बातम्या

Trending:


MSRTC File Pending : मुख्यमंत्र्यांच्या हलगर्जीपणाचा एसटीच्या प्रवाशांना फटका, हा निर्णय अडकला लालफितीत

MSRTC File Pending : राज्यातील ग्रामीण भागाची लाईफलाईन असलेल्या एसटीला आणखी मजबूत करण्यासाठी एसटी महामंडळाने 2200 नवीन बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या नवीन बस मार्चमध्ये एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार होत्या. मात्र महामंडळासाठी बसेस खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या निधीच्या फाईलवर मुख्यमंत्र्यानी सही केली नसल्याने एसटीला मिळणाऱ्या 2200 गाड्या रखडल्या आहेत.


Satara | 'उदयनराजेंचं वक्तव्य तर्कहिन' बाळासाहेब थोरांतांचं प्रत्युत्तर

Loksabha 2024 Udayanraje Bhosle vs BalasabhebThorat


Loksabha Election 2024 : आधी लगीन लोकशाहीचा! लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी मतदान केंद्रावर पाऊल

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा पार पडला... या लोकशाहीच्या सणादिवशीच अनेकांच्या लग्नाचेही मुहूर्त होते. हाच दुग्धशर्करा योग साधत, अनेकांनी मुंडावळ्या बांधत लोकशाहीचंही भान जपलं... नांदेडच्या रुपाली भांगे आणि गजानन माने यांनी लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी मतदान केंद्रावर पाऊल ठेवत मतदानाचा हक्क बजावला. तर हिंगणघाट येथील जगदीश वैद्य यांनीही लग्नाच्या अक्षता पडण्याआधी मतदानावर शिक्का मारला. तर हिंगणघाटच्या प्रफुल्ल राऊत यांनीही लग्नाची वरात निघालेली असताना मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचं कर्तव्य पार पाडलं...


Maharashtra Weather Forecast : बापरे..! राज्यात 3 दिवस पुन्हा उष्णतेची लाट, तर या भागात पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra weather update : राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा कहर सुरु आहे. गेल्या काही दिवसात तापमानात वाढ होत काही ठिकाणी तापमानाने 43 अंशाचा टप्पा पार केला आहे. अशात पुन्हा उष्णतेच्या लाटेसह अवकाळीचे संकट कायम आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


Crime News : खुनीहल्ल्यातील फरार हल्लेखोर अखेर जेरबंद

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : आंबी (ता. हवेली) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेच्या दिवशी किरकोळ कारणावरून योगेश रामचंद्र निवंगुणे (वय 30, रा. कुंबळवाडी, आंबी, ता. हवेली) याच्यावर खुनीहल्ला करणार्‍या सहा फरार हल्लेखोरांना हवेली पोलिसांनी बुधवारी (दि. 24) अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. न्यायालयाने 6 हल्लेखोरांना सोमवार (दि. 29) पर्यंत पोलिस कोठडीत, तर …


ESIC Recruitment 2024 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ईएसआयसी अंतर्गत या जॉबकरता निवड झाल्यास मिळणार लाखोंच्या घरात पगार

ESIC Vacancy 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात अधिकाऱ्यांच्या पदांसाठी भरती आली आहे. जर तुम्हाला येथे मोठ्या पॅकेजवर सरकारी नोकरी मिळवायची असेल, तर या भरतीशी संबंधित सर्व तपशील काळजीपूर्वक वाचा.


Nanded Ramtirtha EVM : नांदेडच्या रामतीर्थ मतदार केंद्रावर ईव्हीएमची कुऱ्हाडीने तोडफोड

नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर एक गंभीर प्रकार घडला आहे. भानुदास एडके या व्यक्तीने मतदान केंद्रात प्रवेश करत चक्क VVPAT मशीन आणि बलेट मशीन कुऱ्हाडीने तोडून टाकली. या व्यक्तीने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचे ओरडत होता. मतदान केंद्रावर ग्रह रक्षक दलाचे कर्मचारी तैनात होते पण त्यांचाही नाईलाज झाला. या फोडलेल्या मशीन मध्ये अंदाजे 500 मतदान झाले होते. पण कंट्रोल युनिट सुरक्षित असल्याने झालेले मतदानही सुरक्षित असल्याचं प्रशासनाचा दावा आहे.


Baburao Kohalikar Voting : बाबुराव कोहळीकरांनी व्यक्त केला विजयाच विश्वास

Baburao Kohalikar Voting : बाबुराव कोहळीकरांनी व्यक्त केला विजयाच विश्वास. चार जूनला निकालात पुन्हा एकदा आला बाबूराव हे गाणं तुम्हाला वाजलेला दिसेल.माझी ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली त्यामुळे मला वेळ तसा कमी मिळाला. पण जो काही वेळ मिळाला त्याच्यात रात्रंदिवस मी काम केलं आणि तयारी केली. माझ्यासोबत असणारे या सगळ्या लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. नागेश पाटील आष्टीकर यांना चार्जिंगला कळेल की कोणता उमेदवार त्यांच्यासाठी जड होता. 4 जूनला पुन्हा एकदा आला बाबूराव हे गाणं वाजेल


पनवेलमधील शोरुममध्ये पावणेदोन लाखांची चोरी

पनवेल शहरातील शीव पनवेल महामार्गालगत पनवेल इंडस्ट्रीयल कॉ.ऑप. इस्टेटमधील हॉलमार्क मोटार कंपनीच्या शोरुममध्ये बुधवारी पहाटे पावणेदोन लाख रुपयांची चोरी झाली आहे.


Devendra Fadnavis Mumbai : नक्कीच महायुतीचे उमेदवार विजयी होतील : फडणवीस

Devendra Fadnavis Mumbai : नक्कीच महायुतीचे उमेदवार विजयी होतील : फडणवीस


Supreme Court : ईव्हीएम, व्हीव्हीपॅट संदर्भातील सर्व याचिका कोर्टानं फेटाळल्या

Supreme Court : ईव्हीएम, व्हीव्हीपॅट संदर्भातील सर्व याचिका कोर्टानं फेटाळल्या


Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 26 एप्रिल 2024

Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 26 एप्रिल 2024


रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा व पायाभूत कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेवर ब्लाॅक घेण्यात येणार आहे.


अग्रलेख: महाराष्ट्र ‘दीन’!

दोम्माराजू गुकेशने अवघ्या १७व्या वर्षी बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये आव्हानवीर बनण्याचा मान पटकावला. गुकेश चेन्नईचा. त्यामुळे त्यानिमित्ताने विश्वनाथन आनंदच्या ‘चेन्नई वंशावळी’चा गौरव होणे स्वाभाविकच.


MHADA, CIDCO Housing Lottery : म्हाडा, सिडकोचा महत्त्वाचा निर्णय; अनेकांना मिळणार हक्काचं घर

MHADA, CIDCO Housing Lottery : म्हाडाकडून राज्यभरात सर्वसामान्यांना स्वस्तात घरं उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकल्पांची उभारणी केली जाते आणि त्यांची लॉटरी पद्धतीने विक्री केली जाते. परंतु आता म्हाडाने लॉटरीत समाविष्ट असणारे आणि विक्री न झालेली घरं आता मास बुकिंगच्या माध्यमातून सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


Ahmedabad Mumbai Bullet Train Project: बुलेट ट्रेनचे काम सुसाट, दुसऱ्या स्टील ब्रिजचा व्हिडिओ बघितला का ?

Ahmedabad Mumbai Bullet Train Project: अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प हा भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रोजेक्ट आहे. अहमदाबाद आणि मुंबई या दोन शहरांमध्ये 508 किलोमीटर लांब बुलेट ट्रेन कॉरिडोर बांधण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी (Bullet Train Updates) तयार करण्यात येणाऱ्या 28 ब्रिजपैकी दुसरा ब्रिज आज आज लाँच करण्यात आला आहे.


Manoj Jarange Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंची विधानसभा लढण्याची घोषणा; सर्व मतदारसंघात देणार उमेदवार

Manoj Jarange Patil announcement to contest Maharashtra Assembly Elections: लोकसभा निवडणूक रंगात आलेली असतानच आता जरांगे यांनी विधानसभा लढवण्याची घोषणा केली आहे. लोकसभेला उमेदवार दिले नाही, परंतु आम्ही आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत. विधानसभेला राज्यातली सर्व 288 मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.


Hello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणं

Hello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणं


ShantiGiri Maharaj Nashik Loksabha:शांतिगिरी महाराजांचा अपक्ष अर्ज, 29 एप्रिलला जोरदार शक्तिप्रदर्शन

शांतिगिरी महाराज लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. आज त्यांनी नाशिक लोकसभेसाठी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आता 29 एप्रिलला शक्तिप्रदर्शन करत आणखी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे. शांतिगिरी महाराजांची मालमत्ता 38 कोटी रूपये इतकी आहे.


Sanjay Jadhav and Mahadev Jankar : जाधवांची मशाल की जानकरांची शिट्टी?

देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 8 मतदारसंघात मतदान होईल. यापैकी परभणीच्या निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष लागलंय. विद्यमान खासदार उबाठा गटाचे संजय जाधव आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यात ही लढत आहे.


भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्लाप्रकरणी एकाला अटक

ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्तालयावर मार्च २०२३मध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी एका व्यक्तीला भारतामध्ये अटक केली.


उदयनराजे भोसले यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Udayanaraje Bhosale's serious accusation against Congress


लक्ष्मीदेवीला घुबड हे वाहन कसं मिळालं? पुराणात सांगितली आहे रंजक कथा

मुंबई : भारतीय पुराणातल्या कथांनुसार प्रत्येक देवी-देवतांकडे स्वतःचं वाहन आहे. त्यामुळे त्या वाहनांना अर्थात त्या प्राणी व पक्ष्यांना आपल्या धर्मामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. भगवान शंकरांचं वाहन नंदी, गणपतीचं वाहन उंदीर, कार्तिकेयांचं वाहन मोर, भगवान विष्णूंचं वाहन गरुड हे सर्वांना माहीत आहे. तसंच लक्ष्मीदेवीचं वाहन घुबड हे आहे. लक्ष्मीदेवीला हे वाहन कसं मिळालं यामागे एक रंजक कथा आहे.भगवान विष्णू व लक्ष्मीदेवीची उपासना अनेक जण करतात; मात्र माता...