Trending:


Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : 'शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील, मात्र...'; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल

Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) शांतता रॅलीला आज हिंगोलीतून (Hingoli) सकाळी साडेअकरा वाजता सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीत जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अंतरवाली सराटीतून हिंगोलीकडे रवाना होण्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शांतता रॅली...


Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाचा ‘जांगडगुत्ता’!

Maharashtra Sadan Delhi : अयोध्येत, जम्मू-काश्मीरमध्ये सरकारने नवी महाराष्ट्र सदने सदने जरूर बांधावीत. पण आधी राजधानीतल्या दोन्ही सदनांतील प्रशासकीय अनास्थेचा, गडबड-गोंधळाचा ‘जांगडगुत्ता’ सोडवावा. ती इच्छाशक्ती राज्य सरकार कधी दाखवणार?


VidhanSabha | पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर

Anti Paper Leak Law Bill in Maharashra Assembly


TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :06 JULY 2024 : ABP Majha

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :06 JULY 2024 : ABP Majha रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट, गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार महायुतीची आज संध्याकाळी बैठक, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि नेते उपस्थित राहणार, विधान परिषद निवडणूक आणि शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचं मार्गदर्शन केलं जाणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट..राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवर चर्चा विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी.. दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग... मुख्यमंत्री शिंदे माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार..एक दिवस वारकऱ्यांसह करणार पायी वारी


भाजपकडून २४ राज्यांमध्ये नवे प्रभारी

महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर पुढील वर्षी जूनमध्ये बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे


bihar bridge collapses : पडझडीचे वर्तमान

bihar ten bridges collapsed : बिहारमध्ये १५ दिवसांत एक, दोन नव्हे, तब्बल १० पूल कोसळले आहेत. पूल कोसळण्याच्या या दहा दुर्घटनांत मनुष्यहानी झालेली नाही, हा त्यातल्या त्यात दिलासा; पण, त्यामुळे कदाचित त्याचे गांभीर्यही अद्याप फारसे अधोरेखित झालेले नसेल.


बिहारची ‘अफसर बिटिया’

टिनू सिंगने २०२३ च्या मध्यंतरीच्या काळात लागोपाठ कॉम्प्युटर ऑपरेटर, सहाय्यक शाखा अधिकारी, बीपीएससी शिक्षक भरतीमधील तीन वेगवेगळ्या अशा एकूण पाच परीक्षा दिल्या होत्या. या सर्व परीक्षांचा निकाल डिसेंबर २०२३ मध्ये सलग पाच दिवस लागणार होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे टिनूच्या मेहनतीला यश आले आणि तिने ज्या पाच परीक्षा दिल्या होत्या त्या सर्व परीक्षांमध्ये ती अव्वल क्रमांकाने पास झाली. टिनूच्या या यशाने जमुई जिल्हाच नाही तर बिहारमध्ये ती चर्चेचा विषय...


मराठा आरक्षण : जरांगेंच्या विधानावर समांतांचं वक्तव्य

Uday Samant On Manoj Jarange Patil Remarks On Election


Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला

Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला Hathras stampede Bhole Baba : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोलेबाबा यांच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये 121 जणांचा बळी गेला. दुर्घटनेनंतरची दृश्य ही मन विषण्ण कऱणारी होती. देवाचा धावा करण्यासाठी आलेले भाविक थेट देवाघरी पोहोचलेत.यात कुणाची आई आहे.कुणाचा बाप आहे. कुणाची बहीण, कुणाचा भाऊ आहे. तर कुणाचे इवले इवले पोटचे गोळे आहेत. सिकंदराबादच्या फुलरई गावात भोलेबाबा नावाच्या महाराजाचा सत्संग आयोजित केला होता. आणि याच सत्संगानंतर, या बाबाच्या पायाखालची माती घेण्यासाठी जत्थेच्या जत्थे धावले. आणि त्यांच्या आयुष्याची अक्षरश: माती झालीय. जिथं हा सत्संग झाला तिथं आता भयाण स्मशान शांतता पसरलीय तर ज्यांचे जीव गेले त्यांच्या घरात फक्त आणि फक्त हंबरडा आणि आक्रोश उरला आहे. हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? सत्संगासाठी 80 हजार जणांची परवानगी असतानाही त्या दिवशी 2.50 लाख भाविक जमले होते. सत्संग संपल्यावर भोलेबाबाची चरणधूळ गोळा करण्यासाठी पळापळ झाली. चरणधुळीसाठी अनेक जण बसलेल्यांच्या अंगावरून धावत गेले. यामुळे अनेक जण खाली पडले, त्यांच्या अंगावरून लोक जात राहिले. काही क्षणांत या पळापळीचं चेंगराचेंगरीत रुपांतर झालं. पुढच्या बाजूनं सत्संग समितीचे लोक भाविकांना रोखत होते. त्यामुळे मागे गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरीची तीव्रता आणखी वाढली. या दुर्देवी घटनेमध्ये जीव गुदमरून 121 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये 100 पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे. अनेकजण यामध्ये जखमीही झाले.


Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?

Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी कोणीच मागे न घेतल्याने 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. 12 जुलैला विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडणार आहे. गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. महायुतीचे नऊ उमेदवार रिंगणात 12 जुलै रोजी होणाऱ्या महाराष्ट्रातील 11 जागांवर होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी 12 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज कायम आहेत....


Ravikant Tupkar | तुपकर काय भूमिका घेणार?

Ravikant Tupkar Today decide political decision


keir starmer : आजचा अग्रलेख, मजूर पक्षाचा नवा सूर्योदय

Prime Minister of the United Kingdom keir starmer: महागाई, असुरक्षितता आदींमुळे त्रस्त झालेल्या मतदारांनी स्टार्मर यांच्या झोळीत भरभरून मतांचे दान टाकले. ३५ टक्के मते आणि चारशेच्या वर जागा यांतून मजूर पक्षाचा भव्य विजय स्पष्ट होतो.


Zika Virus Advisory: झिका व्हायरसचा धोका वाढतोय? आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना ॲडव्हायझरी जारी

Union Health Ministry Issues Advisory to States in view of Zika virus: महाराष्ट्रातील झिका विषाणूची प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना अॅडव्हायजरी जारी केली आहे. झिका विषाणूच्या संसर्गासाठी गर्भवती महिलांची तपासणी करून आणि झिका पॉझिटिव्ह आलेल्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवत राज्यांनी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रुग्णालयांचा परिसर एडिस डासमुक्त ठेवण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी...


Maharashtra Rain Alert: आज राज्यातील या 5 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी

Maharashtra Rain Prediction: आज राज्याच्या जवळपास सर्वच भागात पावसाची शक्यता आहे. मात्र 5 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हे जिल्हे कोणते आहेत ते जाणून घेऊयात...


Aditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संताप

Aditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संताप


Nashik Accident : पुलाचे कठडे तोडत कार थेट कोसळली गोदावरी नदीत, नाशिकमध्ये पुन्हा भीषण अपघात

नाशिक : गंगापूर धरण (Gangapur Dam) परिसरात असलेल्या गोदापात्रात काल मध्यरात्री एक चारचाकी वाहन थेट पुलावरून नदीत कोसळून भीषण अपघात घडला आहे. मागील पंधरा दिवसातील हा तिसरा अपघात (Nashik Accident News) असून या अपघातामध्ये चारचाकी वाहनात असलेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या गंमत जंमत हॉटेलजवळ काल मध्यरात्री एका कारचा भीषण अपघात झाला. कार...


Book Review : जगाचे पोट भरणारा शास्त्रज्ञ

leon hesser biography : खराब रस्ते, कृषी संशोधन केंद्रेही तशीच, अशा विपरीत परिस्थितीत बोरलॉग यांनी कृषिसंशोधन कसे केले? अन्नधान्य उत्पादन कसे वाढवले? त्यासाठी काय-काय प्रयत्न त्यांना करावे लागले? या सगळ्याचा आढावा या पुस्तकातून घेतला आहे.


मैदानावरील Wolf Salute सेलिब्रेशन अन् 5000 जणांचा मृत्यू... नव्या वादाला फुटलं तोंड

New Controversy Over Celebration 5000 Deaths Connection: हा सारा प्रकार समोर आल्यानंतर एका देशाच्या गृहमंत्र्यांनी थेट या प्रकरणाचा उल्लेख करत आक्षेप नोंदवला आहे.


विज्ञानक्षेत्रात ‘ती’ कुठे?

जागतिक स्तरावर संशोधनात स्त्रियांचं प्रमाण ४१ टक्के असल्याचं दर्शवणारा एक नवीन अहवाल समोर आलाय. त्यानुसार सक्रिय संशोधकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण वाढण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.


Sindhudurg News : महाराष्ट्राची चेरापुंजी पर्यटकांनी बहरली, आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी

Amboli Ghat Tourist : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी केली आहे.


Sanjay Raut Full PC : गरज सरो, वैद्य मरो; संजय राऊतांची भाजपवर सडकून टीका

Sanjay Raut Full PC : गरज सरो, वैद्य मरो; संजय राऊतांची भाजपवर सडकून टीका महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे वक्तव्य योग्य असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं. राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार आहे. आम्हाला 175-180 जागा मिळतील असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. केंद्रात राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर इंडिया आघाडीच्या आणखी 25-30 जागा वाढल्या असत्या असे संजय राऊत म्हणाले. कोणतंही सरकार किंवा संस्था बिनचेहऱ्याची असू नये. आपण कोणासाठी मतदान करतो हे लोकांना कळायला हवं. लोकांनी इंदिरा गांधींना, राजीव गांधींना मतदान केलं. मोदींना मतदान केलं. त्यामुळं महाविकास आघाडीला मुख्यमंत्रीदाचा चेहरा हवा हे आमचं मत असल्याचे राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीसांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊत यांनी टीका केली. फडणवीसांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. त्यांच्या पक्षाला राज्यातील जनतेनं झिडकारुन लावलं आहे. ते स्वत:ला नाना फडणवीसांचे मोठे भाऊ समजत होते, पण तसं काही नाही. नाना फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते. त्या साडेतीन शहाण्यांमध्ये यांना स्थान नाही, असे म्हणत राऊतांनी फडणवीसांना टोला लागवाला. नाशिक आणि पुणे ही महाराष्ट्रातील ड्रगची महत्वाची केंद्र पुणे हे ड्रग्जचं केंद्र बनलं आहे. पुणे हे एकेकाळी सामाजिक चळवळीचं केंद्र होतं. पोलिसांची मदत असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा व्यवहार होईल असं वाटत नसल्याचेही संजय राऊत म्हणाले. हे सगळं ड्रग्ज गुजरातमधून येत आहे. नाशिक आणि पुणे ही महाराष्ट्रातील ड्रगची महत्वाची केंद्र आहेत. तरुण ड्रग्जच्या आहारी जातायेत. वरदहस्त असल्याशिवाय हे होऊ शकत नाही असेही राऊत म्हणाले.


जोतिबा मंदिरात शनिवारपासून मूर्ती संवर्धन; गुरुवारपर्यंत दर्शन बंद

करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया एप्रिल महिन्यात पार पडल्यानंतर आता दख्खनचा राजा जोतिबा देवाची मूर्ती संवर्धन प्रक्रिया उद्या रविवार (७ जुलै) पासून सुरू होणार आहे.


ECHS Recruitment 2024: ईसीएचएसअंतर्गत ८वी पास ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरी; ७५,००० रुपये पगार

ECHS Recruitment 2024 Applications: तुम्ही आठवी पास असाल आणि सरकी नोकरीच्या शोधात असाल तर हि संधी वाया जाऊ देऊ नका. माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना म्हणजेच ईसीएचएस अंतर्गत ८ वी पास, १० वी पास, १२ वी पास आणि पदवीधर उमेदवारांची रिक्त पदांवर नियुक्त करण्यासाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या जागांसाठी १५ जुलैपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.


चंद्रमौळी

डोक्यावर चंद्र धारण करणारा, अशा अर्थाने या दोन्ही ठिकाणी ‘चंद्रमौळी’ असा शब्द वापरला जातो. गरिबी असली, अगदी छतही नीट शाकारलेले नसले, तरी घरामध्ये चंद्र उतरणे ही बाब साहित्यिकांनी शब्दबद्ध केली.


MHADA Lottery: मुंबईत घर खरेदीचं स्वप्न पूर्ण होणार; म्हाडाच्या लॉटरीचा मुहूर्त ठरला, वाचा कधी सोडत निघणार

MHADA Mumbai Lottery advertisement: मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी लॉटरीचा मुहूर्त ठरला आहे. त्यामुळे आता मुंबईत आपल्या हक्काचं आणि स्वप्नातलं घर घेण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे.


CBSE Board Exam 2025: सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा पॅटर्न बदलणार; आता वर्षभरात दोनदा परीक्षा घेण्यावर भर

CBSE Latest News in Marathi: CBSE 2025 बोर्ड परीक्षेत मोठा बदल होऊ शकतो. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचे धोरण वर्षातून दोनदा लागू करण्याची तयारी शिक्षण मंत्रालयाने तीव्र केली आहे. सीबीएसई बोर्ड परीक्षेचा पॅटर्न तयार करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील मुख्याध्यापकांकडून सूचना मागवल्या आहेत.


Mumbai Traffic Diversion: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' परिसरातील वाहतूक 5 दिवसांसाठी बंद

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यानुसार मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. बीकेसी परिसरातील वाहतुकीवर या बदलाचा परिणाम होणार आहे. या संदर्भात मुंबई पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, बीकेसी परिसरातील वाहतूक आज 5 जुलै 2024 रोजी सायंकाळी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत आणि 12 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 या चार दिवसांसाठी दुपारी 1 ते रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहील.