Trending:


Maharashtra Vidhan Parishad : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं Mahayuti vs MVA Special Report

सध्या विधानपरिषद निवडणुकीची जोरदार चर्चा रंगलीय... कुणी कुणाला उमेदवारी दिली याची चर्चा तर रंगली आहेच... मात्र त्याचसोबत, कोणत्या उमेदवाराची किती संपत्ती आहे... आणि उमेदवारांनी संपत्तीच्या बाबतीत कशी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतलीयत... पाहूयात... पंकजा मुंडेंची संपत्ती किती? उत्पन्नाचा स्त्रोत- शेती, माजी आमदार निवृत्तीवेतन, भाडे बँक खात्यांत- ९१ लाख २३ हजार ८६१ शेअर्स, म्युच्युअल फंड- १ कोटी २८ लाख, ७५ हजार ६९४ स्वत:च्या नावावर एकही वाहन नाही स्थावर मालमत्ता- ९६ लाख, ७३ हजार, ४९० जंगम मालमत्ता- ६ कोटी ८ लाख, १५ हजार, ७०९ एकूण कर्ज- २ कोटी, ५० लाख, ३२ हजार ४२७ सोने- ४५० ग्रॅम (३२ लाख, ८५ हजार) ------------------- मिलिंद नार्वेकरांची संपत्ती किती? उत्पन्नाचा स्त्रोत- घरांचे भाडे, व्यावसायिक उत्पन्न बँक खात्यांत- ७४ लाख १३ हजार, २४३ बॉण्ड्स, म्युच्युअल फंड- ५० हजार रुपये पोस्ट, पॉलिसीमध्ये- ३ लाख ६८ हजार, ७२९ स्वत:च्या नावावर एकही कोणतेही वाहन नाही सोने- ३५५ ग्रॅम (२४ लाख, ६७ हजार ९८१) जमीन- दापोली येथे ७४ एकर जमीन मालाड, बोरीवली १ हजार चौरस फुटाचं घर एकूण कर्ज- २६ लाख, ३८ हजार, १६० रुपये --------------- भावना गवळी यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा स्त्रोत- घरांचे भाडे, व्यावसायिक उत्पन्न बँक खात्यांत- २१ लाख २५ हजार ०१६ रुपये बॉण्ड्स, म्युच्युअल फंड- २७ हजार ७०० हजार रुपये पोस्ट, पॉलिसीमध्ये- २० लाख वाहन - टोयाटो इनोव्हा- २४ लाख ३७ हजार रुपये सोने- २०० ग्रॅम (१३ लाख ६० हजार ) जमीन- रिसोड येथे ५ एकर ५६ गुंठे जमीन वाशिममध्ये ५ हजार चौरस फुटाचं घर ------------------- सदाभाऊ खोत यांची संपत्ती बँक खात्यांत- २ लाख ०८ हजार ८४० बॉण्ड्स, म्युच्युअल फंड- ५३ हजार रुपये पोस्ट, पॉलिसीमध्ये- ५८ लाख ९ हजार ५०० वाहन - टोयाटो इनोव्हा क्रिस्ट- २९ लाख रुपये एमजी हेक्टर झेड एस इव्ही किंमत २३ लाख सोने- १५ ग्रॅम (१३ लाख ६० हजार ) सांगली ६१२ चौरस फुटांचं घर


नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेची साईट उपलब्ध नाही


Pune BJP : हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक, राहुल गांधींविरोधात भाजपचं आंदोलन

राहुल गांधींनी हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक -------------------- काँग्रेस, राहुल गांधींविरोधात भाजपचं आंदोलन ------------------ पोलिसांकडून भाजप कार्यकर्त्यांची धरपकड नवी दिल्ली : काही लोकांनी निवडणुकीच्या वेळी सर्व मार्गांचा अवलंब केला, पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही, काही लोकांच्या वेदना मी समजू शकतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांना टोला लगावला. खोटं पसरवूनही विरोधकांचा पराभव झाल्याचं ते म्हणाले. आपल्या कार्यकाळात देशातील 25 कोटी जनता गरिबीच्या बाहेर आली असं नरेंद्र मोदी म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्यास सुरूवात करताच लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी सभासदांना समज दिली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा खासदार झालेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केलं. तसेच जनतेने तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी देशवासियांचे आभार मानले.


Sawantwadi News | सावंतवाडी ZP शाळेचा एक भाग कोसळला

Sawantwadi news zp school bad condition


Weather update : महाराष्ट्रावर धडकणार मोठं संकट; पुढील 2 दिवस महत्त्वाचे

महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD)देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात आज पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सोबतच वादळी वाऱ्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. विदर्भात समाधानकारक पाऊस झाला नव्हता मात्र गेले दोन दिवस पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान पुढील 24 तासांमध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकणाबाबत बोलायचं झाल्यास पुढील 24 तासांमध्ये कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ढगाळ वातावरण राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. मुंबईत पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या काळात मुंबईचं तापमान 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान या काळात नुसता पाऊसच पडणार नसून, वादळाच्या रुपानं मोठं संकट देखील समोर आहे. या काळात ताशी 50 ते 60 किमी वेगानं वारं वाहू शकतं असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून आज पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.


Gondia Agriculture Department Raid | गोंदियात बोगस बियाणे विक्रेत्यांवर कृषी विभागाची कारवाई

Gondia Agriculture Department Raid | Agriculture department action against bogus seed sellers in Gondia


Zero Hour Guest Ambadas Danve : दानवेंचं गोऱ्हेंना पत्र, निलंबन मागे की कालावधी कमी करणार?

भेटी, बैठकांच्या बातमीनंतर.. आता पुन्हा जावूया विधिमंडळाच्या अधिवेशनात... आज चर्चा रंगली आहे ती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निलंबनाची.. परवा, म्हणजेच १ जुलै रोजी आक्रमक भूमिका मांडताना दानवेंनी, सभागृहातच भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती.. त्यानंतर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी, दानवेंचं ५ दिवसांसाठी निलंबनदेखील केलं.. यावर दानवेंच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी, महिलांची जाहीर माफी मागितली.. त्यानंतर दानवे यांनी एक पाऊल मागे घेत, याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली.. त्याबाबत बोलण्यासाठी थोड्याच वेळात स्वत: अंबादास दानवे झीरो अवरमध्ये उपस्थित असणार आहेत... निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती करणारे पत्र, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हेंंना त्यांनी दिलंय.. यावर दुपारी डॉ. निलम गोऱ्हेंंच्या दालनात बैठकदेखील पार पडली.. दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी केला जाऊ शकतो.. याबाबतचा निर्णय झाला असून, उद्या संसदीय कार्यमंत्री त्या निर्णयाची घोषणा करतील.. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधान परिषदेत दिली...


Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?

विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय... सर्वच पक्षांकडून मतांची बेगमी करण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. त्यातच, पुरेशी संख्याबळ नसताना उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरवलंय... त्यामुळे मोठी चुरस निर्माण झालीय... पाहूयात... मिलिंद नार्वेकरांचा प्रवास मिलिंद नार्वेकर उद्धवठाकरे यांचे अत्यंतजवळचे १९९२ साली गटप्रमुखअसताना नार्वेकरपहिल्यांदा मातोश्रीवर नार्वेकरांची कामाचीपद्धत पाहून ठाकरेंनीत्यांना जवळ केलं उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठी,दौऱ्यांचं नियोजननार्वेकरांकडे अनेक नेत्यांचेशिवसेना सोडतानामिलिंद नार्वेकरांवर आरोप शिंदेंच्या बंडावेळी आमदारपरत आणण्याची जबाबदारीनार्वेकरांवर मिलिंद नार्वेकर यांचेभाजप, शिंदेसेनेसहसर्वच पक्षात चांगले संबंध शिवसेनेच्या फुटीनंतर मिलिंद नार्वेकर हे शिंदेंसोबत जाण्याबाबतच्या चर्चा रंगल्या होत्या... त्या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकर यांची विधानपरिषदेची उमेदवारी चर्चेचा विषय ठरलीय. त्यामुळे आता मिलिंद नार्वेकरांच्या विजयासाठी गणितं नेमकी कशी जुळवली जातात, हे बघावं लागेल.


Mhada 2000 Housing Lottery । म्हाडाच्या 2000 घराची लॉटरी; घरे कुठे आणि किती असणार किंमती?

Mhada 2000 Housing Lottery. Mhada's 2000 House Lottery; Where and how much will the prices be?


Encroachment Action In Lonavala : भुशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासनाने शेकडो अनधिकृत हॉटेल्स व टपऱ्यांवर फिरवला बुलडोझर

Encroachment action in Lonavala : भुशी धरण परिसरात पर्यटनाला अडसर ठरणारी छोटे हॉटेल, फेरीवाले, चना-चाट विक्रेत्यांवर कारवाई करत बुलडोझर फिरवला आहे. लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल्वे मंडळ प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली आहे.


मागील पानावरून पुढे

Om Birla : विरोधकांनीही मतविभागणी न मागता संख्याबळाची झाकली मूठ कायम ठेवली. उमेदवार निश्चित करताना विश्वासात न घेतल्याबाबत तृणमूल काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्याने ‘इंडिया’ आघाडीतील कुरबुरीही समोर आल्या.


Kolhapur News: कोल्हापुरात राहत्या घरात 4 फूट खोल खड्डा खोदून सुरू होती पूजा, गुप्तधनाच्या लालसेपोटी....

Kolhapur News: गुप्त धनाच्या लालसेपोटी राहत्या घरात चार ते पाच फूट खड्डा खोदून अघोरी पूजा सुरू होती. कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात हा नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत तपासणी केली. दरम्यान, याप्रकरणी सहा संशयितांना मंगळवारी मध्यरात्री पोलीसांनी अटक केली. गुप्त धनाच्या लालसेपोटी पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात हा प्रकार घडल्याने जिल्ह्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.


Password Safety: 17 टक्के भारतीय नागरिक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत बेफिकीर; सर्वेक्षणातून आले समोर

Password Safety negligence : 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षितपणे पासवर्ड जतन करतात, सर्वेक्षणात धक्कादायक सत्य उघड झाले: भारतीय लोक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत निष्काळजी वृत्ती बाळगतात. लोकांना त्यांच्या फोनमध्ये पासवर्ड सेव्ह करण्याची किंवा नोटपॅडवर लिहून ठेवण्याची सवय असते. अशा निष्काळजीपणामुळे डेटा चोरीचा धोका वाढतो. एका सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षित पद्धतीने पासवर्ड सेव्ह करतात.


Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE : अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक, शिंदे सरकारला कोंडित पकडणार?

Marathi News Live Update : विधीमंडळ अधिवेशनासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.


Vishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम

Vishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता यांना दिलेल्या आहारात चक्क मृत सापाचे किरडू आढळल्याची घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील पळूस तालुक्यात हा प्रकार उघडकीस आलाय. पलूस परिसरातील लाभार्थी पालक व अंगणवाडी सेविकात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना पोषण आहार गेली अनेक वर्षे पुरवला जातो. यामध्ये या अगोदर हरभरा तांदूळ,तूरडाळ,गहू, तिखट,मीठ विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या. नुकताच एप्रिल व मे महिन्याचा पोषण आहार पलूस येथील केंद्रावर पोहोच करण्यात आला. तो तत्परतेने संबधित लाभार्थ्यांना संपर्क करून आहार घेऊन जाण्यास सांगितले.


Mumbai Central Public Park : न्यूयॉर्क, लंडनसारखं आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ लवकरच मुंबईत

Mumbai Central Public Park On 300 Acres : मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क विकसित होणार आहे. ३०० एकरवर हे उभारण्यात येणार असून यासाठी प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे.


नीट पेपरफुटी प्रकरणात पालकांकडून पैशांची फसवणूक

NEET Exam Paper Leak Accused And Wife Account Showing Transaction Of 7 Lakhs


‘दीक्षाभूमी’चा प्रक्षोभ

Deekshabhoomi Nagpur : दीक्षाभूमी स्मारक समितीने संवादी भूमिका टाळल्याने आणि एकूणच पारदर्शकता न दाखविल्याने हा तिढा चिघळल्याचा अनेकांचा आरोप आहे.


Job Majha : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथे विविध पदांसाठी भरती : 3 July 2024 : ABP Majha

Job Majha : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथे विविध पदांसाठी भरती : 3 July 2024 : ABP Majha हेही वाचा BOB Jobs 2024 : बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी, 600 हून अधिक पदांवर भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या Bank of Baroda Jobs 2024 : तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात (Job Vacancy) असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत विविध पदांवर भरती करण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावा. इच्छुक आणि पात्र उमेदवार bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. बँक ऑफ बडोदामध्ये 627 पदांवर भरती बँक ऑफ बडोदामध्ये वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यात येत आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 627 पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 12 जून 2024 पासून सुरु झाली आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख 2 जुलै 2024 आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळीच अर्ज दाखल करावा.


Bharat Ratna to Shahu Maharaj: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न; राज्य सरकारमधील मंत्र्यांचे मोठे वक्तव्य

Shahu Maharaj: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने हसन मुश्रीफ यांनी महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी सरकारकडे विनंती करणार असल्याचे सांगितले.


Vidhansabha Election: वंचित बहुजन आघाडी ॲक्शन मोडमध्ये; आंबेडकरांनी कंबर कसली!

मुंबईत VBA विधानसभेची तयारी सुरू करून, आम्ही सकारात्मक कृती आणि मतदार संबंधांवर लक्ष केंद्रित करून २६ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारतो. उमेदवार हार्ड कॉपी अर्ज देखील सबमिट करू शकतात. छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणांच्या वारशाचे अनुसरण करून वंचितांना सशक्त करणे आणि मतदार संपर्क मजबूत करणे हे VBA चे उद्दिष्ट आहे.


Ajit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार

Ajit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार हेही वाचा : कारखान्यासाठी कर्ज डावल्याने अशोक पवारांनी (Ashok Pawar) अजित पवारांना (Ajit Pawar) चॅलेंज केले आहे. 'एनएसडीसी'कडे (NSDC) सादर केलेल्या कर्जाच्या फाईल मध्ये त्रुटी असतील तर संबंधितांनी दाखवाव्यात. माझी कर्जाची फाईल 100% बरोबर आहे. मी समोरासमोर बसून चर्चा करेन असे आव्हान अशोक पवारांनी दिले. मी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत राहिलो म्हणून माझ्यावर अन्याय करणार असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशा शब्दात अशोक पवारांनी अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली. केवळ विरोधी पक्षात आहे म्हणून निधी दिला जात नाही हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. दोन दिवसांपूर्वी राज्यातील १३ कारखान्यांना एनएसडीसीकडून कारखान्यांना 1800 कोटींहून अधिक मर्जीचे कर्ज देण्यात आले होते. यामध्ये विरोधी पक्षात असणाऱ्या कारखान्यांना कर्ज डावलले गेल्याचा आरोप होत असून पुण्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं

Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं नवी दिल्ली : इन्फोसिसच्या सहसंस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy) यांच्या पत्नी आणि लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य (Rajya Sabha) म्हणून निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. सुधा मूर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती ही ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी आहे. पीएम मोदींनी लिहिले की, "भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती केल्याचा मला आनंद आहे. सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान प्रचंड आणि प्रेरणादायी आहे. त्यांची राज्यसभेतील उपस्थिती ही एक महत्त्वाची गोष्ट आहे." आपल्या 'नारी शक्ती'चा एक शक्तिशाली पुरावा, जो आपल्या देशाचे नशीब घडवण्यात महिलांच्या सामर्थ्याचे आणि क्षमतेचे उदाहरण देतो. मी त्यांना यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो.