. कोल्हापुरात तशा हालचाली सुरू आहेत. ए वाय पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांनी अलिकडच्या काळात दोन वेळा कोल्हापूरचा दौरा केला. या दोन्ही दौऱ्यांत ए वाय वाटील यांचा सहभाग होता. ए वाय पाटलांच्या भेटीनंतर ते शरद पवार यांच्यासोबत जाण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जातंय.


Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला

Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला Hathras stampede Bhole Baba : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोलेबाबा यांच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये 121 जणांचा बळी गेला. दुर्घटनेनंतरची दृश्य ही मन विषण्ण कऱणारी होती. देवाचा धावा करण्यासाठी आलेले भाविक थेट देवाघरी पोहोचलेत.यात कुणाची आई आहे.कुणाचा बाप आहे. कुणाची बहीण, कुणाचा भाऊ आहे. तर कुणाचे इवले इवले पोटचे गोळे आहेत. सिकंदराबादच्या फुलरई गावात भोलेबाबा नावाच्या महाराजाचा सत्संग आयोजित केला होता. आणि याच सत्संगानंतर, या बाबाच्या पायाखालची माती घेण्यासाठी जत्थेच्या जत्थे धावले. आणि त्यांच्या आयुष्याची अक्षरश: माती झालीय. जिथं हा सत्संग झाला तिथं आता भयाण स्मशान शांतता पसरलीय तर ज्यांचे जीव गेले त्यांच्या घरात फक्त आणि फक्त हंबरडा आणि आक्रोश उरला आहे. हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? सत्संगासाठी 80 हजार जणांची परवानगी असतानाही त्या दिवशी 2.50 लाख भाविक जमले होते. सत्संग संपल्यावर भोलेबाबाची चरणधूळ गोळा करण्यासाठी पळापळ झाली. चरणधुळीसाठी अनेक जण बसलेल्यांच्या अंगावरून धावत गेले. यामुळे अनेक जण खाली पडले, त्यांच्या अंगावरून लोक जात राहिले. काही क्षणांत या पळापळीचं चेंगराचेंगरीत रुपांतर झालं. पुढच्या बाजूनं सत्संग समितीचे लोक भाविकांना रोखत होते. त्यामुळे मागे गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरीची तीव्रता आणखी वाढली. या दुर्देवी घटनेमध्ये जीव गुदमरून 121 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये 100 पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे. अनेकजण यामध्ये जखमीही झाले.


Manoj Jarange Maratha Reservation : मुंबईत जाण्याचं ठरलं तर; ती मोठी रॅली असणार - मनोज जरांगे

Manoj Jarange Maratha Reservation : मुंबईत जाण्याचं ठरलं तर; ती मोठी रॅली असणार - मनोज जरांगे भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सरपंचाच्या घरी झालेल्या भेटीत तब्बल दोन तास चर्चा झाली. दरम्यान, चर्चा झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भेटीत काय काय घडलं हे त्यांनी सांगितलं आहे. चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे काय म्हणाले? अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे सरकार ,समाज किंवा माध्यम म्हणून आलेत का? हा विषय महत्त्वाचा नाही. त्यांच्या माध्यमातून चर्चा सुरु राहिलं. बाकी आमच्या मागण्याबाबत पाठपुरावा सुरूच राहणार आहे. सगेसोयरेची आमच्या व्याख्येप्रमाणे अंमलबजावणी, हैदराबाद गॅजेट आणि सरसकट गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं. अशोक चव्हाण काय काय म्हणाले? आमचा सर्वांची इच्छा आहे हा विषय जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढा संपलेला बरा. आमच्या चर्चेत राजकीय चर्चेचा विषयच नव्हता. शासन आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वयाची आवश्यकता आहे. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असून हा विषय लवकर संपवा अशी आमची भावना असल्याने संवाद होण्याच्या कारणाने आपण आल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. शनिवारपासून मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला सुरुवात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची शनिवारपासून शांतता रॅले सुरु होणार आहे. त्यापूर्वीच राज्यसरकार अॅक्शनमोडवर आलं आहे. येत्या सोमवारपासून शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहे. शिंदे समितीचा हा 4 दिवसांचा हैद्राबाद दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये शिंदे समिती मनोज जरांगेंच्या हैदराबाद गॅझेटच्या मागणीबाबत पुरावे गोळा करण्यात येणार आहेत. या कामात मदत करावी अशी विनंती राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी तेलंगणाच्या मुख्य सचिवांना पत्र देऊन केली आहे. 13 जुलैपर्यंत सरकारने सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही तर 288 उमेदवार पाडायचे की उभे करायचे याबाबत विचार करावा लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे.


CBSE Board Exam 2025: सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा पॅटर्न बदलणार; आता वर्षभरात दोनदा परीक्षा घेण्यावर भर

CBSE Latest News in Marathi: CBSE 2025 बोर्ड परीक्षेत मोठा बदल होऊ शकतो. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचे धोरण वर्षातून दोनदा लागू करण्याची तयारी शिक्षण मंत्रालयाने तीव्र केली आहे. सीबीएसई बोर्ड परीक्षेचा पॅटर्न तयार करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील मुख्याध्यापकांकडून सूचना मागवल्या आहेत.


Tuljapur Chocolate Har : तुळजाभवानीला भक्ताकडून चॉकलेटचा हार

Tuljapur Chocolate Har : तुळजाभवानीला भक्ताकडून चॉकलेटचा हार तुळजाभवानी देवीला घातला चॉकलेटचा हार - चॉकलेटचा हार घातल्याने वाद उद्भवण्याची शक्यता भक्ताने दिलेला चॉकलेटचा हार पुजाऱ्याने मंदीर संस्थांच्या परवानगी विना घातला देवीला तुळजाभवानी मंदीर संस्थानला देऊन कवायत कायदा लागु असताना त्याची अमलबजावणी केली जात नसल्याचा पुजाऱ्याचा आरोप देवीच्या गाभाऱ्यात केवळ फुलांचे हार व फळांनी सजवला जातो गाभारा - ऐतिहासिक ठेवा असताना तो तसाच राहावा पुजारी मंडळाने व्यक्त केली भुमीका चॉकलेटचा हार घातल्याने वाद उद्भवण्याची शक्यता -चुकीची पध्दत नको - जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांची मागणी हेही वाचा : रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट, गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार. महायुतीचा आज संध्याकाळी मेळावा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, तर आरोप करणारेच घोडेबाजार करतात, नाना पटोलेंचा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट..राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवर चर्चा विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी. दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग... पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर..३ ते १० वर्षांची शिक्षा तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद...मंंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक..


PM Awas Yojana: पीएम आवास योजना शहरी 2.0 लवकरच सुरू होणार; 1 कोटी घर बांधणार

Pradhan Mantri Awas Yojana: पंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 लॉन्च करण्याची सरकारने तयारी सुरू केली आहे. या योजने अंतर्गत शहरी भागातील नागरिकांना घर खरेदीत लाभ मिळणार आहे. जाणून घेऊयात सरकारचं काय आहे प्लानिंग...


ECHS Recruitment 2024: ईसीएचएसअंतर्गत ८वी पास ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरी; ७५,००० रुपये पगार

ECHS Recruitment 2024 Applications: तुम्ही आठवी पास असाल आणि सरकी नोकरीच्या शोधात असाल तर हि संधी वाया जाऊ देऊ नका. माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना म्हणजेच ईसीएचएस अंतर्गत ८ वी पास, १० वी पास, १२ वी पास आणि पदवीधर उमेदवारांची रिक्त पदांवर नियुक्त करण्यासाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या जागांसाठी १५ जुलैपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.


UCO Bank Recruitment: परीक्षा न देता बँकेत नोकरी, युको बँकेने 'या' पदांसाठी मागवले अर्ज

UCO Bank Apprentice Recruitment 2024: युको बँकेत एकूण ५४४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.


बुद्धीचा तो लोप

स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता वयाच्या साधारण ५७व्या वर्षानंतर असते. अलीकडे मात्र हा आकडा ‘वर’ आला आहे. अगदी तरुण मुलांना, लहान मुलांनाही विस्मरण होण्याच्या घटना बघायला मिळतात. कमी वयात साध्या-साध्या गोष्टी सहजपणे विसरणे अनेक संशोधनातून आढळून आलेले आहे. हे इंटरनेटच्या अतिवापरामुळे घडते आहे का?