CCTV INSTALLATION TIPS: घरामध्ये लावायचाय CCTV कॅमेरा; आधी तपासा 'या' 4 गोष्टी, नाहीतर पैसे जातील वाया

जर तुमचे लहान मुलं किंवा पालक घरी एकटे राहत असतील तर त्यांच्या सुरक्षिततेची चिंता असणे स्वाभाविक आहे. घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले तर ऑफिस किंवा कामानिमित्त बाहेरगावी गेले तरी घरावर लक्ष ठेवता यावे अशी अनेकांची इच्छा असते. याशिवाय तुम्ही एकटे राहत असाल तर तुमच्या घराच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पूर्वी फक्त दुकाने, मॉल अशा सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही लावले जायचे, पण आता लोकांनी ते घरामध्येही बसवायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत पैशांचा अपव्यय होऊ नये म्हणून कोणत्या प्रकारचा सुरक्षा कॅमेरा बसवायचा हे ठरवणे आवश्यक आहे.

कॅमेरा रेंज

घरासाठी सीसीटीव्ही कॅमेरा घेतांना ज्याची रेंज किमान 20-25 मीटर आहे असा कॅमेरा घ्या. जितकी रेंज चांगली असेल तितक्या दूरच्या वस्तू टिपणे सोपे जाते. रेंज इमेज सेन्सरच्या आकारावर तसेच लेन्सच्या फोकल लांबीवर अवलंबून असते.

व्हिडिओ क्वालिटी

सर्वोत्कृष्ट सीसीटीव्ही कॅमेराचा व्हिडिओ 720p आणि 1080p रिझोल्यूशनसह येतो. तुम्हाला हे माहित असले पाहिजे की रिझोल्यूशन जितके जास्त असेल तितकी व्हिडिओ गुणवत्ता चांगली असेल. त्यामुळे कॅमेऱ्याची गुणवत्ता तपासणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही खरेदी करत असलेल्या कॅमेरामध्ये तुमचे पैसे वाया जाणार नाहीत.

SD कार्ड स्लॉट

CCTV कॅमेरे सहसा इनबिल्ट SD कार्ड स्लॉटसह येतात. रेकॉर्डिंगसाठी युजर्स 32GB, 64GB किंवा 128GB घेऊ शकतात. काही स्वस्त सीसीटीव्ही कॅमेरे इंटरनल स्टोअरेजसह प्रोव्हाईड केलेले नाहीत. त्यामुळे SD कार्ड देणारा कॅमेरा खरेदी करा.

मोशन सेन्सर

जर तुम्ही थोडा जास्त खर्च करू शकत असाल तर मोशन सेन्सर देणारे सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करा. अशा कॅमेऱ्यांची किंमत इतरांपेक्षा थोडी जास्त असली तरी हे सेन्सर कोणताही अनावश्यक आवाज किंवा हालचाल ओळखू शकतात आणि ॲपद्वारे युजर्सना सतर्क करू शकतात.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-30T08:47:44Z dg43tfdfdgfd