SWINE FLU : महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचा शिरकाव, दोघांच्या मृत्यूने खळबळ

बब्बू शेख, मालेगाव : नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा धोका वाढला असून दोघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मालेगावात दोघांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आलीय. दोन्ही रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, स्वाइन फ्लूचा शिरकाव झाला तरी आरोग्य यंत्रणेकडून म्हणावी तशी पावले उचलली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर मालेगाव महापालिकेने नागरिकांनी घाबरू नये, सतर्क रहावे असे आवाहन केले आहे.

मालेगावात 63 वर्षांच्या महिलेचा 5 एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. स्वाइन फ्लूची लागण झाल्यानंतर महिलेवर नाशिकमध्ये उपचार केले जात होते. स्वाइन फ्लूची लागण झालेल्यांच्या संपर्कातील रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. आता महिलेनंतर आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 20 दिवसात दोन जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. एका माजी कृषी अधिकाऱ्यासह दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकां मध्ये खळबळ उडाली.स्वाईन फ्ल्यू पसरू नये यासाठी महानगर पालिकेचे आरोग्य विभाग अलर्ट झाले असून विविध उपाय योजना केल्या जात असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री आहेर यांनी दिली.

सर्दी, खोकला, ताप किंवा चालताना दमा लागणं ही स्वाइन फ्लूची लक्षणे असून यापैकी काही त्रास असल्यास लगेच जवळच्या रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्या. औषधोपचार घ्या, घाबरू नका अशा सूचना महापालिका आणि आरोग्य विभागाने केल्या आहेत. स्वाइन फ्लू बरा होतो त्यामुळे घाबरू नका असंही महापालिकेच्या आरोग्य अधिकारी जयश्री अहिरे यांनी सांगितलं.

2024-04-27T04:07:20Z dg43tfdfdgfd