बातम्या

Trending:


Mumbai Central Public Park : न्यूयॉर्क, लंडनसारखं आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ लवकरच मुंबईत

Mumbai Central Public Park On 300 Acres : मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क विकसित होणार आहे. ३०० एकरवर हे उभारण्यात येणार असून यासाठी प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे.


Kolhapur News: कोल्हापुरात राहत्या घरात 4 फूट खोल खड्डा खोदून सुरू होती पूजा, गुप्तधनाच्या लालसेपोटी....

Kolhapur News: गुप्त धनाच्या लालसेपोटी राहत्या घरात चार ते पाच फूट खड्डा खोदून अघोरी पूजा सुरू होती. कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात हा नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत तपासणी केली. दरम्यान, याप्रकरणी सहा संशयितांना मंगळवारी मध्यरात्री पोलीसांनी अटक केली. गुप्त धनाच्या लालसेपोटी पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात हा प्रकार घडल्याने जिल्ह्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.


Raj Thackeray: आयुष्यात कुणाला घाबरता? राज ठाकरेंचं उत्तर ऐकून सगळेच भारावले

मुंबई: तडाखेबाज भाषण आणि बेधडक निर्णय शैलीमुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. विरोधकांना किंवा सरकारच्या निर्णयावर घेऊन ठाकरी शैलीत फटकेबाजी करणारे राज ठाकरे आयुष्यात खरंच कुणाला घाबरतात का, असा सवाल थेट एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दिलेलं उत्तर ऐकून सगळेच भारावून गेले आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी...


MLA Fund : निधीवाटपावरुन जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप, भाजपकडून सभागृहात गदारोळ

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या निधीवाटपावरुन महायुती सरकारवर गंभीर आरोप, मला आमदार निधी मिळला नाही अशी खंत आव्हाडांनी सभागृहात बोलून दाखवली.


Ladki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधाव

Ladki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधाव आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने राज्य सरकारसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या (CM Ladki Bahin Yojna) अंमलबजावणीसंदर्भात मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी एक मागणी केली आहे. राज्य सरकारने दोन बायका किंवा दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषत: मुस्लीम महिलांना (Muslim Women) या योजनेचा फायदा देऊ नये, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे. प्रकाश महाजन यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल. राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' एका उदात्त हेतूने सुरु केली आहे. त्यामुळे राज्यातील महिला सक्षम होतील. मात्र, राज्य सरकारने या योजनेसाठी डोमिसाईल प्रमाणपत्राची घातलेली अट गरजेची आहे. डोमिसाईल प्रमाणपत्राची अट रद्द केल्यास राज्याबाहेरील लोक याचा फायदा घेतील, असे मतही प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले.


Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दर

Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दर हेही वाचा : देवगिरी निवासस्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची रात्री बैठक संपन्न... नवाब मलिकही बैठकीला उपस्थित..मलिकांना महायुतीत घेण्यास याआधी फडणवीसांनी केला होता विरोध उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक अटळ,शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात अंबादास दानवेंच्या शिवीगाळीबाबत उद्धव ठाकरेंनी मागितली माफी...तर अंबादास दानवेंचं निलंबन एक षडयंत्र, ठाकरेंचा हल्लाबोल तुम्ही नकली वाघांसोबत आहात इथे असली वाघांमध्ये या...वाघनखं कधी आणणार या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जयंत पाटलांना टोला... लाडकी बहीण योजनेत दोन बदल... वयाच्या मर्यादेत ६५ वर्षांपर्यंत वाढ, तर पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार.. तर अर्ज भरण्यासाठी ⁠३१ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ.. उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये भोलेबाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, ११६ भाविकांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त


Job Majha : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथे विविध पदांसाठी भरती : 3 July 2024 : ABP Majha

Job Majha : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथे विविध पदांसाठी भरती : 3 July 2024 : ABP Majha हेही वाचा BOB Jobs 2024 : बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी, 600 हून अधिक पदांवर भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या Bank of Baroda Jobs 2024 : तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात (Job Vacancy) असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत विविध पदांवर भरती करण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावा. इच्छुक आणि पात्र उमेदवार bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. बँक ऑफ बडोदामध्ये 627 पदांवर भरती बँक ऑफ बडोदामध्ये वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यात येत आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 627 पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 12 जून 2024 पासून सुरु झाली आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख 2 जुलै 2024 आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळीच अर्ज दाखल करावा.


Rahul Gandhi | राहुल गांधी विठुरायाच्या दर्शनासाठी येणार

Rahul Gandhi To Visit Pandharpur For Vitthal Rukmini Darshan


Vishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम

Vishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता यांना दिलेल्या आहारात चक्क मृत सापाचे किरडू आढळल्याची घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील पळूस तालुक्यात हा प्रकार उघडकीस आलाय. पलूस परिसरातील लाभार्थी पालक व अंगणवाडी सेविकात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना पोषण आहार गेली अनेक वर्षे पुरवला जातो. यामध्ये या अगोदर हरभरा तांदूळ,तूरडाळ,गहू, तिखट,मीठ विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या. नुकताच एप्रिल व मे महिन्याचा पोषण आहार पलूस येथील केंद्रावर पोहोच करण्यात आला. तो तत्परतेने संबधित लाभार्थ्यांना संपर्क करून आहार घेऊन जाण्यास सांगितले.


SSC Recruitment 2024: सरकारी नोकरीची संधी, कर्मचारी निवड आयोगात ८ हजारांपेक्षा अधिक जागांसाठी भरती

Staff Selection Commission Recruitment: कर्मचारी निवड आयोगात एकूण ८ हजार ३२६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसंदर्भात आवश्यक माहिती जाणून घेऊयात.


Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE : अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक, शिंदे सरकारला कोंडित पकडणार?

Marathi News Live Update : विधीमंडळ अधिवेशनासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.


संविधानभान : मूलभूत हक्कांवरील मर्यादा…

अनुच्छेद ३३ नुसार मूलभूत हक्कांत फेरफार करण्याचा अधिकार संसदेला आहे. संसद कोणाच्या हक्कांत व का फेरबदल करू शकते, याविषयी...


नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेची साईट उपलब्ध नाही


Bharat Ratna to Shahu Maharaj: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न; राज्य सरकारमधील मंत्र्यांचे मोठे वक्तव्य

Shahu Maharaj: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने हसन मुश्रीफ यांनी महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी सरकारकडे विनंती करणार असल्याचे सांगितले.


अकरावी प्रवेश प्रक्रिया : पहिली प्रवेश यादी जाहीर

मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावीची केंद्रीय प्रवेशाची पहिली प्रवेश यादी आज (२७ जून) सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आली.


Password Safety: 17 टक्के भारतीय नागरिक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत बेफिकीर; सर्वेक्षणातून आले समोर

Password Safety negligence : 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षितपणे पासवर्ड जतन करतात, सर्वेक्षणात धक्कादायक सत्य उघड झाले: भारतीय लोक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत निष्काळजी वृत्ती बाळगतात. लोकांना त्यांच्या फोनमध्ये पासवर्ड सेव्ह करण्याची किंवा नोटपॅडवर लिहून ठेवण्याची सवय असते. अशा निष्काळजीपणामुळे डेटा चोरीचा धोका वाढतो. एका सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षित पद्धतीने पासवर्ड सेव्ह करतात.


Uddhav Thackeray and Aaditya Thackeray : "Mahalaxmi Race Course ची जागा बिल्डरांच्या घशात घालू नका"

Uddhav Thackeray and Aaditya Thackeray : "Mahalaxmi Race Course ची जागा बिल्डरांच्या घशात घालू नका" Mahalaxmi Racecourse 120 Acres Land Handover To BMC: मुंबई : महालक्ष्मी रेस कोर्सची (Mahalaxmi Race Course) 120 एक्कर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या (BMC) ताब्यात देण्यास राज्य सरकारनं (Maharashtra Government) मंजुरी दिली आहे. महालक्ष्मी (Mumbai News) रेसकोर्सची 120 एकर जागेत सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी जागा वापरली जाणार आहे. 1914 साली रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 99 वर्षांच्या लीजवर ही जागा देण्यात आली होती. त्यानंतर हा करार 2013 मध्ये संपुष्टात आला होता. त्यानंतर या जमिनीवर थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. या प्रकल्पात थीम पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनर असा समावेश होता. या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. थीम पार्क उभारण्यासाठी ही जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करणे गरजेचे होते. ही 211 एकर जागा आहे. त्यामध्ये 91 एकर जागा टर्फ क्लबला ठेवण्यात येणार आहे, तर उर्वरित 120 एकर जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित केली जाईल. आतापर्यंत ही जागा लीजवर देण्यात आली होती.


Sawantwadi News | सावंतवाडी ZP शाळेचा एक भाग कोसळला

Sawantwadi news zp school bad condition


Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठक

मुंबई: हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली आहे. या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील राजकीय समीकरणं बदलणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे संतोष बांगर यांची भेट झाल्यानंतर हिंगोलीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. अधिवेशनाच्या कालावधीत ही भेट झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्या दरम्यान संतोष बांगर आणि त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्या गेल्या. पण आता हे दोन्ही नेते अब्दुल सत्तारांच्या घरी भेटले आणि ही भेट गुप्त होती. त्यामुळेच ही भेट हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणं बदलवणारी ठरण्याची शक्यता आहे.


Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial Report

नागपुरात झालेल्या आंदोलनाबाबत आता एक नवी माहिती समोर आलीय. या आंदोलनात नागपूरच्या बाहेरच्यांचा काही सहभागी होता का असा संशय उत्पन्न झालाय. स्मारक समितीने सुरू केलेल्या सौदर्यकरण प्रकल्पाला अचानक विरोध कसा काय सुरू झाला, इथपासून कालच्या आंदोलनापर्यंत अनेक प्रश्न निर्माण होतात. या संदर्भात एबीपी माझाने थेट स्मारक समिती विश्वस्तांशी चर्चा केली... त्यातून कोणती माहिती समोर आलीय. पाहूया हा रिपोर्ट देशातलंच नाही तर जगातलं एक महत्त्वाचं श्रद्धास्थान... या ऐतिहासिक भूमीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचारांचा अंकूर पेरला, त्याचा आता जगभरात वटवृक्ष झालाय. मात्र इथल्या सौंदर्यीकरण प्रकल्पातील अंडरग्राऊंड कामाला विरोध करत १ जुलैला आंदोलन पेटलं. अंडरग्राऊंड सुरु असलेल्या विरोधाची कारणं जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने स्मारक समितीच्या विश्वस्तांशी चर्चा केली. त्यांनी दिलेली माहितीही या प्रकरणात जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल.


Zero Hour Guest Ambadas Danve : दानवेंचं गोऱ्हेंना पत्र, निलंबन मागे की कालावधी कमी करणार?

भेटी, बैठकांच्या बातमीनंतर.. आता पुन्हा जावूया विधिमंडळाच्या अधिवेशनात... आज चर्चा रंगली आहे ती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निलंबनाची.. परवा, म्हणजेच १ जुलै रोजी आक्रमक भूमिका मांडताना दानवेंनी, सभागृहातच भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती.. त्यानंतर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी, दानवेंचं ५ दिवसांसाठी निलंबनदेखील केलं.. यावर दानवेंच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी, महिलांची जाहीर माफी मागितली.. त्यानंतर दानवे यांनी एक पाऊल मागे घेत, याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली.. त्याबाबत बोलण्यासाठी थोड्याच वेळात स्वत: अंबादास दानवे झीरो अवरमध्ये उपस्थित असणार आहेत... निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती करणारे पत्र, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हेंंना त्यांनी दिलंय.. यावर दुपारी डॉ. निलम गोऱ्हेंंच्या दालनात बैठकदेखील पार पडली.. दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी केला जाऊ शकतो.. याबाबतचा निर्णय झाला असून, उद्या संसदीय कार्यमंत्री त्या निर्णयाची घोषणा करतील.. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधान परिषदेत दिली...


Vidhansabha Election: वंचित बहुजन आघाडी ॲक्शन मोडमध्ये; आंबेडकरांनी कंबर कसली!

मुंबईत VBA विधानसभेची तयारी सुरू करून, आम्ही सकारात्मक कृती आणि मतदार संबंधांवर लक्ष केंद्रित करून २६ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारतो. उमेदवार हार्ड कॉपी अर्ज देखील सबमिट करू शकतात. छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणांच्या वारशाचे अनुसरण करून वंचितांना सशक्त करणे आणि मतदार संपर्क मजबूत करणे हे VBA चे उद्दिष्ट आहे.


Central Railway : नाहूर - मुलुंड स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा, मध्य रेल्वे उशिराने

Central Railway News : मध्य रेल्वेवरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. रात्री सव्वा दहाच्या सुमारास रेल्वे ट्रॅकला तडा गेल्याने धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आता लोकल सुरू झाली असून उशिराने धावत आहे.