MANOJ JARANGE PATIL: मोठी बातमी! मनोज जरांगेंची विधानसभा लढण्याची घोषणा; सर्व मतदारसंघात देणार उमेदवार

Manoj Jarange Patil announcement to contest Maharashtra Assembly Elections: राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे देखील जरांगे यांनी म्हटले आहे. प्रचंड ताकदीने मराठा समाज ज्यांच्या पाठीमागे उभा आहे असे नेते असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडली आहे.

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकूण 7 टप्प्यात लोकसभेचं मतदान होणार आहे. त्यातील दोन टप्प्यातील मतदान पू्र्ण झाले आहे. देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ही अतिशय महत्त्वाची निवडणूक मानली जात आहे. असे असताना जरांगे पाटील यांनी मात्र या निवडणुकीत तटस्त राहत मराठा समाजाला योग्य उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. परंतु लोकसभा निवडणूक रंगात आलेली असतानच आता जरांगे यांनी विधानसभा लढवण्याची घोषणा केली आहे. लोकसभेला उमेदवार दिले नाही, परंतु आम्ही आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत. विधानसभेला राज्यातली सर्व 288 मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. जरांगे यांच्या या घोषणेमुळे सर्वच राजकीय पक्षांचे टेन्शन वाढले आहे.

मराठा समाजाचं जरांगे यांना समर्थन

राज्यात मोठ्या संख्येने असेला मराठा समाज मनोज जरांगे यांच्या पाठीशी आहे. जरांगे यांनी रज्यभारत केलेल्या आंदोलनाला आणि त्यांच्या मोर्चाला मराठा सामाजाने ऐतिहासिक गार्दी करून पाठिंबा दर्शवला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांनी उभारलेल्या या लढ्याला मुस्लीम बांधवांनी देखील समर्थन दिल्याचे राज्याने पाहिले आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी केलेली विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा ही राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. लोकसभा निवडणूका सुरु असतानाच मनोज जरांगे यांनी विधानसभेचं रणशींग फुंकलं आहे.

एक महिन्यांपासून सुरु केली तयारी

मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही विधानसभेची तयारी एक महिन्यांपासून सुरु केली आहे. मराठे, दलित आणि मुस्लिम बांधवानी मिळून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. लोकसभेला उमेदवार दिले नाही, मात्र आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत. विधानसभेला राज्यातील सर्व 288 मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत असेही जरांगे पाटील यांनी सांगितले. जरांगे यांच्या या घोषणेनंतर आता ते मराठा आंदोलक उमेदवार देणार की एखाद्या पक्षाची स्थापना करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

जरांगेंनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 8 मतदारसंघात आज मतदान झाले. मनोज जरांगे यांनी प्रकृती बरी नसतानाही परभणी मतदारसंघातील शहागडच्या गोरी गांधारी येथे मतदानाचा हक्क बजावला. छत्रपती संभाजीनगरहून ते रुग्णवाहिकेतून मतदानकेंद्रापर्यंत पोहोचले आणि मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी नागरिकांना 100 टक्के मतदान करण्याचे देखील आवाहन केले.

2024-04-26T17:00:01Z dg43tfdfdgfd