लक्ष्मीदेवीला घुबड हे वाहन कसं मिळालं? पुराणात सांगितली आहे रंजक कथा

मुंबई : भारतीय पुराणातल्या कथांनुसार प्रत्येक देवी-देवतांकडे स्वतःचं वाहन आहे. त्यामुळे त्या वाहनांना अर्थात त्या प्राणी व पक्ष्यांना आपल्या धर्मामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. भगवान शंकरांचं वाहन नंदी, गणपतीचं वाहन उंदीर, कार्तिकेयांचं वाहन मोर, भगवान विष्णूंचं वाहन गरुड हे सर्वांना माहीत आहे. तसंच लक्ष्मीदेवीचं वाहन घुबड हे आहे. लक्ष्मीदेवीला हे वाहन कसं मिळालं यामागे एक रंजक कथा आहे.

भगवान विष्णू व लक्ष्मीदेवीची उपासना अनेक जण करतात; मात्र माता लक्ष्मीच्या वाहनाची माहिती फारशा लोकांना नसते. घुबड हे लक्ष्मीदेवीचं वाहन आहे. शुक्रवारी लक्ष्मीदेवीची प्रार्थना केली जाते. ज्या घरी लक्ष्मीदेवीचा वास असतो, त्या घरी आर्थिक सुबत्ता असते. लक्ष्मीदेवीची प्रार्थना जिथे केली जाते, त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही. त्या घरी सुख-समृद्धी नांदते. आपल्या देवी-देवतांना स्वतःचं असं वाहन आहे. तसंच ते लक्ष्मीदेवीलाही आहे. हे वाहन लक्ष्मीदेवीला कसं मिळालं, याची एक रंजक कथा आहे.

कंजूष लोकांच्या जन्मतारखा या असतात; खिशातून पैसे देतानाही हात थरथरतात

पौराणिक कथांनुसार, प्राण्यांचं जग निर्माण झाल्यावर स्वर्गातल्या देवी व देव स्वतःसाठी वाहन म्हणून प्राण्यांची निवड करत होते. लक्ष्मीदेवीही त्यांचं वाहन निवडण्यासाठी पृथ्वीवर आल्या. सगळ्याच प्राणी-पक्ष्यांनी आपली निवड करावी म्हणून लक्ष्मीदेवींकडे आग्रह धरला. यावर लक्ष्मीदेवींनी सर्वांना शांत केलं व सांगितलं, की कार्तिक महिन्यातल्या अमावास्येला मी पृथ्वीवर येते. तेव्हा जो प्राणी किंवा पक्षी सर्वांत आधी माझ्याजवळ येईल त्यालाच माझं वाहन बनण्याचा मान मिळेल.

लक्ष्मीदेवींनी सांगितल्यानुसार कार्तिक महिन्याची अमावास्या तिथी आली. अमावास्या असल्यामुळे सगळीकडे गडद अंधार होता. त्यामुळे सगळे प्राणी व पक्ष्यांना अंधूक दिसत होतं. सामान्यपणे इतर प्राणी व पक्ष्यांना रात्रीच्या गडद काळोखात स्पष्ट दिसत नाही; मात्र घुबडाला रात्री स्पष्ट दिसतं. त्यामुळे लक्ष्मीदेवी पृथ्वीवर आल्या, तेव्हा सगळ्यात आधी घुबड त्यांच्यापाशी पोहोचलं. माता लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न झाल्या व त्यांनी घुबडाला आपलं वाहन होण्याचा मान दिला.

कोण आहे कल्की? भारतात या राज्यात अवतरणार का अन् खरंच होईल कलियुगाचा शेवट?

घुबड दिसणं हा शुभ संकेत मानला जातो. विशेषतः दिवाळीच्या दिवशी घुबडाचं दर्शन झालं, तर ते शुभ समजलं जातं. घुबड आर्थिक समृद्धीचं प्रतीक असतं. असं म्हणतात, की घुबडाला भूतकाळाबाबत आणि भविष्याविषयी सगळ्यात आधी समजतं.

अनेक शुभ प्रतीकांमध्ये घुबडाचा वापर केला जातो. लक्ष्मीदेवीचं वाहन असल्यानं घुबडालाही सुबत्ता व समृद्धीचं प्रतीक समजलं जातं.

2024-04-27T01:36:54Z dg43tfdfdgfd