बातम्या

Trending:


BSF Constables Missing: बीएसएफच्या दोन महिला कॉन्स्टेबल गायब, लास्ट लोकेशन परराज्यात, आईला वेगळाच संशय

Women Mysteriously Missing From BSF Academy: बीएसएफच्या दोन महिला कॉन्स्टेबल अचानक गायब झाल्याने खळबळ माजली आहे. त्या गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता आहेत. तर या प्रकरणी एका महिलेल्या आईने मोठी भीती व्यक्त केली आहे.


असांज आता काय करणार?

Julian Assange :'हॅकिंग विश्वाचा रॉबिनहूड' अशी ओळख असणारे ज्युलियन असांज यांची नुकतीच सुटका झाली. या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा हा आढावा...


SSC Recruitment 2024: सरकारी नोकरीची संधी, कर्मचारी निवड आयोगात ८ हजारांपेक्षा अधिक जागांसाठी भरती

Staff Selection Commission Recruitment: कर्मचारी निवड आयोगात एकूण ८ हजार ३२६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसंदर्भात आवश्यक माहिती जाणून घेऊयात.


Nawab Malik : मलिक बैठकीत, घेणार महायुतीत? फडणवीस काय भूमिका घेणार? Special Report

माजी मंत्री नवाब मलिक यांनी अजित दादांनी बोलवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला हजेरी लावली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागच्या अधिवेशनातील पत्राची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली. त्याचसोबत, ज्यांना विरोध केला त्या नवाब मलिकांना महायुतीत घेणार का? असा सवालही आता विचारला जाऊ लागलाय... पाहूयात याबाबतचा एक रिपोर्ट अजित पवार यांनी बोलवलेल्या बैठकीत नवाब मलिक उपस्थित असल्याची ही दृश्य... ही दृश्य जेव्हा बाहेर आली तेव्हा अनेकांच्या भुवया वर गेल्या आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या... अजित पवार राष्ट्रवादीत सर्वात मोठं आणि ऐतिहासिक बंड करत सत्तेच्या मांडवाखाली आले... त्याचवेळी नवाब मलिकांवरून जोरदार खटके उडाले होते... खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना सोबत घेण्याबाबत नाराजीची भूमिका मांडत अजित पवारांना पत्र लिहिलं


Maharashtra Vidhan Parishad : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं Mahayuti vs MVA Special Report

सध्या विधानपरिषद निवडणुकीची जोरदार चर्चा रंगलीय... कुणी कुणाला उमेदवारी दिली याची चर्चा तर रंगली आहेच... मात्र त्याचसोबत, कोणत्या उमेदवाराची किती संपत्ती आहे... आणि उमेदवारांनी संपत्तीच्या बाबतीत कशी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतलीयत... पाहूयात... पंकजा मुंडेंची संपत्ती किती? उत्पन्नाचा स्त्रोत- शेती, माजी आमदार निवृत्तीवेतन, भाडे बँक खात्यांत- ९१ लाख २३ हजार ८६१ शेअर्स, म्युच्युअल फंड- १ कोटी २८ लाख, ७५ हजार ६९४ स्वत:च्या नावावर एकही वाहन नाही स्थावर मालमत्ता- ९६ लाख, ७३ हजार, ४९० जंगम मालमत्ता- ६ कोटी ८ लाख, १५ हजार, ७०९ एकूण कर्ज- २ कोटी, ५० लाख, ३२ हजार ४२७ सोने- ४५० ग्रॅम (३२ लाख, ८५ हजार) ------------------- मिलिंद नार्वेकरांची संपत्ती किती? उत्पन्नाचा स्त्रोत- घरांचे भाडे, व्यावसायिक उत्पन्न बँक खात्यांत- ७४ लाख १३ हजार, २४३ बॉण्ड्स, म्युच्युअल फंड- ५० हजार रुपये पोस्ट, पॉलिसीमध्ये- ३ लाख ६८ हजार, ७२९ स्वत:च्या नावावर एकही कोणतेही वाहन नाही सोने- ३५५ ग्रॅम (२४ लाख, ६७ हजार ९८१) जमीन- दापोली येथे ७४ एकर जमीन मालाड, बोरीवली १ हजार चौरस फुटाचं घर एकूण कर्ज- २६ लाख, ३८ हजार, १६० रुपये --------------- भावना गवळी यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा स्त्रोत- घरांचे भाडे, व्यावसायिक उत्पन्न बँक खात्यांत- २१ लाख २५ हजार ०१६ रुपये बॉण्ड्स, म्युच्युअल फंड- २७ हजार ७०० हजार रुपये पोस्ट, पॉलिसीमध्ये- २० लाख वाहन - टोयाटो इनोव्हा- २४ लाख ३७ हजार रुपये सोने- २०० ग्रॅम (१३ लाख ६० हजार ) जमीन- रिसोड येथे ५ एकर ५६ गुंठे जमीन वाशिममध्ये ५ हजार चौरस फुटाचं घर ------------------- सदाभाऊ खोत यांची संपत्ती बँक खात्यांत- २ लाख ०८ हजार ८४० बॉण्ड्स, म्युच्युअल फंड- ५३ हजार रुपये पोस्ट, पॉलिसीमध्ये- ५८ लाख ९ हजार ५०० वाहन - टोयाटो इनोव्हा क्रिस्ट- २९ लाख रुपये एमजी हेक्टर झेड एस इव्ही किंमत २३ लाख सोने- १५ ग्रॅम (१३ लाख ६० हजार ) सांगली ६१२ चौरस फुटांचं घर


नीट पेपरफुटी प्रकरणात पालकांकडून पैशांची फसवणूक

NEET Exam Paper Leak Accused And Wife Account Showing Transaction Of 7 Lakhs


Password Safety: 17 टक्के भारतीय नागरिक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत बेफिकीर; सर्वेक्षणातून आले समोर

Password Safety negligence : 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षितपणे पासवर्ड जतन करतात, सर्वेक्षणात धक्कादायक सत्य उघड झाले: भारतीय लोक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत निष्काळजी वृत्ती बाळगतात. लोकांना त्यांच्या फोनमध्ये पासवर्ड सेव्ह करण्याची किंवा नोटपॅडवर लिहून ठेवण्याची सवय असते. अशा निष्काळजीपणामुळे डेटा चोरीचा धोका वाढतो. एका सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षित पद्धतीने पासवर्ड सेव्ह करतात.


Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठक

मुंबई: हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली आहे. या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील राजकीय समीकरणं बदलणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे संतोष बांगर यांची भेट झाल्यानंतर हिंगोलीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. अधिवेशनाच्या कालावधीत ही भेट झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्या दरम्यान संतोष बांगर आणि त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्या गेल्या. पण आता हे दोन्ही नेते अब्दुल सत्तारांच्या घरी भेटले आणि ही भेट गुप्त होती. त्यामुळेच ही भेट हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणं बदलवणारी ठरण्याची शक्यता आहे.


Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray : चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं स्वागत : ABP Majha

Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray : चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं स्वागत : ABP Majha मुंबई: महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन म्हणून पाहिल्या जाणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून मुंबईत सुरुवात झाली. कालच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापल्या पत्रकारपरिषदांमध्ये परस्परांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कटूता पाहायला मिळेल, असा अंदाज होता. मात्र, आज सकाळी...


Nanded | एसटी बस वाहक आणि प्रवाशात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

ST Driver and Passanger Rada in Nanded


Sawantwadi News | सावंतवाडी ZP शाळेचा एक भाग कोसळला

Sawantwadi news zp school bad condition


जायकवाडीवर ड्रोनद्वारे टेहळणी

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पावर मंगळवारी रात्री दहानंतर चार ते पाच ड्रोन भिरभिरताना आढळून आले. या प्रकाराने खळबळ उडाली.


MLA Fund : निधीवाटपावरुन जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप, भाजपकडून सभागृहात गदारोळ

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या निधीवाटपावरुन महायुती सरकारवर गंभीर आरोप, मला आमदार निधी मिळला नाही अशी खंत आव्हाडांनी सभागृहात बोलून दाखवली.


Maharashtra NEET Counselling 2024: सुरू होत आहे महाराष्ट्र नीट काऊन्सिलिंग, ही कागदपत्रे तयार ठेवा

NEET Counselling Documents List: महाराष्ट्रातल्या NEET काऊन्सिलिंग २०२४ मधून राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा भरण्याचा उद्देश असेल. ज्यातील १०,१४५ जागा या MBBS पदवीसाठी तर ३,५४६ जागा BDS म्हणजेच दंतचिकित्सेच्या पदवीसाठी काऊन्सिलिंग होईल. महाराष्ट्र NEET काऊन्सिलिंग २०२४ हे ३ फेऱ्यांमध्ये होईल. मेरिट लिस्टच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. तरीही जागा शिल्लक असल्यास अखेर स्ट्रे वेकन्सी फेरी होईल.


Astronaut Sunita Williams : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकून पडल्या? आतापर्यंत काय काय घडलं अन् परतीचा प्रवास कसा असणार??

Astronaut Sunita Williams : 'नासा'च्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Astronaut Sunita Williams) सहकारी बॅरी विल्मोर यांच्यासोबत दीर्घकाळापासून अंतराळात अडकल्या आहेत. हे मिशन केवळ 8 दिवसांचे होते, परंतु अंतराळ यानामधील तांत्रिक दोषामुळे अद्याप अंतराळातून परत आलेले नाहीत. अंतराळ प्रवास 5 जून रोजी भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या बोईंग स्टारलाइनरच्या (Boeing Starliner) पहिल्या उड्डाणाने सुरू झाला. परंतु स्टारलाइनरमधील...


Arvind Kejriwal | मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवालांच्या अडचणीत वाढ

CBI Arrest Delhi CM Arvind Kejriwal


Job Majha : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथे विविध पदांसाठी भरती : 3 July 2024 : ABP Majha

Job Majha : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथे विविध पदांसाठी भरती : 3 July 2024 : ABP Majha हेही वाचा BOB Jobs 2024 : बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी, 600 हून अधिक पदांवर भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या Bank of Baroda Jobs 2024 : तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात (Job Vacancy) असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत विविध पदांवर भरती करण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावा. इच्छुक आणि पात्र उमेदवार bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. बँक ऑफ बडोदामध्ये 627 पदांवर भरती बँक ऑफ बडोदामध्ये वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यात येत आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 627 पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 12 जून 2024 पासून सुरु झाली आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख 2 जुलै 2024 आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळीच अर्ज दाखल करावा.


Zero Hour Rahul Gandhi vs Narendra Modi:राहुल गांधी यांचं वक्तव्य ते नरेंद्र मोदी यांची सडेतोड उत्तर

ब्रेकनंतर झीरो अवरमध्ये पुन्हा एकदा स्वागत.. ज्यांच्या समर्थनासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंनी काल सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं.. त्या राहुल गांधींसंदर्भातली बातमी.. काल भाजपवर आरोप करत असताना राहुल गांधींनी जी जोरदार बॅटिंग केली.. त्यातीलच वक्तव्य हाताशी धरत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोक सभेत राहुल गांधींना क्लीन बोल्ड करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावासाठी लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं.. आणि मोदींनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरींचा उल्लेख केला.. सोबतच राहुल गांधींच्या कालच्या भाषणाला उत्तरं दिलं..राहुल गांधींच्या वक्तव्याचा कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध व्यक्त केला होता.. आज सकाळपासूनचं भाजपनं देशभरात निदर्शनं केली.. टीका केली.. फक्त भाजपच नाही तर आज मित्रपक्षांकडूनही राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध बघायला मिळाला. भाजपाच्या मित्रपक्षांनी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजप मित्रपक्षांमध्ये कशी एकवाक्यता दिसली.. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही राहुल गांधींवर पलटवार केलाय.. तो आधी पाहुयात.. आज म्हणायला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान बोलणार असे जरी असले, तरी उत्सुकता होती... ती राहुल गांधींना मोदी काय उत्तर देणार ह्याची... त्यांच्या भाषणाचा एक मोठा भाग राहुल गांधींवर असणार.. ही अपेक्षा होती. आणि मोदींनी अपेक्षाभंग केला नाही.. १० वर्षानंतर देशाला विरोधी पक्ष नेता मिळाला आणि काल ते पद भूषवणाऱ्या राहुल गांधींचे पहिलेच भाषण होते... त्यात त्यांचा रोख निवडणुकीसारखाच मोदी सरकार विरोधी होता... त्यालाच आज त्याच आवेशात पंतप्रधानांनी उत्तर दिले... मोदी भाषणाला उभे राहिले तेव्हापासूनच विरोधी बाकांवरून गोंधळ ऐकू येऊ लागला... मात्र मोदींनी हि न थांबता आपले भाषण सुरु ठेवले.. आणि राहुल गांधींनी काल केलेल्या प्रत्येक मुद्द्याला खोडून काढलं.. आणि राहुल गांधी यांच्या हिंदू या शब्दावरुन केलेल्या टीकेला विशेष उत्तर दिलं.. पाहुयात.. नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं.. पण, जसं भाजपच्या मित्रपक्षांनी देशभरात राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला.. अनेक ठिकाणी राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी केली.. बॅनरबाजी केली.. तिथं काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही राहुल गांधीचं समर्थन सुरु केलंय.. आणि त्याची सुरुवात झाली महाराष्ट्रातून.. उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं वक्तव्य केलं.. तर राहुल गांधींनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा उतरवल्याची टीका, संजय राऊतांनी केली.. पाहुयात..


IRCTC Ticket Booking: वेगळे आडनाव असलेल्या नातेवाईकांचे रेल्वे तिकीट बुक करणे अवैध? IRCTC ने दिले स्पष्टीकरण

IRCTC Clarification On Online Ticket Booking: सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या बातम्यांमध्ये असा दावा केला जात होता की, जर प्रवाशांची आडनाव वेगळी असेल तर त्यांना एकत्र तिकीट मिळणार नाही असे सांगितले जात होते. यावरून प्रवाशांमध्ये बराच गोंधळ झाला होता. तिकिट बुकिंग करण्याबाबत प्रवाशांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत होते. परंतु आता यावर आयआरसीटीसीने पुढे येऊन स्पष्टीकरण दिले आहे.


Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दर

Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दर हेही वाचा : देवगिरी निवासस्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची रात्री बैठक संपन्न... नवाब मलिकही बैठकीला उपस्थित..मलिकांना महायुतीत घेण्यास याआधी फडणवीसांनी केला होता विरोध उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक अटळ,शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात अंबादास दानवेंच्या शिवीगाळीबाबत उद्धव ठाकरेंनी मागितली माफी...तर अंबादास दानवेंचं निलंबन एक षडयंत्र, ठाकरेंचा हल्लाबोल तुम्ही नकली वाघांसोबत आहात इथे असली वाघांमध्ये या...वाघनखं कधी आणणार या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जयंत पाटलांना टोला... लाडकी बहीण योजनेत दोन बदल... वयाच्या मर्यादेत ६५ वर्षांपर्यंत वाढ, तर पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार.. तर अर्ज भरण्यासाठी ⁠३१ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ.. उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये भोलेबाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, ११६ भाविकांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त


‘दीक्षाभूमी’चा प्रक्षोभ

Deekshabhoomi Nagpur : दीक्षाभूमी स्मारक समितीने संवादी भूमिका टाळल्याने आणि एकूणच पारदर्शकता न दाखविल्याने हा तिढा चिघळल्याचा अनेकांचा आरोप आहे.