MAHARASHTRA WEATHER FORECAST : बापरे..! राज्यात 3 दिवस पुन्हा उष्णतेची लाट, तर या भागात पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra weather update : राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेसह (heat wave) अवकाळी पावसाचा (unseasonal rain) कहर सुरु आहे. गेल्या काही दिवसात तापमानात वाढ होत काही ठिकाणी तापमानाने 43 अंशाचा टप्पा पार केला आहे. अशात पुन्हा उष्णतेच्या लाटेसह अवकाळीचे संकट कायम आहे. हवामान खात्याने (imd) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील नागरिक सध्या सुरु असलेल्या या संमिश्र वातावरणानुळे त्रस्त असताना आता पुन्हा तापमानात वाढ होत उष्णतेच्या लाटेमुळे चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात 27 ते 29 एप्रिल या तीन दिवसांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबईसह (mumbai weather) विदर्भात उष्णतेची लाट तीव्र असेल. यासह अवकाळी पावसाचे संकट देखील कायम आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यापासून उत्तर तमिळनाडूपर्यंत तसेच मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपासून विदर्भ, मराठवाडा आणि कर्नाटकपर्यंत हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाची शक्यता आहे. त्यानुसार, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, लातूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथे तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर वाशिम, यवतमाळ, वर्धा, अकोला, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यासह वातावरणाच्या खालच्या थरातील द्रोणीका रेषा ही मराठवाडा व लगतच्या मध्य महाराष्ट्रावर असलेल्या चक्रीय स्थितीमधून जाऊन ते तमिळनाडूपर्यंत जात आहे. आणखी एक द्रोणीका रेषा ही दक्षिण मध्य महाराष्ट्र व कर्नाटक पर्यंत जात आहे. यामुळे आज महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकणात पुढील दोन ते तीन दिवस वातावरण उष्ण व दमट राहील आज रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तवली आहे.

2024-04-26T04:43:01Z dg43tfdfdgfd